लाडोबा दिवाळी अंक २०२६ । पूर्वनोंदणी
यंदाच्या 'लाडोबा' दिवाळी अंकात बालसाहित्यातील अत्यंत प्रतिष्ठित 'साहित्य अकादमी' पुरस्कारप्राप्त सहा लेखकांच्या कथा वाचायला मिळतील. आबा महाजन, एकनाथ आव्हाड, डॉ. संगीता बर्वे, डॉ. सुरेश सावंत, डॉ. राजीव तांबे आणि भारत सासणे या आणि अशा दिग्गज लेखकांच्या कथा बालविश्वाचे अनोखे मनोरंजन करतील.
गोष्टी: यात 'जादूची पेटी', 'नाइक्रोमीचा प्रवास', 'आजीची जादू', 'आई मी आलोय', 'डाकिणीची गुहा', 'डुक्कर खाडीतील थरार', 'साऊ', 'भाजांशी गट्टी' अशा विविध विषयांवरील लेख आणि कथा आहेत.
कथा विज्ञानाच्या: यात नॅनो विज्ञानाची माहिती देण्यात आली आहे.
कविता: यात डॉ. संगीता बर्वे, उत्तम सदाकाळ, सीमा महाबळ, डॉ. सुरेश सावंत, कविता विजय डोखे आणि प्रशांत केंदळे यांच्या कविता आहेत.
.jpg)



























