top of page
SKU: 9789391239237

सोनचाफा (देवनागरी आणि मोडी लिपीतील कवितासंग्रह) | Sonchafa

₹१५०.०० Regular Price
₹११२.५०Sale Price
Quantity

‘जो बदलतो तो टिकतो’ हा डार्विनचा सिद्धांत असला तरी अनेक गोष्टी वापराअभावी मोडीत निघतात. मराठी भाषेचा वापर आपण कमी केला तर भविष्यात मराठी नावाची एक भाषा होती, असे सांगावे लागेल. तसे व्हायचे नसले तर आपली मातृभाषा आपणच जपली पाहिजे. मराठीत बोलणे, मराठीत लिहिणे, मराठीतच व्यक्त होणे इतकी साधी काळजी आपण घेतली तर आपल्या हातून मायमराठीची खूप मोठी सेवा घडेल.
देवनागरी आणि मोडी लिपितला हा कवितासंग्रह आपल्या संस्कृतीशी निगडित अनेक गोष्टी ‘मोडी’त निघू नयेत असा संस्कारशील आहे. आजी-आजोबा, नात, कुटुंबिय, कर्मभूमी  हे व असे विषय घेऊन अनंतराव घोगलेकाकांनी या कवितांची निर्मिती केली आहे.

वयाच्या सत्तरीनंतर मोडी लिपी शिकणे आणि तो व्यासंग जपत त्यात आपले काव्य अनुवादित करणे हे सोपे काम नाही. साहित्यशारदेच्या दरबारात दीर्घकाळ याची दखल घेतली जाईल. मुलांना-पालकांना भावतील अशा अनेक रचना घोगले काकांनी साध्या-सोप्या भाषेत केल्यात. त्याला ‘मोडी’चे आवरण दिल्याने याचे साहित्यमूल्य कमालीचे वाढले आहे. मोडी अभ्यासक आणि मोडीप्रेमींसाठी तर ही पर्वणीच आहे पण आमच्यासारख्या ज्या पामरांना मोडीचा कसलाही गंध नाही त्यांच्या मनात मोडीविषयी जिज्ञासा निर्माण होईल. एखाद्या गोष्टीचा विचार करायला लावणं, त्यात कुतूहल, जिज्ञासा निर्माण करणं हेच तर अस्सल कवीचं सामर्थ्य असतं. घोगले काकांच्या या कविता म्हणून ‘अनंत’ काळ वाचकांच्या मनात घर करून राहतील, याबाबत माझ्या मनात कसलाच किंतु नाही.
शुभं भवतू!
घनश्याम पाटील

  • अनंत घोगले | Anant Ghogle
  • 88

Related Products

bottom of page