top of page
All Posts


ते १०० तरुण कुठे आहेत?
या महिन्यात स्वातंत्र्यदिन! स्वातंत्र्याच्या संकल्पनेविषयी आजवर अनेकांनी अनेकदा लिहिलंय. प्रत्येकाची स्वातंत्र्याची व्याख्या वेगळी. असे असूनही आपण खरंच स्वतंत्र आहोत का? हा प्रश्न मात्र पडतोच पडतो. भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील त्याग, समर्पण, शौर्याची कल्पना नसलेल्या अनेकांना 2014 साली स्वातंत्र्य मिळाल्यासारखं वाटलं. असं वाटलेल्यापैकी अनेकांना कळलं की हे सुद्धा मृगजळच आहे. एकीकडे महासत्तेच्या गोष्टी केल्या जात असताना दुसरीकडे जगणं कठीण झालंय. जात, धर्म अशा अस्मिता टोकदार झाल्या
Aug 135 min read


जे. डी. पराडकर यांच्या ‘ऋतुरंग’ला राज्यस्तरीय अक्षर गौरव साहित्य परस्कार
‘चपराक प्रकाशन’ची निर्मिती; अश्वमेध ग्रंथालय व वाचनालयाचा उपक्रम पुणे - ‘बुके ऐवजी बुक’ या संकल्पनेतून ‘चपराक प्रकाशन’ने कोकणातील लेखक जे. डी. पराडकर यांच्या प्रकाशित केलेल्या ‘ऋतुरंग’ या पुस्तकाला सातारा येथील अश्वमेध ग्रंथालय आणि वाचनालयाचा कै. भास्करराव ग. माने स्मृत्यर्थ ‘राज्यस्तरीय अक्षर गौरव साहित्य विशेष पुरस्कार 2025’ प्राप्त झाला आहे. पुरस्कारासाठी साहित्याची निवड झाल्याचे पत्र त्यांना प्राप्त झाले. ‘ऋतुरंग’ या पुस्तकाला प्रस्तावना निसर्ग अभ्यासक डॉ. उमे
Aug 131 min read


एक सुरेल प्रवास
: आय.टी. नोकरी सोडत संगीतासाठी स्वतःला झोकून देणाऱ्या गायिका आणि संगीतकार ज्योती भांडे हिचा संघर्षमय आणि प्रेरणादायी प्रवास. वाचा संपूर्ण लेख 'साहित्य चपराक'मध्ये!
Aug 133 min read


खाली दुकान, वर मकान!
व्हिएतनाम सफर : भाग-तीन हॉटेल सोडून आम्ही एअरपोर्ट वेळेत गाठलं पण सेक्युरिटी चेक झाल्यावर फु-कॉकला जाणारी फ्लाईट लेट आहे असं कळलं. एअरपोर्टवर स्थानिकांची गर्दी होती. लुनार फेस्टिवलच्या सुट्ट्या असल्याने बरीचशी मंडळी फॅमिलीसह आपापल्या गावी किंवा पर्यटनस्थळी निघाली होती. बहुतांशी लोकांकडे लहान मुलं होती, ती फारच गोंडस दिसत होती. कदाचित वय वाढतं तसा चेहरा बदलतो पण नाक मात्र लहानच राहत असावं! पण ही लहान मुलं मात्र नाकी-डोळी नीटस दिसत होती. विशेष सांगण्यासारखी गोष्ट म्हणजे 15 वर्ष
Aug 123 min read


खड्ड्याच्या मागेही खड्डा अन् खड्ड्याच्या पुढेही खड्डा... !
पात्रे व घटना काल्पनिक असून ती कुणाच्या व्यक्तिमत्त्वाशी वा घटनांशी जुळून आल्यास तो निखळ योगायोग समजावा. (सकाळी सकाळी महाराज विविध वर्तमानपत्रे वाचत बाल्कनीत आरामखुर्चीत बसले आहेत, तेवढ्यात सेवक व प्रधानजी एका आम माणसाला धरून महाराजांपुढे आणतात.) सेवक/प्रधानजी :- जय हो! विजय हो! महाराजांचा विजय असो! महाराज :- हं बोला प्रधानजी! आणि हे काय? कुणाला पकडून आणलंय हे सकाळी, सकाळी..! सेवक :- महाराज, हा आहे आपल्या प्रांतातील आम आदमी रस्त्याने राजीनामा! राजीनामा! असे ओरडत चालला होता!
Aug 125 min read


शोध आणि बोध
जगणे सुंदर व्हावे यासाठी आपण सगळेच अहोरात्र धडपडत असतो. मुळात सुखी, आनंदी आणि समृद्ध जीवन प्रत्येक सजीवाच्या वाट्याला यावे, हा तर आपल्या सर्वांचा नैसर्गिक अधिकार आहे; परंतु सृष्टीतील प्रत्येक जीव सुखी, समृद्ध आणि संपन्न असेलच असे नाही. निसर्गाने आपल्याला भरभरून दिले आहे, परंतु निसर्गाची मानवाला लाभलेली ही देण आपण कशी स्वीकारतो, यावर माणसाच्या सुखाच्या कल्पना अवलंबून असतात. जीवन जगताना माणसाचे जगणे अव्याहतपणे सुखदुःखाच्या हिंदोळ्यावर हेलकावत असते. सुखासाठी आपण अहोरात्र धडपडतो,
Aug 126 min read


तुमचं पुस्तक
"सर, तुम्हाला नाही देत का पुस्तक?" एका विद्यार्थिनीचा हा निरागस प्रश्न व्यवस्थेतील मोठ्या उणिवेकडे बोट दाखवतो. शिक्षकाच्या हातात पुस्तक नसताना उत्तम अध्यापनाची अपेक्षा करणे कितपत योग्य आहे? वाचनीय लेख.
Aug 122 min read


फुलला श्रावण
आकाशी खेळ कुणाचा... चालला मजेने होता त्या शुभ्र ढगांच्या आड... लपलेला कोणी होता काळोख कुठेही नव्हता पण ढग सोनेरी होता पाहून रंगला जीव... धरणीचा खाली होता दाटले अचानक मेघ... राखोडी, करडे, काळे गर्जना विजांची झाली भयभीत चराचर सगळे हा खेळ भयावह होता... सृष्टीला फुटला घाम शिव करत होता तांडव... धरणीने स्मरिला श्याम तो बरसत, धावत आला... सृष्टीवर त्याचे प्रेम तोषवले त्याने जीव... पाळला स्वत:चा नेम अंथरला खाली होता गालिचा मऊ कुरणांचा सांडला घडा रंगांचा बरसता खेळता त्याचा रंगली फुले क
Aug 121 min read


पाऊस अन् प्रेम
दोन्ही शब्द आशयगर्भ आणि खूप मोठा आयाम असलेले. कितीतरी संदर्भ, कितीतरी प्रकार. दोन्हींचा अनुभव घेतला तरच अनुभूती. फक्त पाऊस दिसतो/दाखवता येतो. पाऊस अस्सल असतो, प्रेमही अस्सल असतं तरीही प्रेम मात्र ओळखावं लागतं. अन्यथा फसगत होऊ शकते. वयानुसार प्रेमाचा संदर्भ बदलतो. आपल्यावर कोण जीव लावतं हे लहान बाळांना चटकन समजतं. त्यांच्याकडूनही प्रेमाची परतफेड लगेच सुरुही होते. काही व्यक्तिंना काही काळात प्रेम वेडं करून सोडतं. प्रेम आणि पाऊस दोन्हीवर उतारा नसतो, भरपाई नसते, विकत घेता येत नाह
Aug 123 min read


नसरापूर निकाल : न्यायव्यवस्थेतील कार्यक्षमतेचा नवा मानदंड
"उशिरा मिळालेला न्याय म्हणजे नाकारलेला न्याय." भारतीय न्यायव्यवस्थेवर अनेकदा खटल्यांच्या विलंबावरून टीका होते, परंतु पुणे सत्र न्यायालयाने अवघ्या ५८ दिवसांत दिलेल्या निकालाने वेळेत न्याय शक्य असल्याचे सिद्ध केले आहे. न्यायालयीन सुधारणा आणि कार्यक्षमतेवरील हे अभ्यासपूर्ण विश्लेषण नक्की वाचा.
Aug 1226 min read


शोषित समाजांचे शोषण का होते?
सुख-दु:खे प्रत्येकालाच असतात. किंबहुना मानवी जीवनाचा तो अविभाज्य हिस्सा आहे. माणूस जसा प्रगल्भ होत जातो तशा सुख-दु:खाच्या व्याख्या मात्र बदलत जातात. काल ज्याचे दु:ख वाटत होते त्याचे आता दु:ख वाटत नाही. सुख-दु:ख हे शेवटी मानवी भावना व विचारांशी जोडले गेले असल्याने व्यक्तिनिहाय त्याच्या वेगळ्या व्याख्या असण्ो, प्रगल्भतेबरोबर त्या बदलत जाण्ो स्वाभाविक आहे. समाज व राष्ट्रांनाही हे लागू पडते कारण समाज हा व्यक्तिंमुळेच बनतो. सामूहिक भावना व सामूहिक विचारांचे अस्तित्त्व हे सदासर्वका
Aug 124 min read


साप्ताहिक चपराक - १० ते १६ ऑगस्ट २०२६
साप्ताहिक चपराक - १० ते १६ ऑगस्ट २०२६
Aug 111 min read


संपादकीय : हडळीला नाही नवरा आणि खवीसाला नाही बायको!
सुप्रिया सुळेंच्या नेतृत्वाखाली शरद पवार गटाच्या ८ खासदारांनी मोदींची घेतलेली भेट केवळ विकासकामांसाठी की मोठ्या राजकीय भूकंपाची नांदी? वाचा महाराष्ट्राच्या बदलत्या राजकारणावर एक सडेतोड राजकीय विश्लेषण.
Aug 114 min read


कायम पहिल्या स्थानावर
'दै. पुण्य नगरी'चे संस्थापक मुरलीधर अनंता (बाबा) शिंगोटे यांच्या स्मृतिदिनानिमित्त घनश्याम पाटील यांनी लिहिलेला विशेष लेख. ४ भाषांमध्ये ८ दैनिके चालवून मराठी वृत्तपत्रविश्वात इतिहास घडवणाऱ्या या 'बाप माणसा'ची प्रेरणादायी जीवनगाथा नक्की वाचा.
Aug 64 min read


राग, चीड, मैत्री आणि विश्वास
मी ७० च्या दशकात महाविद्यालयात असताना अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या संपर्कात आलो. त्या काळचं वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक विद्यार्थी हा कुठल्या ना कुठल्या विद्यार्थी संघटनेशी जोडलेला होता. त्यावेळचे विद्यार्थी नेते त्यावेळच्या राजकारणातील नेत्यांपेक्षा जास्त प्रभावी होते. प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे, बाळासाहेब आपटे, भालचंद्र कांगो, सुभाष लोमटे, वसंत काळे, अनिरुद्ध देशपांडे, डॉ. विजय गव्हाणे, अमर हबीब, शांताराम पंदेरे, मंगल खिंवसरा, प्रकाश जावडेकर, धरमचंद चोरडिया, माधव ठाकूर
Aug 43 min read


व्हिएतनामध्ये झालो लखपती!
व्हिएतनाम सफर : भाग-दोन थोड्याशा विश्रांतीनंतर नाश्ता करून आम्ही हो ची मिन्ह सिटी बघायला बाहेर पडलो. गाईड ‘ग्रीन’ आम्हाला मोडक्या तोडक्या इंग्रजीत माहिती देत होता. व्हिएतनाममध्ये खूप कमी लोक इंग्लिश बोलतात. त्यांची भाषा आपल्याला मुळीच कळत नाही. आपल्या प्रश्नावर त्यांनी दिलेली प्रतिक्रिया किंवा उत्तर ऐकून आपण अजूनच घोटाळ्यात पडतो. गुगल ट्रान्सलेटर हा सर्वोत्तम पर्याय. मोबाईलमधील गुगल ट्रान्स्लेटरचा माईक ओपन करून आपण आपल्या भाषेत बोलायचे. ट्रान्सलेटर व्हिएतनामीमधून किंवा आपल्
Aug 44 min read


'व्हिएतनाम सफर' : भाग-एक
सालाबादप्रमाणे बिल्डर्स असोसिएशनच्या यावर्षीच्या ट्रीपच्या चर्चेच्या अनेक फेऱ्या झाल्या. सुरुवात 'फॅमिली ट्रिप करूया' पासून झाली. फॅमिली ट्रिप म्हटलं की मीटर गुणिले दोन किंवा मुलंबाळं न्यायची असतील, तर तीनने चारने आकडा वाढत जाणार. त्यामुळे हा मुद्दा लवकरच निकाली निघाला. पुढे परत बजेटचा मुद्दा आला. सर्वांना परवडेल असे ठिकाण पाहूयात, त्यामुळे अडीच-तीन लाखाच्या वर जाणारे युरोप मागे पडले (युरोपच्या अगोदरच चार ट्रिप झाल्यात). व्हिएतनाम फायनल होत होते; पण येऊ इच्छिणाऱ्या बऱ्याच जणा
Aug 44 min read


दरोज मीच झाडती!
शालेय स्वच्छता करायला मुलांना नेहमीच आवडते. त्यात काही आवर्जून आपले ठरलेले काम पुढाकार घेऊन करतात, तर काहींना सवय व्हावी म्हणून नियोजनाप्रमाणे त्यांच्याकडून करवून घेतले जाते. असेच एके दिवशी वर्ग झाडण्यासाठी समोर असलेल्या मुलीला सहज हटकले, तर तिने या आठवड्यात केलेल्या कामाची पावतीच भराभर समोर ठेवली. तिचे मनोमन पटलेही होते; पण आता पुन्हा तिलाच करावे लागणार म्हणून तिला समजावू लागलो आणि झाडू हातात घेत मीच वर्ग झाडू लागलो. तिला कसेकसे झाले. तिने हातातून झाडू घेत, “सर, दरोज मीच झाड
Aug 43 min read


संपादकीय - शहा खरंच काही वाचतात?
भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला. जंतर मंतर येथील तरूणांच्या आंदोलनानंतर अमित शहा यावर काय भाष्य करणार? याबाबत उत्सुकता होती. शहा यांनी या कार्यक्रमात काय सांगितलं? “सामान्य माणसाने गीतेतील विचार दैनंदिन आयुष्यात कसे जगावेत याचे उत्तम मार्गदर्शन गीतारहस्य या ग्रंथात आहे. हा ग्रंथ वाचल्यानंतर तुम्ही आयुष्यात कधीही चूक करणार नाही, याची गॅरंटी मी देतो. मला गीतारहस्य हा ग्रंथ
Aug 44 min read


अद्भुत प्रवास!
कारणे काहीही असोत, प्रत्येकाला प्रवास हा करावाच लागतो! मी तर प्रवासाबाबतीत नादखुळा. काल माझ्या गावी म्हणजे ईश्वरपूरला थोड्या कामासाठी जाऊन रात्रीपर्यंत परत आलो. “आम्ही कारशिवाय कुठे जात नाही”, “आम्ही दोनचाकी कधीच वापरत नाही”, असे म्हणणारी माझी मित्रमंडळी आहेत! पण मी एक साधा माणूस. बऱ्याच देशांत पर्यटन करून आलो, पण कुठेही जाताना पब्लिक ट्रान्सपोर्टने जायला मला आवडते. आपल्याशिवाय समाजातील इतर लोक कसे जगतात, वागतात वगैरे बघायला मिळते, खूप काही शिकायला मिळते. तर मंडळी, सध्याच्या
Aug 44 min read
bottom of page
.jpg)