भेट पावसाची
पावसाळ्यात सगळच भिजलेल
तू मी आणि आपल प्रेम
तू सामोर आल्यावर मला सुचलेल
प्रत्येक वेळेस नसत सेम
पहिली भेट पावसाळ्य़ातच
चिंब ओल्या मनांची
मनात होती होळी
सुकलेल्या भावनांची
भावनांन स्पर्श माझ्या
तू तेव्हाच केलास
लोखंड मनाला
परीसस्पर्श दिलास
येता पावसाळा
होतो मी भाबडा
आटःवतो चेहरय़ावरी
थेबांचा तो सडा
दिसती चिखलांमधे
तुझ्याच पाऊलखूणा
वाजणारय़ा पॆंजणांचा
नाद तो देखणा
पाहता डोळ्य़ांमध्ये
आड आलेली पापणी
केसात लपूनी कानामध्ये
चमकणारा तो मणी
अजूनी होतो भास मला
थरथरणारय़ा त्या परीचा
मीच आहे स्वप्नाळू
दोश ना या सरीचा