top of page
SKU: 9789386421357

शोधक | Shodhak

₹१३०.०० Regular Price
₹९७.५०Sale Price
Quantity

शोधक' हा तरुण कवी गणेश आटकळे यांचा केवळ कवितासंग्रह नसून तो एक 'रांगडा आविष्कार' आहे. कवी मूळचा ग्रामीण भागातील असून सध्या रोबोटिक्स आणि आर्टिफिशिअल इंटेलिजन्स (AI) सारख्या अत्याधुनिक आयटी क्षेत्रात कार्यरत आहे. तरीही, त्यांच्या लेखणीने आधुनिकतेचा बुरखा न पांघरता मातीशी असलेली नाळ घट्ट जपली आहे.

​या संग्रहातील कवितांमध्ये एक सर्जनात्मक विद्रोह आहे, ज्याला वारकरी संप्रदायाच्या स्नेहाची आणि मानवी करुणेची किनार लाभली आहे. आपल्या गावावर, माणसांवर आणि मातीवर नितांत प्रेम करणाऱ्या या कविता थेट काळजाला भिडतात. जीवनातील संघर्षातून वाट काढतानाही स्वतःचा 'शोध' घेण्याची वृत्ती आणि ग्रामीण साधेपणाचे विलोभनीय दर्शन या पुस्तकात घडते.

​English:

"Shodhak" is a unique collection of poetry where tradition meets technology. The author, Ganesh Atkale, hails from a rural background and has established himself in the cutting-edge fields of Robotics and Artificial Intelligence. Yet, his poetry refuses to don the mask of artificial modernity.

​Instead, it offers a raw, robust, and authentic voice that speaks of the soil, the village, and the people. The poems possess a creative rebellion, softened by the compassion found in the Warkari tradition. This book is a straightforward, heart-to-heart expression of a young man seeking his own light ("Swayam-Prakash") while navigating the struggles of life.

मान्यवरांचे अभिप्राय

​"अस्सल मराठमोळा आणि रांगडा आविष्कार..."

​"गणेश आटकळे यांच्या या काव्यात आपल्या मातीवर प्रेम करणारा रांगडा आविष्कार आहे... यातला विद्रोह हा मराठमोळ्या संस्कृतीतून निनादनार्‍या डफावरच्या थापेसारखा रांगडा पण चित्तवृत्ती खळबळवून सोडणारा आहे. हा कवी मागास भागातून येत आयटी क्षेत्रात, रोबोटिक्स आणि एआय सारख्या ज्ञानक्षेत्रात पाऊल रोवतो आणि तरीही आधुनिक संस्कृतीचा नाटकी भाग न बनता आपला अस्सल मराठमोळा भावनाकंद जपतो, ही महत्त्वाची बाब आहे."

​- संजय सोनवणी (सुप्रसिद्ध साहित्यिक आणि संशोधक)

​"A Genuine and Robust Expression..."

​"In Ganesh Atkale's poetry, there is a raw, robust expression that loves its soil... The rebellion here is like the beat of a traditional drum (Daf)—rugged yet soul-stirring. It is significant that this poet, coming from a backward region and establishing himself in advanced fields like Robotics and AI, has not become a dramatic part of modern culture but has preserved his authentic Marathi emotional core."

​- Sanjay Sonawani (Renowned Author and Researcher)

​Unique Author Profile (वैविध्यपूर्ण व्यक्तिमत्त्व): Written by an IT professional (Robotics/AI) who has retained his rural sensitivity.

​Authentic Voice (अस्सल शैली): Free from imitation, the language is direct, simple, and straight from the heart (Saralsot).

​Constructive Rebellion (सर्जनात्मक विद्रोह): Poems that challenge the status quo but with compassion and faith, not destruction.

​Themes (विषय): Rural life, struggle for identity, ambition, and the search for self-illumination.

​Product Details / उत्पादन तपशील

The Seeker' or 'The Researcher' – a narrative about discovery, curiosity, and the pursuit of knowledge.

  • गणेश आटकळे | Ganesh Atkale
  • 96
bottom of page