सांगायचा नसतो,
कधी आपल्या माणसावर हक्क..
होता होइल तेवढं प्रेम,
व्हाव कृतीतून व्यक्त...
हक्क संगीतला कि, उरतो केवळ व्यवहार,
कर्तव्य, नाती..
तीथे प्रेमाला कुठे जागा असते?
तीथे असते दुस-याकडून केलीली अपेक्षा,
आणि आपल्याला हव्या असलेल्या गोष्टींची याचना...
पण आपण मात्र म्हणत राहतॊ...
हक्क आहे माझा...
पण निरपेक्ष प्रेमात मात्र...
या हक्कालाच नाही जागा...