top of page
विशेष लेख


..पण लक्षात कोण घेतो? कोर्स करेक्शन केले जाईल? -प्रा. दिलीप फडके
हा लेख प्रसिद्ध होईल तेव्हा लोकसभेच्या निवडणुकांचे निकाल लागून जवळपास महिना झालेला असेल. ‘चार सौ पार’चा नारा देणारा भाजपा साधे बहुमत देखील मिळवू शकला नाही पण एनडीएमधल्या घटक पक्षांच्या साहाय्याने बहुमत मिळवून नरेंद्र मोदी तिसर्यांदा सत्तेवर आले हे देखील आता जुने झाले. उत्तर प्रदेश, राजस्थान, बंगाल, महाराष्ट्र ह्या राज्यांमध्ये भाजपाचे पानिपत झाले ही गोष्ट देखील आता जुनी झाली. हे असे का झाले आणि यातून भाजपा कोणता बोध घेणार आहे यावर बरीच चर्चा होते आहे. कुणी घटनादुरुस्ती.... म
Jun 27, 20244 min read


परिवर्तनाची नांदी - घनश्याम पाटील
कोणतीही व्यक्ती किंवा संस्था सर्वोच्च स्थानी गेली की पुन्हा तिची घसरण सुरू होते, हा निसर्गाचा नियम असतो. म्हणजे एखादा डोंगर सर केल्यावर पुन्हा उतरंड लागतेच. अशावेळी डोंगरावर काही सपाट भाग असतो. तिथे तुम्ही किती वेळ थांबता हे तुमच्यावर अवलंबून असते. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारने 2014 आणि 2019 साली घवघवीत यश मिळवल्यानंतर यंदाही त्यांना सत्तेची उब अनुभवता येईल, असेच सर्वांना वाटत होते. त्यातूनच त्यांनी ‘चार सौ पार’चा नारा दिला आणि मतदारांनी त्यांना खाडकन जागेवर
Jun 26, 20245 min read
योगाचे निर्माते प्राचीन जैन तत्त्वज्ञ, योगाचे प्राचीन नाव ‘व्रत’ - संजय सोनवणी
योग हा प्रथम उपनिषदांमध्ये विशद केला आहे असे मानले जाते. उपनिषदे वेदांचे शेवटचे भाग मानले जातात. म्हणून त्यांना वेदांत असे म्हणण्याचीही प्रथा आहे. प्रत्यक्षात उपनिषदात येणारे तत्त्वज्ञान हा ऋग्वेदात येणार्या भौतिकवादी विचारांचा तार्किक विस्तार असू शकतो की नाही यावर वाद झाला आहे व पुढेही होत राहील. प्रत्यक्षात मात्र उपनिषदे ज्या आध्यात्मिक क्षेत्रांचा शोध घेतात त्यामागील आध्यात्मिक तत्त्वज्ञान आणि वेदांनी प्रतिपादन केलेल्या ऐहिक सुखाच्या प्राप्तीसाठी केल्या जाणार्या विधीविधा
Jun 19, 202417 min read
आईच्या म्हणी : एक समृद्ध दालन- डॉ. शकुंतला काळे
भाषेचे सैांदर्य अनेक अंगांनी बहरतं, समृद्ध होतं ते त्यातील शब्दप्रयोग, म्हणी, वाकप्रचार यांच्या वापराने. त्यात म्हणींचा वापर हा तर भाषिक समृद्धीचा परमबिंदू आहे. म्हणींचा वापर करत वारसा निर्माण करण्याचे काम जुन्या पिढीतील मंडळींनी केले आहे. भावभावनांचा आविष्कार, रूढी, परंपरा, लोकजीवन, त्या-त्या भागातील संस्कृती, मूल्ये, जगण्यातला विरोधाभास, प्रकृृती आणि विकृती या साऱ्याचं प्रतिबिंब म्हणींच्या वापरातून ध्वनीत होतं. म्हणींमध्ये विनासायास जुळलेला यमक भाषेच्या नजाकतीत अजून भर घालत
Jun 4, 20245 min read


आरोपी : सोडवायचा की सडवायचा? - संजय सोनवणी | Accused and Accusations : Analysis of Natural Justice
न्यायाच्या बाजू अनेकदा दुर्बोध आणि त्यामागील कारणमीमांसा अनाकलनीय असते. न्याय हे सुडाचे प्रतीक बनून गेले असल्याचे आपल्याला मध्ययुगपूर्व कायद्यांतून दिसून येते. मग ते धार्मिक न्याय असोत की राजसत्ता प्रवर्तित. अनेकदा दोन्हीही न्याय हे एकमेकांत बेमालूम मिसळले गेले असल्याचेही आपल्याला दिसून येईल. हाताच्या बदल्यात हात आणि डोळ्याच्या बदल्यात डोळा हे नैसर्गिक न्यायाचे तत्त्व प्रदीर्घ काळ मानवी जगावर राज्य करत असल्याचे आपल्याला त्याचमुळे दिसते. ईश्वरनिंदा हे घोर पातक मानून देहदंड दे
May 28, 20247 min read


सावरकरांची कविता: आत्मबल -सौ. सुषमा राम वडाळकर, बडोदे
स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या प्रत्येक कृतीतून, त्यांच्या लेखनातून व आजवर वाचलेल्या त्यांच्याबद्दलच्या प्रत्येक लेखातून, पुस्तकातून प्रकर्षाने जाणवते ती त्यांची प्रखर देशभक्ती, ओजस्वी बुद्धिमत्ता, त्यांची काव्यप्रतिभा व सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्यांचे ‘आत्मबल’ होय. या आत्मबलाच्या जोरावरच तर ते मार्सेलिसच्या समुद्रात जहाजाच्या हातभर रुंद खिडकीतून 20 फूट उंचावरून अथांग समुद्रात उडी टाकू शकले होते व याच आत्मबलाच्या जोरावर अंदमानासारख्या ठिकाणी एका अंधार्या कोठडीत, अनन्वित शारीर
May 28, 20243 min read
सुख म्हणजे नक्की काय असतं!!
बालपण आठवले की मला एकच गाव कधीही आठवत नाही. जसं कळायला लागलं आणि मला पहिल्यांदा शाळेत घातलं ते माझ्या वडिलांच्या मूळ गावी असणाऱ्या बालवाडीत. वडील व चुलते नोकरीसाठी मुंबईला आणि आमचे आज्जी आजोबा गावी असल्याने आमचं कुटुंब आणि काकांचे कुटुंब आलटून पालटून काही वर्षे मुंबई तर काही वर्षे गावी राहत. बरं , गावी राहिल्यावर मी वडिलांच्या गावीच राहिलेय आणि एकाच शाळेत शिकले असंही नाही. माझी पहिली माझ्या आजोळी , दुसरी तिसरी आत्त्याच्या गावी ,चौथी /पाचवी /सहावी मुंबईत तर सातवी ते दहावी मात
May 28, 20243 min read
दहावी नंतर काय करायचं? - डॉ. श्रीराम गीत
35% ते 65% मिळवून यशस्वी होणार्यांसाठी गरजेचे कोणताही अभ्यासक्रम शिकण्यासाठी एक अडचण असते. आपण पहिलीपासून दहावीपर्यंत कुठला ना कुठला तरी क्लास लावून शिकत आलेलो असतो. ज्यांनी लावलेला नाही त्यांच्या संदर्भात हा प्रश्न येत नाही पण असे विद्यार्थी फारच क्वचित सापडतात. ही अडचण अकरावी नंतरच्या प्रत्येक अभ्यासक्रमामध्ये बर्यापैकी उद्भवते. ज्या संस्थेच्या अभ्यासक्रमाला आपण प्रवेश घेतो त्यासाठीचे पैसे बँक कर्ज म्हणून देऊ शकते पण कोणत्याही क्लाससाठी किंवा खाजगी शिकवणीसाठी पैसे कोणीही
May 28, 20242 min read
किमयागार
‘राज्याचा व्यापार म्हणजे राज्याची शोभा आहे, राज्य संपन्न व्हायचे असेल तर राज्यात व्यापार चांगल्या प्रकारे व्हायला हवेत’ हे त्याकाळी छत्रपती श्री शिवाजीमहाराजांनी सांगितले होते. ‘आज्ञापत्रा’त व्यापारविषयक धोरण सांगताना त्यांनी नोंदवून ठेवले आहे की, ‘साहुकार म्हणजे राज्याची व राजर्षिंची शोभा. परमुलखी जे जे साहुकार असतील त्यांची समाधानी करून ते आणावे. त्यांसि अनुकूल पडे तरी असतील तेथेच त्यांचे समाधान रक्षून, आपली माया त्यांस लावावी. व्यापारामुळे राज्य श्रीमान होते म्हणून राज्या
May 22, 20243 min read


निवडणुका दरवर्षी का होत नाहीत? - किस्सा ए इलेक्शन - घनश्याम पाटील
पुण्याचे माजी महापौर आणि शरद पवार यांचे निष्ठावान अनुयायी अंकुश काकडे यांचे ‘हॅशटॅग पुणे’ हे पुस्तक मध्यंतरी उत्कर्ष प्रकाशनने प्रकाशित केले. या पुस्तकात त्यांनी पुण्याच्या सामाजिक, राजकीय संस्कृतीचा वेध घेतलाय. त्यात त्यांनी निवडणूक प्रचाराचे काही इरसाल किस्से सांगितले आहेत. काकडे लिहितात, मनसे आमदार रमेश वांजळे यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या खडकवासला विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक होती. त्याचा निरीक्षक म्हणून मी हिंगणे परिसरात प्रचार करत होतो. सायंकाळी साडेसहाची वेळ होती
Apr 17, 20242 min read


स्थानिक विरुद्ध उपरा : किस्सा-ए-इलेक्शन - घनश्याम पाटील
सोलापूर लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसच्या उमेदवार आमदार प्रणिती शिंदे यांनी त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार आमदार राम सातपुते यांना एक पत्र लिहिले. त्यात त्यांनी सोलापूरच्या संस्कृतीविषयी लिहून सातपुते हे बाहेरचे म्हणजे उपरे असल्याचे सांगितले. त्यावर सातपुते यांनीही त्यांना प्रतिउत्तर देत आपण सोलापूर जिल्ह्यातीलच माळशिरस विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आल्याचे आणि सोलापूरशी आपला नियमित संपर्क असल्याचे सांगितले. मुख्य म्हणजे एका माजी मुख्यमंत्र्याची मुलगी आणि एका ऊसतोड क
Apr 16, 20242 min read


फाईल आणि दादूमियाँ : किस्सा-ए-इलेक्शन - घनश्याम पाटील
दादूमियाँ उर्फ दामोदर विष्णू नेने हे बडोद्यातील एक मोठं प्रस्थ. स्तंभलेखक म्हणून त्यांची ओळख आहे. इंदिरा गांधी यांचं पहिलं चरित्र त्यांनी लिहिलं. नरेंद्र मोदी दादूमियाँच्या घरी येणार्या पाहुण्यांच्या मदतीसाठी स्वयंसेवक म्हणून काम करायचे. मध्यंतरी ते पुण्यात एमआयटीने आयोजित केलेल्या ऋषिपूजनाच्या कार्यक्रमासाठी आले होते. नव्वदीच्या पुढे वय असूनही त्यांच्या चेहर्यावरील विद्वत्तेचं तेज विलक्षण आहे. त्यांनी एक किस्सा सांगितला. त्यावेळी ते ‘माणूस’ साप्ताहिकात ‘दिल्लीतला महाराष्ट्
Apr 15, 20242 min read


उद्योजकांना वापरा, कामे सामान्यांची करा! | किस्सा ए इलेक्शन - घनश्याम पाटील
बॅरिस्टर विठ्ठलराव गाडगीळ हे पुण्यातून काँग्रेसतर्फे खासदार म्हणून निवडून जायचे. ते केंद्रीय संरक्षण उत्पादन मंत्री होते. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचीही जबाबदारी त्यांनी सांभाळली. कै. न. वि. उर्फ काकासाहेब गाडगीळ यांचे ते चिरंजीव. काकासाहेब आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची चांगली मैत्री होती. एकदा बॅरिस्टर गाडगीळ दिल्लीला गेले असता डॉ. आंबेडकरांना भेटले. त्यावेळचा किस्सा ते रंगवून सांगायचे. त्यांच्या चेहर्यावर किस्से सांगताना कायम एक मिश्किल हास्य असायचं. बाबासाहेबांनी त्या
Apr 13, 20242 min read
सरीवर सरी - श्रद्धा बेलसरे-खारकर
सुप्रसिद्ध लेखिका, कवयित्री आणि महाराष्ट्र राज्याच्या निवृत्त माहिती संचालक श्रद्धा बेलसरे-खारकर यांचे हे नवे सदर या अंकापासून देत आहोत. बेलसरे यांचे ‘मोरपंखी', ‘आजकाल' आणि ‘फाईल व इतर कविता' हे कवितासंग्रह प्रकाशित आहेत. ‘टिकली तर टिकली' हा ललितलेखसंग्रह आणि ‘सोयरे' हा व्यक्तिचित्रणाचा संग्रह प्रकाशित आहे. त्यांचे ‘डबल बेल' हे एस.टी.मधील अभिनव उपक्रमाचे अनुभवकथनही प्रकाशित आहे. त्यांनी अनेक मान्यवर वृत्तपत्रांसाठी सदर लेखन केले असून त्यांना ‘कवी कट्टी', ‘पद्मश्री विखे पाटील'
Apr 3, 20249 min read


उद्ध्वस्त व्यक्तिमत्त्वाचे राज्य... महाराष्ट्र! - संजय सोनवणी
जसे माणसाला एक व्यक्तिमत्त्व असते तसेच व्यक्तिमत्त्व राज्य आणि राष्ट्राचेही असते. व्यक्तिच्या जीवनाचे अनुभव, अर्जित केलेले ज्ञान आणि त्याचा उपयोग करत समाजाला वा परिवाराला दिलेले योगदान, एकुणातील वागणे इ. बाबीवरून त्याचे व्यक्तिमत्त्व ठरते. स्वत:ला जाणवणारे व्यक्तिमत्त्व आणि इतरांना भासणारे अथवा वाटणारे व्यक्तिमत्त्व यात जुळणारे सांधे असतातच असे नाही. तरीही एकुणात व्यक्तिमत्त्व ही बाब मानवी जीवनात महत्त्व घेऊन बसते. व्यक्तिला मिळणारा सन्मान अथवा त्याच्याकडे होणारे दुर्लक्ष या
Apr 1, 202414 min read


वाचन ही ‘संस्कृती' आहे काय? - घनश्याम पाटील
भारतीय भाषात शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी अशा श्रमिकांवर बरेच साहित्य लिहिले गेले. असे साहित्य ज्यांच्यावर लिहिले गेले त्यांना त्या साहित्याचा कधी काही फायदा झाला नाही, असे मानणारा एक मोठा मतप्रवाह आहे. वाचनाने क्रांती झाली असती तर गीता, कुरान, बायबल वाचून लोक सुधारले नसते काय? रामायण-महाभारत अशा महाग्रंथातून त्यांनी काही बोध घेतला नसता काय? असाही प्रश्न उपस्थित केला जातो. बरं, ज्यांचं वाचन भरपूर आहे त्यांचा खूप विकास झाला असे तरी काही चित्र आहे का? जे आयुष्यभर भरपूर वाचतात ते मन
Apr 1, 20244 min read


ज्ञानेश्वरीतील वसंतऋतू...
ज्ञानेश्वरी हा मराठी माणसांच्या जीवनातील कोहिनूर आहे. जीवनाच्या आणि निसर्गाच्या सर्व बाजूला स्पर्श करणारा परीस आहे. या परिसाच्या स्पर्शाने आपल्या जीवनाचे सोने झाले आहे. ज्ञानेश्वरीत निसर्गाचा मुक्त वावर आहे. निसर्गातील चराचर सृष्टीचे दर्शन वेळोवेळी यामध्ये दिसून येते. ज्ञानेश्वरीतील वसंत ऋतुचा शोध घेताना जाणवले की, समग्र ज्ञानेश्वरीच एक वसंत ऋतू आहे. वसंत ऋतुतील चैतन्य, ताजेपणा, नवनिर्मिती, सुगंधाचा बहर, आंब्याचा मोहोर, कोकिळेचे कूजन, सृष्टीचे पूजन, सगळे ज्ञानेश्वरीत ठाई ठ
Mar 27, 20247 min read


तीन सारांश कथा - नागनाथ कोत्तापल्ले
कथा हा अतिशय लवचिक असा वाङमयप्रकार आहे. संस्कृतिच्या प्रारंभापासून कविता आणि कथा लिहिल्या जातात. पुढे नाटक आले. म्हणजे साहित्याचे हे मूळ आविष्कार रूपे होत. कथा ही लवचिक असल्यामुळे ती असंख्य रुपात व्यक्त झालेली आहे. होऊ शकते. लघुत्तम कथा, लघुकथा, गोष्ट, कथा, दीर्घकथा, धक्कांतिका अशा विविध रुपात कथा लिहिली गेली. कमीत कमी अवकाशात खूप काही सूचित करण्याचे सामर्थ्य कथा या वाङ्मय प्रकारात असते. शिवाय काही अनुभवच असे असतात की, कथेशिवाय ते अनुभव इतरत्र व्यक्त होऊच शकत नाहीत. एक प्रकार
Mar 22, 20246 min read


मराठवाड्यातील खाद्यसंस्कृती
अश्मयुगीन कालखंडापासून ते आजच्या आधुनिक युगापर्यंत मानवाच्या जीवनात वेगवेगळे बदल होत गेले. संस्कृती बदलल्या. जीवनमान बदलले. अन्न, वस्त्र, निवारा या तीन गरजा मात्र कधीच बदलल्या नाहीत. गरजांचे स्वरूप फक्त बदलले, कंदमुळे खाणारा आदिमानव आणि विविध पदार्थ चवीनं खाणारी आजची पिढी या दोन बिंदूच्या मध्ये असलेला भक्कम खाद्यप्रवास निश्चितच रंजक, ज्ञानवर्धक आणि विशेषतः भूकवर्धक आहे. दहादहा कोसावर भाषा बदलते. तसेच अन्नपदार्थ आणि त्यांच्या चवीही बदलतात. प्रांताप्रांतामधील अनेक खाद्य पदार्था
Mar 16, 20244 min read
मार्गस्थ (कथा) - अनिल राव
सभागृह संपूर्णपणे भरायला आलं होतं. आज विठ्ठल पांडुरंग कापडनेकर यांची ‘मार्गस्थ' ही दहावी कादंबरी प्रकाशित होत होती. त्यांची आजपावेतो चोवीस पुस्तके प्रकाशित झाली होती. आजचे पंचविसावे पुस्तक प्रकाशित होत होते. साहित्य क्षेत्रातील ते एक मोठं प्रस्त होतं. सदोदित हसत-खेळत राहणारं व्यक्तिमत्त्व होतं. सगळ्यांना आपलेसे करणारे साहित्यिक असा त्यांचा नावलौकिक होता. आजपर्यंत त्यांचे साहित्य ज्या ज्या प्रकाशकांनी प्रकाशित केले होते त्यांनी सर्वांनी मिळून आजचा हा मोठा समारंभ आयोजित केला हो
Mar 13, 202411 min read
bottom of page
.jpg)




