top of page
व्यक्तिविशेष
किमयागार
‘राज्याचा व्यापार म्हणजे राज्याची शोभा आहे, राज्य संपन्न व्हायचे असेल तर राज्यात व्यापार चांगल्या प्रकारे व्हायला हवेत’ हे त्याकाळी छत्रपती श्री शिवाजीमहाराजांनी सांगितले होते. ‘आज्ञापत्रा’त व्यापारविषयक धोरण सांगताना त्यांनी नोंदवून ठेवले आहे की, ‘साहुकार म्हणजे राज्याची व राजर्षिंची शोभा. परमुलखी जे जे साहुकार असतील त्यांची समाधानी करून ते आणावे. त्यांसि अनुकूल पडे तरी असतील तेथेच त्यांचे समाधान रक्षून, आपली माया त्यांस लावावी. व्यापारामुळे राज्य श्रीमान होते म्हणून राज्या
May 22, 20243 min read


गझलसम्राट सुरेश भट - नागेश सू. शेवाळकर
अमरावती येथे डॉ. श्रीधर भट आणि त्यांची पत्नी शांताबाई यांचे वास्तव्य होते. 15 एप्रिल 1932 रोजी या दांपत्याच्या पोटी पुत्ररत्नाचा जन्म झाला. तो दिवस म्हणजे रामनवमी! मोठ्या आनंदाने बारसे साजरे झाले. मुलाचे नाव सुरेश ठेवण्यात आले. श्रीधर भट हे कान, नाक, घसातज्ज्ञ होते. अमरावती येथील त्यांच्या वसाहतीत अनेक जाती-धर्माचे लोक राहत होते. त्यातही ख्रिश्चन, पारशी, मुस्लिम कुटुंबीय अधिक होते त्यामुळे साहजिकच डॉक्टरांना मराठीपेक्षा हिंदी आणि इंग्रजी भाषेतून बोलावे लागे. शांताबाईंनी घरकाम
Apr 3, 20246 min read


पेट्रोलपंप चालविण्याची बालपणीची ‘मनीषा’ झाली पूर्ण, व्यवस्थापक ते कर्मचारी सर्व महिलाच
संगमेश्वर हे मूळ गाव असलेल्या मनीषा रहाटे यांचे घराणे व्यावसायिक. त्यांनी सिव्हिल इंजिनिअर हे शिक्षण घेतले. काही काळ त्यांनी बांधकाम व्यवसायात कंत्राटे घेणे आणि त्यानंतर पंतप्रधान ग्रामसडक योजनेत अभियंता म्हणून स्वतःच्या नावाचा वेगळा ठसा उ मटवला; मात्र घराण्याची व्यावसायिक परंपरा पाहता त्यांचे मन सरकारी नोकरीत रमत नव्हते. याच दरम्यान भारत पेट्रोलियम या कंपनीची मुंबई-गोवा महामार्गावर खेड तालुक्यात खास महिलांसाठी पेट्रोलपंपाची जाहिरात निघाली. ही जाहिरात मनीषा यांचे वडील गणपत रह
Mar 8, 20243 min read


मराठी साहित्यातील स्त्री संतांचे योगदान - माधवी देवळाणकर
कुठल्याही प्रदेशाचा सांस्कृतिक व साहित्यिक इतिहास किंवा मागोवा घेताना त्या प्रदेशाचा भौगोलिक व राजकीय इतिहास बघणे महत्त्वाचे ठरते, असे मला वाटते. साहित्यावर त्या संस्कृतीचा, लोकजीवनाचा प्रभाव पडत असतो. साहित्य म्हणजे त्या प्रदेशातील समाजजीवनाचा आरसा असतो. त्यामुळे साहित्यात ह्या सर्वांचे पडसाद उमटणे हे अपरिहार्य असते. साहित्याचा अभ्यास करताना तेथील भौगोलिक व राजकीय घडामोडींचा अभ्यास करणे आवश्यक ठरते. महाराष्ट्राची भूमी ही संत भूमी आहे. इथल्या काळ्या मातीत अनेक मोलाचे संत जन्म
Mar 4, 20244 min read


प्रत्येक क्षणाची मजा घेतली - गौरव चाटी
भारतीय चित्रपटसृष्टीत, संगीत क्षेत्रात प्ले बॅक सिंगर आणि संगीतकार म्हणून काम करतोय. 25 जुलै 1994 रोजी जन्म झाला. वयाच्या 9व्या वर्षी माझ्या आईने माझ्यातील कलाकाराला ओळखले कारण रेडिओवर दुरून जरी एखादं गाणं ऐकु आलं तरीही ते कान देऊन ऐकायचो. त्यात तल्लीन होऊन जायचो. घरातले डब्बे, दरवाजे, टेबल जे मिळेल त्यावर मी ठेका धरत असे त्यामुळे आईने मला गाण्याच्या क्लासला घातले. जसजसं वय वाढत गेलं तसातसा माझा गाण्याचा अभ्यास आणि रूची वाढत गेली. इंजिनीअरिंगचं धावपळीचं शेड्युल सांभाळून मी रि
Feb 19, 20243 min read


मी आणि आई
‘मला मुलगी होणार, 15 ऑगस्टला होणार आणि मी तिला नृत्य शिकवणार!’’ मम्मी बोलत होती. आजी म्हणत होत्या, ‘‘अगं शोभा, आत्ता तुझी प्रकृती पाहता बाळाचा जन्म 15 ला नाही होणार...’’ पण मम्मी ठाम होती! आणि झालेही तसेच! मुलगी झाली, 15 ऑगस्टला झाली आणि फक्त शिक्षण नाही तर आयुष्यच नृत्यासाठी दिले गेले... इतकी ताकदीची इच्छाशक्ती होती माझ्या मम्मीची आणि ती मुलगी मी... संयोगिता... संयोगिता या नावामागेसुद्धा एक गोष्ट आहे. माझी मम्मी जेव्हा शाळेत होती तेव्हा मम्मीने हे नाव ऐकले होते आणि जेव्हा मी
Feb 15, 20245 min read


धक्का - संजय संत
आपल्याला आयुष्यात अनेक सुखद, दु:खद, चांगले, वाईट, हवेसे, नकोसे धक्के बसतच असतात. काही व्यक्तिगत असतात व काही सामाजिक व राजकीय असतात. सामाजिक व राजकीय हे आपल्याला जरी धक्के वाटत असले तरी ते बरेचसे पूर्वनियोजित कवा प्रयत्नपूर्वक असतात. हा एक डावपेचांचा भाग असतो. धकाधकीचे जीवन हा शब्द ‘धक्का’ यावरूनच आला असावा. मुंबईकरांना तर धक्का हा रोजच्या जीवनातला अविभाज्य घटक बनला आहे. मोकळ्या लोकल कवा बेस्ट बसमधून प्रवास करताना चुकल्यासारखेच होत असेल. धक्क्याला लागणे असाही एक वाक्प्रचा
Feb 13, 202427 min read


कणेरी मठाचे मठाधिपती काडसिद्धेश्वर स्वामी यांची मुलाखत
कोणताही धर्म हा जोडण्याचंच काम करतो, तो माणसाला माणसापासून तोडत नाही हे मात्र नक्की. धर्मदंड हातात असलेली माणसं लोककल्याणासाठी नेमकं काय करतात हे जाणून घेण्याचा हा एक छोटासा प्रयत्न... 7,8,9 डिसेेंबर 2019 ला मराठवाड्यातील श्रीरामदास स्वामींचे जन्मगाव असलेल्या श्रीसमर्थ जांब येथे चैतन्य ज्ञानपीठाने आयोजित केलेले ‘समर्थ महासंगम’ अतिशय उत्साहात संपन्न झाले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह श्री. भय्याजी जोशी, कणेरी मठाचे प्रमुख प. पू. अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामी, प. पू.
Sep 18, 202325 min read
सामर्थ्यवान माता
सिंधुताई सपकाळ यांनी विसाव्या शतकात अनाथांना आणि बेघरांना आश्रय मिळवून दिला. ज्यांना कोणी नाही त्यांच्यासाठी सिंधुताई उभ्या राहिल्या. अनाथ मुलांचे प्रश्न त्यांनी सातत्यानं मांडले. या सगळ्यांपेक्षा सिंधुताईंचं सगळ्यात मोठं योगदान असं आहे की सामाजिक, सांस्कृतिक चळवळीपासून दूर गेलेल्या महाराष्ट्रातल्या मध्यमवर्गीय, उच्च मध्यमवर्गीय, कनिष्ठ मध्यमवर्गीय लोकांना त्यांनी पुन्हा या चळवळीकडे आणलं. सामाजिक जाणिवेपासून दूर गेलेल्या आणि केवळ उपभोगवादाच्या नादाला लागलेल्या वर्गासमोर जाऊन
May 11, 20233 min read


भीमसेनास्त्र
पौराणिक काळात अशी काही अस्त्रे होती की जेंव्हा कोणावर सोडली जात ती तेव्हांच थांबत ज्यावेळी ज्यांच्यावर सोडली आहेत ते त्या अस्त्राला संपूर्ण शरण जातील. ‘भीमसेनास्त्र’ हे असे अस्त्र आहे की ते वारंवार आपल्यावर यावे म्हणून जगभर लाखो रसिक वर्षानुवर्षे त्यांना शरण जात आहेत. काही नावे फारच समर्पक आहेत. भीमसेन हे त्यातलेच एक नाव. त्यांच्या गाण्यात, वागण्यात नेहमी ही भीमसेनी ताकद जाणवत असे. बालगंधर्वांना राजहंस कुळात जन्म मिळावा व आपल्या बासरीने सर्वत्र प्रसिद्ध असलेले अमुल्यज्योती तथ
May 8, 20239 min read
कुविचारांची हजामत करणारा सेना न्हावी
‘आम्ही वारीक वारीक। करू हजामत बारीक॥’ किंवा ‘जाता पंढरीसी। सुख वाटे जीवा॥’ हे अभंग आपण नेहमी ऐकतो, पण ते नेमके कोणी लिहिले असावेत? याविषयी काही कल्पना आहे का? महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. वास्तविक संपूर्ण भारत ही संतांची भूमी आहे, पण त्यामध्येही महाराष्ट्रामध्ये संत परंपरा ही खूप मोठी आहे. उच्च जातीपासून तर समाजातल्या तळातील जातीपर्यंत प्रत्येक जातीमध्ये संत महाराष्ट्रामध्ये होऊन गेलेले आहेत ज्यांच्याकडे आपण पार्लरमध्ये जाऊन केस कापतो त्यांना आता आपण ब्युटीशियन म्हणत असू
Apr 7, 20236 min read


राष्ट्रज्योत तेवत ठेवणारे बेंद्रे
असे म्हणतात की, एकेक पायरी सोडवत गेल्यास गणित सुटते; मात्र इतिहासाचे तसे नसते! इतिहासलेखन जेव्हा पूर्ण होते तेव्हाच त्याला खरे फाटे फुटतात! म्हणूनच इतिहास लेखन हे आत्यंतिक जिकिरीचे आणि कष्टाचे काम असते. त्यासाठी प्रचंड अभ्यास लागतो. तटस्थ वृत्ती लागते. ते जीवनध्येयच बनायला हवे. महाभारतकार व्यास मुनींनी म्हटलंय की, ‘इतिहास ही राष्ट्राची ज्योत आहे’ आपल्या राष्ट्राचा उज्ज्वल आणि स्फूर्तिदायी इतिहास समाजापुढे यावा यासाठी अनेकजण प्रामाणिकपणे झटत असतात. ज्यांना इतिहासलेखन क्षेत्रात
Mar 25, 20233 min read
सतत जळणारा आणि फुलणारा लोककवी
उद्याचा कालिदास अनवानी पायाने फिरत असेल तर त्यात अब्रू त्याची नव्हे; राजा भोजाची जाते, असे सांगणारे लोककवी मनमोहन तथा गोपाळ नरहर नातू प्रतिभेचा स्फोट घडविणारे अद्भूत किमयागार होते. 7 मे 1991 ला त्यांनी जगाचा निरोप घेतला असला तरी त्यांच्या साहित्य कारकिर्दीमुळे ते अजरामर आहेत. अ फाट सामर्थ्य असलेल्या या कविराजांच्या आयुष्यात अनेक विलक्षण घटना घडल्या. व्यावहारिक पातळीवर कदाचित ते मागे राहिले असतील; पण कवी केशवसूत ते मर्ढेेकर या परंपरेचा मागोवा घेताना सर्वाधिक झगमगणारं उंचच उंच
Mar 19, 20233 min read


महाराष्ट्राचे 'अमर' लेणे!
महाराष्ट्र शाहीर अमर शेख यांचा जन्म 20 आक्टोबर 1916 चा. सोलापूर जिल्ह्यातल्या बार्शीचा. माता मुन्नेरबी यांच्या पोटी जन्मलेल्या ह्या कलावंताला सोबत मिळाल्या त्या दोन गोष्टी. एक दारिद्य्र आणि दुसरे म्हणजे काव्य. दारिद्य्राने जगण्याचे शिक्षण दिले तर काव्याने जीवनदृष्टि दिली. हे दोन्ही पंख पसरूनच त्याने जीवनभर भरारी घेतली. दारिद्य्रात पिचणारी आई मराठी संस्कृतीची, मराठी परंपरेची, मराठी चालीरितींची अभिमानी होती. त्या अभिमानाचे बाळकडू मेहमूदला प्राप्त झाले होते. तिचा, मातेचा संस्कार
Mar 13, 202312 min read


पहिला पेशवा : बाळाजी विश्वनाथ
पहिला पेशवा : बाळाजी विश्वनाथ मराठेशाही व पेशवाईची विविधांगांनी भरपूर चर्चा होत असली तरी होत नाही ती रणरागिणी ताराराणी व पहिला पेशवा बाळाजी विश्वनाथावर . तसे दोघेही समकालीन. ताराराणीने 1700 ते 1707 पर्यंत संताजी व धनाजीसारख्या वीरांच्या मदतीने मोगलांशी जी झुंज दिली तिला तोड नाही. अनेक युद्धात तिने स्वत: नेतृत्व केले. घोडदळाचे नेतृत्व करण्यात ती कुशल होती. रणनीतीत तिचा हात कोणी धरू शकले नसते. 1705 मध्ये तर तिने नर्मदा ओलांडून माळवा ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला होता. जदुनाथ
Mar 6, 20239 min read
व. पु. काळे - माझे दोस्त!
ही गोष्ट आहे २००७ ची. गांधीभवनाच्या पायर्यावर बसून आम्ही यमुनामाईंनी केलेली पिठलं-भाकरी खाल्ली. लोककवी म. भा. चव्हाण हे आमचे ज्येष्ठ मित्र. ते व. पु. काळे यांच्या आठवणीने व्याकूळ झाले होते. त्यांना म्हटलं, ‘‘मभा, हे सगळं लिहून काढा. मी चपराकमध्ये छापतो.’’ ते म्हणाले, ‘‘लेखनाबाबत माझा महाआळशी स्वभाव तुम्हाला माहीतच आहे. इच्छा तीव्र आहे पण कागदावर कधी उतरेल माहीत नाही.’’ मग मी त्या भारावलेल्या अवस्थेतच माझ्या बॅगमधून कागद काढले. म. भा. मंत्रमुग्धपणे बोलत होते आणि माझ्याकडून
Feb 15, 20234 min read
सर्वधर्मसमभावाचं प्रतीक दारा शुकोह...!
केंद्र सरकार एनआरसी राबविण्याच्या तयारीत आहे. शिवाय २०२४च्या निवडणुकांपूर्वी समान नागरी कायद्याची सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार अंमलबजावणी करण्याची शक्यता आहे. याबरोबरच एक सांस्कृतिक उपक्रमाचं नियोजन सरकार करतंय. ते म्हणजे धर्मांध कर्मठांच्या रोषाला बळी पडून राजधानीत ज्याची धिंड काढून शिरच्छेद करण्यात आला! आज सर्वधर्मसमभावाचे डिमडिम दशदिशांत घुमत असताना तीनशे-साडेतीनशे वर्षांपूर्वी जो उमदा युवराज स्वतःच्या आंधळ्या धर्मबांधवांच्या क्रूर क्रोधाची शिकार बनला; हि
Feb 6, 202318 min read


सोनेरी प्रवासाच्या चंदेरी आठवणी कालनिर्णय नाबाद 50
ही गोष्ट आहे एका अशा दिनदर्शिकेची जी जगभरात विकत घेतली जाते आणि फक्त भिंतीवरच न राहता अनेकांच्या भावजीवनाचा हिस्सा बनली आहे... ही गोष्ट आहे एका अशा दिनदर्शिकेची जी एकूण दोन-चार नाही तर तब्बल सात भाषांमध्ये छापली जाते... ही गोष्ट आहे एका अशा दिनदर्शिकेची जिच्या एकाच भाषेतल्या चार वेगवेगळ्या प्रादेशिक आवृत्त्या छापल्या जातात... ही गोष्ट आहे एका अशा दिनदर्शिकेची जी शास्त्रार्थ तिथी, वार, नक्षत्र, करण, योग याबरोबरच साहित्य-विज्ञान-आहार-व्यायाम-आरोग्य यासाठीही आवर्जून विकत घेतली ज
Nov 22, 202226 min read


भाषणांची पन्नास वर्षे!
संयुक्त महाराष्ट्र चळवळीचा तो काळ होता. सातार्यात क्रांतीसिंह नाना पाटील, आचार्य प्रल्हाद केशव अत्रे यांची घणाघाती भाषणे गांधी मैदानावर ऐकायला मिळत. शाळेत कवी गिरीश, शाहीर अमर शेख यांच्यासारखे थोर कवी, शाहीर ऐकायला मिळाले. तेव्हापासून मनात यायचं ‘आपणही वक्ता व्हायचं’. परंतु आपली फजिती झाली तर काय? या भीतीने प्रत्यक्ष भाषण देणं किंवा स्वतंत्र कार्यक्रम करणं पुढं ढकललं जात होतं. त्यामुळे शाळेत काही भाषणाचं धाडस केलं नाही. गाभुळलेल्या चिंचा! सातारच्या छत्रपती शिवाजी महाविद्या
May 20, 20224 min read


कॅमेर्याचे पांग फेडणारा छायादिग्दर्शक - राहुल जनार्दन जाधव
जर तुमच्यापुढे ‘गलेलठ्ठ पगाराची कायमस्वरूपी सरकारी नोकरी’ आणि ‘आवडीच्या पण अनिश्चित क्षेत्रातील सहाय्यक प्रशिक्षणार्थी’ या दोन प्रस्तावांपैकी एक स्वीकारण्याचा पर्याय असेल तर कोणता निवडाल? विशेषतः तेव्हा, जेव्हा परिस्थितीने तुम्हाला एकेका पैशाचे महत्त्व चटके देऊन समजावले असेल. आपल्यापैकी बहुतांश लोक आधी आर्थिक स्थिरतेचा विचार करतील मग त्यातून वेळ मिळाला तर छंद, हौस, आवड वगैरे! पण त्याने मात्र वयाच्या अवघ्या एकविसाव्या वर्षी एम.पी.एस.सी. पास करून मिळवलेल्या सरकारी नोकरीपुढे छा
May 18, 20228 min read
bottom of page
.jpg)




