top of page

फुलला श्रावण

Aug 12
1 min read

आकाशी खेळ कुणाचा... चालला मजेने होता

त्या शुभ्र ढगांच्या आड... लपलेला कोणी होता

काळोख कुठेही नव्हता पण ढग सोनेरी होता

पाहून रंगला जीव... धरणीचा खाली होता



दाटले अचानक मेघ... राखोडी, करडे, काळे

गर्जना विजांची झाली भयभीत चराचर सगळे

हा खेळ भयावह होता... सृष्टीला फुटला घाम

शिव करत होता तांडव... धरणीने स्मरिला श्याम



तो बरसत, धावत आला... सृष्टीवर त्याचे प्रेम

तोषवले त्याने जीव... पाळला स्वत:चा नेम

अंथरला खाली होता गालिचा मऊ कुरणांचा

सांडला घडा रंगांचा बरसता खेळता त्याचा



रंगली फुले कित्येक केशरी, जांभळी, पिवळी

त्या हिरव्या कुरणावर हासली मनेही सगळी

ही लीला अपरंपार कोणाला नाही कळली

रंगांत रंगली सृष्टी कवितांची वृष्टी झाली


- सौ. सुषमा राम वडाळकर

बडोदा, गुजरात

9825032939

Comments

Rated 0 out of 5 stars.
No ratings yet

Add a rating
bottom of page