समतावादी लोकराजा – राजर्षी शाहू महाराज

आपल्या संस्थानात मागासवर्गीयांसाठी 50 टक्के आरक्षण ठेवण्याचा क्रांतिकारी निर्णय जांनी 1902 साली आपल्या वाढदिवशी घेतला व दलित, वंचित, पीडित, गोरगरीब, शोषित, गावकुसाबाहेरच्या मागास जनतेला एक अनोखी भेट दिली होती. त्या निर्णयाला आता शंभरहून अधिक वर्षांचा काळ लोटला आहे. आज जग परग्रहावर वसाहत करण्याचा प्रयत्न करीत असताना एकविसाव्या शतकातही मागास, दलित, विकलांगांना बरोबरीच्या नात्याने वागवले जात नाही आणि म्हणूनच महाराजांच्या शंभर वर्षांपूर्वीच्या या वटहुकुमाचे महत्त्व आणखीनच, नव्हे शतपटीने अधोरेखित होते. असे म्हणतात की प्रत्येक मोठ्या माणसाच्या आयुष्यात आत्मजागृतीचा क्षण येतो, जो त्यांच्या संपूर्ण आयुष्याची दिशाच बदलून टाकतो. त्याला आपण कशासाठी जगायचे,…

पुढे वाचा

पाऊले चालती पंढरीची वाट

Dehu Alandi Pandharpur Wari 2017 Image

पाऊले चालती पंढरीची वाट । सुखी संसाराची सोडूनीया गाठ ॥ असं म्हणत विठूरायाची लेकरं पावसा-पाण्याची, वादळ-वार्‍याची तमा न बाळगता पंढरपूरला जायला निघतात. संतजनांच्या पालख्या आपापल्या ठिकाणांहून निघतात. एकत्र येतात जणू वेगवेगळ्या सरिताच एकत्र येऊन त्यांचा महासंगम होतो आणि ही भावसरिता त्या पंढरपूरच्या कल्लोळात विलीन होण्यासाठी प्रवाहीत होते. विटेवर उभ्या सावळ्या परब्रह्माला भेटण्यासाठी, त्याला कडकडून मिठी मारण्यासाठी, त्याच्या पायावर डोई ठेवण्यासाठी, निदान त्याचं मुखदर्शन घेण्यासाठी, नामदेव पायरीवर नतमस्तक होण्यासाठी, गरूड खांबाला आलिंगण देण्यासाठी, चंद्रभागेमध्ये स्नान करण्यासाठी, अविरत ओढीने, न थकता नाचत-बागडत हे भाविक पंढरपूरची वारी करतात. आषाढी वारी फार महत्त्वाची मानली…

पुढे वाचा

माझं लिखाण!

ज्या समाजात आपण राहतो, ज्या समाजाने आपली जडणघडण  केली त्या समाजाचं आपण काहीतरी देणं लागतो. विधात्याने जर माझ्या हातात लिखाणाचे कौशल्य दिले असेल तर मी माझी लेखणी समाजाला काहीतरी चांगलं देण्यासाठी वापरावी किंबहुना प्रत्येक कलावंताने आपली कला समाज समृद्धीसाठीच निर्माण करावी असं मला वाटतं आणि त्या दृष्टिकोनातूनच मी लिहितो.

पुढे वाचा

माझा साहित्य प्रवास …

लहानपणापासूनच घरात वेगवेगळ्या प्रकारचे साहित्य उपलब्ध होते. कथा, कादंबर्‍या, नियतकालिके, वर्तमानपत्रे यांची रेलचेल असायची. ग्रामोफोन असत्यामुळे एचएमव्हीच्या जुन्या चित्रपट गाण्यांच्या रेकॉर्डही असायच्या. संध्याकाळच्या वेळी वडील चित्रपटांचे सुमधूर आणि आशयघन अशी गाणी ऐकायचे. त्यामुळे सी रामचंद्र, नौशाद यांच्या तालवाद्यावर आणि लता मंगेशकर, तलत मेहमूद, बेगम अख्तर यांची अजरामर गाणी ऐकायला मिळायची. एक प्रकारचं भारलेलं वातावरण असायचं आणि त्याचमुळे अवीट चवीची, शब्दालंकाराने गीतरचना भावायला लागली. वाचनाची आवड वाढायला लागली आणि साहित्यातील रूची निर्माण झाली. अंतरीच्या गाभार्‍यातून शब्द उसळी मारू लागले. शब्दाला शब्द जोडून ओळ तयार झाली आणि पाचवीत असताना जीवनातील पहिली कविता…

पुढे वाचा

माझीही एक पणती..

‘‘जीवनात तुम्हाला लिखाणाची प्रेरणा कोणाकडून मिळाली?’’ असा प्रश्‍न मला कोणी केला तर माझं उत्तर असेल – ‘‘जीवनाकडूनच!’’ होय! आपण जर जगता-जगता या जीवनाकडे बारकाईने पाहिलं तर आपल्याला ते खूपकाही सांगत असतं, दाखवत असतं. 2010 साली पुण्यात ‘एमबीए’ शिक्षणासाठी आलो आणि इथे त्या दोन वर्षांमध्ये जे जीवन जगलो ते अतिशय विलक्षण होतं.

पुढे वाचा

थोडं मनातलं…

‘चपराक’ साप्ताहिकासाठी दर आठवड्याला एक तरी वाचनीय  लेख तुम्ही लिहावा, अशी प्रेमळ ताकीद संपादकांकडून मिळाली आणि मग सर्वसामान्य माणसाला (कॉमन मॅन) डोळ्यासमोर ठेवून, दैनंदिन जीवनात त्याला पडणारे निरनिराळे प्रश्न, त्यांच्या समस्या याविषयी लिहित गेलो. आपण एकटे का पडतो? माणसं अशी का वागतात? आजचे शिक्षक गुरू कधी होणार? तुमचं तुमच्या कुटुंबावर प्रेम आहे का? इतका आटापिटा कशासाठी? ग्राहक राजा कधी होणार? ही जीवघेणी लालसा कधी थांबणार?

पुढे वाचा

बी पॉझिटिव्ह

असं म्हणतात आयुष्यात दोन-चार ठेचा खाल्याशिवाय माणसाला शहाणपण येत नाही. जो चुकतो तोच शिकतो आणि पुढे जातो. जो चुकतो पण शिकत नाही तो तिथंच राहतो आणि जो कधी चुकतच नाही तो माणुसच नसतो.

पुढे वाचा

जयघोष निनादला…!!

सावरकर जयंतीच्या निमित्ताने ठाणे येथील जागतिक आणि सामाजिक मंच व ऑस्ट्रेलियातील सिडनीमधील मराठी असोसिएशन ऑफ सिडनी इन्कॉर्पोरेटेड (मासी) या दोन संस्थांनी संयुक्तपणे सावरकर विश्वसंमेलनाचे आयोजन केले होते. हे चौथे संमेलन होते. आजवरची तीनही संमेलने उत्तमरित्या आणि निर्वेध पार पडली. यावेळचे संमेलन मात्र अपवाद ठरले. अगदी निघायच्या दिवसापर्यंत विसाचा पत्ताच नव्हता.

पुढे वाचा

‘श्यामची आई’ साठी बेचाळीस वर्षे महाराष्ट्र भ्रमण

कुठेही नोकरी न करता समाजसेवेच्या भावनेतून शाळा देतील ते मानधन स्वीकारून साने गुरुजींचे वाङमय प्रसार करणारा एक कलाकार गेल्या बेचाळीस वर्षांपासून महाराष्ट्र भ्रमंती करत आहे. साने गुरुजींची ‘श्यामची आई’ समाजाच्या तळागाळातील असंख्य मुलांपर्यंत पोहोचविणारा हा कलाकार इतके दिवस प्रसिद्धीपासून दुर्लक्षित कसा राहिला याचेच आश्चर्य आहे .

पुढे वाचा

‘पर्यटन स्थळ’ असलेली एकमेव स्मशानभूमी

  काही दिवसापूर्वी वाराणसी अर्थात श्री क्षेत्र काशी येथे जाण्याचा योग आला. काशी हे हिंदुंचे पवित्र धर्मस्थळ आहे. असे म्हणतात की आयुष्यात एकदा का होईना काशी विश्‍वेश्‍वराचे दर्शन घ्यावे आणि गंगेत डुबकी मारावी. जगभरातून अनेक हिंदू लोक येथे काशी विश्‍वेश्‍वराच्या दर्शनाला येतात. अभ्यास आणि पर्यटनाचा भाग म्हणून देखील अनेक विदेशी पर्यटक काशीला आवर्जून भेट देतात. काशीला जर भेट दिली तर काही गोष्टी आवर्जून बघाव्यात आणि त्या म्हणजे काशी विश्‍वेश्‍वराचे दर्शन, बनारसी साडी, गंगेची आरती, गंगेच्या काठी बांधलेले प्रसिद्ध घाट.

पुढे वाचा