top of page
SKU: 9789391239947

सृजनाची वाट | Srujanachi Waat

₹२५०.०० Regular Price
₹१८७.५०Sale Price
Quantity

असे म्हणतात की, जोपर्यंत मूलभूत परिवर्तन होत नाही तोपर्यंत वरवर दिसणार्‍या बदलांना फारसा अर्थ उरत नाही. जर खरे समाज परिवर्तन घडवायचे तर शिक्षणाशिवाय पर्याय नाही. शिक्षण म्हणजे जे शाळेत दिले जाते तेवढेच, अशी याची संकुचित व्याख्या नाही. जीवन जगण्यासाठी, एक चांगला माणूस म्हणवून घेण्यासाठी, देशाचा आदर्श नागरिक होण्यासाठी जे गुण अंगी असावे लागतात ते जाणून घेणे, आचरणात आणणे म्हणजे शिक्षण! असे शिक्षण मिळावे यासाठी आम्ही ‘शिक्षण विचार’ घेऊन काही पुस्तके प्रकाशित करायचे ठरवले. सुप्रसिद्ध साहित्यिक, शिक्षणतज्ज्ञ संदीप वाकचौरे यांनी ही कल्पना मांडली आणि स्वतःच ते शिवधनुष्य यशस्वीरित्या पेललेही. त्यामुळेच एक लेखक, एक प्रकाशक आणि एकच विषय या कल्पनेतील तब्बल बारावे पुस्तक वाचकांच्या भेटीस येत आहे. या पुस्तकातून त्यांनी ‘सृजनाची वाट’ दाखवली आहे. 

 

अनेक आव्हानांमुळे शिक्षणव्यवस्था ‘अगतिक’ झालेली दिसत असताना संगमनेरसारख्या तालुक्याच्या ठिकाणी वास्तव्य असलेले वाकचौरे यांच्यासारखे एक ज्ञानसाधक शिक्षक शिक्षणाबाबत ‘जागतिक’ विचार मांडत आहेत. सर्व भारतीय भाषेतून प्रकाशित व्हावेत असे त्यांचे हे वैचारिक सामर्थ्य आहे. इथल्या प्रत्येक नागरिकाने हे वाचायलाच हवे. राष्ट्राचे पुनरूत्थान घडवायचे तर इथला सामान्य माणूस सशक्त व्हायला हवा. त्याची मानसिक दुर्बलता नष्ट होऊन त्याला ‘स्व’ची ओळख पटावी आणि नवसृजनाची वाट सापडावी यासाठी संदीप वाकचौरे यांचे हे शिक्षणचिंतन समजून घेणे अत्यावश्यक आहे.

- घनश्याम पाटील

  • संदीप वाकचौरे | Sandip Wakchaure
  • 176

Related Products

bottom of page