top of page
कथा


तीन सारांश कथा - नागनाथ कोत्तापल्ले
कथा हा अतिशय लवचिक असा वाङमयप्रकार आहे. संस्कृतिच्या प्रारंभापासून कविता आणि कथा लिहिल्या जातात. पुढे नाटक आले. म्हणजे साहित्याचे हे मूळ आविष्कार रूपे होत. कथा ही लवचिक असल्यामुळे ती असंख्य रुपात व्यक्त झालेली आहे. होऊ शकते. लघुत्तम कथा, लघुकथा, गोष्ट, कथा, दीर्घकथा, धक्कांतिका अशा विविध रुपात कथा लिहिली गेली. कमीत कमी अवकाशात खूप काही सूचित करण्याचे सामर्थ्य कथा या वाङ्मय प्रकारात असते. शिवाय काही अनुभवच असे असतात की, कथेशिवाय ते अनुभव इतरत्र व्यक्त होऊच शकत नाहीत. एक प्रकार
Mar 22, 20246 min read
मार्गस्थ (कथा) - अनिल राव
सभागृह संपूर्णपणे भरायला आलं होतं. आज विठ्ठल पांडुरंग कापडनेकर यांची ‘मार्गस्थ' ही दहावी कादंबरी प्रकाशित होत होती. त्यांची आजपावेतो चोवीस पुस्तके प्रकाशित झाली होती. आजचे पंचविसावे पुस्तक प्रकाशित होत होते. साहित्य क्षेत्रातील ते एक मोठं प्रस्त होतं. सदोदित हसत-खेळत राहणारं व्यक्तिमत्त्व होतं. सगळ्यांना आपलेसे करणारे साहित्यिक असा त्यांचा नावलौकिक होता. आजपर्यंत त्यांचे साहित्य ज्या ज्या प्रकाशकांनी प्रकाशित केले होते त्यांनी सर्वांनी मिळून आजचा हा मोठा समारंभ आयोजित केला हो
Mar 13, 202411 min read
झिपरीचा माळ - समीर गायकवाड
गावातल्या सगळ्या गल्ल्या ओलांडून डाव्या अंगाने गावाबाहेर पडलं की आमराई लागते. आमराईतून जाताना सावल्यांचा काचबंदी खेळ अंगावर झुलत राहतो. कवडशांच्या गर्दीतून अंग झटकत दोन कोस चालत गेलं की आधी केकताडांनी वेढलेला झिपरीचा माळ लागतो. दहा-बारा एकराचं हे सगळं रान सुपीक मातीचं पण इथं नांगराचा फाळ कधी लागला होता हे गावातल्या कुणालाच सांगता येत नव्हतं. काळीभोर मऊशार जमीन असल्यानं घासगवतापासून बोरी-बाभळीपर्यंतची सगळी झाडं एकमेकाच्या अंगाला खेटून पार फांदीत गळे गुतवून ताठ उभी होती. आमराईप
Mar 9, 20248 min read
देह निरांजन झाला - माधव गिर
तापी दुथडी भरून वाहत नसली तरी दोन्ही किनाऱ्याच्या मधोमध एक मोठी धार वाहत झेपावत पुढे निघाली होती. आज तिच्या काठावर अभंगाचे सूर उमटले. टाळ-मृदुंगाचा नाद घुमला. हरिनामाचा गजर झाला. हिरव्या कंच वनराईत भगव्या पताका डोलू लागल्या. आळंदीहून निघालेला वैष्णवांचा मेळा तापीच्या किनाऱ्यावर विसावला. हे पाहून तापीचा प्रवाह आनंदला! संत जनांची मांदियाळी पाहून त्या प्रवाहाचे डोळे भरून पावले. तो दिवस, हो तोच दिवस, तापी आजपावेतो कधीही विसरली नाही. विसरणारही नाही. तो दिवस होता - ‘वैशाख मासातील
Mar 8, 20246 min read
कडू पण गुणकारी औषध #balkatha - हर्षल कोठावदे
राम आणि शाम नावाचे दोन मित्र असतात. ते एकाच शाळेत शिकत असतात. त्यांची गट्टी खूप छान जमलेली असते परंतु दोघांच्या वर्तनात एक बदल असतो, तो म्हणजे आईच्या लाडामुळे... रामची आई नेहमी त्याला चांगल्या गोष्टी सांगत असते. रामचे काही चुकले तर त्याला रागवते, फटकारते. उदाहरणार्थ :- आईने जेवणाचा डबा पोळी-भाजीचा दिला, जर रामने नाही खाल्ला, रामने नाटक केले तर आई त्याला समजावून सांगते, रागवते. त्याने अभ्यास नाही केला तर आई अभ्यासाचे महत्त्व समजावून सांगते. रामला या गोष्टींचा राग यायचा पण आई
Feb 20, 20241 min read
सिद्धी : कथा - सुनील माळी
तो घाईघाईतच रात्री नवाच्या सुमारास आपल्या ऑफिसमधून बाहेर पडला. तसा उशीरच झाला होता पण न जाऊन चालणार नव्हते. त्याच्या जवळच्या मित्राच्या बहिणीच्या लग्नाचे रिसेप्शन होते रामकृष्ण गार्डनला. पत्रिकेवर दिलेली वेळ संध्याकाळी सात ते दहा अशी होती पण जेवढ्या लवकर आपण पोहोचू तेवढी जास्त माणसे भेटतील, आता आपण निघालो तर किमान एक तास तरी मिळेल, या अपेक्षेने त्याने गाडीला किक मारली. रामकृष्ण गार्डनमध्ये अजूनही गर्दी होती. ओळखीच्यांना हात करत, कुठे कुणाजवळ थोडे थांबत तो मंचावर पोचला. ‘‘या
Feb 20, 202413 min read


आजोबा आणि सांताक्लॉज ( कथा )
आईबाबा ऑफिसला जायचे. दिवसभर घरात फक्त आजोबा आणि बडबड्या शुभम. घरात शुभमचा पसारा आणि त्याची घरभर पसरलेली बडबड. या दोनच गोष्टीने घर भरलेलं असायचं. दिव्याखाली अंधार का असतो? पृथ्वी गोलच का असते? ती त्रिकोणी का नसते? भाजीपाला हिरवा का असतो? रात्री अंधार का असतो? सारखे पोहून मासे दमत कसे नाहीत? टीव्हीत माणसे कुठून येतात? असे किती अन् काय काय प्रश्न शुभमला पडतात! या इतकुशा पोराला इतके प्रश्न पडतातच कसे? याचं आजोबांना भारी अप्रूप वाटायचं. शुभमला बघताना आजोबांना त्यांचं बालपण आठवायचं
Nov 21, 20233 min read
हतबल - कथा
‘‘हे बघ श्रीपती, असा मौका परत येणार नाही. तुझ्या त्या पडीक माळरानात तसंही काहीच पिकत नाही. तुझे वडील होते तोपर्यंत ठीक होतं पण आता ते हयात नाहीत. किती दिवस ते दगडगोटे भावनेच्या आहारी जाऊन सांभाळणार आहेस? बघ, थोडा तरी व्यवहारी हो, कुणाला काय वाटेल याचा फार विचार करू नकोस. लक्ष्मी स्वत:हून तुझ्या दारापर्यंत चालून आली आहे. तिला असं लाथाडू नकोस...’’ श्रीपती फक्त शांतपणे ऐकून घेत होता. ‘‘ती बिनकामी जमीन विकून टाकलीस तर एक रकमी चांगले दहा-बारा लाख रुपये मिळतील. तू जर म्हणत असलास त
Nov 20, 20237 min read
चौथं पोट - ह. मो. मराठे
राजकारण म्हणजे पैसे खाण्याचा धंदाच झालाय. भारतीय राज्यव्यवस्थेत तर राजकारणाइतके बदनाम दुसरे कुठलेही क्षेत्र नाही. महाराष्ट्रातील विख्यात लेखक आणि ज्येष्ठ पत्रकार ह. मो. मराठे यांनी एका व्यंगकथेच्या माध्यमातून समकालीन राजकीय व्यवस्थेवर केलेले भाष्य - विजयबापूंनी बाहेर जाण्याचे कपडे घातले आणि ते मोठ्या आरशासमोर उभे राहिले. त्यांनी आपलं भारदस्त रूप आरशात पाहिलं. थुलथलीत देह, चेहराही तसाच. गोरा आणि गुबगुबीत. सतत एसीतच वावरण्याच्या सवयीचा परिणाम त्यांच्यावर चांगलाच दिसून येत होता.
Sep 18, 202313 min read


वापसी
संध्याकाळचे सात वाजले होते. पाचगणीसारख्या थंड हवेच्या ठिकाणी आता अंधार पसरू लागला होता. थंडीचा कडाकाही वाढला होता. यावर्षी नोव्हेंबरमध्येच चांगली थंडी जाणवू लागली होती. उद्या संध्याकाळी सहा वाजता याच स्पॉटवर भेटायचे ठरवून मार्टिना आणि पंकजने एकमेकांचा निरोप घेतला.मार्टिना आणि पंकज एकमेकांचे क्लासमेट होते. पाचगणीच्या रेसिडंट स्कूलमध्ये शिकत होते. पहिलीपासून त्यांची मैत्री होती. मार्टिना पणजी येथून आलेली होती. तिच्या वडिलांचा तेथे वाईनचा मोठा व्यवसाय होता. मुलीला गोव्यापासून दू
Apr 8, 202310 min read


प्रमुख अतिथी
मार्च महिना संपला होता. तालुक्यातील अनेक शाळांतील वार्षिक स्नेहसंमेलने संपन्न झाली होती. आम्ही दरवर्षी एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात स्नेहसंमेलन घेत असू. यावर्षी मात्र दुष्काळामुळे ते घ्यावे की नाही या द्विधा मन:स्थितीत होतो. या निमित्ताने वर्षभर झालेल्या विविध स्पर्धांतील गुणवंतांचा गौरव करता येतो आणि विद्यार्थ्यांना स्वत:तील सुप्त कलागुण दर्शविण्याची संधी मिळते. असा हा प्रेरणादायी, वैशिष्ट्यपूर्ण व मनोरंजक कलामहोत्सव असल्यामुळे पालक मेळाव्यात स्नेहसंमेलन घेण्याचे सर्वानुमते
Apr 7, 202314 min read
देखणी
माखी नाव तिचे. अतिशय गरीब कुटुंबात जन्मलेली एका झोपडपट्टीत ती, तिच्या तीन बहिणी, आई व सदा न कदा दारुच्या नशेत धुंद राहणारा तिचा बाप एवढे कुटुंब एकाच खोलीत, खोली म्हणण्यापेक्षा झोपडी काट्याकुट्या, रबर, कागद, गोणपाटाने तयार झालेली झोपडी अशा ठिकाणी जन्म घेतला . घरात अठरा विश्वे दारिद्य्र. आईला दारु पिऊन मार मार मारणारा बाप व त्याला कुठलाही प्रतिकार न करु शकणारी परंतु चार मुलींना जगवण्यासाठी धडपड करणारी तिची आई! वस्ती अतिशय घाणरेडी. जिकडे तिकडे कचराकुंड्या, दारुच्या भट्ट्या, पत्
Mar 23, 202311 min read


मॅनहटन मिस्ट्री - गूढकथा
रात्रीचे आठ वाजले होते. तरीही लख्ख सूर्यप्रकाश होता. मॅनहटन सिटी आनंदाने न्हाली होती. शुक्रवार संध्याकाळ असल्याने लोकांच्या उत्साहाला उधाण आले होते. नाचत, गात मंडळी हिंडत होती. काही तरुण उघड्या जीपमधून वेगाने आवाज करीत जात होते. आरशासारख्या स्वच्छ रस्त्यावर काही परदेशी पर्यटक चक्क पाठीवर झोपून उंच इमारतींचे फोटो काढत होते. निऑन साईनचे बोर्ड इमारतींच्या तीस-चाळीसाव्या मजल्यावरूनही स्पष्ट दिसत होते. अनेक मोठे रंगीत टीव्हीच इमारतींवर लागलेले होते. थोड्याच वेळात सूर्यास्त झाला. व
Mar 15, 202317 min read


पेच - कथा
‘‘येऊ का सरला वहिनी?’’ ‘‘या या वसंतराव, अहो आम्ही सगळे तुमचीच वाट पाहत होतो.’’ वसंतराव आत आले. सोफ्यावर बसले. सरलाताईंनी त्यांना विचारले, ‘‘तुम्ही जाऊन आलात कुलकर्ण्यांकडं? काय म्हणाले ते?’’ ‘‘वहिनी इथंही तीच अडचण आली. बाकी त्यांना दीपा पसंत आहे; पण तिचं मूल पदरात घ्यायला ती मंडळी तयार नाहीत!’’ सरलाताई उदास झाल्या. दीपा त्यांची धाकटी मुलगी. तिच्या नवर्याच्या निधनानंतर तिच्या दुसर्या लग्नासाठी त्या खटपट करत होत्या. सरलाताईंचेही आता वय झाले होते. आयुष्यभर खस्ता काढून, त्यांनी
Mar 10, 20238 min read


माइंड रीडर (कथा) - राजीव तांबे
जागतिक कीर्तीचे ख्यातनाम शास्त्रज्ञ डॉ. सॅम बर्डींनी फोन घेतला. भारताचे पंतप्रधान म्हणाले, ‘‘ एका अत्यंत महत्त्वाच्या आणि गोपनीय कामासाठी तुमची मदत हवी आहे. लगेचच दिल्लीत पोहोचा. आता यानंतर श्री. अशोक शर्मा तुमच्याशी संपर्क साधतील .’’ थोड्याच वेळात डॉ. सॅम बर्डींच्या दाराशी एक काळी गाडी येऊन थांबली. बर्डी तयारच होते. गाडीतून उतरणार्या माणसाने, ‘‘ मी अशोक शर्मा ’’ असं म्हणताच बर्डी गाडीत बसले. तिथून जवळच्या विमानतळावर आणि तिथूनच ते खास विमानाने दिल्लीला रवाना झाले. त्याच दिवश
Feb 21, 202312 min read
चित्र्या
‘‘आज्जे हे बग, चित्र्या वस्तीवरनं हिथं घरात आलाय बग!’’ नातवाच्या हाकाटीने कावरीबावरी झालेली मथुराबाई आपल्या जीर्ण झालेल्या इरकली नऊवारीचा पदर नीटनेटकाच असूनही पुन्हा ठीकठाक करत उजव्या हातानं कपाळावर ओढत ओसरीत आली. जणू काही कुणी जीवाभावाचं माणूस घरी आलंय आणि त्याच्या समोर अदबीनं जावं तशी मथुराबाई लगबगीनं बाहेर आली होती. मथुरा दारापाशी येताच चित्र्यानं तिचे हात चाटायला सुरूवात केली तशी मथुराआजीच्या डोळ्याला धार लागली. पदराचं टोक डोळ्याला पुसत ती झपकन आत गेली. त्या बरोबर चित्र्
Dec 11, 202215 min read
bottom of page
.jpg)




