’गर्भ भाड्याने देणे आहे!’

घर भाड्याने देणे आहे, सायकल भाड्याने देणे आहे, टीव्ही भाड्याने देणे आहे, या श्रेणींत मानवी अवयवाने केव्हा स्थान मिळवले, कळलेही नाही. गर्भ भाड्याने देणे आहे किंवा गर्भाशय भाड्याने देणे आहे, काही वर्षांपूर्वी विचित्र वाटलेली या संकल्पना हळूहळू कळत नकळत आमच्या विचारात रुजू लागली आहे, नव्हे समाजात बर्‍यापैकी प्रस्थापित होऊ लागली आहे. कोणत्याही कारणाने स्त्री बाळाला जन्म देण्यास असमर्थ असेल व इच्छा असूनही तिला किंवा एखाद्या जोडप्याला स्वतःच्या अपत्याचे सौख्य लाभू शकत नसेल, अशा वेळेस त्या स्त्रीचे किंवा दुसर्‍या स्त्रीचे बीजांड व पुरुषाच्या शरीरातील शुक्राणू याचे प्रयोगशाळेत फलन घडवून आणले जाते.…

पुढे वाचा

संवाद साधनांद्वारे किती होतोय खराखुरा संवाद?

‘मेरे पिया गये है रंगून, किया है वहां से टेलिफुन; तुम्हारी याद सताती है, जीया मे आग लगाती है…’ हे प्रचंड गाजलेलं गीत आहे! 1949 साली आलेल्या ’पतंगा’ या चित्रपटासाठी प्रसिद्ध गायिका शमशाद यांनी गायलेलं. कोणत्याही कलाकृतीवर तत्कालीन समाजाच्या विचारसरणीचा प्रभाव असतो हे विचारात घेऊन हे गीत ऐकल्यास लक्षात येते की त्या काळी समाजाला टेलिफोनचे किती प्रचंड कौतुक होते! दूरवरच्या जीवलगाला टेलीफोनवर बोलता येणे ही बाबच मुळी प्रचंड कुतुहलाची आणि कौतुकाची! शमशाद बेगमच्या आवाजातून हा भाव खूप सुंदररित्या व्यक्तही झाला आहे.

पुढे वाचा