top of page

कशी झाली फजिती! (बालकथा) The Clever Fox and the White Jacket

  • Jun 9, 2025
  • 7 min read

एक मोठ्ठं जंगल होतं. केवढं मोठं माहीत आहे का? खूप खूप मोठं. म्हणजे आपण वरती बघताना कसं फक्त आकाश दिसतं, दुसरं काहीच दिसत नाही तसं. जंगलाकडे बघितलं की जिकडे तिकडे नुसती झाडंच झाडं. हिरवी हिरवीगार, उंच फांद्या असणारी. मध्ये मध्ये छोटी झाडं. चिक्कूची, पेरूची, आंब्याची आणि फणसाची. केळीची आणि डाळिंबाची. एवढ्या मोठ्या जंगलात भरपूर प्राणी राहत असत. छोटू ससा, रंगीबेरंगी पिसारा फुलवून नाचणारा मोर, तुडूतुडू पळणारं हरीण, इकडून तिकडे उड्या मारणारी माकडं, लबाड कोल्हा, कुणी सांगेल तसं वागणारं गाढव, पट्टेदार आणि कायम घोळक्यात राहणारे तरस, मोठ्या कुत्र्यासारखा दिसणारा लांडगा, अगडबंब हत्ती, पिवळे पट्टे असणारा बिबट्या आणि झुबकेदार आयाळ असलेला सिंह. ससा, हरीण, गाढव गवत खायचे. झाडावरची फळं खायचे. एवढ्या अगडबंब शरीराचा हत्ती सुद्धा झाडाचा पाला, केळी खायचा. हे होते शाकाहारी प्राणी. कोल्हा, तरस, लांडगा, बिबट्या, सिंह हे प्राणी दुसर्‍या प्राण्यांना मारून खाणारे, म्हणजे मांसाहारी. एवढे सगळे प्राणी त्या मोठ्या जंगलात मस्त राहत होते. एकदा काय झालं, कोल्हा गेला फिरत फिरत जंगलाच्या बाहेर. तिकडे रुंद रस्ता होता, त्या रस्त्यावरून वाहनं जात-येत होती. एक गाडी थांबलेली होती. कोल्हा हळूच तिकडे गेला. गाडीच्या जवळ कुणीच नव्हतं, पण एक पांढर्‍या रंगाचं जॅकेट गाडीजवळ पडलेलं दिसलं. कोल्ह्यानं ते पटकन उचललं आणि अंगावर टाकलं. त्याला एकदम भारी वाटलं. ते तसंच अंगावर टाकून तो जंगलाच्या दिशेनं पळत सुटला. जंगलाच्या एका टोकाला छोटीशी टेकडी होती, तिथे कोल्हा राहायचा. टेकडीच्या वाटेवर त्यानं पाहिलं की छोटू ससा गाजर खात उभा होता. पांढरं जॅकेट पळत येताना बघून ससुल्याच्या अंगाला घाम फुटला. भीतीनं त्याची बोबडी वळली. भूत... भूत तो पुटपुटला. कोल्ह्याला ते शब्द बरोबर ऐकू गेले. त्याला मस्त कल्पना सुचली. एवढं दूर पळून आल्यामुळे त्याला जोरदार भूक लागली होती. समोर सशाच्या पंजात धरलेलं केशरी धम्मक रंगाचं गाजर दिसत होतं. कोल्हा जोरात म्हणाला, ‘‘मी भूत आहे. मी तुला खातो.’’ ससा घाबरला. त्यानं पंज्यातलं गाजर टाकलं आणि म्हणाला, ‘‘नको नको भुता. हे घे गाजर. एकदम ताजं ताजं आहे. हे खा, मला जाऊ दे.’’ कोल्ह्यासमोर गाजर टाकून ससा तुरुतुरु पळून गेला. कोल्ह्यानं गाजर जॅकेटच्या खिशात टाकलं आणि तो गेला टेकडीवरच्या त्याच्या राहण्याच्या जागेकडे. जॅकेट काढून ठेवलं, गाजर खाल्लं, नदीवर जाऊन पाणी पिऊन आला आणि गेला झोपून. जॅकेट घातल्यामुळे सशाची कशी घाबरगुंडी उडाली. त्यानं आयतं गाजर आपल्याला देऊन टाकलं, मज्जा आहे की आपली. मग दुसर्‍या दिवशी कोल्ह्यानं परत जॅकेट घातलं. निघाला जंगलाकडे जायला. वाटेत दिसलं हरीण. झाडाला लागलेले चिक्कू तोडायला ते उड्या मारत होतं. समोरून पांढरं जॅकेट पळत येताना बघून हरीण घाबरलं. ओरडायला लागलं, भूत आलं, भूत आलं. कोल्हा मनात हसला आणि म्हणाला, ‘‘मी भूत आहे, मी तुला पकडतो.’’ हरीण म्हणालं, ‘‘भूत दादा, मला नको पकडू. मी तुला चिक्कू देतो.’’ त्यानं खूप चिक्कू तोडले. चिक्कू टाकून ते गेलं पळून. कोल्ह्यानं चिक्कू खिशात टाकले. टेकडीवरच्या आपल्या जागेत आला. जॅकेट काढून ठेवलं. गोड गोड चिक्कू खाल्ले. नदीवर पाणी प्यायलं आणि आरामात पाय पसरून पडला. आता कोल्ह्याला कळलं की सगळे प्राणी आपल्याला भूत समजतात. आता रोज तो जॅकेट घालून जायचा. कधी लांडगा भेटायचा. लांडगा त्याला खाऊ द्यायचा, मोर दाणा द्यायचा. कोल्ह्याला काही न करता नुसतं, ‘भूत आलं’ म्हणून खायला मिळायचं. एकदा तो असाच जॅकेट घालून येत असताना त्याला दिसला हत्ती. एवढा मोठा हत्ती बघून त्याला भीती वाटली. हत्ती चिडला की सोंडेत पकडून, गरागरा फिरवून टाकून द्यायचा. आता मात्र पांढरं जॅकेट बघून हत्ती घाबरला. ‘भूत आलं, भूत आलं’ ओरडायला लागला. कोल्हा म्हणाला, ‘‘मी तुला पकडतो.’’ हत्ती म्हणाला, ‘‘नको रे भूतदादा. मी तुला केळी देतो.’’ हत्तीनं केळी जमिनीवर टाकली आणि तो पळाला. हत्ती आपल्याला घाबरला याचा कोल्ह्याला भारी आनंद झाला. तो पळत टेकडीकडे गेला. जॅकेट काढून ठेवलं. केळी खाल्ली. सालं तिकडेच टाकून दिली. नदीवर पाणी प्यायला गेला. तेवढ्यात एक गम्मत झाली. आकाशातून एक घार उडत चालली होती. उडून ती जंगलात पोचली. बघते तर काय, सगळे प्राणी भुताबद्दल बोलत आहेत. हत्ती सांगत होता, ‘‘आत्ता ते भूत येऊन गेलं. मी केळी दिली मग ते पळून गेलं.’’ घार ऐकत होती. तिनं विचारलं, ‘‘ते भूत पांढरे कपडे घालून येतं का?’’ सगळे एकदम ओरडले, ‘‘हो.’’ घारीला हसू आलं. तिनं सांगितलं, ‘‘भूत वगैरे काही नाही. त्या टेकडीवरच्या कोल्ह्याची लबाडी आहे ही. तो कोल्हा पांढरे कपडे घालून येतो. तुम्ही का घाबरता त्याला?’’ हत्ती म्हणाला, ‘‘कशावरून तो कोल्हा आहे?’’ घार म्हणाली, ‘‘आत्ता मी तिकडूनच तर आले. हत्तीदादानं दिलेली केळी खाऊन, साली टाकून तो लबाड गेलाय पाणी प्यायला. मी पाहिलं ते जॅकेट काढून टाकलेलं आणि केळ्याची सालं पडलेली. तुम्ही बिलकुल घाबरू नका त्याला.’’ सगळे प्राणी एकमेकांकडे बघायला लागले. असं होय! त्या लबाड कोल्ह्यानं सगळ्यांना फसवलं होतं तर! दुसर्‍या दिवशी पांढरं जॅकेट घालून कोल्हा आला. कुणीच त्याच्याकडे लक्ष दिलं नाही. मग तोच ओरडला, ‘‘भूत आलं. आता भूत तुम्हाला पकडेल.’’ तेवढ्यात हत्तीदादा आला आणि त्यानं सोंडेत कोल्ह्याला पकडून गरागरा फिरवायला सुरुवात केली. कोल्हा घाबरला, म्हणाला ‘‘मला सोड.’’ तो सुटण्याचा प्रयत्न करत असताना त्याचं जॅकेट सोंडेत अडकलं आणि फाटलं. आतला कोल्हा सगळ्यांना दिसला. सगळे प्राणी जोरात ओरडले, ‘‘हत्तीदादा, हत्तीदादा या लबाड कोल्ह्याला उचलून फेकून दे. आम्हाला फसवतो काय!’’ हत्तीदादानं कोल्ह्याला दूर फेकून दिलं. इतरांना फसवणार्‍या कोल्ह्याची अशी झाली फजिती.

  • नीलिमा बोरवणकर

The Clever Fox and the White Jacket

Once upon a time, there was a vast jungle. How big, you ask? So, so big! Just like when you look up and only see the sky, nothing else, this jungle was full of nothing but trees everywhere. Green, tall trees with high branches, and in between, smaller trees: chikoo, guava, mango, and jackfruit trees. Even banana and pomegranate trees grew there. In this enormous jungle lived many animals. There was Chhotu the rabbit, the peacock that danced with its colorful feathers spread wide, the deer that trotted along, monkeys that leaped from branch to branch, a sly fox, a donkey that just did whatever it was told, striped hyenas that always stayed in a group, a wolf that looked like a big dog, a gigantic elephant, a leopard with yellow stripes, and a lion with a bushy mane.

The rabbit, deer, and donkey ate grass and fruits from the trees. Even the enormous elephant munched on tree leaves and bananas. These were the herbivorous animals. The fox, hyena, wolf, leopard, and lion were carnivorous animals – they hunted and ate other animals.

All these animals lived happily in that big jungle. One day, the fox went for a stroll outside the jungle. There was a wide road there, with vehicles going to and fro. One car was stopped. The fox quietly approached it. No one was near the car, but he saw a white jacket lying on the ground. The fox quickly picked it up and put it on. He felt really cool. He dashed back towards the jungle, wearing it just as it was.

At one end of the jungle was a small hill where the fox lived. On the path to the hill, he saw Chhotu the rabbit standing, munching on a carrot. Seeing the white jacket running towards him, sweat broke out on the little rabbit's body. Fear tied his tongue. "Ghost... ghost," he muttered. The fox heard those words clearly. A brilliant idea struck him. He was very hungry after running such a long distance. He saw the bright orange carrot in the rabbit's paw. The fox loudly declared, "I am a ghost! I'm going to eat you!"

The rabbit trembled. He dropped the carrot he was holding and said, "No, no, dear ghost. Here, take this carrot. It's perfectly fresh. Eat this and let me go."The rabbit threw the carrot in front of the fox and scampered away.

The fox put the carrot in the jacket pocket and headed towards his dwelling on the hill. He took off the jacket, ate the carrot, went to the river to drink water, and then went to sleep.The fox thought about how scared the rabbit had gotten just from him wearing the jacket. He even got a free carrot! "This is fun!" he thought. So, the next day, the fox put on the jacket again. He set out towards the jungle. On the way, he saw a deer. It was jumping to pick chikoo from a tree. Seeing the white jacket running towards it, the deer got scared. It started screaming, "A ghost! A ghost has come!"

The fox smiled to himself and said, "I am a ghost, and I'm going to catch you!"The deer said, "Dear Ghost, please don't catch me. I'll give you chikoo."It picked a lot of chikoo. It threw the chikoo and ran away. The fox put the chikoo in his pocket. He came back to his place on the hill. He took off the jacket. He ate the sweet chikoo. He drank water from the river and lay down comfortably.

Now the fox understood that all the animals thought he was a ghost. So, every day he would go out wearing the jacket. Sometimes he'd meet the wolf. The wolf would give him food. The peacock would give him grains. The fox would get food without doing anything, just by saying, "A ghost has come!"One day, as he was coming back wearing the jacket, he saw the elephant. He felt scared looking at such a huge elephant. If the elephant got angry, it would pick him up with its trunk, spin him around, and throw him. But this time, seeing the white jacket, the elephant got scared. It started shouting, "A ghost! A ghost has come!" The fox said, "I'm going to catch you!"

The elephant said, "No, dear Ghost. I'll give you bananas." The elephant dropped the bananas on the ground and ran away. The fox was extremely happy that the elephant was scared of him. He ran towards the hill. He took off the jacket. He ate the bananas, leaving the peels there. He went to the river to drink water.

Just then, something funny happened. A kite was flying in the sky. It flew into the jungle. And what did it see? All the animals were talking about the ghost. The elephant was saying, "That ghost just left. I gave it bananas, and then it ran away." The kite was listening. It asked, "Does that ghost come wearing white clothes?" Everyone shouted at once, "Yes!" The kite laughed. It said, "There's no ghost. This is just a trick by the fox on the hill. That fox comes wearing white clothes. Why are you scared of him?"

The elephant asked, "How do you know it's the fox?" The kite replied, "I just came from there. After eating the bananas given by you, dear elephant, that sly one threw the peels and went to drink water. I saw the jacket taken off and the banana peels lying there. Don't be scared of him at all."

All the animals looked at each other. "Is that so!" So, that sly fox had tricked everyone! The next day, the fox came wearing the white jacket. No one paid any attention to him. Then he himself shouted, "A ghost has come! Now the ghost will catch you!"

Just then, the elephant came and caught the fox with its trunk, starting to spin him around. The fox got scared and screamed, "Let me go!"As he tried to get free, his jacket got caught in the trunk and tore. The fox inside was visible to everyone. All the animals shouted loudly, "Elephant-dada, Elephant-dada, throw this sly fox far away! How dare he trick us!"

The elephant threw the fox far away. This is how the mischievous fox who tricked others got his comeuppance.

  • Nilima Borvankar, Pune

Recent Posts

See All
ऑनलाईन खरेदी : बालकथा

शाळेतून आलेली ओजस्वी हातपाय धुऊन तयार झाली. ती तिची मैत्रीण लेशाची वाट पाहत होती. दोघी एकाच इमारतीत आणि शेजारच्या सदनिकेत राहत होत्या. लहानपणापासून त्यांची घनिष्ठ मैत्री होती. दोघीही एकाच शाळेत तिसर्‍

 
 
 

Comments


Chaprak Prakashan | Ladoba Prakashan

Publication House

Socials

Be the First to Know

402, Wellspring, Bavdhan Market Yard, Pune 411021

7057292092

Sign up for our newsletter

© Copyright

© 2026 by Chaprak Prakashan, Ladoba Prakashan

bottom of page