बाई आणि बदलणारे जग – मृणालिनी कानिटकर – जोशी

एक काळ असा होता की, स्त्री अनेक प्रकारच्या सामाजिक, कौटुंबिक जाचाच्या शृंखलांनी बद्ध होती. तिला ह्या जाचातून मुक्त करण्यासाठी त्याकाळी अनेक समाजसुधारक, विचारवंत हळूहळू पुढे येऊ लागले. ह्या शृंखलांचे वेढे सैल करण्याचा प्रयत्न करू लागले पण त्यांना कितीही वाटत असलं तरी परंपरावादी, जुनाट मानसिकता असणाऱ्या समाजाचा विरोध पत्करून क्षणार्धात ह्या शृंखला तोडणं शक्य नव्हतं. त्यामुळे धिम्या गतीने पण निश्चितपणे ह्या दिशेने समाजाची वाटचाल सुरू झाली होती. सर्व नाही तरी काही स्त्रिया पुढे येऊन शिकत होत्या कवा त्यांना त्यांच्या घरात शिकण्यासाठी पाठबा मिळत होता. त्या सामाजिक कार्यात सहभागी होत होत्या. अगदी…

पुढे वाचा

व्यथिता : व्यथित करणारा संग्रह!

सुख पाहता जवापाडे। दु:ख पर्वताएवढे! संत तुकाराम महाराजांच्या या ओळींचा प्रत्यय मानवी जीवनात पदोपदी येतो. जीवन, संसार म्हटलं की सुख- दु:ख, बऱ्यावाईट घटना ह्या ठरलेल्या असतात.

पुढे वाचा

एकाच या जन्मी जणू…

इतक्यात वटपौर्णिमा संदर्भात एक वेगळी बातमी टिव्हीवर पाहिली व वर्तमानपत्रात देखील वाचली. ती बातमी म्हणजे वटपौर्णिमेला पुरुषांनीही पत्नीच्या दीर्घ आयुष्यासाठी वडाच्या झाडाला धागा बांधून वडाला फे-या मारल्या व वडाची पूजा केली. आणि हा उपक्रम स्त्री पुरुष समानतेचा संदेश देणारा आहे असे सांगण्यात आले.

पुढे वाचा

महिलांच्या विकासाचा निर्धार हाच खरा पुरुषार्थ

सकारात्मक दृष्टीकोनातून पाहिले तर आजची स्त्री ही दिवसेंदिवस नुसती शिकत नाही तरी ती सुशिक्षित होऊन आपल्या समाजाला निश्चितपणे प्रगतीच्या मार्गावर घेऊन जाते आहे हे चित्र आज सर्वदूर पहायला मिळते आहे.  ह्याची पाळेमुळे एकोणविसाव्या शतकातच क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले ह्यांनी समाजात रुजवून आपल्या समाजावर फार मोठे उपकारच केले आहेत असे नमूद करणे गरजेचे वाटते. ज्या काळी स्त्री ही फक्त चूल आणि मूल ह्यासाठीच जन्माला आली आहे असा प्रघात असताना त्यांनी केलेले हे धाडस आज एकविसाव्या शतकात महिलांच्या विकासाकडे पाहिले की जाणवते की त्यांचा स्त्रीशक्तीचा हा विचार किती दूरदृष्टीचा होता आणि आपल्या देशासाठी…

पुढे वाचा