‘साहित्य चपराक’ दिवाळी २०१७ महाविशेषांकासाठी साहित्य पाठवा!

लिहित्या हातांना आवाहन…

‘साहित्य चपराक’ दिवाळी महाविशेषांकासाठी साहित्य पाठवा!

‘साहित्य चपराक’ दिवाळी महाविशेषांकाचे काम शेवटच्या टप्प्यात आहे. वैविध्यपूर्ण विषयांवरील दर्जेदार साहित्याने नटलेला हा अंक वाचकप्रिय ठरला आहे. तब्बल पाचशे पानांचा आणि संपूर्ण बहुरंगी छपाई असलेला हा अंक सहा राज्यात वितरित होतो. आपणही या अंकात सहभाग नोंदवू शकता.

त्यासाठी विषयाचे, साहित्य प्रकाराचे अथवा शब्दांचे बंधन नाही. ‘गुणात्मक दर्जा’ हा एकमेव निकष असेल. आपण जर काही सर्वोत्तम लिहिले असेल तर 15 जुलै 2017 पर्यंत आमच्याकडे पाठवू शकता.

साहित्य निवडीचा अधिकार अर्थातच आमच्या संपादकीय सहकार्‍यांचा आहे. अस्विकृत साहित्य परत पाठवले जात नाही. ज्या साहित्याची निवड झालीय त्यांना 20 जुलैपर्यंत कळवले जाईल. त्याबाबत वेगळा पत्रव्यवहार अथवा दूरध्वनीवर सातत्याने विचारणा करू नये!

आपण जर लेखनाचे काही वेगळे प्रयोग केले असतील तर लाखो वाचकांपर्यंत पोहोचण्याची ही संधी आहे.

साहित्य पाठवण्याचा पत्ता – मासिक ‘चपराक’, 617, साईकृपा, पहिला मजला, शिवाजी रस्ता, शुक्रवार पेठ, पुणे 411 002.
दूरध्वनी – 020- 24460909
ई-मेल – chaprakdiwali@gmail.com

टीम चपराक

गेली 15 वर्षे पूर्णवेळ पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत. साप्ताहिक ‘चपराक’ आणि मासिक ‘साहित्य चपराक’चे मालक, मुद्रक, प्रकाशक आणि संपादक. ‘चपराक प्रकाशन’ या प्रकाशन संस्थेचे प्रकाशक, संचालक. महाराष्ट्रातील सर्वात कमी वयाचा स्वतंत्र संपादक.

प्रतिक्रिया

प्रतिक्रिया

हे ही अवश्य वाचा