top of page

कडू पण गुणकारी औषध #balkatha - हर्षल कोठावदे

  • Feb 20, 2024
  • 1 min read

राम आणि शाम नावाचे दोन मित्र असतात. ते एकाच शाळेत शिकत असतात. त्यांची गट्टी खूप छान जमलेली असते परंतु दोघांच्या वर्तनात एक बदल असतो, तो म्हणजे आईच्या लाडामुळे... रामची आई नेहमी त्याला चांगल्या गोष्टी सांगत असते. रामचे काही चुकले तर त्याला रागवते, फटकारते. उदाहरणार्थ :- आईने जेवणाचा डबा पोळी-भाजीचा दिला, जर रामने नाही खाल्ला, रामने नाटक केले तर आई त्याला समजावून सांगते, रागवते. त्याने अभ्यास नाही केला तर आई अभ्यासाचे महत्त्व समजावून सांगते. रामला या गोष्टींचा राग यायचा पण आईच्या आग्रहास्तव आईचे म्हणणे त्याला ऐकावे लागे. https://www.youtube.com/watch?v=N6G49PDeL1c याउलट परिस्थिती शामची असते. शामने जसा हट्ट केला तसा आई त्याचा हट्ट पूर्ण करते. ‘मला अभ्यास करायचा नाही, मला कंटाळा आला आहे.’ शामने म्हटल्यावर आई म्हणायची, ‘ठीक आहे नंतर कर.’ शामने जेवणात स्नॅक्स मागितले तरी लगेच पुरवायची. नेहमी डब्याला बेकरीचे पदार्थ देत असे. राम नेहमी शामला म्हणत असे, ‘तुझी आई किती चांगली आहे, तू जसं म्हणतोस तसं ती वागते.’ यामुळे राम नेहमी दुःखी असायचा. इकडे मात्र सततच्या बाहेरच्या खाण्यामुळे शाम काही दिवस आजारी पडला. आपसूकच त्याचे अभ्यासाकडे दुर्लक्ष झाले. परीक्षेचा काळ आला, दोन्ही मित्रांनी परीक्षा दिली. राम पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण झाला, शाम मात्र काठावर पास झाला. https://shop.chaprak.com/product/mitrachi-gosht/ दिवसागणिक, वर्षागणिक अशा परिस्थितीत ते मोठे होत गेले. पुढे राम एक चांगला आदर्श नागरिक व आदर्श अधिकारी झाला तेव्हा त्याला आपल्या आईची किंमत समजली. शाम मात्र एक साधारण मनुष्य म्हणून जीवन व्यतीत करू लागला. काही वर्षानंतर दोन्ही मित्रांची पुन्हा भेट झाली. त्यावेळी शामने मात्र रामचे व रामच्या आईचे कौतुक केले. माझ्या आईने जर मला योग्य वेळी हट्ट न पुरविता फटकारले असते तर मी नक्कीच तुझ्यासारखा मोठा झालो असतो. त्यावर राम एकच वाक्य बोलला, ‘औषध नेहमी कडू असते परंतु गुणकारी असते.’ हर्षल कोठावदेनाशिक99218 70820

Comments

Rated 0 out of 5 stars.
No ratings yet

Add a rating
bottom of page