अनोख्या रेशीम गाठी: सकारात्मक, क्रांतिकारी कथानक!

लिव्ह इन रिलेशनशिप ही येऊ पाहणारी व्यवस्था अनेकांना न पटणारी आहे. अर्थात त्यांचा विरोध तसा दुर्लक्षित न करता येण्यासारखा आहे कारण जगात आपल्या संस्कृतीला एक आदराचे, वैशिष्ट्यपूर्ण स्थान आहे. परंतु जेव्हा दुर्दैवाने साथीदार सोडून जातो तेव्हा होणारी मानसिक, शारीरिक घुसमट ही ज्यावर एकटे राहण्याची वेळ येते तेच जाणोत.

पुढे वाचा

चौथं पोट – ह. मो. मराठे

विजयबापूंनी बाहेर जाण्याचे कपडे घातले आणि ते मोठ्या आरशासमोर उभे राहिले. त्यांनी आपलं भारदस्त रूप आरशात पाहिलं. थुलथलीत देह, चेहराही तसाच. गोरा आणि गुबगुबीत. सतत एसीतच वावरण्याच्या सवयीचा परिणाम त्यांच्यावर चांगलाच दिसून येत होता. मंत्री म्हणून मिळालेला बंगला पुष्कळसा एसी. गाडी एसी. मंत्रालयातील दालनही एसी. असा सर्व काळ एसीमधला वावर. त्यामुळे त्यांना गोरेपण आलं होतं. केसांना काळाभोर कलप लावलेला. तसेच मिशीलाही. डोळ्यांवर रूबाबदार चष्मा. अंगात सफारी. इतर मंत्र्यांप्रमाणे त्यांनीही काही दिवस जाकीट वापरून पाहिलं. त्यात त्यांना अवघडल्यागत वाटू लागलं. त्यांनतर त्यांनी छानशा कपड्याचा सफारीच वापरायला सुरूवात केली. सफारीत एक वाईट…

पुढे वाचा

‘साहित्य चपराक’ दिवाळी २०१७ महाविशेषांकासाठी साहित्य पाठवा!

लिहित्या हातांना आवाहन… ‘साहित्य चपराक’ दिवाळी महाविशेषांकासाठी साहित्य पाठवा! ‘साहित्य चपराक’ दिवाळी महाविशेषांकाचे काम शेवटच्या टप्प्यात आहे. वैविध्यपूर्ण विषयांवरील दर्जेदार साहित्याने नटलेला हा अंक वाचकप्रिय ठरला आहे. तब्बल पाचशे पानांचा आणि संपूर्ण बहुरंगी छपाई असलेला हा अंक सहा राज्यात वितरित होतो. आपणही या अंकात सहभाग नोंदवू शकता.

पुढे वाचा