top of page
सामाजिक


आरोपी : सोडवायचा की सडवायचा? - संजय सोनवणी | Accused and Accusations : Analysis of Natural Justice
न्यायाच्या बाजू अनेकदा दुर्बोध आणि त्यामागील कारणमीमांसा अनाकलनीय असते. न्याय हे सुडाचे प्रतीक बनून गेले असल्याचे आपल्याला मध्ययुगपूर्व कायद्यांतून दिसून येते. मग ते धार्मिक न्याय असोत की राजसत्ता प्रवर्तित. अनेकदा दोन्हीही न्याय हे एकमेकांत बेमालूम मिसळले गेले असल्याचेही आपल्याला दिसून येईल. हाताच्या बदल्यात हात आणि डोळ्याच्या बदल्यात डोळा हे नैसर्गिक न्यायाचे तत्त्व प्रदीर्घ काळ मानवी जगावर राज्य करत असल्याचे आपल्याला त्याचमुळे दिसते. ईश्वरनिंदा हे घोर पातक मानून देहदंड दे
May 28, 20247 min read
ना देवी, ना दासी - - हिरालाल पगडाल, संगमनेर
लाखो वर्षाच्या मानवी इतिहासाच्या वाटचालीत एक बाब स्पष्टपणे दिसून येते ती म्हणजे जगातील बहुसंख्य संस्कृतींनी स्त्रीच्या महात्म्याला दगडाच्या, मातीच्या, धातूच्या मूर्तीत बंद करून देवळात कोंडून ठेवले आहे. वास्तव जीवनात मात्र स्त्रीच्या वाट्याला पुरुषांच्या तुलनेत दुय्यम स्थान दिले आहे. तिचे जिणे पुरुषांच्या तुलनेत कष्टदायी आणि विनासन्मानाचे आहे. प्राचीन काळापासून भारतात स्त्री देवतेची पूजा केली जाते. तिला मातृत्वाची देवता, शक्तिची देवता म्हणून मान्यता आहे. भारतातील सर्वच राज्या
Mar 8, 20248 min read


आणखी किती काळ लढावे लागणार? - संदीप वाकचौरे
जगाच्या पाठीवर महिलांवर अन्याय, अत्याचार होत होते. त्यांना माणूस म्हणून पुरूषांच्या बरोबरीच्या अधिकारापासून वंचित ठेवले जात होते. आज आपण समता आणि समानतेचा विचार करत आहोत. महिलाना समान अधिकार द्यायला हवे, अशी भाषा होत असली तरी २१ व्या शतकातही त्यांना पुरूषांच्या बरोबरीने वागवले जात नाही हेही वास्तव लक्षात घ्यायला हवे. आपल्याही देशात महिला अजूनही समतेच्या अधिकारासाठी लढा देत आहेत. महिलांना आज जे काही जगात समान अधिकार मिळत आहेत त्यासाठी जगातील महिलांना मोठा संघर्ष करावा लागला
Mar 8, 20248 min read
बाई आणि बदलणारे जग - मृणालिनी कानिटकर - जोशी
एक काळ असा होता की, स्त्री अनेक प्रकारच्या सामाजिक, कौटुंबिक जाचाच्या शृंखलांनी बद्ध होती. तिला ह्या जाचातून मुक्त करण्यासाठी त्याकाळी अनेक समाजसुधारक, विचारवंत हळूहळू पुढे येऊ लागले. ह्या शृंखलांचे वेढे सैल करण्याचा प्रयत्न करू लागले पण त्यांना कितीही वाटत असलं तरी परंपरावादी, जुनाट मानसिकता असणाऱ्या समाजाचा विरोध पत्करून क्षणार्धात ह्या शृंखला तोडणं शक्य नव्हतं. त्यामुळे धिम्या गतीने पण निश्चितपणे ह्या दिशेने समाजाची वाटचाल सुरू झाली होती. सर्व नाही तरी काही स्त्रिया पुढे य
Mar 8, 20243 min read


पहिलटकरणी - सुधीर जोगळेकर
बाई असूनही समाजजीवनाच्या विविध क्षेत्रात भारतीय स्त्रियांनी गाठलेली उत्तुंग यशाची ‘भारी’ शिखरं ही भारतीय इतिहासाला नवीन नाहीत. जे जे क्षेत्र या महिलांनी निवडलं, त्या त्या क्षेत्रातील पुरुषप्रधानतेवर मात करत, त्या त्या क्षेत्रातलं पुरुषी वर्चस्व झुगारून देत, स्वतःचं स्वतंत्र अस्तित्व जगाला दाखवून देणारे नवनवे विक्रम या महिलांनी सुस्थापित केले. कंबर कसून, पाय घट्ट रोवून उभ्या राहत, ज्यांनी इतिहास घडवला अशा या स्त्रिया एका अर्थानं त्या त्या क्षेत्रातल्या ‘पहिलटकरणी’ ठरल्या. वै
Mar 8, 20248 min read


स्वकर्तुत्वाने सन्मान मिळवताना - शिरीष चिटणीस
महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी आपल्या लिखाणात म्हटलेय, “माझ्या अगोदरचा कृष्णा म्हणून माझा भाऊ सहा महिन्यांचा असताना आईच्या अंगाखाली चिरडून झोपेत कधी मेला ते कळलेच नाही. त्याला पाजीत असताना आईला गाढ झोप लागून मुलाचा दम कोंडून सकाळी तो मेलेला आढळला! मग त्या एकांताला आणि आईच्या हालाला कोण सीमा असणार!” हा प्रकार १८७०-७१ मधील! त्यांच्या आईला एकंदर वीस मुले झाली. (एक खंडीभर अशी म्हण आहे) त्यापैकी एकावेळी पाचाहून जास्त केव्हाच नव्हती. याचा अर्थ निदान १५ तरी मुलांचा शोक आईला करावा ल
Mar 8, 20246 min read
मी एक संभ्रमीत - प्रवीण दवणे
राजकारण असो की समाजकारण, साहित्य असो की सांस्कृतिक वातावरण पदोपदी संभ्रम ाचे भोवरे आहेत, चकव्यात हरवावे आणि आपल्याच घराचा रस्ता आपल्याला सापडू नये असे बेसुमार वातावरण आहे. सामान्य माणूस म्हणून आजच्या वर्तमानाचे फक्त काही संभ्रम मांडण्याचा हा प्रयत्न. घटना प्रातिनिधिक आहेत, याला समांतर असंख्य घटना घडतच आहेत. लिहिणार किती नि सांगणार कोणाला? आणि कोणाकोणाला? कुंपणच शेत खातंय, आंधळं दळतंय आणि कुत्रं पीठ खातंय, हे बालपणी मराठी पुस्तकात वाचलेले म्हणी व वाक्प्रचार आपण सत्यात जगत
Dec 4, 20236 min read


उबुंटु : एक सामूहिक जीवनपद्धती
जगातला सर्वात मागासलेला खंड म्हणून आपण आज आफ्रिकेकडे पाहतो. नायजेरिया, काँगो, इथिओपिया ह्यासारखे मागासलेले देश, सतत चालणारी यादवी युद्धे, कुपोषणाचे बळी ठरणारी लहान मुले, असहाय्य महिला आणि वृद्धांची केविलवाणी धडपड ही आफ्रिकेच्या संदर्भातली आपल्या डोळ्यासमोर उभी राहणारी दृश्ये आहेत. ही काही आफ्रिकेची खरीखुरी ओळख मानता येणार नाही. आजचा हा दयनीय वाटणारा भूभाग मानवी संस्कृतीच्या पहाटेच्या काळात सर्व जगाच्या पुढे होता व त्याच्या विकासाच्या प्रकाशात बाकीच्या जगाने विकासाची वाट शोधली
Nov 22, 20235 min read


गरज पर्यावरणीय अणीबाणीची...
जागतिक तापमान वाढ (Global Warming) आणि वातावरण बदल (Climate Change) हे आता सर्वच माध्यमांसाठी आणि सर्वसामान्य लोकांसाठी रोजच्या परिचयाचे शब्द होऊन बसले आहेत परंतु त्यांच्या परिणामांच्या खर्या स्वरूपाची ओळख किंवा त्यांच्या परिणामांच्या दाहकतेचा अंदाज काही तुरळक अपवाद म्हणजे अपूर्णांकातली लोकसंख्या वगळता अजून बहुतांश लोकसंख्येला आलेला नाही. आजमितीला जीवसृष्टीच्या आणि जीवनासमोर उभ्या ठाकलेल्या या निर्णायक आव्हानाच्या उंबरठ्यावर संपूर्ण मानवजात येऊन ठेपली आहे. केवळ मानव नव्हे त
Nov 20, 20235 min read


गाव हरवलं आहे!
नांगरून ठेवलेल्या शेतावर जरा हलकासा पाऊस पडून गेला की, मातीची ढेकळं फुटतात आणि काळ्याभोर मातीचा मऊशार, मोहक गालिचा तयार होतो. या मातीवरून कोणी वावराच्या मध्यभागातून या बांधापासून त्या बांधापर्यंत चालत गेलं की, वावराच्या मध्यभागी एका विशिष्ट लयीत पावलांचे मोहक ठसे उमटतात. बांधावर उभं टाकून लांब जाणार्या या पावलांच्या ठशांकडे काही सेकंद लक्षपूर्वक पाहिलं तर मनात उगीच हलकीशी हुरहुर दाटते. हवहवसं काहीतरी लांब जातंय, सुटत चाललंय असं वाटतं. प्रत्येकाच्या मनात खोलवर रुतून बसलेल्या
Mar 12, 20235 min read


महिलादिन म्हणुनी न व्हावे उत्सवी
८ मार्च हा महिला दिन म्हणुन साजरा होतो. जागतिक पातळीवर स्त्रिया हा दिवस मोठ्या प्रमाणावर साजऱ्या करताना हल्ली दिसतात. महिलादिन साजरा का करतात? या पाठीमागील कारण काय? ८ मार्चलाच हा दिवस का साजरा केला जातो? याचा इतिहास काय? असे अनेक प्रश्न आहेत! काही जणांना हे प्रश्न पडतात तर बर्याच जणांना हे प्रश्न पडत नाहीत. ज्यांना हा प्रश्न पडतो त्यातील काहीच लोकं यामागील कार्यकारण भाव माहित करुन घेण्याचा प्रयत्न करतात तर काही करतही नाहीत. म्हणजेच समाजातील बहुसंख्यांना याबद्दल काहीही माहीत
Mar 8, 20234 min read
अनुभव नाहीये? खचू नका! मग फ्रेशरनी अशी मिळवावी नोकरी
नुकताच पत्राने आपलं पदवीचे शिक्षण पूर्ण केले होते. आता गरज होती ती नोकरी मिळवण्याची. एखादी कमी पगाराची का होईना पण नोकरीची सुरूवात महत्त्वाची होती. पत्रा नोकरीच्या शोधात होती. नोकरीसाठी आपल्या शालेय, महाविद्यालयीन आणि पदवी काळातील मिळवलेली प्रमाणपत्रे, प्रशस्तीपत्रे आणि बायोडाटा घेऊन एका कंपनीत गेली. तिला आशा होती की, तिला नोकरी मिळेल आणि थोडी मनात भीतीदेखील होती. मुलाखतीसाठीची तिची ही पहिलीच वेळ होती. पत्रा तशी हुशार होती पण तिच्या बुद्धिकौशल्याचा ताळमेळ तिच्या अनुभवाशी बसेन
Dec 14, 20223 min read
स्त्री-पुरूष मैत्री - आकर्षण, गरज की फॅशन?
‘सौहृदान सर्वभूतानां विश्वासो नाम जायते।’ मैत्रीमुळे सर्व प्राण्यांमध्ये एकमेकांविषयी विश्वास निर्माण होतो, असे मैत्रीविषयी म्हटले गेले असले तरी मैत्री या शब्दाची, त्यातील गर्भित भावनेची व्यापकता खूप मोठी आहे. मनुष्य समाजप्रिय प्राणी आहे. जन्मताच त्याला अनेक नाती मिळतात पण मैत्री हे असे नाते असते की ते त्याने स्वतः निर्माण केलेले असते. मनातले सांगायला, मन मोकळे करायला, खेळायला, हसायला, रडायला हक्काचे एक ठिकाण हवे असते आणि ते असते मैत्रीचे. कुठल्याही रागालोभाची, फायद्या-तोट्या
Dec 12, 20227 min read
वारी एक समाजसंस्कार
परिचारिका कधी तू वैद्य होऊनी किती रुपात तू आलास सैन्य होऊनी कृतीतूनी जगास कर्मयोग दाविला आज माणसामध्ये मी देव पाहिला वर्षानुवर्षे वारीची परंपरा जपणारे, कधीही न चुकता वारी करणारे, कोरोनाच्या आधी पहिल्यांदाच वारीचे अमृत चाखलेले आणि दुसऱ्या वर्षी परत जायची ओढ लागलेले वारकरी शिवाय वारकऱ्यांना सेवा , सुविधा पुरवणारे असे सगळेच गेली दोन वर्षे पुन्हा वारी सुरू होण्याची वाट बघत होते. अवघ्या दोन वर्षांच्या लढाईनंतर वारीच्या मार्गाचे श्वास मोकळे झाले. वैद्य , वैद्यकीय कर्मचारी, पोलीस ,
Jul 10, 20223 min read


एसटीचा संप मिटला! कर्मचारी आणि लालपरीच्या आवाजाचं काय?
यंदा ऐन दिवाळीत एसटी कर्मचार्यांनी विलीनीकरण, सातवा वेतन आयोग लागू करावा यासह अनेक मागण्या घेऊन संपाचं हत्यार उपसलं होतं. त्यावेळी अनेक चाकरमानी, विद्यार्थी, कामगार दिवाळीच्या सुट्टीत आपापल्या गावी जायला निघाले होते, त्यांना या संपाचा मोठा फटका बसला. एसटी बंद म्हटल्यावर खाजगी वाहतुकीची चांदी होणार हे गृहीतच होतं. सर्वसामान्यांचा कुठलाच विचार न करता खाजगी लोकांनी तिकिटाचे दर भरमसाठ वाढवले. त्यातून गरीब जनतेचे मोठे आर्थिक शोषण झाले. मागच्या तीन-चार वर्षाचा विचार करता हा संपही
May 18, 202210 min read
bottom of page
.jpg)




