top of page
SKU: 9789391239909

वेध अंतर्मनाचा | Vedh Anatarmanacha

₹२५०.०० Regular Price
₹१८७.५०Sale Price
Quantity

कोकणच्या गावमातीची स्पंदने आपल्या शब्दांतून उजागर करणारा संवेदनशील लेखक म्हणून जे. डी. पराडकर हे नाव आता मराठी साहित्यात सर्वश्रुत झाले आहे. त्यांनी आपल्या लेखणीतून कोकणला शब्दांच्या माध्यमातून चित्रांकित केले आहे. कोकणचा निसर्ग, तेथील माणूस, त्याच्या भावभावना, गावमातीचे अनोखे गंधसंवेदन यास अतिशय ताकदीनं त्यांनी आपल्या लेखणीत बद्ध करून वाचकांपर्यंत पोहचवलं आहे आणि त्याचं वाचकांनी चांगलं स्वागतही केलं आहे.

 

'हायटेक' काळात पैशाच्या बळावर अतोनात सुविधा आपल्या दिमतीला आल्या आहेत मात्र आपण मोलाचं काही गमावून बसलो आहोत याची जाणीव व्हायला फार वेळ लागतो. तेव्हा हातातून सारं काही निसटून गेलं आहे हे आपल्याला जाणवतं. आपल्यातून आधी आपण गाव गमावून बसलो, संवेदना गमावून बसलो. अशा काळात जे. डी. पराडकर यांच्यातील लेखक तुम्हाला पुन्हा त्या जगात नेऊन तुमच्या अंतर्मनाचा तळ ढवळून काढत तुम्हाला पुन्हा त्या दिवसांपाशी घेऊन जातो. आपण जे जिथे सोडून आलो आहे त्याच्याजवळ साक्षात उभं करतो. कोकणच नाही तर कुठल्याही गावमातीत जगलेल्या माणसाला हे लिखाण आपल्याच भावभावनांचं प्रतिबिंब वाटेल. यातच जे. डी. पराडकर यांचं लेखक म्हणून यश आहे.

 

Quest of the Inner Mind' – a deep dive into psychology, spirituality, and the search for self-understanding.

  • जे. डी. पराडकर | J. D. Paradkar
  • 128

Related Products

bottom of page