top of page
व्यक्तिविशेष


ज्ञानसाधकाची संकल्पपूर्ती
ही गोष्ट आहे सप्टेंबर 2015 ची! महाराष्ट्राचा बराचसा भाग दुष्काळाने होरपळत होता. विदर्भ, मराठवाड्यात शेतकर्यांच्या आत्महत्या वाढलेल्या होत्या. माणसांना पिण्यासाठी पाणी मिळत नव्हतं. चार्याअभावी उपासमारीनं जनावरं मरत होती. मिरजेहून लातूरला पाण्याची रेल्वे नेण्यापर्यंत दिवस आले होते. अशा सगळ्या भीषण परिस्थितीत नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे हे दोन अभिनेते पुढे आले आणि त्यांनी नाम फाऊंडेशनची स्थापना करून शक्य त्यांना, शक्य तितकी मदत करण्याचा विडा उचलला. त्यांच्या या नेक कामाला प
Aug 15, 20256 min read
महाराष्ट्र कन्या 'अहिल्याबाई'
देवी सती अहिल्या भारतभूला ललामभूत जी। राजकारणी चतुरा असुनी जिने ठेविला हरी राजी ।। — संतकवी श्री दासगणु महाराज संत श्री दासगणू महाराज यांनी गौरविलेल्या, आणि ज्या मनगटात बळ, बुद्धी व चातुर्य आहे, असा जो स्वकर्तृत्वावर लोकाभिमुख राजा बनू शकतो, असा संदेश देणारी महाराष्ट्र कन्या म्हणजे अहिल्याबाई होळकर! माणकोजी शिंदे हे चौंडी (ता. जामखेड, जि. अहमदनगर) येथील पोलीस पाटील होते. त्यांच्या पत्नीचे नाव सुशीला बाई. ३१ मे १७२५ या शुभदिनी सुशीला बाई यांच्या पोटी एक कन्यारत्न जन्मास आले. य
May 31, 20253 min read
मुलाखतींचे पर्व निर्माण करणारे सुधीर गाडगीळ
सुधीर गाडगीळ - एक नाव जे मराठी रसिक श्रोत्यांच्या मनात निवेदनासाठी आणि प्रभावी मुलाखतींसाठी कोरले गेले आहे. या खास मुलाखतीमध्ये, घनश्याम पाटील यांनी सुधीर गाडगीळ यांच्या जीवनप्रवासातील अनेक पैलूंना स्पर्श केला आहे. त्यांच्या यशामागील संघर्ष, महत्त्वाचे टप्पे, आणि जीवनाकडे पाहण्याचा त्यांचा सकारात्मक दृष्टिकोन याबद्दल त्यांनी दिलखुलास संवाद साधला आहे. ही मुलाखत केवळ माहितीपर नसून, तुम्हाला प्रेरणा देणारी आणि तुमच्या मनात सकारात्मक विचार रुजवणारी आहे. जर तुम्ही यशस्वी व्यक्तीं
May 29, 20251 min read
स्वातंत्र्यवीर सावरकरांची 'ती' उडी | The Legendary Leap of Swatantryaveer Savarkar
"काय, ओळखलंत का मला? हे केवळ कपडे बदलले आहेत. मी तोच आहे. ईश्वराची इच्छा असेल तर पुन्हा भेट होईलच. तोवर जरी कधी सामान्य संसाराचा मोह होऊ लागला, तर असा विचार करा की, मुलामुलींची वीण वाढवणं आणि चार काटक्या एकत्र करून घरटी बांधणं यालाच जर संसार म्हणायचे असेल, तर असले संसार कावळे-चिमण्याही करीतच आहेत. पण संसाराचा याहून भव्य अर्थ घ्यायचा असेल, तर मनुष्यासारखा संसार थाटण्यात आपणही कृतकार्य झालो आहोत. आपली चार चूलबोळकी फोडून टाकली; पण त्यायोगे पुढेमागे हजारो जणांच्या घरी क्वचित सोन्
May 27, 202522 min read


आकाशाशी नाते जोडणारे जयंत नारळीकर
विज्ञान हे शतकानुशतकांपासून सिद्धान्त, प्रयोग आणि निरीक्षण या निकषांवर उत्क्रांत झालेली प्रक्रिया आहे. गोल गोल फिरत वर जाणाऱ्या आणि न संपणाऱ्या जिन्यासारखी ही सतत चालणारी प्रक्रिया आहे. निसर्ग समजून घेताना एखादी नवी गोष्ट समजणे म्हणजेच या न संपणाऱ्या जिन्याची एखादी पायरी वर चढण्यासारखे आहे. जेव्हा अशा जिन्यावरील एखादी पायरी आपण चढतो, तेव्हा ज्ञानाच्या अभावामुळे माहितीच नसलेले नवे मुद्दे आणि प्रश्न आ वासून उभे राहतात, ज्यांना प्रश्न म्हणून हाताळण्यासाठी आपली पूर्वीची समज पुरेश
May 20, 20254 min read
राजर्षी छत्रपती शाहू महाराज – समतेचे सूर्य
कोल्हापूरच्या राजवाड्यात २६ जून १८७४ रोजी केवळ एका नव्या दिवसाचा अरुणोदय झाला नाही, तर एका क्रांतिकारी पर्वाची पहाट झाली. याच दिवशी एका तेजस्वी बालकाचा जन्म झाला, ज्याने पुढे एका राजसिंहासनाला केवळ भूषविले नाही, तर त्या सिंहासनाला एका उदात्त विचारसरणीचे, समाजोद्धाराचे आणि परिवर्तनाचे प्रतीक बनवले. हे असामान्य व्यक्तिमत्व म्हणजे राजर्षी छत्रपती शाहू महाराज! कागलच्या घाटगे घराण्यात जन्मलेल्या या तेजस्वी बालकाचे मूळ नाव यशवंतराव होते. नियतीच्या मनात काहीतरी वेगळेच योजलेले होते.
May 6, 20253 min read


संतकवी महिपती महाराज
या वर्षी प्रयागराज, उत्तरप्रदेश येथे महाकुंभाचे भव्यदिव्य आयोजन सुरू आहे. त्या निमित्ताने भारतच नव्हे, तर या संपूर्ण जगातील हिंदू या महाकुंभात गंगेत पवित्र स्नान करण्यासाठी आले आहेत आणि सर्वच जगभरातील लोक या महापर्वाकडे दिव्यतेची अनुभूती घेत पाहत आहेत. याच मुहूर्तावर अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन राजधानी दिल्लीमध्ये आयोजित केले जात आहे. त्यात संपूर्ण भारतातील मराठी माणसे सहभागी झालेली आहेत आणि माऊलींच्या मराठी साहित्यिकांच्या ज्ञानामृतात स्नान करून विचार शुद्ध करणार आहेत.
Apr 19, 20258 min read
संतांचे कवी संत महिपती | The Poet of Saints, Sant Mahipati
हा काळ आहे मुस्लिम राजवटीतला ! नगर जिल्ह्यातील ताहाराबाद ही त्यांचीच जहागीर होती. एकेदिवशी या जहागीरदारांनी त्यांच्या हिशोबनीसाला तातडीनं बोलावणं धाडलं. त्यावेळी हिशोबनीस देवपूजा करत होते. त्यांनी निरोप घेऊन आलेल्या सैनिकाला सांगितलं, "स्नानसंध्या आटोपून येतो..." सैनिक म्हणाले, "असेल तसे या, असा निरोप आहे." हिशोबनीसांनी नाईलाजाने देवपूजा अर्धवट सोडली. जहागीरदाराकडे गेले. त्यांचा हिशोब पूर्ण करून दिला आणि त्यांनी नोकरीला रामराम ठोकला. ते म्हणाले, "यापुढे तुमची नोकरी नको! चाकरी
Apr 19, 20258 min read
पुस्तक काका - अशोक सुलाखे
पुण्यातल्या भरतनाट्य मंदिरात मी व सौ. गीता भुर्के यांनी ‘खुमासदार अत्रे’ हा कार्यक्रम सादर केला. कार्यक्रम खूपच रंगला. संपताना श्रोत्यांनी टाळ्यांचा कडकडाट केला. अनेक जण रंगमंचावर आले. अभिनंदनचा वर्षाव केला. त्यात एक जण होते श्री. अशोक सुलाखे! त्यांनी रघुनाथ धोंडो कर्वे यांचे ‘शारदेची पत्रे’ हे पुस्तक भेट दिले. ते देताना मोबाईलमध्ये फोटोही काढला. ही पुस्तक भेट मौल्यवान होती. एक मोठे विचारधन त्यांनी कायमस्वरूपी मला दिले होते. खूप आनंद झाला. ही सुलाखे यांची खासियत आहे. कार्यक्र
Nov 29, 20245 min read


मानसीचा चित्रकार तो
चौदा विद्या आणि चौसष्ट कलांची देवता म्हणून आपण श्रीगणेशाकडे पाहतो. त्याच्या वरदहस्ताने मिळालेल्या आशीर्वादातून कुणाला विद्येची प्राप्ती होते, तर कुणाला कलेची देणगी मिळते. जेव्हा एखाद्याच्या घरी विद्येचा वारसा तोही वैद्यकीय क्षेत्रातला असताना, स्वतःकडे अनुभवाची कुठलीही शिदोरी नसताना सध्याच्या डिजिटल जमान्यात डिजिटल पोर्ट्रेटची कला अवगत करून त्यात आपली निपुणता सिद्ध करणं, याला काय म्हणायचं? तर यालाच म्हणतात गणरायाच्या आशीर्वादातून मिळालेली देणगी. या देणगीचा वसा जोपासणारा कलाकार
Nov 28, 20243 min read
मला दिसलेले बाळासाहेब ठाकरे
ते 1996 चे साल होते. मे महिन्याच्या शेवटी मी ‘सचिव, राजशिष्टाचार’ या पदावर काम करीत असताना मला अचानक मुख्यमंत्र्यांनी बोलावून घेतले. त्यानी सांगितले की, ‘शिवसेनाप्रमुख श्री. बाळासाहेबांना मला भेटण्याची इच्छा आहे. त्यासाठी मी त्यांच्या ‘मातोश्री’ या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घ्यावी.’ मला या निमंत्रणाचा काही केल्या संदर्भ लागेना. त्यावर त्यांनी स्पष्ट केले की, ‘मंत्रीमंडळाच्या शपथविधीमध्ये प्रत्येक मंत्र्यांच्या मागे तुम्ही उभे दिसता. ते फोटो बघत असताना त्यांना समजले की तुम
Nov 28, 20246 min read
तुझ्याविना - सुधीर गाडगीळ
https://youtu.be/FmVJ3BRdgp4?feature=shared
Nov 25, 20241 min read


संवादाची 'अमृत'साधना
‘‘...आणि आम्हाला खातरी आहे की, आपण यापुढे ज्यांची मुलाखत घ्याल, तेव्हा हा महाराष्ट्र म्हणेल, या माणसाची सुधीर गाडगीळ यांनी मुलाखत घेतली म्हणजे हा माणूस निश्चितच मोठा आहे’’ असे गौरवोद्गार बाळासाहेब ठाकरे यांनी ज्यांच्याविषयी काढले ते सुधीर गाडगीळ आज (दि. 25) पंचाहत्तराव्या वर्षात पदार्पण करत आहेत. ‘मुलाखतींचा बादशहा’ अशी ओळख सार्थ ठरविणार्या सुधीर गाडगीळ यांच्याविषयीचा हा लेख. सूत्रसंचालन हा पूर्णवेळचा व्यवसाय होऊ शकतो, हे सिद्ध करणारे भारतातील पहिले व्यावसायिक मुलाखतकार म्हण
Nov 25, 20243 min read
बहुआयामी आचार्य अत्रे - अरुण कमळापूरकर
आचार्य प्रल्हाद केशव अत्रे हे शब्द जरी उच्चारले तरी माझ्या पिढीच्या म्हणजे पन्नासच्या दशकात जन्मलेल्या आणि त्याच्या आधीच्याही पिढ्यांच्या डोळ्यापुढे एक भारदस्त, धिप्पाड व्यक्तिमत्त्व उभे राहते. येत्या 13 ऑगस्टला आचार्यांच्या जन्माला 126 वर्ष पूर्ण होतील. त्यांच्या निर्वाणालाही 55 वर्षे होऊन गेली तरीही मराठी मनातली त्यांची प्रतिमा जराही धूसर झालेली नाही. त्यांच्या आयुष्यातील लहानमोठ्या घटना, जीवनाच्या विविध क्षेत्रातील त्यांची उत्तुंग कर्तबगारी उभ्या महाराष्ट्राला उत्तमपणे ज्ञ
Aug 11, 20244 min read


सैनिक हो तुमच्यासाठी! - राजेंद्र ल. हुंजे
आपल्या देशाची सीमा अहोरात्र पहारा देत उभ्या असलेल्या जवानांमुळे अत्यंत सुरक्षित आहे. या जवानांनी कधीही आपल्या जिवाची तमा बाळगली नाही, ना कधी मनात आपल्या कुटुंबीयांबद्दल आलेला विचार कवटाळला. व्रत एकच देशसेवेचं, निर्धार एकच शत्रूला जागेवर गारद करण्याचा. सीमा सुरक्षा दलाच्या अशा अनेक जवानांवर आपल्या कुटुंबातल्या सदस्यांप्रमाणे प्रेम करून त्यांच्या आरोग्याची काळजी घेणारा एखादाच अवलिया असतो, जो त्याच्या सुट्टीच्या दिवशीही फक्त जवानांच्या आरोग्याचीच काळजी करत असतो. हो, असाच एक अवलि
Aug 2, 20244 min read
शब्दांजली - डॉ. लक्ष्मणराव देगलूरकर
डॉ. लक्ष्मणराव देगलूरकर हे सामाजिक भान असलेले वैद्यकीय अधिकारी आणि विचारवंत होते. त्यांचे ‘ओड आणि ओढ’ हे आत्मचरित्र या महिन्यात 31 तारखेला ‘चपराक प्रकाशन’तर्फे प्रकाशित होत आहे. त्यांचे नुकतेच म्हणजे 25/06/2024रोजी निधन झाले. त्यांना ‘चपराक’तर्फे श्रद्धांजली म्हणून हा विशेष विभाग देत आहोत. हे पुस्तक आपण ‘चपराक’च्या वेबसाईटवरून घरपोहोच मागवू शकाल. शिवाय 31 ऑगस्टनंतर याचे ऑडिओ बुकही आपण ‘चपराक’च्या युट्यूब चॅनेलवरून ऐकू शकाल. - संपादक डॉक्टरसाहेब माणसांच्या सततच्या मागण्
Aug 2, 20249 min read
रामोजी राव : इलेक्ट्रॉनिक माध्यमांचा पितामह - राजेंद्र हुंजे
ईश्वराने जगाची निर्मिती करून या भूतलावर मानवाचं अस्तित्व अबाधित ठेवलं. त्याचं कारण हेच असावं कदाचित की, त्या मानवाकडून नेहमीच सर्जनाची निर्मिती व्हावी आणि एकमेकांमध्ये असलेला ‘माणूसपणाचा’ दुवा जपला जावा. ईश्वराच्या या संकल्पनेला मूर्त रूप देणारे व्यक्तिमत्व म्हणजे रामोजी राव. नुकतंच त्यांचं निधन झालं. त्या दिवशीचा सूर्योदय अमावस्येची काळी रात्र घेऊन आल्याचा अनुभव देऊन गेला. 2003 सालापर्यंतच्या पत्रकारितेत मी वृत्तपत्रसृष्टीत काम करत होतो. त्यावेळी मराठीमधून तासा-तासाला बातमीप
Jul 12, 20243 min read
bottom of page
.jpg)




