top of page

Create Your First Project

Start adding your projects to your portfolio. Click on "Manage Projects" to get started

घनश्याम वसंतराव पाटील | Ghanshyam Vasantrao Patil

घनश्याम पाटील यांचा जीवनप्रवास

नाव : घनश्याम वसंतराव पाटील जन्म : ०८ ऑगस्ट १९८४

कार्यक्षेत्र : सडेतोड पत्रकारिता, सर्जनशील लेखन आणि प्रकाशन

मराठी सारस्वताच्या नभांगणात आपल्या कर्तृत्वाचा, लेखणीचा आणि प्रकाशनाचा स्वतंत्र ठसा उमटवणारे एक नाव म्हणजे घनश्याम वसंतराव पाटील. लेखणीची धार आणि प्रकाशनाची दूरदृष्टी यांचा दुर्मीळ संगम त्यांच्या ठायी पाहायला मिळतो. वयाच्या अवघ्या तेराव्या वर्षी खांद्यावर वर्तमानपत्रांचा गठ्ठा वाहणाऱ्या एका मुलाने पुढे स्वतःचे माध्यमविश्व निर्माण करावे आणि महाराष्ट्रातील सर्वात तरुण स्वतंत्र संपादक म्हणून नावलौकिक मिळवावा, हा प्रवास एखाद्या दंतकथेहून अधिक रोमहर्षक आणि प्रेरणादायी आहे. जिद्द, चिकाटी आणि असीम कष्टांच्या पायावर उभा राहिलेला हा डोलारा आज अनेक तरुणांसाठी दीपस्तंभ ठरला आहे.

संघर्षाच्या भट्टीतून घडलेले व्यक्तिमत्त्व - घनश्याम पाटील यांच्या ध्येयधुंद प्रवासाची बीजे बालपणीच्या संघर्षातच रोवली गेली. लातूर जिल्ह्यातील किल्लारीसारख्या भूकंपग्रस्त भागातून त्यांच्या लेखनाचा प्रवास सुरू झाला. पहाटे उठून वर्तमानपत्रे टाकणे हा त्यांचा दिनक्रम; पण ते केवळ बातम्या पोहोचवणारे राहिले नाहीत तर त्या बातम्यांच्या अंतरंगाचा वेध घेण्याची उपजत वृत्ती त्यांच्यात होती. भूकंपग्रस्तांची दुभंगलेली मने सांधण्याच्या प्रयत्नातून या अभ्यासू लेखकाचा जन्म झाला. विविध नामवंत दैनिकांच्या स्तंभांतून त्यांचे विचार परखडपणे उमटू लागले.

'चपराक' : एका साहित्यिक चळवळीचा उदय
वयाच्या पंधराव्या वर्षी विद्येचे माहेरघर असलेल्या पुण्यात त्यांनी पाऊल टाकले. 'दैनिक संध्या'मध्ये काम करतानाच त्यांच्यातील 'संपादक' जागा झाला. पारतंत्र्यातील चाकरीपेक्षा स्वातंत्र्यातील नवनिर्मितीची ओढ त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. याच प्रेरणेतून २००२ साली त्यांनी ‘चपराक’ या ज्ञानयज्ञाची मुहूर्तमेढ रोवली. आज 'चपराक' ही केवळ प्रकाशन संस्था उरली नसून, ती विचारांचे विद्यापीठ बनली आहे. 'चपराक' आणि मासिक 'साहित्य चपराक'च्या माध्यमातून त्यांनी ४५ हून अधिक साहित्य प्रकारांना हक्काचे व्यासपीठ मिळवून दिले आहे.

चिंतनशील लेखणी आणि वैचारिक वारसा - एक यशस्वी प्रकाशक म्हणून क्षितिज विस्तारत असताना त्यांची स्वतःची लेखणीही तितकीच तळपत राहिली. ‘दखलपात्र’, ‘झुळूक आणि झळा’, ‘अक्षर ऐवज’, ‘दरवळ’ आणि ‘धडक-बेधडक’ ही त्यांची साहित्यसंपदा त्यांच्या वैचारिक प्रगल्भतेची साक्ष देते. विशेषतः ‘धडक-बेधडक’ या पुस्तकातून त्यांनी महाराष्ट्राच्या सामाजिक आणि राजकीय परिस्थितीवर केलेले भाष्य समाजाच्या डोळ्यात अंजन घालणारे आहे. वैचारिक मतभेदांना हिंसेऐवजी संवादाने उत्तर देण्याचे आवाहन ते करतात. याशिवाय २५० हून अधिक ग्रंथांना लिहिलेल्या प्रस्तावना त्यांच्या चौफेर अभ्यासाचा परिपाक आहेत.

सन्मानाची मोहोर आणि नवोदितांचे आधारवड - त्यांच्या या अविरत तपश्चर्येची दखल साहित्याच्या दरबारात अनेकदा घेतली गेली आहे. 'साहित्य चपराक'च्या दिवाळी अंकाला महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे मराठी ग्रंथालय आणि मुंबई मराठी ग्रंथलेखक संघाचे मानाचे पुरस्कार लाभले आहेत. निर्भीड पत्रकारितेसाठी त्यांना ‘स्व. माधवराव गडकरी पुरस्काराने’ गौरवण्यात आले आहे मात्र त्यांचा खरा गौरव म्हणजे त्यांनी घडवलेली लेखकांची नवी पिढी. ‘उपेक्षित ते अपेक्षित’ या धोरणाने त्यांनी ग्रामीण भागातील हिऱ्यांना पैलू पाडून प्रकाशझोतात आणले आहे. 'चपराक साहित्य महोत्सवा'च्या माध्यमातून ते साहित्यिकांचा आणि वाचकांचा मेळा भरवतात, जिथे शब्दांचा उत्सव साजरा होतो.

भविष्याचा वेध आणि व्यापक क्षितिज - अखिल भारतीय मराठी नियतकालिक परिषदेचे उपाध्यक्षपद, गरवारे महाविद्यालयाच्या अभ्यास मंडळाचे सदस्य, महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वार्षिक पारितोषिक स्पर्धेचे परीक्षक, दिल्ली येथे झालेल्या अ. भा. मराठी साहित्य संमेलनातील प्रकाशन कट्ट्याचे प्रमुख, सातारा येथील अ. भा. मराठी साहित्य संमेलनाच्या प्रकाशन कट्ट्याचे मुख्य समन्वयक अशी प्रत्येक जबाबदारी घनश्याम पाटील यांनी समर्थपणे पेलली. दरवर्षी शेकडो पुस्तके प्रकाशित करणे आणि ती लाखो वाचकांपर्यंत पोहोचवणे, हे त्यांचे स्वप्न मराठी साहित्याला एका नव्या उंचीवर नेणारे आहे.

घनश्याम पाटील यांचा हा प्रवास केवळ एका व्यक्तिचा उत्कर्ष नसून, मराठी साहित्य आणि पत्रकारितेच्या उज्ज्वल भविष्याची ती एक आश्वासक नांदी आहे.

संपर्क : ७०५७२९२०९२ | ghanshyam@chaprak.com


The Odyssey of a Visionary: Ghanshyam Patil

Name: Ghanshyam Vasantrao Patil Date of Birth: 08 August 1984 Domain: Unflinching Journalism, Creative Writing, and Publishing

In the resplendent firmament of Marathi literature, Ghanshyam Vasantrao Patil stands as a luminary who has carved a distinct niche through his prowess in writing and his visionary approach to publishing. He represents a rare and powerful confluence of a writer's piercing intellect and a publisher’s foresight. The trajectory of a thirteen-year-old boy, once shouldering the weight of newspaper bundles, rising to become Maharashtra's youngest independent editor and a media entrepreneur, reads less like a biography and more like a legend. Built on the bedrock of grit, perseverance, and indomitable labor, his life stands today as a towering beacon for the youth.

Forged in the Crucible of Struggle The seeds of Ghanshyam Patil’s ambitious journey were sown in the harsh soil of adversity. His literary voyage began in the earthquake-ravaged landscape of Killari in the Latur district. His days began before dawn, delivering newspapers, but he was never content with merely being a carrier of news; he possessed an innate, burning curiosity to decode the human stories behind the headlines. It was the effort to heal the fractured spirits of the earthquake victims that gave birth to the studious writer within him. Soon, his fearless thoughts and articulate columns began gracing the pages of prestigious dailies.

'Chaprak': The Rise of a Literary Movement At the tender age of fifteen, he stepped into Pune, the 'Oxford of the East'. While working with Dainik Sandhya, the dormant editor within him awakened. The restless urge to create a sovereign platform, rather than toil in the shadow of servitude, took over. Driven by this impulse, he ignited the flame of ‘Chaprak’ in 2002. Today, ‘Chaprak’ is not merely a publishing house; it has evolved into a ‘University of Thought’. Through the Chaprak media house and Sahitya Chaprak monthly, he has provided a rightful stage to over 45 diverse literary genres.

The Creative Pen and Intellectual Legacy Even as he expanded his horizons as a successful publisher, his own creative pen remained ablaze. His literary works—Dakhpatra, Jhuluk Aani Jhala, Akshar Aivaj, Darval, and the seminal Dhadak-Bedhadak—stand as testaments to his intellectual depth. Dhadak-Bedhadak, in particular, acts as a mirror to society, offering a scathing commentary on the socio-political state of Maharashtra and advocating for dialogue over violence. Furthermore, his scholarly prefaces for over 250 books reflect the vastness of his study and his command over the language.

A Seal of Honor and a Pillar for the Novice His relentless literary penance has been duly honored in the court of literature. The Diwali edition of Sahitya Chaprak has garnered prestigious accolades from the Maharashtra Sahitya Parishad, Pune Marathi Granthalaya, and the Mumbai Marathi Granth Sangrahalaya. For his fearless journalism, he has been decorated with the esteemed ‘Late Madhavrao Gadkari Award’. Yet, his true glory lies in his role as a mentor. Acting on the philosophy of "From Obscurity to Prominence," he has tirelessly polished hidden gems from rural Maharashtra, bringing them into the literary mainstream. Through the 'Chaprak Sahitya Festival', he orchestrates a grand celebration of words, uniting writers and readers alike.

Envisioning the Future Ghanshyam Patil has shouldered every responsibility with grace and competence—be it as the Vice-President of the All India Marathi Periodicals Council, a member of the Board of Studies at Garware College, an Examiner for the Maharashtra Sahitya Parishad Annual Awards, or the Chief Coordinator of the Publishers' Forum at the All India Marathi Literary Meets in Delhi and Satara. With a noble goal to publish hundreds of books annually and reach millions of readers, he is tirelessly at work to elevate Marathi literature to new heights.

Ghanshyam Patil’s journey is not merely an individual triumph; it is a promising dawn for the future of Marathi literature and journalism.

Contact: +91 70572 92092 | ghanshyam@chaprak.com

Chaprak Prakashan | Ladoba Prakashan

Publication House

Socials

Be the First to Know

402, Wellspring, Bavdhan Market Yard, Pune 411021

7057292092

© Copyright

Sign up for our newsletter

© 2026 by Chaprak Prakashan, Ladoba Prakashan

bottom of page