top of page
सांस्कृतिक
योगाचे निर्माते प्राचीन जैन तत्त्वज्ञ, योगाचे प्राचीन नाव ‘व्रत’ - संजय सोनवणी
योग हा प्रथम उपनिषदांमध्ये विशद केला आहे असे मानले जाते. उपनिषदे वेदांचे शेवटचे भाग मानले जातात. म्हणून त्यांना वेदांत असे म्हणण्याचीही प्रथा आहे. प्रत्यक्षात उपनिषदात येणारे तत्त्वज्ञान हा ऋग्वेदात येणार्या भौतिकवादी विचारांचा तार्किक विस्तार असू शकतो की नाही यावर वाद झाला आहे व पुढेही होत राहील. प्रत्यक्षात मात्र उपनिषदे ज्या आध्यात्मिक क्षेत्रांचा शोध घेतात त्यामागील आध्यात्मिक तत्त्वज्ञान आणि वेदांनी प्रतिपादन केलेल्या ऐहिक सुखाच्या प्राप्तीसाठी केल्या जाणार्या विधीविधा
Jun 19, 202417 min read


परिवर्तनाची शक्ती देणारी वारी
महाराष्ट्र हे भारतातील एक राज्य आहे आणि तरी ते ‘महा राष्ट्र’ आहे. या महाराष्ट्राने समाजाच्या उद्धाराकरिता विचारांची पेरणी केली आहे. या मातीने अनेक विचारवंत दिले. या भूमीने या देशाच्या स्वातंत्र्याच्या लढ्याला जसे अनेक क्रांतीकारक दिले त्याप्रमाणे समाजाचे उत्थान घडवण्यासाठी विचारवंत देखील दिला आहेत. या भूमीने सतत माणूसपणाचा विचार केला आहे. या मातीत जे उगवले होते त्यामागे विचारांची पेरणी हेच कारण आहे. पेरलेल्या विचारबीजांमुळे येथील भूमी अधिक समृद्ध झाली आहे. त्यामुळे येथील माणस
May 31, 202410 min read


उद्ध्वस्त व्यक्तिमत्त्वाचे राज्य... महाराष्ट्र! - संजय सोनवणी
जसे माणसाला एक व्यक्तिमत्त्व असते तसेच व्यक्तिमत्त्व राज्य आणि राष्ट्राचेही असते. व्यक्तिच्या जीवनाचे अनुभव, अर्जित केलेले ज्ञान आणि त्याचा उपयोग करत समाजाला वा परिवाराला दिलेले योगदान, एकुणातील वागणे इ. बाबीवरून त्याचे व्यक्तिमत्त्व ठरते. स्वत:ला जाणवणारे व्यक्तिमत्त्व आणि इतरांना भासणारे अथवा वाटणारे व्यक्तिमत्त्व यात जुळणारे सांधे असतातच असे नाही. तरीही एकुणात व्यक्तिमत्त्व ही बाब मानवी जीवनात महत्त्व घेऊन बसते. व्यक्तिला मिळणारा सन्मान अथवा त्याच्याकडे होणारे दुर्लक्ष या
Apr 1, 202414 min read


वाचन ही ‘संस्कृती' आहे काय? - घनश्याम पाटील
भारतीय भाषात शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी अशा श्रमिकांवर बरेच साहित्य लिहिले गेले. असे साहित्य ज्यांच्यावर लिहिले गेले त्यांना त्या साहित्याचा कधी काही फायदा झाला नाही, असे मानणारा एक मोठा मतप्रवाह आहे. वाचनाने क्रांती झाली असती तर गीता, कुरान, बायबल वाचून लोक सुधारले नसते काय? रामायण-महाभारत अशा महाग्रंथातून त्यांनी काही बोध घेतला नसता काय? असाही प्रश्न उपस्थित केला जातो. बरं, ज्यांचं वाचन भरपूर आहे त्यांचा खूप विकास झाला असे तरी काही चित्र आहे का? जे आयुष्यभर भरपूर वाचतात ते मन
Apr 1, 20244 min read


मराठवाड्यातील खाद्यसंस्कृती
अश्मयुगीन कालखंडापासून ते आजच्या आधुनिक युगापर्यंत मानवाच्या जीवनात वेगवेगळे बदल होत गेले. संस्कृती बदलल्या. जीवनमान बदलले. अन्न, वस्त्र, निवारा या तीन गरजा मात्र कधीच बदलल्या नाहीत. गरजांचे स्वरूप फक्त बदलले, कंदमुळे खाणारा आदिमानव आणि विविध पदार्थ चवीनं खाणारी आजची पिढी या दोन बिंदूच्या मध्ये असलेला भक्कम खाद्यप्रवास निश्चितच रंजक, ज्ञानवर्धक आणि विशेषतः भूकवर्धक आहे. दहादहा कोसावर भाषा बदलते. तसेच अन्नपदार्थ आणि त्यांच्या चवीही बदलतात. प्रांताप्रांतामधील अनेक खाद्य पदार्था
Mar 16, 20244 min read
मराठी जीवनभाषा व्हावी
मराठी भाषा गौरव दिन दरवर्षीप्रमाणे याही वर्षी साजरा होईल. ‘नेमिची मग येतो पावसाळा’ या न्यायाने दिन साजरे होत राहतात. कधी भाषा संवर्धन पंधरवाडा, मराठी भाषा दिन, वाचन प्रेरणा दिन, दरवर्षी मराठी भाषेचा उत्सव म्हणून अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलने आयोजित केली जातात. यासारखे अनेक उपक्रम करत आपण मराठी भाषेच्या विकासाच्या दृष्टीने प्रयत्न करत असतोच. शासनही वेगवेगळे आदेश देऊन मराठी संवर्धन करण्याचा प्रयत्न करत आहे. मराठीत स्वाक्षरीची सक्ती आणि सर्व पत्रव्यवहार मराठीत करणे याबाबत सक
Feb 27, 202411 min read
एकविसावे शतक आणि छ. शिवाजी महाराजांच्या विचारांची गरज.
छ. शिवरायांसाठी 'युद्ध' हे साधन होते, आणि स्वराज्य निर्मिती हे त्यांचे 'साध्य' होते. त्या स्वराज्य निर्मितीचा उद्देश, छ शिवरायांच्या भूमिका काय होत्या ? यासंदर्भाने आम्ही शिवचरित्राकडे पाहतो का ? खरेतर आज लोकशाही व्यवस्था अस्तित्वात असताना अशा २१ व्या शतकात सुद्धा त्यांचा उदोउदो का व्हावा ? जेव्हा की ते सरंजामशाहीतील राजे होते, आणि आज तर सर्वदूर लोकशाही व्यवस्था आहे. लोकांच्या हातात सत्ता असूनही स्वतःच्या निर्मित व्यवस्थेपेक्षा सरंजामशाहीतील राजाच्या व्यवस्थेचा उदोउदो का व्ह
Feb 18, 20238 min read
bottom of page
.jpg)




