विद्यार्थ्यानो, अपयश म्हणजे तात्पुरती माघार असते, तो अंतिम टप्पा नसतो.

देशात दहावी-बारावीच्या निकालादरम्यान हजारो विद्यार्थी आत्महत्या करतात. अपयश आल्याने किंवा अपयश येण्याच्या भीतीने. अपयश ह्या शब्दातच यश आहे. तुम्ही अपयशी झालात म्हणजे तुमचं ते पूर्णपणे अपयश नसतं, त्या अपयशातूनही तुम्ही काहीनाकाही यश मिळवलेलं असतं, नक्कीच. अपयश हा अंतिम टप्पा नसतो, तो फक्त एक अडथळा असतो तात्पुरता. कुठल्याही अपयशावर आत्महत्या हा तोडगा नाही, अपयश पचवायला शिकलं पाहिजे. तुम्ही हारलात हे बघू नका, तुम्ही खेळलात हे बघा. कुठल्याही परीक्षेत नापास होणं म्हणजे आयुष्यातलं सगळं संपलंं असं नाही. तुम्हाला जेव्हा वाटतं की आता सगळं संपलं आहे… तेव्हाच खरी सुरुवात झालेली असते. परीक्षा रद्द…

पुढे वाचा

शेतीबाडीच्या कविता

साहित्य चपराक’चे सहसंपादक आणि प्रतिभावंत कवी माधव गिर यांचे ‘नवं तांबडं फुटेल’ आणि ‘शेतीबाडी’ हे दोन अस्सल कवितासंग्रह प्रकाशित आहेत. त्यांच्या कवितांना प्रचंड वाचकप्रियता लाभली. शेती आणि शेतकर्‍यांच्या जीवनावर आधारित असलेल्या ‘शेतीबाडी’ या अष्टाक्षरी खंडकाव्यात त्यांनी अनेक प्रश्‍न सुहृदयतेने हाताळले आहेत. शिक्षकी पेशात कार्यरत असलेले गिर सर स्वतः शेतकरी असल्याने त्यात शेतकर्‍यांच्या सुखदुःखाचे प्रतिबिंब लखलखीतपणे उमटले आहे. सध्याच्या शेतकरी संपाच्या पार्श्‍वभूमिवर त्यांच्या ‘शेतीबाडी’तील काही रचना खास ‘चपराक’च्या वाचकांसाठी. आपल्याला त्या आवडतील याची खात्री आहेच. या कवितांवरील  आपल्या प्रतिक्रिया अवश्य कळवा; तसेच या कविता जास्तीत जास्त शेअर करा. जातीचा मी शेतकरी                                      …

पुढे वाचा