संपादकीय - लोकशाहीचे वास्तव
- Jul 7
- 4 min read
नारायण राणे हे एकेकाळचे कट्टर शिवसैनिक! एका मुलाखतीत विलासराव देशमुख यांना ‘सर्वेात्तम प्रशासक’ म्हटल्याने त्यांचे बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत काही मतभेद झाले आणि त्यांनी शिवसेना सोडली. ‘बाळासाहेबांनी मला हाकलून दिलं’ म्हणून ते सगळ्यांच्या समोर रडले. शिवसेनेत मुख्यमंत्री राहिलेल्या या नेत्याने काँग्रेसमध्ये प्रवेश केला. बारा वर्षे तिथे संसार केल्यावर त्यांनी सांगितलं, ‘इथं माझी किंमत नाही.’ दोन्ही विचारधारा अनुभवल्यानंतर त्यांनी काय करावं? स्वतःचाच पक्ष काढला. त्याचं नाव काय ठेवंल? ‘महाराष्ट्र स्वाभिमान!’ अपेक्षेप्रमाणे तो सहा महिन्यात बंद पडला. मग त्यांनी भाजपशी जवळीक केली. ‘पक्षांतरबंदी’ या विषयावर बोलताना एका आमदारानं त्यांना उपहासानं सांगितलं, “राणे साहेब, तुम्ही तीन लग्न केलीत!” त्यावर क्षणाचाही विलंब न करता राणे म्हणाले, “हो! पण माझ्या तिन्ही बायका चांगल्या निघाल्या. त्यांच्याकडं मला मुख्यमंत्रिपद, मंत्रिपद आणि खासदारकी मिळाली.” म्हणून त्यांना ‘बंडखोरांचे बादहशा’ म्हटलं जाऊ लागलं.
.jpg)


