पांथेय मी,
या मुक्या वाटेचा
शब्दांच्या मोन हुंकारात
स्वतःलाच शोधातो आहे.
क्षितिजाकडे चाललेला
सुर्याचा तांबुस गोळा
मु़क्या वाटेचं पोरकेपण कवेत घेतो.
मात्र ! हे अवेळी मिळालेलं गर्भारपण
मोन हुंदक्यांची विरक्ति दुर करेल काय?
म्ह्नणुनच!
शोधतो आहे
या चराचरात
अवेळी लादणार्r05;या गर्भारपणालाच छेदणारा
पांथेय.