top of page

AI 171: 'पायलट एरर' की 'सिस्टिमॅटिक मर्डर'? | Human Error or a Hidden Bug?

  • 3 days ago
  • 3 min read

Updated: 3 days ago

विमान वाहतूक उद्योगात सध्या एकाच प्रश्नाची चर्चा आहे: AI 171 चा अपघात मानवी चुकीमुळे झाला की बोईंग ७८७ च्या सिस्टीममधील एका लपलेल्या 'बग'मुळे?


१२ फेब्रुवारी २०२६ रोजी, इटलीच्या 'कोरीएरे डेला सेरा' या वृत्तपत्राने एक खळबळजनक रिपोर्ट प्रसिद्ध केला. त्यात त्यांनी दावा केला की, AI 171 च्या कॉकपिटमध्ये वैमानिकाने नजरचुकीने फ्युएल कंट्रोल स्विचेस बंद केले. पण हा दावा करताना त्यांनी १ फेब्रुवारीला VT-ANX एअरक्राफ्टसोबत घडलेल्या गंभीर घटनेकडे दुर्लक्ष केले आहे असे वाटत आहे. आपल्या शोध पत्रकारितेकरता प्रसिद्ध असलेल्या वृत्तपत्राकडून याची दखल कशी घेतली नाही?


१ फेब्रुवारीला, एअर इंडियाच्याच VT-ANX या ड्रीमलायनर विमानात एक घटना घडली. विमानाच्या टॅक्सींग दरम्यान, वैमानिकाचा हात न लागता किंवा कोणताही 'पुल' (Pull) फोर्स न लावता, डाव्या इंजिनचा फ्युएल स्विच आपोआप 'रन' (RUN) वरून 'कट-ऑफ' (CUT-OFF) वर गेला.

बोईंगचे मॅन्युअल सांगते की हे स्विचेस 'पुल-टू-अनलॉक' (Pull-to-Unlock) आहेत, म्हणजे त्यांना वर ओढल्याशिवाय फिरवणे अशक्य आहे. मग VT-ANX मध्ये हे कसे घडले? याचे उत्तर आहे, डिटेंट फेल्युअर' आणि 'व्हायब्रेशन' जर VT-ANX मध्ये स्विच आपोआप फिरू शकतो, तर AI 171 मध्येही तेच घडले असण्याची शक्यता आहे.


यावरून 'कोरीएरे डेला सेरा'चा रिपोर्ट ज्या गोष्टीला 'कन्फ्युजन' म्हणतो, ती प्रत्यक्षात वैमानिकाची हतबलता असू शकते. आपल्या हाती आलेल्या AI 171 च्या कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर (CVR) च्या एक्सक्लुझिव्ह ट्रान्सक्रिप्टचे विश्लेषण केल्यास कळते की फर्स्ट ऑफिसरने "मी हे केलं नाही" (I didn't do it) असे स्पष्टपणे म्हटले आहे. 'कोरीएरे डेला सेरा'ने या वाक्याचा अर्थ 'बचावाचा पवित्रा' असा लावला आहे. पण VT-ANX ची घटना पाहता, हे वाक्य पायलटची निर्दोषिता आणि तांत्रिक बिघाडाचा मोठा पुरावा ठरू शकते.


'कोरीएरे डेला सेरा'चा रिपोर्ट हा बोईंगला वाचवण्याचा आणि मृतांच्या नातेवाईकांचे लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न वाटतो. त्यांनी रिपोर्टमध्ये 'पायलट फटीग' आणि 'लॅक ऑफ ट्रेनिंग' (Lack of Training) यावर भर दिला आहे, पण 'स्विच डिटेंट वेअर' बद्दल एक शब्दही लिहिला नाही.


२०१८ मध्येच FAA ने या स्विचेसच्या डिझाइनमधील त्रुटींवर बोट ठेवले होते. तरीही, १२ फेब्रुवारी २०२६ च्या रिपोर्टमध्ये या जुन्या वॉर्निंग्जना दुर्लक्षित केले गेले आहे.


जर VT-ANX ची घटना घडली नसती, तर कदाचित जगाने AI 171 च्या वैमानिकांनाच गुन्हेगार मानले असते. DGCA ने आता 'कोरीएरे डेला सेरा'च्या रिपोर्टला बाजूला सारून, VT-ANX आणि AI 171 मधील 'मेकॅनिकल लिंक' शोधण्यावर लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे. कारण प्रश्न फक्त एका अपघाताचा नाही, तर जगभरात उडणाऱ्या शेकडो ड्रीमलायनर्सच्या सुरक्षिततेचा आहे.


- ज्योती घनश्याम


Human Error or a Hidden Bug? The Question Haunting the Aviation Industry

By Jyoti Ghanshyam



​The aviation industry is currently consumed by a single, burning question: Was the crash of AI 171 the result of human error, or was it caused by a hidden 'bug' in the Boeing 787's systems?

​On February 12, 2026, the Italian newspaper Corriere della Sera published a sensational report claiming that the pilot of AI 171 inadvertently turned off the fuel control switches in the cockpit. However, in making this claim, they seem to have completely overlooked a critical incident involving aircraft VT-ANX on February 1. How could a newspaper renowned for its investigative journalism miss such a vital piece of the puzzle?

The Smoking Gun: The VT-ANX Incident

On February 1, a startling event occurred on another Air India Dreamliner, VT-ANX. During taxiing, the left engine's fuel switch spontaneously moved from 'RUN' to 'CUT-OFF' without any pilot intervention or the application of any 'pull' force.

​Boeing’s manual explicitly states that these are 'Pull-to-Unlock' switches, implying they cannot be rotated without first being lifted. So, how did this happen on VT-ANX? The answer lies in 'detent failure' combined with 'vibration.' If a switch can rotate on its own in VT-ANX, the probability of the same mechanical failure occurring on AI 171 cannot be ruled out.

Reinterpreting the Black Box

This evidence suggests that what the Corriere della Sera report dismisses as "confusion" may, in reality, have been pilot helplessness. An analysis of the exclusive Cockpit Voice Recorder (CVR) transcript from AI 171 reveals the First Officer clearly stating: "I didn't do it."

​While the Italian newspaper interprets this as a defensive maneuver, the VT-ANX incident suggests this sentence could be a definitive proof of the pilot's innocence and a catastrophic technical failure.

Protecting the Manufacturer?

The Corriere della Sera report appears to be an attempt to shield Boeing and divert the attention of the victims' families. The report heavily emphasizes 'pilot fatigue' and 'lack of training,' yet writes not a single word about 'switch detent wear.'

​It is worth noting that as far back as 2018, the FAA had flagged design flaws regarding these specific switches. Yet, the report from February 12, 2026, chooses to ignore these longstanding warnings.

The Path Forward

Had the VT-ANX incident not occurred, the world might have unjustly condemned the AI 171 pilots. It is now imperative that the DGCA sets aside the Corriere della Sera narrative and focuses on establishing the 'mechanical link' between VT-ANX and AI 171.

​This is no longer a question of a single accident; it is about the safety of hundreds of Dreamliners operating globally.


-Jyoti Ghanshyam

Recent Posts

See All
Bharat's Aerial Dearms - Jyoti Ghanshyam

Bharat’s Turbulent Skies: A Collision of Grand Ambitions and Grounded Realities On June 12, 2025, the skies over Ahmedabad witnessed a horrific tragedy. Flight AK-171 of Air India, a symbol of nationa

 
 
 

Chaprak Prakashan | Ladoba Prakashan

Publication House

Socials

Be the First to Know

402, Wellspring, Bavdhan Market Yard, Pune 411021

7057292092

Sign up for our newsletter

© Copyright

© 2026 by Chaprak Prakashan, Ladoba Prakashan

bottom of page