Create Your First Project
Start adding your projects to your portfolio. Click on "Manage Projects" to get started
सुनील भातंब्रेकर | Suneel Bhatambrekar
सुनील भातंब्रेकर:
सामान्यात असामान्यत्व बघणारे, जीवनातील सुखात्मता शोधणारे, विसंगती व विडंबन ह्यांचा अचूक वेध घेणारे, सूक्ष्म निरीक्षणशक्तीच्या आधारे प्रामुख्याने विनोदी, मार्मिक व आशयसंपन्न लिखाण करणारे लेखक म्हणजे सुनील भातंब्रेकर असे म्हणता येईल.
विनोदी ललित लेख हा त्यांचा मुख्य प्रांत असला तरी कथा, कविता, व्यक्तिचित्रे, इंग्रजी लेख, तंत्रज्ञानावर आधारित लेख ह्यातही त्यांना तितकाच रस आहे व त्यावरही ते कधी कधी लिहितात.
'व्यक्ती तितक्या कृती', 'मिक्स व्हेज', 'हास्यांगण', 'पोतडी' 'पुष्पगुच्छ', 'दादरायण', 'माणूसगिरी', ‘हास्यरंग’ वगैरे त्यांची प्रकाशित झालेली पुस्तके असून ‘वदनी कवळ घेता’, 'ऐसी माणसे रसिके' वगैरे त्यांची प्रकाशनाच्या वाटेवरची पुस्तके आहेत. त्यांच्या ‘दादरायण’ पुस्तकाला राज्यस्तरीय पुरस्कार देखील मिळाला आहे
ह्या शिवाय दिवाळी अंकात, दैनिकात त्यांचे लेख येत असतात. त्यांचा स्वतःचा ब्लॉग देखील आहे.
त्याशिवाय युट्युबवर त्यांच्या मुलाखती व काही व्याख्याने देखील उपलब्ध आहेत. आकाशवाणी पुणे केंद्रावर त्यांचे कार्यक्रम प्रसारित झाले आहेत.
विशेष म्हणजे चित्रकलेमधल्या विविध प्रकारांत ते हौशी कलाकार म्हणून कलेची आराधना करत आहेत. त्याचाच भाग म्हणून त्यांच्या पुस्तकातील समर्पक अशी रेखाचित्रे काढण्याचा त्यांचा प्रयत्न असतो.
श्री. सुनील भातंब्रेकर हे मेकॅनिकल इंजिनीअर असून मशीन टूल आणि ऑटोमोबाईल क्षेत्रात कार्यरत होते. सध्या ते वरिष्ठ तांत्रिक सल्लागार म्हणून कार्यरत आहेत.
Sunil Bhatambrekar
(Author | Mechanical Engineer | Artist)
1. Profile Overview
Sunil Bhatambrekar is a writer known for finding the extraordinary within the ordinary. His literary persona is defined by a keen sense of observation, a search for joy in everyday life, and an uncanny ability to capture life's ironies and contradictions. While his writing is primarily humorous, it is also poignant, meaningful, and deeply insightful.
2. Literary Domain
While Humorous Essays (Lalit Lekh) remain his forte, his literary interests are vast and versatile. He frequently writes:
Short Stories & Poetry
Character Sketches
Articles on Technology
English Articles
3. Published Works (Bibliography)
His diverse body of work includes several published titles:
Vyakti Titkya Kruti
Mix Veg
Hasyangan
Potadi
Pushpaguchcha
Dadarayan (Winner of a State-Level Award)
Manusgiri
Hasyarang
Upcoming Publications:
Vadani Kaval Gheta
Aisi Manse Rasike
4. Media & Public Presence
Print Media: Regular contributor to various Daily Newspapers and prestigious Diwali Magazines (Diwali Ank).
Digital Media: Maintains an active personal blog. His interviews and lectures are available on YouTube.
Radio: His programs have been broadcast on All India Radio (Akashvani), Pune Station.
5. Artistic Pursuits
Beyond words, Mr. Bhatambrekar is a passionate amateur artist. He explores various forms of painting and sketching. A unique aspect of his creativity is that he often creates illustrations for his own books, ensuring that the visuals perfectly complement his writing.
6. Professional Background
By profession, Sunil Bhatambrekar is a Mechanical Engineer. He has extensive experience in the Machine Tool and Automobile sectors. Currently, he serves as a Senior Technical Consultant.
.jpg)

