top of page
SKU: 978-93-47851-07-0

माझी स्मरणगाथा | Majhi Smaranagatha

₹३००.०० Regular Price
₹२२५.००Sale Price
Quantity

विठोबा, ज्ञानोबा, तुकोबा, शिवबा आणि सह्याद्री हे मराठीचे पंचप्राण म्हणून ओळखले जातात. याच सह्याद्रीचा वारसा लाभलेल्या ‘अकोले तालुक्याची गौरवगाथा’ म्हणजेच प्रस्तुत पुस्तक ‘माझी स्मरणगाथा’.

प्रयोगशील शिक्षक आणि सौंदर्यदृष्टी असलेले लेखक, पत्रकार श्री. प्रकाश आरोटे यांनी या पुस्तकाचे शीर्षक 'माझी स्मरणगाथा' असे ठेवले असले तरी हे केवळ त्यांचे स्मरणरंजन नाही. हे अकोले तालुक्याचे सामाजिक, ऐतिहासिक, भौगोलिक दस्तऐवीकरण आहे. आपला प्रांत समजण्यासाठी, इथल्या अस्मितेच्या मुळांचा शोध घेण्यासाठी अशी पुस्तके म्हणजे पर्वणी असतात.

अकोले तालुक्याबद्दलचा आदिवासी तालुका असल्याचा गैरसमज या पुस्तकाच्या निमित्ताने दूर होतो. अकोले तालुक्याचा संपन्न वारसा, समृद्ध परंपरा, नैसर्गिक प्रतिष्ठाने यांचं सुंदर धाडोह यात घेतला आहे. तालुक्यातील मंदिरे, शिलालेख, किल्ले, लोकपरंपरा, धरणे, क्रांतिकारक याविषयीची अनोखी माहिती यात वाचायला मिळते. कळसुबाईचे पठार सर्वांना माहीत आहे पण कळसुबाई कोण होती?, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती सुप्रसिद्ध आहे पण ते दगडूशेठ कोण होते? अशी रंजक माहितीही यात मिळते.

हे सारे वैभव अत्यंत साध्या, सोप्या भाषेत मांडताना प्रकाशजी आरोटे आपल्याला सर्वत्र फिरवून आणतात. शब्दातून प्रसंग, पात्र, ठिकाणे उभे करण्याचे कौशल्य या पुस्तकाला लाभले आहे. 'अकोले तालुक्याची बखर' म्हणून हे पुस्तक संग्राह्य आणि दखलपात्र ठरणार आहे.

Related Products

bottom of page