तृतीय नेत्र - भाग १ | Trutiya Netra - Part 1
हंपीच्या विरुपक्ष मंदिरातील शिवप्रतिमेवरील तो दुर्मिळ रक्तवर्णी हिरा... 'तृतीय नेत्र' कुठे गायब झाला?
विजयनगर साम्राज्याचा सम्राट देवरायाने विरुपक्ष मंदिरात बसवलेला मौल्यवान आणि दुर्मिळ हिरा 'तृतीय नेत्र', सोळाव्या शतकातील मुस्लिम आक्रमणाच्या काळात रहस्यमयरीत्या गायब झाला. त्या विनाशकारी धामधुमीनंतर हंपी शहर नष्ट झाले आणि हा हिराही विस्मरणात गेला.
पण एकविसाव्या शतकात अचानक काही जुनी कागदपत्रे हाती लागतात आणि एका आंतरराष्ट्रीय टोळीकडून या हिऱ्याचा निर्घृण शोध सुरू होतो. सुरत स्वारीच्या दरम्यान हा हिरा छत्रपती शिवाजी महाराजांच्या हाती लागून तो महाराष्ट्रात आला असावा, या शंकेने या हिऱ्याचा शोध कर्नाटकातून महाराष्ट्रात येतो... आणि सुरू होतो एक रक्तशंजीत थरार! पोलिसांनाही चक्रावून टाकणाऱ्या खुनांची मालिका आणि त्यामागील रहस्य शोधणारे एक धाडसी तरुण इतिहास संशोधक जोडपे.
भूतकाळ आणि वर्तमानकाळाला जोडणारा एक जळजळीत, रहस्यमय थरार अनुभवण्यासाठी संजय सोनवणी लिखित 'तृतीय नेत्र (भाग १)' ही कादंबरी आजच वाचा!
पुस्तकाचे नाव: तृतीय नेत्र - भाग १ (Trutiya Netra - Part 1)
लेखक: संजय सोनवणी (Sanjay Sonawani)
प्रकाशक: प्राजक्त प्रकाशन (Prajakt Prakashan)
भाषा: मराठी (Marathi)
बायंडिंग: पेपरबॅक (Paperback)
ISBN-13: 978-9392753190
साहित्य प्रकार: रहस्यमय थरारक कादंबरी / सस्पेन्स थ्रिलर (Mystery, Suspense & Historical Thriller)
.jpg)















