कष्ट-त्याग-समर्पणाची गाथा- ‘अग्निदिव्य’

एका स्त्रीचा स्वतःच्या अस्तित्वासाठी व स्वतःच्या मुलाला हक्क व न्याय मिळवून देण्यासाठी दिलेला हा लढा, एक संघर्ष म्हणजेच हे पुस्तक. हे पुस्तक वाचताना एका स्त्रीचा लढा केवळ ‘अग्नितांडव’ न राहता तो ‘अग्निदिव्य’ कसा बनत गेला, याची प्रचिती हेते. कारण पुस्तकाच्या या नावातच या पुस्तकाचा सर्व गाभा दडलेला आहे. एका मुलाची आंतरिक वेदना, एका महिलेचा आभाळाएवढा संघर्ष व समाजमन असे तीन टप्पे युवालेखक आशिष निनगुरकर यांच्या ‘अग्निदिव्य’ या चरित्रात्मक पुस्तकात आहेत. एका महिलेने व तिच्या मुलाने केलेला संघर्ष म्हणजे हे पुस्तक अशीच प्राथमिक ओळख या पुस्तकाची करून द्यावी लागेल.

पुढे वाचा

देह निरांजन झाला – माधव गिर

तापी दुथडी भरून वाहत नसली तरी दोन्ही किनाऱ्याच्या  मधोमध एक मोठी धार वाहत झेपावत पुढे निघाली होती. आज तिच्या काठावर अभंगाचे सूर उमटले. टाळ-मृदुंगाचा नाद घुमला. हरिनामाचा गजर झाला. हिरव्या कंच वनराईत भगव्या पताका डोलू लागल्या. आळंदीहून निघालेला वैष्णवांचा मेळा तापीच्या किनाऱ्यावर विसावला. हे पाहून तापीचा प्रवाह आनंदला! संत जनांची मांदियाळी पाहून त्या प्रवाहाचे डोळे भरून पावले. तो दिवस, हो तोच दिवस, तापी आजपावेतो कधीही विसरली नाही. विसरणारही नाही. तो दिवस होता – ‘वैशाख मासातील वैद्य दशमीचा.’ 

पुढे वाचा

ना देवी, ना दासी – – हिरालाल पगडाल, संगमनेर

लाखो वर्षाच्या मानवी इतिहासाच्या वाटचालीत एक बाब स्पष्टपणे दिसून येते ती म्हणजे जगातील बहुसंख्य संस्कृतींनी स्त्रीच्या महात्म्याला दगडाच्या, मातीच्या, धातूच्या मूर्तीत बंद करून देवळात कोंडून ठेवले आहे. वास्तव जीवनात मात्र स्त्रीच्या वाट्याला पुरुषांच्या तुलनेत दुय्यम स्थान दिले आहे. तिचे जिणे पुरुषांच्या तुलनेत कष्टदायी आणि विनासन्मानाचे  आहे.

पुढे वाचा

आणखी किती काळ लढावे लागणार? – संदीप वाकचौरे

जगाच्या पाठीवर महिलांवर अन्याय, अत्याचार होत होते. त्यांना माणूस म्हणून पुरूषांच्या बरोबरीच्या अधिकारापासून वंचित ठेवले जात होते. आज आपण समता आणि समानतेचा विचार करत आहोत. महिलाना समान अधिकार द्यायला हवे, अशी भाषा होत असली तरी २१ व्या शतकातही त्यांना पुरूषांच्या बरोबरीने वागवले जात नाही हेही वास्तव लक्षात घ्यायला हवे.  आपल्याही देशात महिला अजूनही समतेच्या अधिकारासाठी लढा देत आहेत. महिलांना आज जे काही जगात समान अधिकार मिळत आहेत त्यासाठी  जगातील महिलांना मोठा संघर्ष करावा लागला आहे. कधी अंहिसेची वाट, कधी हसक स्वरूपाची आंदोलने झाली आहेत. आठ मार्च हा महिलांच्या अधिकाराची मागणी…

पुढे वाचा

बाई आणि बदलणारे जग – मृणालिनी कानिटकर – जोशी

एक काळ असा होता की, स्त्री अनेक प्रकारच्या सामाजिक, कौटुंबिक जाचाच्या शृंखलांनी बद्ध होती. तिला ह्या जाचातून मुक्त करण्यासाठी त्याकाळी अनेक समाजसुधारक, विचारवंत हळूहळू पुढे येऊ लागले. ह्या शृंखलांचे वेढे सैल करण्याचा प्रयत्न करू लागले पण त्यांना कितीही वाटत असलं तरी परंपरावादी, जुनाट मानसिकता असणाऱ्या समाजाचा विरोध पत्करून क्षणार्धात ह्या शृंखला तोडणं शक्य नव्हतं. त्यामुळे धिम्या गतीने पण निश्चितपणे ह्या दिशेने समाजाची वाटचाल सुरू झाली होती. सर्व नाही तरी काही स्त्रिया पुढे येऊन शिकत होत्या कवा त्यांना त्यांच्या घरात शिकण्यासाठी पाठबा मिळत होता. त्या सामाजिक कार्यात सहभागी होत होत्या. अगदी…

पुढे वाचा

स्वकर्तुत्वाने सन्मान मिळवताना – शिरीष चिटणीस

महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी आपल्या लिखाणात म्हटलेय, “माझ्या अगोदरचा कृष्णा म्हणून माझा भाऊ सहा महिन्यांचा असताना आईच्या अंगाखाली चिरडून झोपेत कधी मेला ते कळलेच नाही. त्याला पाजीत असताना आईला गाढ झोप लागून मुलाचा दम कोंडून सकाळी तो मेलेला आढळला! मग त्या एकांताला आणि आईच्या हालाला कोण सीमा असणार!”

पुढे वाचा

शरीर एक जादूगार – राजेंद्र देशपांडे, पुणे

वरील शीर्षक वाचून आपल्याला आश्चर्य वाटलं असेल पण ते खरं आहे. माणूस व त्याचं शरीर खरंच जादूगार आहे. फक्त माणसाचं शरीरच नाही, सर्व प्राणिमात्र, वनस्पती यांची रचना, स्वत: जिवंत राहण्याची त्यांची किमया हे सर्वच विलक्षण आहे. पृथ्वीवरील सर्व जीव याच जादूने जिवंत आहेत. आता ही जादू कोणती? तर सर्वात मोठी जादू निसर्ग करीत आहे ती म्हणजे त्याच्यासारखा दुसरा जीव तयार करणं! माणसाच्या बाबतीत उदाहरण द्यायचं झालं तर, माणसाचा जन्म व्हायच्या आधी, दोन जिवापासून जिवाची निर्मिती, 9 महिने त्याचे उदरात संगोपण, प्रत्येक अवयव जागच्या जागी तयार होणं, मातेच्या उदरात काय आहे,…

पुढे वाचा

मराठी साहित्यातील स्त्री संतांचे योगदान – माधवी देवळाणकर

कुठल्याही प्रदेशाचा सांस्कृतिक व साहित्यिक इतिहास किंवा मागोवा घेताना त्या प्रदेशाचा भौगोलिक व राजकीय इतिहास बघणे महत्त्वाचे ठरते, असे मला वाटते. साहित्यावर त्या संस्कृतीचा, लोकजीवनाचा प्रभाव पडत असतो. साहित्य म्हणजे त्या प्रदेशातील समाजजीवनाचा आरसा असतो. त्यामुळे साहित्यात ह्या सर्वांचे पडसाद उमटणे हे अपरिहार्य असते. साहित्याचा अभ्यास करताना तेथील भौगोलिक व राजकीय घडामोडींचा अभ्यास करणे आवश्यक ठरते.

पुढे वाचा

मराठी जीवनभाषा व्हावी

मराठी भाषा गौरव दिन दरवर्षीप्रमाणे याही वर्षी साजरा होईल. ‘नेमिची मग येतो पावसाळा’ या न्यायाने दिन साजरे होत राहतात. कधी भाषा संवर्धन पंधरवाडा, मराठी भाषा दिन, वाचन प्रेरणा दिन, दरवर्षी मराठी भाषेचा उत्सव म्हणून अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलने आयोजित केली जातात. यासारखे अनेक उपक्रम करत आपण मराठी भाषेच्या विकासाच्या दृष्टीने प्रयत्न करत असतोच. शासनही वेगवेगळे आदेश देऊन मराठी संवर्धन करण्याचा प्रयत्न करत आहे. मराठीत स्वाक्षरीची सक्ती आणि सर्व पत्रव्यवहार मराठीत करणे याबाबत सक्ती केली जाते. सारे करूनही मराठी ज्ञानभाषेचा प्रवास करण्यासाठी पुरेसे प्रयत्न होत नाहीत. केवळ उत्साही असेच कार्यक्रमाचे…

पुढे वाचा