top of page
राजकीय


गांभीर्यपूर्वक शपथ घेते की...
अजितदादांच्या पश्चात सुनेत्राताई पवारांनी 'गांभीर्यपूर्वक' शपथ घेत जपला दादांचा वारसा. दुःखाच्या प्रसंगातही खंबीरपणे उभ्या राहिलेल्या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री आणि विरोधकांची दुहेरी भूमिका यावर घनश्याम पाटील यांचे परखड विश्लेषण.
3 days ago7 min read


..पण लक्षात कोण घेतो? कोर्स करेक्शन केले जाईल? -प्रा. दिलीप फडके
हा लेख प्रसिद्ध होईल तेव्हा लोकसभेच्या निवडणुकांचे निकाल लागून जवळपास महिना झालेला असेल. ‘चार सौ पार’चा नारा देणारा भाजपा साधे बहुमत देखील मिळवू शकला नाही पण एनडीएमधल्या घटक पक्षांच्या साहाय्याने बहुमत मिळवून नरेंद्र मोदी तिसर्यांदा सत्तेवर आले हे देखील आता जुने झाले. उत्तर प्रदेश, राजस्थान, बंगाल, महाराष्ट्र ह्या राज्यांमध्ये भाजपाचे पानिपत झाले ही गोष्ट देखील आता जुनी झाली. हे असे का झाले आणि यातून भाजपा कोणता बोध घेणार आहे यावर बरीच चर्चा होते आहे. कुणी घटनादुरुस्ती.... म
Jun 27, 20244 min read


परिवर्तनाची नांदी - घनश्याम पाटील
कोणतीही व्यक्ती किंवा संस्था सर्वोच्च स्थानी गेली की पुन्हा तिची घसरण सुरू होते, हा निसर्गाचा नियम असतो. म्हणजे एखादा डोंगर सर केल्यावर पुन्हा उतरंड लागतेच. अशावेळी डोंगरावर काही सपाट भाग असतो. तिथे तुम्ही किती वेळ थांबता हे तुमच्यावर अवलंबून असते. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारने 2014 आणि 2019 साली घवघवीत यश मिळवल्यानंतर यंदाही त्यांना सत्तेची उब अनुभवता येईल, असेच सर्वांना वाटत होते. त्यातूनच त्यांनी ‘चार सौ पार’चा नारा दिला आणि मतदारांनी त्यांना खाडकन जागेवर
Jun 26, 20245 min read
पर्मनंट माजी मुख्यमंत्री
इलेक्शनचे किस्से लिहिताना नेत्यांचे काही धमाल किस्से मांडणंही गरजेचं आहे. बॅरिस्टर ए. आर. अंतुले यांचं नाव सिमेंट घोटाळ्यात आल्यानंतर त्यांना राजीनामा द्यावा लागला. त्यांच्या जागी कोणाची वर्णी लागणार याकडे सगळ्यांचं लक्ष होतं. वसंतदादा पाटील, प्रतिभाताई पाटील हे मुख्यमंत्रीपदाचे प्रबळ दावेदात दिल्लीत ठाण मांडून बसले होते. अशा परिस्थितीत महाराष्ट्राला मराठा नेतृत्व मिळावं अशी इंदिरा गांधी यांची इच्छा होती. सातार्याच्या अभयसिंहराजे भोसले यांचं नाव त्यांना अपेक्षित होतं पण
May 20, 20242 min read
स्वतःविरुद्ध लढण्यासाठी दिला निवडणूक निधी
परभणी जिल्ह्यातलं कडोली हे एक छोटंसं गाव. या गावात जन्मलेल्या नानाजी देशमुख यांचं शिक्षण राजस्थानातील सिकर येथे झालं आणि गोळवलकर गुरुजींच्या सूचनेनुसार ते उत्तर प्रदेशातील गोरखपूर येथे संघप्रचारक म्हणून गेले. बलरामपूर लोकसभा मतदारसंघातून ते खासदार म्हणून निवडून गेले. पहिले ग्रामीण विद्यापीठ स्थापन करणार्या मराठमोळ्या नानाजींना ‘भारतरत्न’ या सर्वोच्च सन्मानानं गौरविण्यात आलं. 1999 ते 2005 या कालावधीत ते राज्यसभा सदस्य होते. उत्तर प्रदेशातील खेडी स्वयंपूर्ण होण्यासाठी त्या
May 19, 20242 min read
इंदापुरातील पाटील निवाडा
इंदापूर येथील कर्मयोगी शंकरराव बाजीराव पाटील हे 1980 आणि 1989 ला बारामती लोकसभा मतदारसंघाचे खासदार होते. 1952 ते 1978 अशी 26 वर्षे ते इंदापूरचे आमदार होते. यशवंतराव चव्हाण यांच्या मंत्रीमंडळात त्यांचा दुग्धव्यवसाय व मत्स्यपालन खात्याचे उपमंत्री म्हणून समावेश झाला. त्यातूनच त्यांनी महाराष्ट्रात दूध सोसाट्यांचे जाळे निर्माण केले. सहकारी साखर कारखाना व कामगारांत त्यांनी यशस्वी चर्चा घडवून आणली. त्याला ‘पाटील निवाडा’ म्हणून मान्यता मिळाली. सहकारी संस्था, विविध कार्यकारी सोस
May 18, 20242 min read
दूरदृष्टी असलेला 'भाजपचा लक्ष्मण'
भारतीय राजकारणात ‘तत्त्वज्ञानी शासक’ अशी ज्यांची ओळख होती ते मराठी नेते म्हणजे प्रमोद महाजन . श्रीराम मंदिर निर्माणासाठी अटलजी आणि अडवाणींनी देशभर जी रथयात्रा काढली त्याची संकल्पना प्रमोदजींची होती. भाजप आणि शिवसेनेची युती ही सुद्धा त्यांचीच देण! संघप्रचारक ते भाजपा नेते अशी ओळख असलेल्या प्रमोद महाजन यांचे योगदान फक्त भाजपाच्या वाढीसाठी नव्हते तर देशाच्या हितासाठीही होते. भारतीय लोकशाही आघाडीसाठी पहिले पूर्ण मुदतीचे सरकार स्थापन करण्यासाठी त्यांनी जिवाचे रान केले. 1983
May 17, 20242 min read
फर्ड्या वक्त्या ते उत्तम राजकारणी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काश्मीरसंदर्भातलं कलम 370 हटवल्यानंतर सुषमा स्वराज यांनी ट्विट केलं की , ‘मी आयुष्यभर या दिवसाची प्रतीक्षा करत होते.’ दुर्दैवानं त्यांचं हे ट्विट शेवटचंच ठरलं आणि त्यांनी जगाचा निरोप घेतला. जणू या एकाच गोष्टीसाठी डोळ्यात प्राण आणून त्यांनी वाट पाहिली होती. तीन वेळा आमदार, सात वेळा खासदार आणि दिल्लीच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री म्हणून त्यांनी योगदान दिलं. वयाच्या अवघ्या पंचवीसाव्या वर्षी चौधरी देवीलाल यांच्या सरकारमध्ये त्यांनी श्रम मंत्री हो
May 16, 20242 min read
माझेच काम पाहा!
जवाहरलाल नेहरू यांचा त्या काळी विलक्षण करिष्मा होता. त्यांच्या लोकप्रियतेमुळे ते जगभर तळपत होते. 1964 च्या जानेवारी महिन्यात भुवनेश्वर येथे एकाएकी ते खूप आजारी पडले. डॉक्टरांनी त्यांच्या हालचालीवर पूर्ण बंदी आणली होती. स्वाभाविकच त्यावेळी सगळ्यांना प्रश्न पडला की, आता नेहरूनंतर कोण? त्यांची विश्रांती सुरू असताना लालबहाद्दूर शास्त्री यांनी त्यांना विचारले, ‘‘आता मी कोणते काम पाहू?’’ त्यावर क्षणाचाही विलंब न करता नेहरू म्हणाले, ‘‘तुम्ही माझेच काम पाहा!’’ तिथेच शास्त्रीजीं
May 15, 20242 min read
कृतज्ञता जपणारे...
16 ऑगस्ट 1982 रोजी धाराशिव (तेव्हाच्या उस्मानाबाद) जिल्ह्याचे विभाजन झाले आणि लातूर जिल्ह्याची निर्मिती झाली. या जिल्ह्याने महाराष्ट्राच्या राजकारणात मोठं योगदान दिलं. शिवाजीराव पाटील निलंगेकर हे मुख्यमंत्री होते. विलासराव देशमुख यांनीही मुख्यमंत्री म्हणून दीर्घकाळ राज्याचं नेतृत्व केलं. शिवराज पाटील चाकूरकर हे तर सात वेळा खासदार होते. त्यांनी देशाचं गृहमंत्रीपद भूषविलं. राज्यपाल म्हणून काम केलं. धाराशिव जिल्ह्यातील डॉ. पद्मसिंह पाटील हेही अनेक वर्ष मंत्रीपदी होते. निलंगेकर
May 14, 20242 min read
अत्रेंनी पाडलेला मुंबईचा बादशहा
‘हा सदोबा... लोकसभेत जायचं म्हणतोय. याला मी शोकसभेत पाठवेन,’ अशी बोचरी टीका करणार्या आचार्य अत्रे यांनी एका सभेत एक विधान केलं होतं. ते म्हणाले, ‘मी 13 ऑगस्टला जन्माला आलो. 15 ऑगस्टला स्वातंत्र्य मिळालं. दोन चांगल्या गोष्टींच्या मध्ये एक वाईट गोष्ट घडावी म्हणून 14 ऑगस्टला स. का. पाटील जन्माला आले.’ ‘मुंबईचा अनभिषिक्त सम्राट’ असं ज्यांचं वर्णन केलं जायचं त्या स. का. पाटील यांच्या विरूद्ध आचार्य अत्रे यांनी जंग जंग पछाडलं होतं. त्याचं कारण होतं, स. का. पाटील यांचा संयुक्त म
May 13, 20242 min read
तो पाकिस्तानी आहे का?
उद्धव ठाकरे यांनी सांगलीतून चंद्रहार पाटील यांची उमेदवारी जाहीर केली आणि मविआत सुंदोपसुंदी सुरू झाली. काँग्रेसने ही जागा सोडण्यास नकार दिला. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, बाळासाहेब थोरात आणि विश्वजित कदम यांनी हा विषय बराच ताणला. संजय राऊत यांनी तर महाराष्ट्रात इतर मतदारसंघात काँग्रेसची काय अवस्था होईल, यावर भाष्य केले. शेवटी उद्धव यांनी विश्वजित यांची नाराजी दूर केली आणि हा वाद मिटला. गेल्या काही काळात युती-आघाडी या सर्वांची समीकरणं बदलली आहेत! खरंतर शिवसेना-भाजप यांची नैसर्
May 12, 20242 min read
लोकप्रतिनिधी कामाचा
संपूर्ण भारतातील नव्हे तर आशिया खंडातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका कोणती हे आपणास माहीत आहे का? या प्रश्नाचे आपणा सर्वांना अभिमान वाटावा असे उत्तर आहे, ते म्हणजे पिंपरी-चिंचवड! ही किमया साधण्यात आणि या नगरीच्या उत्थानात सर्वाधिक योगदान देणार्या नेत्याचं नाव आहे अण्णासाहेब मगर. पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या प्रांगणात त्यांचा पूर्णाकृती पुतळा आहे. 1952 साली अण्णासाहेब प्रथम आमदार म्हणून निवडून आले. त्यावेळी हा हवेली मतदारसंघ होता. अण्णासाहेबांनी आमदार झाल्यावर विविध कामा
May 11, 20242 min read
हा किस्सा खरा आहे?
आज मांडणारा किस्सा खरा आहे का? निश्चितपणे खरा आहे! अस्सल आहे! चोवीस कॅरेट सोन्यासारखा! मग कुठला आहे? म्हणजे मतदारसंघ, गाव, शहर? कुठलाही असू शकतो! त्यातल्या भावना महत्त्वाच्या! कुणाबाबतचा आहे...? त्याचेही काही नाव नाही!! आपण फारतर ‘भाऊसाहेब’ म्हणूया! भाऊ आणि साहेब ही दोन्ही विशेषणं या क्षेत्रातील मंडळींची आवडती! म्हणून आजचे नायक भाऊसाहेब! तर हे भाऊसाहेब निवडणुकीला उभे राहिले. मागच्या वेळी लोकानी मोठ्या विश्वासानं त्यांना निवडून दिलं होतं. पण यांनी काय केलं...? अनेक योजनांत
May 10, 20242 min read
देशाचा कंठमणी
संयुक्त महाराष्ट्राचं आंदोलन ऐन भरात होतं. आचार्य अत्रे, सेनापती बापट यांनी मराठी माणसाच्या मनात स्फुल्लिंग चेतवलं होतं. अशावेळी यशवंतराव चव्हाण यांच्यासारख्या बड्या नेत्यानं मात्र ‘महाराष्ट्रापेक्षा नेहरू मोठे’ असं म्हणत महाराष्ट्राचे तुकडे करू पाहणार्यांना साथ दिली होती. हे सगळं घडत असताना एक तोफ सभागृहात धडधडली. भाषावार प्रांतरचनेवरून ते नाराज होते. नरराक्षस मोरारजी देसाई यांच्या आदेशानं सरकारनं मुंबईत जो गोळीबार केला होता त्याच्या चौकशीला नकार देणं त्यांना लोकशाहीवि
May 9, 20242 min read
इंदिराजींना खडे बोल सुनावणारा नेता
राजकारण आणि समाजकारण ही एकाच गाडीची दोन चाके! पण राजकारणातून निवृत्ती घेतल्यानंतर समाजकार्यात टिकून राहणारे अपवादात्मक असतात. अशापैकी एक महत्त्वपूर्ण नाव म्हणजे मोहन धारिया! पुणे महानगरपालिकेचे नगरसेवक ते केंद्रीय मंत्री असा अण्णांचा विलक्षण प्रवास आहे. राजकारणातून निवृत्ती घेत त्यांनी पाणी प्रश्नावर काम सुरू केलं आणि ‘वनराई’च्या माध्यमातून त्याला व्यापक स्वरूप दिलं. गावागावात त्यांनी अनेक झाडे लावली. बंधारे बांधले. पाण्याअभावी दुष्काळात होरपळणार्या अनेकांच्या आयुष्यात परिवर
May 8, 20242 min read
सबसे बडा खिलाडी
‘सबसे बडा खिलाडी’ अशी ओळख असलेल्या सुरेश कलमाडी यांनी 1995 ते 2007 पर्यंत पुण्याच्या विकासात मोठं योगदान दिलं. पुढे पुण्यात कॉमनवेल्थ स्पर्धेत त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले. नऊ महिने तिहार तुरूंगात काढावी लागली आणि पुण्यातील ‘कलमाडी पर्व’ लयास गेलं. इतकंच नाही तर तेव्हापासून पुण्यातील काँग्रेस पक्षाचं अस्तित्वही संपुष्टात आलं. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते उल्हासदादा पवार कलमाडींची एक आठवण सांगतात. उल्हासदादा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष होते. त्यावेळी पुण्य
May 7, 20242 min read
प्रामाणिकपणाचे दुसरे नाव
सध्या कोणत्याही पक्षाचा विचार केला तर उमेदवारी देताना ‘ निवडून येण्याची क्षमता ’ या एकाच निकषाचा प्रामुख्याने विचार होतो. त्यात उमेदवाराची आर्थिक परिस्थिती, जात, धर्म, त्याचा संपर्क, त्याचे आधीचे काम अशा बाबींचा विचार होतो! मात्र पुण्यात जन्मलेला, इथेच शिक्षण झालेला एखादा मराठी माणूस बिहारमध्ये जातो आणि एकदा, दोनदा नाही तर तब्बल चार वेळा खासदार म्हणून निवडून येतो, हे तुम्हाला सांगितले तर अनेक जण विश्वास ठेवणार नाहीत. तुम्ही म्हणाल, ‘फार तर तो राज्यसभेवर निवडून जाईल!’ पण असे
May 6, 20242 min read
कलरफुल नेता
काँग्रेस पक्षात श्रेष्ठींपुढे स्वतःचे मत ठामपणे मांडू शकणार्या मोजक्या नेत्यांपैकी एक म्हणजे वसंत साठे . मुळचे नाशिकचे असलेले वसंतराव साठे वयाच्या सतराव्या वर्षी स्वातंत्र्य आंदोलनात सहभागी झाले. प्रजा सोशालिस्ट पार्टीकडून त्यांनी त्यांच्या राजकीय प्रवासाला सुरूवात केली. महाराष्ट्र राज्याच्या स्थापना वर्षात म्हणजे 1960 साली त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि काँग्रेसशी कायम एकनिष्ठ राहिले. इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांच्या मंत्रीमंडळात त्यांनी उल्लेखनीय योगदान दिले. अ
May 5, 20242 min read
चष्म्यामुळे झाला पराभव
केशवराव नारायण गालट तथा बाबासाहेब धाबेकर हे अकोला जिल्ह्याच्या बार्शीटाकळी तालुक्यातील धाबा या गावचे सुपुत्र. राजकारणात बाबासाहेब धाबेकर याच नावाने ते सुपरिचित होते. धाबे गावच्या ग्रामपंचायत सदस्यापासून त्यांचा राजकीय प्रवास सुुरू झाला. पुढे उपसरपंच, सरपंच, पंचायत समिती सदस्य, सभापती, जि. प. सदस्य, अकोला जिल्हा परिषदेचे बारा वर्षे अध्यक्ष असा त्यांचा राजकीय प्रवास होता. ते अकोला जिल्हा परिषदेचे अध्यक्ष असतानाचा काळ हा सुवर्णकाळ समजला जातो. त्यावेळी त्यांनी अकोला जिल्ह्यात र
May 3, 20242 min read
bottom of page
.jpg)




