संत महिपती | Sant Mahipati
संत चरित्रकार श्री महिपति महाराजांच्या भक्तिमय जीवनकार्याची प्रेरणादायी गाथा!
संत महिपति महाराजांनी भगवद्भक्तीसाठी स्वतःचे आयुष्य वाहून घेतले. त्यांनी महाराष्ट्रातील १६८ आणि महाराष्ट्राबाहेरील ११६ अशा एकूण २८४ संतांचे चरित्र अत्यंत रसाळ व काव्यमय शैलीत लिहिले. पांडुरंगावरील नितांत प्रेमातून त्यांनी 'पांडुरंग महात्म्य', 'पंढरी महात्म्य' आणि 'पांडुरंगस्तोत्र' यांसारख्या भक्तिरसपूर्ण ग्रंथांची रचना केली.
या पुस्तकात संत नामदेव, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत मुक्ताबाई, संत गोरोबा, संत चोखोबा, संत कबीर, बोधलेबुवा, गणेशनाथ उद्ध्व, चिद्धन, विसोबा खेचर, संत सेना महाराज, आणि संत रोहिदास अशा अनेक थोर संतांच्या चरित्राचा व त्यांच्या ग्रंथांचा परिचय करून दिला आहे.
वारकरी संप्रदायात प्रातःस्मरणीय असलेल्या भक्तविजय, कथा सारामृत, भक्तीलीलामृत, संतलीलामृत, आणि संत विजय या ग्रंथांसह त्यांनी लिहिलेल्या अभंग, आरत्या, पदे व ज्ञानेश्वरीच्या सारांशाचा वेध या पुस्तकात घेतला आहे. आपल्या संस्कृतीचा हा प्रेरणादायी आदर्श प्रत्येक घराघरात असायलाच हवा.
Discover the divine lives of Maharashtra’s greatest saints through the legendary work of Sant Mahipati Maharaj.
Sant Mahipati Maharaj devoted his entire life to Bhagavat Bhakti (divine devotion). He authored an astonishing 284 saint biographies—168 from Maharashtra and 116 from across India - written in a deeply poetic and devotional style. His seminal works, including Pandurang Mahatmya, Pandurang Stotra, and Pandhari Mahatmya, remain timeless treasures of the Varkari tradition.
Through Mahipati’s writings, we gain profound insights into the lives of revered saints such as Sant Namdev, Sant Dnyaneshwar, Sant Tukaram, Sant Muktabai, Sant Goroba, Sant Chokhamela, Sant Kabir, Bodhle Bawa, Ganeshnath Uddhav, Chiddhan, Visoba Khechar, Sant Sena Maharaj, and Sant Rohidas.
This comprehensive book highlights Mahipati’s iconic compositions - including Bhakta Vijaya, Katha Saramruta, Bhakti Lilamruta, Sant Lilamruta, and Sant Vijaya - along with various Abhangas, Aartis, Padas, and summaries of Dnyaneshwari. A must-have guide for anyone seeking spiritual inspiration and an authentic look into Varkari heritage.
.jpg)
















