top of page
लाडोबा


ग्रामीण जीवनातील खेळ
खेळ ही काही चांगल्या प्रकारे वेळ घालविण्याची आणि आनंद मिळविण्याची किंवा करमणुकीची साधी गोष्ट नाही. माणसाचे आरोग्य आणि खेळ खांचा घनिष्ठ आणि आंतरिक संबंध आहे. आपल्या पंचेद्रियांची सक्षमता, कौशल्यविकास याच्याशी तो निगडित आहे. खेळ हा क्षणार्धात अचूक निर्णय घेण्याच्या क्षमतेचा ऊर्जा घटक आहे. मुक्त हालचालीसाठी शरीर चापल्य याच्याशी तो निगडित आहे. खेळ हा सांघिक भावनेला सशक्त करणारा एकमेव घटक आहे. एवढेच नव्हे तर माणसाची जीवनाकडे आणि जगाकडे पाहण्याची दृष्टी तुम्ही कोणता खेळ खेळता यावर
Mar 19, 202411 min read
कडू पण गुणकारी औषध #balkatha - हर्षल कोठावदे
राम आणि शाम नावाचे दोन मित्र असतात. ते एकाच शाळेत शिकत असतात. त्यांची गट्टी खूप छान जमलेली असते परंतु दोघांच्या वर्तनात एक बदल असतो, तो म्हणजे आईच्या लाडामुळे... रामची आई नेहमी त्याला चांगल्या गोष्टी सांगत असते. रामचे काही चुकले तर त्याला रागवते, फटकारते. उदाहरणार्थ :- आईने जेवणाचा डबा पोळी-भाजीचा दिला, जर रामने नाही खाल्ला, रामने नाटक केले तर आई त्याला समजावून सांगते, रागवते. त्याने अभ्यास नाही केला तर आई अभ्यासाचे महत्त्व समजावून सांगते. रामला या गोष्टींचा राग यायचा पण आई
Feb 20, 20241 min read
माझी आई
आई म्हणजे आठवण कधीच न सरणारी शाळेत असलो तरी सतत आठवणारी आई म्हणजे अजब रसायन धपाटे तिचे मला वळण लावणारे लागलं कुठे काही तर डोळे तिचे नकळत माझ्यासाठी रडणारे आई... नाही फक्त एक साद ती म्हणजे माझे आयुष्य तिने दिलेला आशीर्वाद अन् बोल घडवतात माझे भविष्य म्हणते आई मी आहे तिचा लाडका बाळ पण खरं सांगू का? माझ्यासाठी ती आहे मायेचं पांघरूण अन् परतीचं आभाळ! - स्नेहा कोळगे
Feb 19, 20241 min read


माझा आवडता तिरंगा!
भारत आणि दक्षिण आफ्रिका या दोन संघातील कसोटी क्रिकेट सामन्याचा चौथा दिवस होता. मी आणि माझा नातू भारत सामना पाहण्यासाठी कारमध्ये बसून निघालो. भारतीय संघाचा संभाव्य विजय यामुळे रस्त्यावर वाहनेच वाहने होती. मैदानापासून काही अंतरावर गाडी लावून आम्ही पायीच मैदानाकडे निघालो. आबालवृद्ध उत्साहाने, आनंदाने मैदानाकडे जात होते. रस्त्याच्या दुतर्फा चेहर्यावर तिरंगा रंगविणारे लोक बसले होते. तिरंगा ध्वज विकणारे लोक हातातील ध्वज उंचावून लक्ष वेधून घेत होते. भारत, झेंडा घ्यायचा ना? आजो
Feb 16, 20242 min read
bottom of page
.jpg)