top of page
विश्लेषण


गांभीर्यपूर्वक शपथ घेते की...
अजितदादांच्या पश्चात सुनेत्राताई पवारांनी 'गांभीर्यपूर्वक' शपथ घेत जपला दादांचा वारसा. दुःखाच्या प्रसंगातही खंबीरपणे उभ्या राहिलेल्या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री आणि विरोधकांची दुहेरी भूमिका यावर घनश्याम पाटील यांचे परखड विश्लेषण.
3d7 min read


परिवर्तनाची नांदी - घनश्याम पाटील
कोणतीही व्यक्ती किंवा संस्था सर्वोच्च स्थानी गेली की पुन्हा तिची घसरण सुरू होते, हा निसर्गाचा नियम असतो. म्हणजे एखादा डोंगर सर केल्यावर पुन्हा उतरंड लागतेच. अशावेळी डोंगरावर काही सपाट भाग असतो. तिथे तुम्ही किती वेळ थांबता हे तुमच्यावर अवलंबून असते. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारने 2014 आणि 2019 साली घवघवीत यश मिळवल्यानंतर यंदाही त्यांना सत्तेची उब अनुभवता येईल, असेच सर्वांना वाटत होते. त्यातूनच त्यांनी ‘चार सौ पार’चा नारा दिला आणि मतदारांनी त्यांना खाडकन जागेवर
Jun 26, 20245 min read
पत्रकारितेच्या धर्मात पक्षपाताचा अधर्म! - आबा माळकर
‘चपराक’चे संपादक आणि माझे मित्र घनश्याम पाटील यांचा फोन आला. तसे आमचे नियमित संभाषण आणि फोन असतो; पण त्या दिवशी घनश्याम थेट म्हणाले, ‘‘आबा, तुम्ही पक्ष पाती आहात का य...?’’ त्यांचे हे शब्द का नावर पडले आणि का ळजात चर्रर... झालं. क्षणभर घनश्याम माझ्यावर आरोप करताहेत असं वाटलं. त्यांना नेमकं का य म्हणायचं आहे, असा प्रश्नही डोक्यात चमकून के ला . https://youtu.be/WIYgUegkQAI अर्थात हे का ही सेकंदात झालं. का ही सेकंदात मन कुठे, कुठे भटकत जातं, याचा प्रत्यय पुन्हा आला. श
Dec 4, 20236 min read


संभाजी महाराजांची हत्या व गुढीपाडवा?
काळ महाराष्ट्र व आसपासच्या राज्यांवर राज्य करणारे महाराष्ट्रातील एकमेव घराणे म्हणजे सातवाहन. सातवाहन स्वत:ला सालाहनही म्हणवून घेत. शालिवाहन हे सालाहनचे कृत्रिम संस्कृतीकरण. आजच्या महाराष्ट्राच्या भाषा-संस्कृतीचा पाया घालणारा, तिचे वर्धन करत महाराष्ट्राची ओळख निर्माण करणारा हा तत्कालीन औंड्र या मेंढपाळ समाजामधून उदयाला आलेला राजवंश. महाराष्ट्रातील रायगड (मूळ नाव रायरी), राजमाची अशा शेकडो किल्ल्यांची मूळ उभारणी सातवाहन काळात झाली. तीनही समुद्रांचे पाणी चाखणारे अश्व असलेले सातव
Mar 20, 20236 min read


भूमिका न घेणं हीच भूमिका!
मराठीतल्या बहुतेक प्राध्यापकांची मुलं इंग्रजी माध्यमांच्या शाळेतून शिकत असतात. हेच लोक ‘मायमराठी वाचवा’ म्हणून भाषणं करत फिरतात, अनेक पुरस्कार लाटत असतात, सरकारी अनुदान, शिष्यवृत्ती पदरात पाडून घेतात. असे विद्यापीठीय आणि विविध मालिकांसाठी रतीब टाकणारे लोकच आजच्या काळात भाव खाऊन जातात, पैसा-प्रसिद्धी मिळवतात आणि वाचन संस्कृतीविषयी कायम नकारघंटा वाजवतात. ‘लेखकांनी सरकारविरूद्ध तुटून पडायला हवं’ असं त्यांना वाटत असतं. त्यांनी स्वत:च अर्ज भरावेत, पुस्तकं पाठवावीत आणि सरकारकडून पु
Feb 27, 20233 min read


मातृभाषा ज्ञानभाषा व्हावी
मातृभाषा ही ज्ञानभाषा झाल्याशिवाय आपला विकास शक्य नाही. ‘आमच्या मुलाला मराठी वाचता येत नाही’, असं म्हणणार्या आया आणि स्वतःच्या मुलांना इंग्रजी माध्यमांच्या शाळात घालून ‘मराठी भाषा ही सर्वदूर कशी पोहचेल आणि अजरामर कशी होईल’ अशा चर्चा करणारे भुरटे साहित्यिक व राजकारणी आधी दूर करायला हवेत. इंग्रजी भाषेपेक्षा मराठी भाषा ही अधिक समृद्ध आहे याची अनेक उदाहरणे आहेत. इंग्रजीत म्हणतात, ‘आय फॉल इन लव्ह.’ म्हणजे ‘मी प्रेमात पडलो’. कोणतीही इंग्रजी कादंबरी असेल किंवा कविता असेल, तिथे ‘पडण
Feb 26, 20234 min read
वारी एक समाजसंस्कार
परिचारिका कधी तू वैद्य होऊनी किती रुपात तू आलास सैन्य होऊनी कृतीतूनी जगास कर्मयोग दाविला आज माणसामध्ये मी देव पाहिला वर्षानुवर्षे वारीची परंपरा जपणारे, कधीही न चुकता वारी करणारे, कोरोनाच्या आधी पहिल्यांदाच वारीचे अमृत चाखलेले आणि दुसऱ्या वर्षी परत जायची ओढ लागलेले वारकरी शिवाय वारकऱ्यांना सेवा , सुविधा पुरवणारे असे सगळेच गेली दोन वर्षे पुन्हा वारी सुरू होण्याची वाट बघत होते. अवघ्या दोन वर्षांच्या लढाईनंतर वारीच्या मार्गाचे श्वास मोकळे झाले. वैद्य , वैद्यकीय कर्मचारी, पोलीस ,
Jul 10, 20223 min read


एसटीचा संप मिटला! कर्मचारी आणि लालपरीच्या आवाजाचं काय?
यंदा ऐन दिवाळीत एसटी कर्मचार्यांनी विलीनीकरण, सातवा वेतन आयोग लागू करावा यासह अनेक मागण्या घेऊन संपाचं हत्यार उपसलं होतं. त्यावेळी अनेक चाकरमानी, विद्यार्थी, कामगार दिवाळीच्या सुट्टीत आपापल्या गावी जायला निघाले होते, त्यांना या संपाचा मोठा फटका बसला. एसटी बंद म्हटल्यावर खाजगी वाहतुकीची चांदी होणार हे गृहीतच होतं. सर्वसामान्यांचा कुठलाच विचार न करता खाजगी लोकांनी तिकिटाचे दर भरमसाठ वाढवले. त्यातून गरीब जनतेचे मोठे आर्थिक शोषण झाले. मागच्या तीन-चार वर्षाचा विचार करता हा संपही
May 18, 202210 min read
नाकर्ती घराणी नाकारा
महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेनंतर राज्याच्या प्रत्येक भागात वेगवेगळी राजकीय घराणी निर्माण झाली. प्रत्येक जिल्ह्यात किमान दोन-तीन घराणी स्थिरावलेली दिसतात. या घराण्यांनी कोणताही राजकीय अभिनिवेष किंवा कोणतीही विचारधारा आदर्शवत माणून वाटचाल केली नाही. आपल्या सोयीनुसार यातील बहुतेकांनी सातत्यानं पक्षांतर केलं. ते वेगवेगळ्या पक्षात गेले, स्थिरावले, आपल्या भूमिका आणि विचार बदलले. येनकेनप्रकारेण सत्तेत कसं राहता येईल याचं कसब त्यांना अवगत आहे. काँग्रेस पक्षाचा विचार करता आमच्या विल
May 8, 20224 min read
bottom of page
.jpg)




