top of page
कविता


फुलला श्रावण
आकाशी खेळ कुणाचा... चालला मजेने होता त्या शुभ्र ढगांच्या आड... लपलेला कोणी होता काळोख कुठेही नव्हता पण ढग सोनेरी होता पाहून रंगला जीव... धरणीचा खाली होता दाटले अचानक मेघ... राखोडी, करडे, काळे गर्जना विजांची झाली भयभीत चराचर सगळे हा खेळ भयावह होता... सृष्टीला फुटला घाम शिव करत होता तांडव... धरणीने स्मरिला श्याम तो बरसत, धावत आला... सृष्टीवर त्याचे प्रेम तोषवले त्याने जीव... पाळला स्वत:चा नेम अंथरला खाली होता गालिचा मऊ कुरणांचा सांडला घडा रंगांचा बरसता खेळता त्याचा रंगली फुले क
2 days ago1 min read


आदर्श बाबा
बाबा, अडगळीत पडलेली तुझी चप्पल आज घालून पाहिली! आपसूकच तुझ्या जीवनाची संघर्षयात्रा मज उमगली!! कळत नकळत पाय माझे थोडे जड झाले, रे! तुझ्या त्या भेगाळलेल्या पावलांची वेदना जाणवली!! स्मरला तू आणि आईने ओढलेला संसाराचा गाडा, तो! संघर्षात त्या तुझी अपुरी राहिलेली स्वप्नेही सापडली!! स्मरतो आम्हा सदा तुझा तो त्याग रे, बाबा! तुझ्या त्या समर्पणातच तुझी कर्तव्यनिष्ठा समजली!! स्मरला तुझ्या भावनांचा फुटलेला बांध, तो! तुझ्यात दडलेल्या आईची हळवी मायाही कळली!! मलाही व्हायचे आहे तुझ्यासारखा रे
Jul 301 min read
माय लेक -राजेंद्र दिघे
माय नितळ गोडवा लेक साखर पाडवा माय प्रेमाचा निर्झर लेक आनंदी पाझर माय कष्टाची भाकर लेक लाडाची कदर माय सुंदर आभाळ लेक नितळ निर्मळ माय अंगणी तुळस लेक घराची कळस माय प्रेमाचा सागर लेक कुळाचा जागर माय वाढता मांडव लेक नात्यांचा सांकव माय गोकूळ आरसा लेक वंशाचा वारसा माय सुखाचा आगर लेक दुःखाला झालर -राजेंद्र दिघे
Apr 3, 20241 min read
माझी आई
आई म्हणजे आठवण कधीच न सरणारी शाळेत असलो तरी सतत आठवणारी आई म्हणजे अजब रसायन धपाटे तिचे मला वळण लावणारे लागलं कुठे काही तर डोळे तिचे नकळत माझ्यासाठी रडणारे आई... नाही फक्त एक साद ती म्हणजे माझे आयुष्य तिने दिलेला आशीर्वाद अन् बोल घडवतात माझे भविष्य म्हणते आई मी आहे तिचा लाडका बाळ पण खरं सांगू का? माझ्यासाठी ती आहे मायेचं पांघरूण अन् परतीचं आभाळ! - स्नेहा कोळगे
Feb 19, 20241 min read
bottom of page
.jpg)