top of page

ध्यास, रंगकर्मी सन्मान सोहळा

  • Mar 23
  • 1 min read

मुंबई : मराठी संस्कृती आणि भाषेचा गौरव करणारा विनोद आणि महेंद्र पवार यांच्या 'ऍड फिझ' निर्मित 'चैत्र चाहूल' हा कलेचा, संस्कृतीचा आणि सामाजिक बांधिलकी जपणारा मानाचा कार्यक्रम यंदाही अत्यंत दिमाखात पार पडला.

कार्यक्रमाची सुरुवात अभिनेता वैभव मांगले यांच्या प्रभावी कथावाचनाने झाली. त्यांनी प्रख्यात लेखक विद्याधर पुंडलिक यांच्या 'माळ' या गाजलेल्या कथेचे वाचन सादर केले. मानवी नातेसंबंध, एकटेपणा आणि भावनिक पोकळी यांचे सूक्ष्म दर्शन घडवणाऱ्या या कथेचे त्यांनी केलेले सादरीकरण इतके जिवंत होते की, सभागृहातील रसिक अक्षरशः मंत्रमुग्ध झाले. उपस्थितांनी या वाचनाला उत्स्फूर्त दाद दिली. यानंतर 'ध्यास' आणि 'रंगकर्मी' सन्मानांचे वितरण करण्यात आले. पुण्यातील 'सुदर्शन रंगमंच'च्या शुभांगी दामले यांना 'ध्यास सन्मान' प्रदान करण्यात आला तर प्रख्यात लेखक व भाष्यकार सुरेश गोसावी यांना 'रंगकर्मी सन्मान' देऊन गौरविण्यात आले. या प्रसंगी नीलेश जाधव यांनी पद्मश्री डॉ. अश्विनी भिडे-देशपांडे यांना स्वतः तयार केलेल्या विठोबाच्या तैल चित्राची आकर्षक फोटोफ्रेम भेट दिली. तसेच त्यांना सापडलेल्या सोन्याच्या दागिन्यांतून मिळालेली रक्कम सामाजिक कार्यासाठी देण्याचा उदात्त निर्णय घेत पेण येथील दिव्यांग मुलांसाठी कार्यरत 'सुहित जीवन ट्रस्ट'च्या संचालिका सुरेख पाटील यांच्याकडे ती रक्कम सुपूर्द करण्यात आली. उत्तरार्धात पद्मश्री डॉ. अश्विनी भिडे-देशपांडे यांनी 'रंग विठ्ठल' हा खास 'चैत्र चाहूल' साठी सादर केलेला अभंग रसिकांसमोर सादर केला. त्यांच्या सुरेल गायनाला तबल्यावर यती भागवत, संवादिनीवर ज्ञानेश्वर सोनवणे, तालवाद्यावर सूर्यकांत सुर्वे, पखवाजवर हनुमंत रावडे, बासरीवर अमर ओक तसेच स्वरसाथीसाठी निमिष कैकाडी, स्वरांगी मराठे आणि स्वराली जोशी यांनी समर्थ साथ दिली.

Recent Posts

See All
अधिक-उणे - मराठी चित्रपटसृष्टीचे

मराठी चित्रपट निर्मात्यांना जेवढ्या सोयी आणि सवलती राज्य शासनाने दिलेल्या आहेत तेवढ्या अन्य कोणालाही देवू केलेल्या नाहीत. चित्रपट निर्मितीसाठी आर्थिक सहाय्य, चित्रपट निर्मिती झाल्यानंतर सिमेना करमुक्त

 
 
 

Comments

Rated 0 out of 5 stars.
No ratings yet

Add a rating
bottom of page