top of page
साहित्य चपराक


शनिवारवाड्यावरील आठवणीतल्या सभा
पुण्यातील शनिवारवाडा पटांगण आणि राजकीय सभा यांचं कित्येक वर्षे अगदी अतूट नातं होतं. माझ्या जन्मापासूनची तीस वर्षे कसबा पेठेत गेल्याने शनिवारवाडा या ऐतिहासिक वास्तूशी निकटचे भावबंध निर्माण झाले होते. वाड्यासमोरील पटांगणात होणाऱ्या विविध सभा हा आमच्या पिढीसाठी सुरेख श्रवणानंद होता. दूरदर्शनचा काळ यायच्या आधीचा जमाना असल्यामुळे संध्याकाळी भाषणे / व्याख्याने कुठे आहेत याचाच शोध घेतला जायचा. धूळभरल्या पटांगणात बसून किती तरी दिग्गज वक्त्यांची आजही स्मृतित असलेली भाषणे ऐकली. आचार्य
2 days ago3 min read


Discover Book Review Insights of Chaprak Prakashan's Books
In the vast and vibrant world of Marathi literature, Sahitya Chaprak has carved a niche that resonates deeply with readers of all ages. Their commitment to nurturing literary talent, especially from rural areas, and enriching the cultural fabric through diverse content is nothing short of inspiring. As someone who has delved into their collection, I find it essential to share book review insights that illuminate the unique qualities and profound impact of Sahitya Chaprak’s o
2 days ago3 min read


एलियन
आपल्या पृथ्वी सारख्या अनेक पृथ्वी इतर आकाशगंगेमध्ये आहेत. त्यामुळे त्यावरही जीवसृष्टी असल्याचा अंदाज नेहमी व्यक्त केला जातो. इतर ग्रहांवरील सजीवांना 'एलियन' असं संबोधलं जातं. विदेशात त्यांना 'यूएफओ' अर्थात 'अनआयडेंटिफाइड फ्लाइंग ऑब्जेक्ट' असं म्हटलं जातं. यांच्या शरीराची ठेवण व यांचा आकार वेगळ्या ढंगाचा असल्याचे बोलले जाते. एलियन पाहिल्याचा दावा अनेक जण करत असतात. उपलब्ध माहिती नुसार १९६४ मध्ये न्यू मेक्सिको येथे एका पोलीस अधिकाऱ्याने एलियन पाहिल्याचा दावा केला होता. या
Jan 19, 20226 min read


स्वभावाचे उत्तरायण
'एक तीळ सात जणांनी वाटून खाल्ला', 'तिळगुळ घ्या गोड बोला' ही वाक्ये आजकाल 'बोलाची कढी बोलाचाच भात' या वाकप्रचारात मोडत आहेत. असे असताना देखील कामापुरत्या गोडबोल्या माणसांच्या भाऊगर्दीत काही माणसं अशी असतात जी आपल्या स्वभावाच्या साखरेने आयुष्य गोड करून जातात. आपल्या भारतीय संस्कृतीत साजरे केले जाणारे सण आणि निसर्ग याचा खूप जवळचा संबंध आहे. त्यात मकर संक्रांतीचे विशेष महत्व आहे. या दिवशी सूर्याचे उत्तरायण सुरू होऊन तो मकर राशीत प्रवेश करतो. हळूहळू 'उजेडाचे राज्य' सुरू होते. विव
Jan 14, 20222 min read


नायिका
न क्रोधो न च मात्सर्यं न लोभो नाशुभा मति: । भवन्ति कृत पुण्यानाम् भक्तानां श्रीसूक्तं जपेत् ॥ श्रीसूक्तामधील वरील ऋचा सांगते की श्रीसूक्ताच्या पठणाने, पुण्यवान भक्ताच्या मनात, राग-लोभ-मत्सर इत्यादी वाईट विचार येत नाहीत! तिला मी कधी श्रीसूक्त म्हणताना पाहीले नाही परंतु वरील सर्व वर्णन तिला तंतोतंत लागु पडत होते. अर्थात हे आता एवढ्या वर्षांच्या आयुष्याच्या अनुभवाने समजते आहे. त्यावेळी तिच्यामधील हे मोठेपण समजण्याची आमची पात्रता नव्हती असंच म्हणावं लागेल. ‘ती’ म्हणजे माझी आजी,
Jan 12, 20226 min read


अद्वितीय योध्दा संन्यासी... स्वामी विवेकानंद
स्वा मी विवेकानंद यांचा जन्म १२ जानेवारी १८६३ रोजी कोलकाता येथे झाला. लहानपणी त्यांचे नाव नरेंद्रनाथ असे ठेवण्यात आले होते. विवेकानंदांचे वडील विश्वनाथ दत्त हे कोलकात्याच्या हायकोर्टात एक प्रसिद्ध वकील म्हणून कार्यरत होते. ते पाश्चात्य सभ्यतेवर विश्वास ठेवणारे होते. मात्र नरेंद्रची आई भुवनेश्वरीदेवी या धार्मिक विचाराने वागणाऱ्या गृहिणी होत्या. त्यांचा जास्तीत जास्त वेळ हा भगवान शिवजी यांच्या भक्तीमध्ये जात होता. लहानपणापासूनच विवेकानंद खूप हुशार आणि खोडकर होते. ते आपल्या स
Jan 12, 20224 min read


मादी बिबट्याच्या अनोख्या वत्सलभावनेची नोंद
को कणची सांस्कृतिक राजधानी असलेल्या चिपळूण नजिकच्या धामणवणे येथील श्रीविठ्ठलाई आणि श्रीविंध्यवासिनी मंदिरांचे सान्निध्य लाभलेल्या डोंगरात 2021 च्या वर्षारंभी सापडलेल्या बिबट्याच्या दोन बछड्यांची आणि त्यांची आई बिबट्याची भेट घडवून आणण्यासाठीच्या शासकीय वनविभाग रत्नागिरी आणि वन्यजीव अभ्यासकांच्या प्रयत्नांना आठवड्याभराच्या संयमित प्रयत्नांनंतर यश प्राप्त झालं. मातृत्वापासून कायमचे पारखे होण्याच्या वाटेवर असलेल्या बिबट्याच्या दोन बछड्यांना (एक नर, एक मादी) मादी बिबट्याने सोबत घे
Jan 10, 202214 min read
कोणता झेंडा घेऊ हाती?
राजकारण हे एक असं क्षेत्र आहे जिथं कुणाच्याही घरादाराची रांगोळी सहजपणे होते. गंमत म्हणजे वरिष्ठ स्तरावरील नेते कधी एकमेकांशी शत्रूत्व करतात आणि कधी ‘ तुझ्या गळा माझ्या गळा’ करतात हे सांगता येणे शक्य नसल्याने या सगळ्यात हाडवैर निर्माण होते ते मात्र सामान्य कार्यकर्त्यांत. अनेकदा एकाच गावात, एकाच गल्लीत राहणारे मित्र वेगवेगळ्या पक्षाच्या नेत्यांच्या छत्रछायेखाली जातात आणि त्यांची तळी उचलताना आपापसात भांडत राहतात. ही भांडणे इतकी विकोपाला जातात की त्यात दोघेही उद्ध्वस्त होतात.
Aug 25, 20213 min read
नारायणऽऽ नारायणऽऽऽ
प्रभू श्रीराम, लक्ष्मण आणि सीतामैय्या वनवासात होते. चौदा वर्षांचा वनवास होता. वनवासाचा दिनक्रम ठरलेला असायचा. सकाळी लवकर उठून लक्ष्मणानं सरपण आणायचं, कंदमुळं आणायची! सीतामाईंनी भोजनाची व्यवस्था करायची! रामानं संरक्षण करायचं! दिवसभर प्रवास करायचा आणि आजूबाजूच्या परिसराचं निरिक्षण करून मुक्कामाची जागा रामानं निश्चित करायची. लक्ष्मणानं झोपडी उभी करायची. आवश्यक ते सामान आणायचं. सीतामाईनं जमेल तसं रांधायचं... दिवसभर एकमेकांशी सुखदुःखाच्या गप्पागोष्टी करायच्या. एकमेकांशी अतिशय प्र
Aug 25, 20213 min read
छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक का केला?
छत्रपती शिवाजी महाराज. मरगळलेल्या मनात चेतनेचा संचार करवणारा प्रेरणामंत्र. हा शब्द म्हणजे महाराष्ट्राचा उर्जस्वल इतिहास. मार्गदर्शक वर्तमान आणि दिशादर्शक भविष्य आहे. कितीही नकारात्मक परिस्थितीशी झगडण्याचं बळ देणारा हा मंत्र आहे. छत्रसालपासून ते नेताजी सुभाषबाबूंपर्यंत कित्येक राष्ट्रनायकांना लढण्याची आणि विजयाची गाढ प्रेरणा देणारे हे अद्भूत व्यक्तीमत्व. नेताजी एकदा पुण्यात भाषण देताना म्हणाले होते, 'दिल्लीच्या तख्ताविरुद्ध शिवाजी महाराजांनी जो दीर्घकाळ लढा दिला, तो आज आधुनिक
Jun 6, 20216 min read
सोच बदलो...तुम बदलोगे
‘‘विचार सतत वाहतात पण त्यांचे सामर्थ्य कमी होत नाही. ते नदीप्रमाणे असतात. एक एक विचार येत गेला, नाहीसा होत गेला पण सत्ता चालली ती विचारांचीच! मनुष्याला या विचारांपासूनच प्रेरणा मिळत आली आहे. विचारांच्या सामर्थ्याची तुलना करावी अशी अन्य शक्ती या जगात नाही,’’ हे अनमोल चिंतन आहे... आचार्य विनोबा भावे यांचं! चांगल्या विचारांनीच माणूस घडत असतो. मात्र सकारात्मक विचार करणार्या लोकांची प्रगती लवकर होताना आपल्याला दिसून येईल. याउलट नकारात्मक विचार करणार्या व्यक्तिंना अनेक संकटांना
May 28, 20213 min read
संवाद व स्वगत
मानवाला मिळालेली सर्वात मोठी देणगी म्हणजे विचार करण्याची शक्ती. या विचार करण्याच्या शक्तीवरच मानवाच्या आयुष्याचा डोलारा उभा असतो. मानवाच्या प्रत्येक कृतीत काही ना काही तरी विचार असतोच. अगदी तान्हे बाळसुद्धा आपल्याला तहान, भूक लागली आहे हा विचार आपल्या रडण्यावाटे आईपर्यंत पोहोचवतच असते. या वयापासून मानव विचार करण्यास तयार होत असतो. आई, बाबा, इतर मंडळी या विचार प्रक्रियेला वळण देत असतात. तहान लागल्यावर स्वतःच्या हाताने पाणी घेण्याचा विचार आईच त्याच्या मनात रुजविते. लहान असतान
May 28, 20214 min read
आठवणीतील चित्रपटगृहे
साधारणतः १९५१ ते १९७० ही जी २० वर्षे होती तो काळ भारतीय हिंदी चित्रपटसृष्टीचा सुवर्णकाळ ओळखला जातो. खरोखरच त्या काळात एकापेक्षा एक सरस नितांत सुंदर अशा चित्रपटांची रेलचेल होती. त्या काळातील प्रत्येक अभिनेत्याने तसेच अभिनेत्रीने आपल्या अंगभूत अभिनयाने रसिकांच्या मनावर राज्य केले होते. चित्रपट संगीताने त्या काळात सुवर्णकळसच गाठला होता. श्रवणीय तसेच अनवट चालीची गाणी देऊन संगीतकारांनी रसिकांना मंत्रमुग्ध केले होते. काही चित्रपटांत आठ ते दहा गाणी असूनही सगळीच गाणी श्रवणीय असायची.
May 11, 20216 min read
आंबोलीत सुरु आहे, स्वच्छतेचा 'अभिषेक'
गेल्यावर्षी कोरोना विषाणूच्या संक्रमणापूर्वी महिनाभर अगोदर शेवटची जंगलमय आंबोली पाहिली होती. तेव्हा अनेक ठिकाणी नजरेला खटकलेल्या कचऱ्याने तीव्र दु:खही झालेलं. सोबत असलेले वन्यजीव अभ्यासक रोहन कोरगावकर मात्र प्रत्येक नेचरट्रेलमध्ये जंगलवाटांवर पडलेला कचरा गोळा करत होते. यंदाही कोरोनाची दुसरी लाट महाराष्ट्रात सक्रीय होण्यापूर्वी मार्चच्या शेवटच्या आठवड्यात आंबोलीला गेलेलो. तेव्हाही नेचरट्रेलमध्ये जंगलवाटांवर पडलेला कचरा गोळा करण्याचे काम चालू राहिले. दरम्यान ‘आंबोली’त स्वच्छत
Apr 18, 20214 min read
जगातलं पहिलं प्रेमपत्र
आजकाल मोबाईलच्या वापरामुळे पत्रलेखन जवळपास थांबल्यासारखेच झाले आहे. काही वर्षांपूर्वीचा काळ म्हणजे आपल्या आवडत्या व्यक्तिच्या पत्राची वाट पाहण्याचा काळ होता. पत्र लिहिणार्याच्या भावना पत्रात उतरत आणि ते ज्याला लिहिले आहे त्याच्यापर्यंत जाऊन पोहोचत. म्हणून तर प्रिय व्यक्तिची पत्रे जपून ठेवली जात. त्यांची पुन्हा पुन्हा पारायणे होत असत. हिंदी चित्रपटात तर या गोष्टीचा उपयोग करून गीतलेखकांनी अनेक गाणी लिहिली आहेत आणि ती कमालीची लोकप्रिय होऊन लोकांच्या ओठांवर आली. नायिकेने नायकाल
Apr 17, 20212 min read
इन्सान ढुंढने मै चला...
माणूस हा जगाच्या पाठीवर एकच असा प्राणी आहे, ज्याला वाटतं आपण सगळं काही करु शकतो. आपण अख्ख्या जगावर नियंत्रण ठेवू शकतो, एवढा तो महत्त्वाकांक्षी होत चालला आहे. बटन दाबताच त्याला सर्व कसं समोर हजर पाहिजे असतं. सगळ्या यंत्रणांंचं रिमोट कंट्रोल आपल्याच हातात असावं अशीच त्याची अपेक्षा असते. सर्वांनी आपलंच ऐकून घ्यावं, असा त्याचा सतत आग्रह असतो! दुर्दैवानं हा माणूस इतर मनुष्यप्राण्यांचं म्हणजे आपल्याच बांधवांचं काही एक ऐकून घ्यायला तयार नसतो. त्यामुळे माणसातलं मनुष्यत्व कुठं हरवत तर
Apr 17, 20213 min read
भूमी, निसर्ग आणि नात्यांच्या ताटातुटीचे वर्तमान आगंतुकाची स्वगते
अभिव्यक्ती प्रामाणिक असली की थेट हृदयाच्या गाभ्यातून कविता जन्माला येते. मातीच्या मुळापर्यंत गेलं की जोमानं पीक तरारून येतं, हीच गोष्ट कवितेबाबतची. सभोवतालचा अस्वस्थ करणारा काळ मोठा विचित्र आहे. अशावेळी कवीची होणारी अस्वस्थ घालमेल म्हणजे कवितेपूर्वीची स्वतःची सोलुन निघण्याची जणू एक प्रक्रियाच असते. त्यातुन येणारी अस्सल कविता म्हणजे स्वतःला चिंतनातून व्यक्त करणारी एक साधनाच असते. कवी कैलास दौंड यांची कविता वाचतानाचा अनुभव असाच आहे. उसवत जाणारा गाव आणि बदलत्या जीवनशैलीतलं आपल
Apr 17, 20214 min read
महाराष्ट्राचे विचारदुर्ग, हेच संस्कारदुर्ग!
माझा जन्म छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात झाला आहे याचा मला सार्थ अभिमान आहे. माझ्या महाराष्ट्राला लाभलेलं वैचारिक आणि सांस्कृतिक वैभव हे जगात वाखाणले गेले आहे. आपल्या बालमनावरही ह्या संस्कृतीचा पगडा नक्कीच जाणवतो व त्याचा अभिमानही वाटतो. नुकतेच माझ्या हातात ‘चपराक प्रकाशन’ पुणे यांनी 12 जानेवारी 2021 ला पुण्यात प्रकाशित केलेले नाशिकचे लेखक श्री. रमेश वाघ यांचे ‘महाराष्ट्राचे विचारदुर्ग’ हे ‘संत चरित्रावर’ आधारित पुस्तक पडले आणि मी ते एखाद्या शाळकरी मुलासारखे उत्साहा
Apr 17, 20213 min read
झुंडशाहीचं करायचं काय...?
सार्वजनिक उपद्रव आणि झुंडशाही म्हणजे सार्वजनिकपणे जनक्षोभ किंवा जनआंदोलनाच्या नावाखाली कायदा हातात घेऊन शिक्षेचा अधिकार स्वतःच्या हातात घेणे, एखादी गोष्ट करण्यापासून वाटेल त्यास बेकायदा प्रतिबंधीत करणे अथवा करवून घेण्यासाठी उपद्रव्यमूल्य वापरून अथवा तसे करण्याची धमकी देऊन केलेली दडपशाही अथवा दंडेलशाही होय. जेव्हा घटनात्मक जबाबदारी असलेल्या संस्था स्वतःची जबाबदारी पार पाडण्यात, लोकशाहीचे आधारस्तंभ सुयोग्य न्याय वेळेत देण्यात अपयशी होतात, सोबत समाज किंवा माध्यमांच्या सर्वसाधा
Apr 17, 20214 min read
आठवणींचा सुगंध
मानवाला मिळालेली सर्वात मोठी देणगी म्हणजे आपल्या ठायी असलेली स्मरणशक्ती. प्रत्येकाच्या मनात या स्मरणशक्तीसाठी एक कोपरा राखलेला असतो. हव्याहव्याशा वाटणार्या आठवणी मनातील या कोपर्यात दडविलेल्या असतात. हळूवार फुंकर मारताच या आठवणी ताज्या होऊन आपल्या मनाभोवती व विचारांभोवती रूंजी घालून आपल्याला वेगळ्याच विश्वात घेऊन जातात. त्या विश्वात फक्त आपण व आपण जतन केलेल्या आठवणी असतात. सामान्यतः आपण सकारात्मक व उत्साहवर्धक तसेच मनाला टवटवी देणार्या आठवणी मनाच्या कोनाड्यात जपून ठ
Apr 17, 20214 min read
bottom of page
.jpg)




