top of page
विश्लेषण
जन्मभरी तो फुलतचि होता...
जगातील सर्वाधिक उत्तुंग मनोरे कोणते? असा प्रश्न मला कधी पडतच नाही. हा प्रश्न न पडण्याचं कारण म्हणजे आपल्या राष्ट्रानं जगाला अनेक भव्यदिव्य मनोरे दिलेत. या मनोऱ्यांनी त्यांच्या कार्यकर्तृत्त्वानं त्यांची उंची आपापल्या क्षेत्रात सातत्यानं दाखुवून दिली. महाकवी केशवसुत ते मर्ढेकर या परंपरेचा विचार करता असाच एक बलदंड मनोरा मला खुणावतो, भुरळ पाडतो. या विलक्षण प्रतिभेच्या मनोऱ्याचं नाव म्हणजे लोककवी मनमोहन नातू! ११-११-१९११ ला जन्मलेल्या मनमोहनांनी ७ मे १९९१ ला जगाचा निरोप घेतला; मात
Mar 13, 20223 min read
गांधीजींचे पुनरागमन
गांधीजींचे पुनरागमन सुसाट आणि पिसाट माणसाला रोखणारी प्रेरणा... विविध भाषिक व पंथीय स्वरूपात आपले गट करून राहणार्या भारतीयांना एकत्र आणण्याचा आणि लढ्यासाठी, न्यायासाठी एकत्रित उभे करण्याचा गांधीजींचा प्रयत्न हा अभिनव तर होताच पण त्याचे मानवी इतिहासातील महत्त्वही अधोरेखित केले पाहिजे. काही हजार लोक पोलिसांची व लष्कराची भीती न बाळगता एकत्र येतात आणि लढा पुढे नेतात, हेच एक अजब आश्चर्य होते. दक्षिण आफ्रिकेतून गांधीजी भारतात परतल्याचे शतक यावर्षीच्या ९ जानेवारीला पूर्ण झाले आणि
Mar 3, 20228 min read
‘परंपरा’ नको, ‘अभिमान’ बाळगा
‘‘शरद पवार यांनी वसंतदादा पाटील यांच्या पाठीत खंजीर खुपसल्याची चर्चा गेली अनेक वर्षे महाराष्ट्रात रंगत आहे. आमच्या पिढीला त्याविषयी फारसे काही माहीत नसल्याने पवार साहेबांनीच त्यावर भाष्य करणारी ‘खंजीर’ नावाची राजकीय कादंबरी लिहिल्यास ती वाचकप्रिय ठरेल आणि त्या कादंबरीला मराठीतला ‘ज्ञानपीठ’ही मिळेल,’’ असे मी एका लेखात लिहिले होते. हाच धागा पकडत अभियांत्रिकी शाखेच्या दुसर्या वर्गात शिकत असलेल्या एका विद्यार्थ्याने मला दूरध्वनी केला. तो म्हणाला, ‘‘दादा, मला हे माहीत आहे की तुम
Feb 27, 20224 min read


वर्डस्वर्थ, यिट्स, शेक्सपिअर आणि मी
एकेकाळी वर्डस्वर्थ, डब्ल्यू. बी. यिट्स... या दिग्गजांच्या शब्दांनी मी भारावलो होतो. त्यांच्या कवितांनी मी आणि माझी कविता अक्षरश: वेडावलो होतो. त्यांच्या इंग्रजी कवितांबरोबरच मला इंग्रजी नाटकांनीही अंतर्बाह्य बदलवलं. त्यात अर्थातच विल्यम शेक्सपिअर प्रचंड भावला. साहित्य वाचण्याची गोडी माझ्यात मातृभाषेमुळंच निर्माण झाली खरी पण साहित्यजाणिवा समृद्ध करण्यासाठी आणि सारा दृष्टिकोन बदलण्यासाठी इंग्रजी साहित्यानं माझ्यावर गारूड केलं... मागच्या वर्षाच्या ऑक्टोबरमध्ये, म्हणजे सारं काही
Feb 24, 202210 min read
लेखणीच्या बळावर आर्थिक झेप कशी उंचावणार?
महाराष्ट्राची लोकसंख्या ही बारा कोटीहून अधिक आहे. जगभरात दहा कोटीहून अधिक मराठी भाषिक आहेत. जगात सर्वाधिक बोलल्या जाणार्या दहा भाषांत मराठी आहे. मराठी भाषेचा इतिहास हा हजार ते बारा वर्षांचा आहे, अशा गोष्टी आम्ही अभिमानाने सांगतो! मात्र केवळ साहित्यनिर्मितीला ‘व्यवसाय’ मानून जगता येईल अशी आजही परिस्थिती नाही . गेल्या दीडशे वर्षात ज्यांनी ज्यांनी मराठी साहित्यनिर्मिती केली त्या सर्वांनी आपला चरितार्थासाठीचा व्यवसाय वेगळा ठेवलाय आणि त्यांचं लेखन त्यांचा छंद म्हणून जोपासला आहे.
Feb 9, 202211 min read
bottom of page
.jpg)




