top of page

Create Your First Project

Start adding your projects to your portfolio. Click on "Manage Projects" to get started

गुरु ठाकूर | Guru Thakur

गुरू ठाकूर (Guru Thakur)
कवी, गीतकार, पटकथा-संवाद लेखक, नाटककार, अभिनेता, व्यंगचित्रकार आणि दिग्दर्शक

अधिकृत संकेतस्थळ : www.guruthakur.in
Guru Thakur - IMDb Profile Link - https://www.imdb.com/name/nm2590575/

गीतकार, नाटककार, चित्रकार, कवी, पटकथा व संवाद लेखक आणि अभिनेता असे बहुआयामी व्यक्तिमत्त्व असलेले गुरु ठाकूर आपल्या सर्वांच्याच परिचयाचे आहेत. 'अगं बाई अरेच्चा!', 'नरबाची वाडी', 'नटरंग', '...आणि डॉ. काशिनाथ घाणेकर' या चित्रपटांपासून ते अगदी अलीकडच्या 'दशावतार'पर्यंत अनेक चित्रपटांसाठी त्यांनी पटकथा आणि संवाद लेखन केले आहे. तसेच 'मन उधाण वाऱ्याचे', 'खेळ मांडला', 'वाजले की बारा', 'अप्सरा आली'पासून ते 'माउली माउली', 'देवाक काळजी रे' आणि 'बहरला मधुमास'पर्यंत जवळपास दीडशेहून अधिक चित्रपटांसाठी त्यांनी गीतलेखन केले आहे.

त्यांच्या या योगदानासाठी त्यांना अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचा 'सर्वोत्कृष्ट नाटककार पुरस्कार', ग. दि. मा. प्रतिष्ठानचा 'चैत्रबन पुरस्कार', 'शांता शेळके पुरस्कार', 'आरती प्रभू सन्मान', 'राजा परांजपे सन्मान', तसेच तब्बल तीन वेळा 'फिल्मफेअर अवॉर्ड्स' (Filmfare Awards) अशा अनेक प्रतिष्ठेच्या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. याशिवाय, महाराष्ट्र शासनाच्या इयत्ता ७ वीच्या 'बालभारती' पाठ्यपुस्तकात त्यांच्या 'असे जगावे' या कवितेचा, तर इंग्रजी माध्यमाच्या इयत्ता १० वीच्या पाठ्यपुस्तकात 'तू बुद्धी दे' या प्रार्थनेचा समावेश करण्यात आला आहे. गोवा राज्य शासनानेही आपल्या पाठ्यपुस्तकात या प्रार्थनेचा समावेश केला आहे.

Guru Thakur
Poet, Lyricist, Screenplay & Dialogue Writer, Playwright, Actor, Caricaturist, and Director

Official Website: www.guruthakur.in

IMDb Profile: https://www.imdb.com/name/nm2590575/

Guru Thakur is a widely recognized and multifaceted personality, spanning roles as a lyricist, playwright, painter, poet, screenwriter, dialogue writer, and actor. He has crafted screenplays and dialogues for numerous acclaimed movies, ranging from hits like Aga Bai Arrecha!, Narbachi Wadi, Natarang, and ...Ani Dr. Kashinath Ghanekar to the recent Dashavatar. Additionally, he has penned lyrics for over 150 films, delivering iconic tracks such as Man Udhan Varyache, Khel Mandala, Wajle Ki Bara, Apsara Aali, Mauli Mauli, Devak Kaalji Re, and Baharla Madhumas.

In recognition of his stellar contributions, he has been honored with several prestigious accolades, including the 'Best Playwright Award' by the Akhil Bharatiya Marathi Natya Parishad, the 'Chaitraban Award' by the Ga. Di. Ma. Pratishthan, the 'Shanta Shelke Award', the 'Aarti Prabhu Samman', and the 'Raja Paranjape Samman'. He is also a proud recipient of the prestigious 'Filmfare Awards' three times. Furthermore, his inspiring poem 'Ase Jagave' is featured in the 7th-grade Marathi Balbharati textbook of the Maharashtra State Board, while his revered prayer 'Tu Buddhi De' is included in the 10th-grade English medium Balbharati textbook, as well as in the school curriculum of the Goa State Government.

bottom of page