top of page

दखलपात्र | Dakhalpatra

₹१५०.०० Regular Price
₹११२.५०Sale Price

सामान्य माणसाच्या उंचावलेल्या स्वराचा निर्भीड आविष्कार!

 

वयाच्या अवघ्या १८ व्या वर्षी संपादक आणि मालक होण्याचा दुर्मिळ बहुमान मिळवणारे, आपल्या लेखणीने आणि वाणीने प्रस्थापितांना चपराक देणारे झुंजार पत्रकार घनश्याम पाटील यांचे 'दखलपात्र' हे दमदार पुस्तक आता वाचकांच्या भेटीला आले आहे.

एक तपाच्या यशस्वी पत्रकारितेचा अर्क या पुस्तकात उतरला आहे. हे पुस्तक म्हणजे केवळ शब्दांची मांडणी नसून, समाजातील मुजोर आणि मस्तवाल प्रवृत्तींविरुद्ध पुकारलेले एक युद्ध आहे. लेखकाचा रोखठोकपणा, सकारात्मक विचारसरणी आणि वस्तुनिष्ठ वैचारिक चिंतनाचा हा धगधगता आविष्कार प्रत्येक वाचनाने अंतर्मुख करणारा आहे.

पुस्तकाची खास वैशिष्ट्ये:

  • निर्भीड पत्रकारिता: सत्तेचा माज असणाऱ्यांना आपल्या लेखणीने गारद करणाऱ्या लढावू वृत्तीचे दर्शन.

  • सहजसंवादी भाषा: उपदेशाचे डोस न पाजता वाचकांशी थेट संवाद साधणारी रसाळ आणि ओघवती शैली.

  • सामाजिक आणि राजकीय वेध: समाजकारण, राजकारण आणि संस्कारांचे धागे अधिक घट्ट करणारी प्रभावी संपादकीय विचारधन.

  • वस्तुनिष्ठ चिंतन: समाजातील भल्याबुऱ्या घटनांचा निर्भयपणे घेतलेला धांडोळा.

    bottom of page