पाटीलकी गाजविणारे ‘दादा’ संपादक : घनश्याम पाटील

पाटीलकी गाजविणारे ‘दादा’ संपादक : घनश्याम पाटील

दत्तात्रय उभे यांच्या संपादनाखाली प्रकाशित होणार्‍या ‘अपेक्षा’ मासिकाच्या दिवाळी अंकाने यंदा ‘भला माणूस, उत्तम माणूस’ हा विशेष विभाग केला आहे. विविध क्षेत्रातील 24 मान्यवरांचा परिचय या विभागातून करून देण्यात आला आहे. ‘चपराक’चे प्रकाशक, संपादक घनश्याम पाटील यांच्याविषयी युवा पत्रकार सागर सुरवसे यांनी या अंकात लेख लिहिला आहे. हा लेख जरूर वाचा. आपल्या प्रतिक्रिया कळवा.

पुढे वाचा

धडाकेबाज महेश भागवत

स्वातंत्र्यानंतर खाकी आणि खादी हीच आपल्या देशाची ओळख झाली. मात्र हे दोन्ही घटक इतके बदनाम झाले की लोक खाकी आणि खादीवाल्यांचा सर्वाधिक तिरस्कार करू लागले. त्यांना शिव्या घालू लागले. यांच्यातीलच काहींनी हे क्षेत्र पुरते बदनाम केले. असे असले तरी या क्षेत्रातील कर्तव्यनिष्ठ आणि प्रामाणिक लोकानी या क्षेत्राला प्रतिष्ठा प्राप्त करून दिली. सगळंच काही संपलेलं नाही हा विश्‍वास निर्माण केला आणि चांगुलपणाच्या जोरावर सामान्य माणसाच्या मनात आदराचे स्थान निर्माण केले. खाकीतला माणूस जेव्हा सामान्य माणसाच्या भल्यासाठी अहोरात्र एक करतो तेव्हा व्यवस्थेवरचा, यंत्रणेवरचा विश्‍वास दृढ होतो. वर्दी अंगावर असतानाही एखादा माणूस सामान्य…

पुढे वाचा

प्रशासकीय खेळीतील माहिती अधिकाराची भूमिका

माहितीचा अधिकार हा नियम किंवा कायदा सन 2005 मध्ये अस्तित्वात आला. त्याकरिता अण्णा हजारे यांचे योगदान महत्त्वाचे ठरते. त्यांनी उपोषण, मौनवृत याद्वारे शासनाला हा कायदा अस्तित्वात आणण्यास भाग पाडले. कारण या कायद्याबाबत शासनव्यवस्था व राजकारणी हे चालढकल करीत होते. अशा नाकर्तेपणामुळेच अण्णा हजारे यांना हा मौनव्रत व उपोषणाचा मार्ग स्वीकारावा लागला. या कायद्याचा फायदा प्रत्येक घटकास झाला. सर्वसामान्यांचे प्रश्‍न सुटू लागले. त्यांना एक प्रकारे माहिती अधिकार नियमाचा वापर करून शासनाकडूनच न्याय मिळू लागला. इतकेच नव्हे तर माहिती अधिकाराची एक वेगळी चळवळच सुरू झाली. काही सामाजिक कार्यकर्ते, संस्था याचा वापर करून…

पुढे वाचा