काव्यफुले | Kavyaphule
आद्य क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा अजरामर कवितासंग्रह - 'काव्यफुले'
मराठी साहित्यातील आधुनिकतेची पहिली ठिणगी!
१८५४ साली प्रकाशित झालेला आणि तब्बल पावणे दोनशे वर्षांच्या प्रदीर्घ कालखंडानंतर पुन्हा एकदा वाचकांच्या भेटीला येत असलेला, आद्य शिक्षिका सावित्रीबाई फुले यांचा हा ऐतिहासिक कवितासंग्रह - 'काव्यफुले'.
मराठी काव्याच्या प्रांतात केवळ संतकाव्य आणि तंतकाव्य (शाहीर) प्रचलित असताना, समाजाच्या जळजळीत वास्तवाला आणि निसर्गाच्या तरलतेला शब्दांत पकडणाऱ्या सावित्रीबाई खऱ्या अर्थाने 'आधुनिक मराठी काव्याच्या जनक' आहेत. केशवसुतांच्या जन्माच्याही आधी सामाजिक क्रांतीचे आणि मुक्त चिंतनाचे काव्य मांडणाऱ्या या महान कवयित्रीचा आवाज आता घराघरात पोहोचणार आहे.
या पुस्तकाचे विशेष आकर्षण
ऐतिहासिक पुनरावृत्ती : १८५४ च्या मूळ आवृत्तीचे वैभव जपणारी नवी मांडणी.
वैविध्यपूर्ण आशय : निसर्गविषयक, आत्मपर, बोधपर आणि सामाजिक क्रांतीचे दर्शन घडवणाऱ्या कविता.
महात्मा जोतीरावांशी संवाद : जोतीराव आणि सावित्रीबाईंमधील वैचारिक आणि भावनिक नाते उलगडणारी काव्यरचना.
तज्ज्ञांचे मार्गदर्शन: प्रसिद्ध साहित्यिक आणि संशोधक संजय सोनवणी यांची अभ्यासपूर्ण प्रस्तावना.
मूळ मुखपृष्ठाचा संदर्भ : पहिल्या आवृत्तीवर आधारित शिव-पार्वतीच्या चित्रासह एक दुर्मीळठेवा. ठेवा. महात्मा जोतीराव फुले यांच्या द्विशताब्दी जन्मवर्षाचे औचित्य साधून, चपराक प्रकाशनाने प्रकाशित केलेली ही आवृत्ती केवळ पुस्तक नसून ती महाराष्ट्राच्या गौरवशाली सामाजिक लढ्याचा दस्तऐवज आहे.
आजच आपली प्रत आरक्षित करा आणि आधुनिक मराठी काव्याचा उगम अनुभववा!
Kavyaphule—The Foundational Poetic Masterpiece by Savitribai Phule
Experience the Dawn of Modern Marathi Poetry!
First published in 1854 and re-emerging after 175 years, 'Kavyaphule' is not just a collection of poems; it is a historic manifesto of social revolution and literary brilliance by the pioneer of Indian education, Savitribai Phule.
While literary history often credits later poets, it was Savitribai who broke the traditional shackles of religious and heroic verse to introduce social realism, nature, and personal introspection to Marathi literature. This collection establishes her as the true 'Mother of Modern Marathi Poetry.'
Why You Must Own This Book:
A Historic Revival: A meticulously curated edition by Chaprak Prakashan, bringing back a work that was ahead of its time.
Thematic Richness: From poignant prayers to Shiva to stirring verses inspired by Mahatma Jotirao Phule’s work, the collection covers social critiques, nature, and memories of her birthplace, Naigaon.
Literary Justice: Featuring an insightful introduction by renowned scholar and author Sanjay Sonawani, reclaiming Savitribai’s rightful place in the literary pantheon.
Collector’s Edition: A tribute to the Phule couple's legacy during the bicentennial birth year of Mahatma Jotirao Phule.
Witness the burning embers of social change and the tender whispers of nature through the eyes of the woman who changed the face of India.
Order your copy now and reconnect with the roots of revolutionary Marathi literature!
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले | Savitribai Phule
.jpg)
