top of page

स्वातंत्र्यवीर सावरकरांची 'ती' उडी | The Legendary Leap of Swatantryaveer Savarkar

"काय, ओळखलंत का मला? हे केवळ कपडे बदलले आहेत. मी तोच आहे. ईश्वराची इच्छा असेल तर पुन्हा भेट होईलच. तोवर जरी कधी सामान्य संसाराचा मोह होऊ लागला, तर असा विचार करा की, मुलामुलींची वीण वाढवणं आणि चार काटक्या एकत्र करून घरटी बांधणं यालाच जर संसार म्हणायचे असेल, तर असले संसार कावळे-चिमण्याही करीतच आहेत. पण संसाराचा याहून भव्य अर्थ घ्यायचा असेल, तर मनुष्यासारखा संसार थाटण्यात आपणही कृतकार्य झालो आहोत. आपली चार चूलबोळकी फोडून टाकली; पण त्यायोगे पुढेमागे हजारो जणांच्या घरी क्वचित सोन्याचा धूर निघेल." हे उद्गार आहेत पन्नास वर्षे काळ्या पाण्याची शिक्षा भोगायला निघालेले थोर स्वातंत्र्यसैनिक विनायक दामोदर सावरकर यांचे! अशा भावपूर्ण शब्दात पत्नीचा निरोप घेताना स्वतः सावरकर आणि त्यांच्या पत्नीची मनोदशा काय असेल, याची आपणास कल्पनाही करणे शक्य नाही.

बालपण आणि शिक्षण

भगूर हे नाशिक जिल्ह्यात असलेले एक गाव. या गावात दामोदरपंत सावरकर नावाचे एक गृहस्थ राहत होते. राधाबाई हे त्यांच्या पत्नीचे नाव. कुटुंब अत्यंत सज्जन, स्वाभिमानी आणि प्रामाणिक म्हणून ख्यातीप्राप्त होते. दामोदरपंत आणि राधाबाई यांना तीन मुले आणि एक मुलगी होती: बाबाराव, विनायक, नारायण आणि मैना.

दामोदरपंत यांच्या दुसऱ्या मुलाचा, म्हणजे विनायकचा जन्म २८ मे १८८३ या दिवशी भगूर याच गावी झाला. विनायक यांचे प्राथमिक शिक्षण (इयत्ता चौथीपर्यंत) भगूर येथे झाल्यानंतर पुढील माध्यमिक शिक्षण घेण्यासाठी त्यांनी शिवाजी विद्यालय, नाशिक येथे प्रवेश घेतला. १८९२ यावर्षी विनायकाच्या जीवनात एक अत्यंत दुःखदायी, क्लेशदायक अशी घटना घडली. त्यावेळी विनायक केवळ नऊ वर्षांचे होते. त्यांची आई राधाबाई यांचे निधन झाले.

लहानपणापासूनच विनायक अत्यंत हुशार आणि बुद्धिमान म्हणून ओळखला जात होता. विनायकचे वक्तृत्व आणि लेखनी या दोहोंवर प्रचंड प्रभुत्व होते. तो शालेय जीवनात उत्कृष्ट काव्य रचना करत असे. शाळेत असताना त्यांनी वयाच्या तेराव्या वर्षी लिहिलेली 'स्वदेशीचा फटका' आणि 'स्वातंत्र्याचे स्तोत्र' ही दोन गीते चांगलीच गाजली. त्याचबरोबर विनायक यांनी वयाच्या दहाव्या वर्षी इतिहास आणि इतर धर्मग्रंथांचा सखोल अभ्यास करायला सुरुवात केली. याच सुमारास चाफेकर बंधूंना फाशी देण्यात आली. सर्वत्र संताप, चीड असे वातावरण असताना छोटा विनायक अत्यंत अस्वस्थ झाला. रात्र-रात्र त्याला झोप येत नव्हती. अशाच एका अस्वस्थ क्षणी, एक निर्णय घेऊन विनायक सरळ कुलदेवतेसमोर जाऊन उभा राहिला. कुलदेवता 'भगवती' समोर त्याने शपथ घेतली, 'देशाच्या स्वातंत्र्यासाठी सशस्त्र क्रांतीचा सेतू उभारून मारिता मारिता मरेतो झुंजेन'!

विनायक सावरकर यांना त्यांच्या वडिलांकडून वाचन, मनन, चिंतन आणि लेखनाचा वारसा मिळाला होता. एका रात्री दामोदरपंतांना जाग आली. पाहतात तर छोटा विनायक तेवढ्या रात्री काहीतरी लिहितो आहे. ते मुलाजवळ गेले. त्यांनी विनायकाला विचारले, "इतक्या रात्री काय लिहितो आहेस?" काहीही न बोलता विनायकाने हातातला कागद वडिलांच्या हातात दिला. दामोदरपंतांनी तो कागद हातात घेतला आणि त्यावरील ओळी वाचत असताना, जिथे त्यांना मुलाचे कौतुक वाटले, तिथेच त्यांचे डोळेही भरून आले. असे काय लिहिले होते? त्या कागदावर चाफेकर बंधूंच्या संदर्भात एक पोवाडा विनायकाने रचला होता. ते क्रांतिकारी विचार वाचून ते म्हणाले, "बाळा, तुझे वय त्यामानाने लहान आहे. या वयात असे विचार लिहिणे योग्य नाही..." हे सांगताना त्यांचे मन त्यांना ग्वाही देत होते की, हे मूल म्हणजे एक धगधगता निखारा आहे. उद्या या विचारांचा ज्वालामुखी होऊन फुटणार आहे.

वक्तृत्व कला आणि प्रसंग

शाळेत असताना विनायक विविध स्पर्धांमध्ये भाग घेत होता. वक्तृत्व ही त्याची अत्यंत आवडती कला होती. परिसरात जिथे कुठे वक्तृत्व स्पर्धा होत असेल, तिथे तो भाग घेत असे. एकदा कर्जतजवळ असलेल्या दहिवली या गावात असलेल्या वक्तृत्व स्पर्धेत विनायकाने भाग घेतला. त्याच्या भाषणाला प्रथम क्रमांक मिळाला; परंतु ते भाषण विनायकने स्वतः लिहिले होते यावर स्पर्धेच्या अध्यक्षांचा विश्वास बसत नव्हता. ते भाषण इतर कुणीतरी लिहून दिले आहे; परंतु त्याची वक्तृत्व कला पाहून त्याला प्रथम क्रमांक मिळतोय, अशा आशयाचे उद्गार त्यांनी काढले. ते ऐकताच विनायक ताबडतोब उभा राहिला आणि जबरदस्त विश्वासाने म्हणाला, "हे भाषण मीच लिहिले आहे. याचे अनेक साक्षीदार आहेत. मी लहान आहे यामुळे हा निबंध माझा नाही असे म्हणणे योग्य नाही. या न्यायाने ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली हेही खोटंच म्हणावे लागेल." विनायकाचे सडेतोड उत्तर ऐकून अध्यक्षांच्या रागाचा पारा चढला; परंतु इतरांनी मध्यस्थी करून त्यांना शांत केले. सावरकरांजवळ जो निसर्गदत्त ठामपणा, सडेतोडपणा, अभ्यासूवृत्ती, देशप्रेम, क्रांतिकारी विचार असे जे गुण होते, त्याचे प्रत्यंतर अशा छोट्या छोट्या प्रसंगातून लहानपणापासूनच येत होते.

कौटुंबिक दुःख आणि उच्च शिक्षण

१८९९ या वर्षी आलेल्या प्लेगच्या आजारात विनायकचे वडील दामोदर सावरकर यांचेही निधन झाले. दामोदरराव यांचे मोठे चिरंजीव बाबाराव यांच्यावर विनायक आणि नारायण या दोन्ही लहान भावांच्या पालनपोषण आणि शिक्षणाची जबाबदारी येऊन पडली. बाबाराव आणि त्यांच्या पत्नी येसूबाई या दोघांनी दोन्ही भावंडांचा उत्तम सांभाळ केला.

दरम्यान, १९०१ या वर्षी त्यांच्या जीवनात आमूलाग्र बदल करणारी एक घटना घडली. त्यावेळी त्यांचे वय जेमतेम अठरा वर्षांचे होते. रामचंद्र त्र्यंबक चिपळूणकर यांची कन्या यमुनाबाई यांच्यासोबत विनायकचे लग्न झाले. याचवर्षी विनायक मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाला. विनायक माध्यमिक शिक्षण घेत असतानाही त्यांचे चौफेर वाचन होते. 'काळ' या वर्तमानपत्रातील लेख आणि विचार यांच्या प्रभावाने त्यांच्या राष्ट्रभक्तीला चालना मिळाली. विनायकची पुढे शिकण्याची इच्छा आणि त्याची प्रखर बुद्धिमत्ता लक्षात घेऊन बाबाराव यांनी त्यांना फर्ग्युसन महाविद्यालयात प्रवेश मिळवून दिला. विनायक यांचे सासरे चिपळूणकर यांनीही विनायकच्या शिक्षणासाठी मदत केली. फर्ग्युसन महाविद्यालयात शिकत असताना त्यांनी देशभक्ती, पारतंत्र्य आणि देशप्रेम या विषयावर तेजस्वी विचार मांडले. १९०५ या वर्षी विनायक दामोदर सावरकर यांना मुंबई विद्यापीठाची बी.ए.ची पदवी मिळाली. हे यश मिळताच एक महत्त्वाची गोष्ट त्यांच्या आयुष्यात घडली. त्यावेळी हुशार विद्यार्थ्यांना परदेशात जाऊन उत्तम शिक्षण घेता यावे म्हणून 'शिवाजी शिष्यवृत्ती' मिळत असे. श्यामजी कृष्ण वर्मा यांच्यावतीने ही शिष्यवृत्तीची योजना मिळत असे. लोकमान्य टिळक यांनी या शिष्यवृत्तीसाठी विनायक यांच्या नावाची शिफारस केली. त्यावेळी विनायक दामोदर सावरकर यांना खूप आनंद झाला. कायद्याचा अभ्यास करण्यासाठी ते लंडनला गेले. तिथला अभ्यासक्रम यशस्वीपणे पूर्ण करून आल्यानंतर त्यांनी मुंबईच्या विल्सन विधी महाविद्यालयातून एलएलबी हा अभ्यासक्रमही पूर्ण केला. १९०५ याच वर्षी एक आगळावेगळा प्रसंग घडला. बंगालची फाळणी झाली आणि सावरकरांनी पुणे येथे फर्ग्युसन महाविद्यालयाजवळ दसऱ्याच्या दिवशी विदेशी वस्त्रांची होळी पेटवली.

अभिनव भारत संघटना

हे सारे करत असताना राष्ट्रप्रेम, राष्ट्रभक्ती, राष्ट्रसेवा ह्यासाठी त्यांनी 'अभिनव भारत' नावाची एक संघटना थेट लंडनमध्ये स्थापन केली. या संघटनेच्या स्थापनेचा इतिहास तसा विलक्षण आहे. वर उल्लेख केल्याप्रमाणे सावरकर कायद्याचे शिक्षण घेण्यासाठी ०९ जून १९०६ रोजी 'परशिया' या बोटीतून लंडनला निघाले. बोटीत अनेक भारतीय तरुण होते. त्यांच्याशी सावरकरांचा परिचय झाला. या प्रवासात सावरकरांनी त्या तरुणांसोबत देश स्वतंत्र कसा करता येईल अशी सातत्याने चर्चा सुरू केली. केशवानंद आणि शिष्टाचारी या दोन तरुणांशी खास मैत्री झाली. एखादी गुप्त संस्था स्थापन करण्याचा विषय निघाला आणि शिष्टाचारी म्हणाले की, "अशी संस्था आपल्यासारख्या मूठभर तरुणांनी स्थापून काही उपयोग होणार नाही. आपल्याला ओळखतातच असे किती लोक? अशी संस्था टिळक, लाला लजपतराय किंवा बडोद्याचे गायकवाड यांच्यासारख्या मोठ्या माणसाने स्थापली तर आपण त्या संघटनेत सहभागी होऊन कार्य करू." त्यावर सावरकरांनी शिष्टाचारी यांना देश-विदेशातील अनेक व्यक्तींची उदाहरणे देऊन सांगितले की, "चाफेकर बंधूंनी स्वयंप्रेरणेने जुलमी इंग्रजाचे मुंडके उडवले ना? आपल्यासोबत कुणी येईल हा विचार न करता आपण स्वतः काहीतरी केले पाहिजे. आगीने आग जशी भडकत जाते, तसेच पराक्रमाचे, शौर्याचे आणि चळवळीचे आहे." सावरकरांचे विचार त्या दोघांना पटत होते; परंतु मनाची तयारी होत नव्हती. त्याच रात्री शिष्टाचारी यांनी सावरकरांसोबत चर्चा करून अनेक शंकांचे निरसन करून घेतले आणि ते ताबडतोब एखादी संस्था स्थापन करून लढा देऊया यासाठी सिद्ध झाले आणि बोटीतच संस्थेचे नामकरणही झाले... 'अभिनव भारत!' पाठोपाठ सावरकरांनी आणि त्या दोघांनीही स्वातंत्र्यासाठी सर्वस्व देण्याची शपथ घेतली. पुढे चालून देशसेवेची मोठी चळवळ या संघटनेच्या माध्यमातून उभी राहत असल्याचे निदर्शनास येताच, इंग्रज सरकारने ही संघटना क्रांतिकारी संघटना म्हणून घोषित केली. या संघटनेच्या माध्यमातून देशातील जनता आणि तरुण यांच्यामध्ये राष्ट्रीयत्वाचे आणि स्वातंत्र्याचे विचार रुजविण्यास सावरकरांनी सुरुवात केली. सोबतच इंग्रज सरकारच्या विरोधात सत्याग्रह आणि लढा देण्यासाठी या संघटनेने कार्य सुरू केले. इंग्रजांच्या पारतंत्र्यातून भारतातील लोकांना स्वातंत्र्य मिळवून देणे हे या संघटनेचे प्रमुख ध्येय होते. देशहित, स्वत्व, देशाची अस्मिता यासोबतच राष्ट्राभिमान यासोबत सावरकरांनी कधीच तडजोड केली नाही. आपण पारतंत्र्यात आहोत ही बोचणी, हे दुःख त्यांना कायम होत असे. अभिनव भारत ही एक राष्ट्रीय शिक्षणसंस्था होती.

"इंग्रजी सत्ता भलेही बळकट, सशस्त्र असेल; परंतु ती उलथवून टाकणे सहज शक्य आहे. सशस्त्र क्रांतीयुद्धात प्रत्येकाने आपले कर्तव्य बजावताना कमीतकमी एका शत्रूला तरी यमसदनी पाठवावे. आपण सुरु केलेल्या कार्यात आपल्याला यश येवो अथवा न येवो. भारतमाता मुक्त करण्यासाठी, शत्रूला धडा शिकविण्यासाठी तू एकटा जरी लढलास, शत्रूने टाकलेले गुलामीचे जाळे तोडण्याचे प्रयत्न करताना तू कामी आलास, तरी हरकत नाही, कारण तू तुझे कर्तव्य पार पाडले आहेस." अशा प्रकारची शिकवण अभिनव भारत या संघटनेत दिल्या जात असे. अभिनव भारत ही संघटना कालांतराने केवळ भारतापुरतीच न राहता, विदेशात ठिकठिकाणी या संघटनेच्या शाखा स्थापन झाल्या. अभिनव भारत संघटनेचा होणारा विस्तार, होत असलेले कार्य लक्षात घेऊन इंग्रज सरकार बिथरले. ही चळवळ नेस्तनाबूत करण्यासाठी सरकारने १९०९ यावर्षी सावरकरांचे मोठे बंधू बाबाराव यांचा अनन्वित छळ केला. बाबाराव यांना पकडून त्यांच्या हाता-पायात बेड्या ठोकून हातात कपड्यांचे आणि काही भांडी दिली. ते ओझे पेलत पायात बेड्या असलेल्या अवस्थेत त्यांना नाशिक शहरातून फिरवण्यात आले, या हेतूने की, बाबारावांची ती अवस्था पाहून इतरांच्या मनात धडकी भरावी आणि कुणी पुन्हा सरकारच्या विरोधात बंड करू नये म्हणून. परंतु तशाही अवस्थेत बाबाराव अत्यंत धीरोदात्तपणे, दमदार पावले टाकत होते. बाबाराव यांच्यावर खटला भरून त्यांना जन्मठेपेची शिक्षा ठोठावून त्यांना अंदमानच्या तुरुंगात पाठवून दिले.

या घटनेनंतर अभिनव संघटनेचे कार्यकर्ते प्रचंड चिडले, संतापाने पेटून उठले. त्याचा परिणाम असा झाला की, लंडन येथे एक कार्यक्रम सुरू असताना मदनलाल धिंग्रा या क्रांतिकारकाने कर्झन वायली या अधिकाऱ्यास गोळ्या घालून यमसदनी पाठवले. तो दिवस होता, १ जुलै १९०९! काही महिन्यांनंतर २१ डिसेंबर १९०९ रोजी नाशिक येथे एक चित्तथरारक घटना घडली. नाशिकच्या विजयानंद सिनेमागृहात क्रांतिकारकांच्या धाडसी कार्यवाहीत जिल्हाधिकारी जॅक्सन हे बळी पडले. अनंत कान्हेरे, विनायक देशपांडे आणि कृष्णाजी कर्वे या क्रांतिवीरांनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. इंग्रज सरकार या दोन घटनांमुळे खवळले. त्यांनी अभिनव भारत संघटनेच्या अनेक कार्यकर्त्यांना पकडले. कान्हेरे, देशपांडे आणि कर्वे यांना फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली, तसेच वामन देशपांडे यांना काळ्या पाण्याची शिक्षा भोगण्यासाठी पाठवण्यात आले. नाशिक येथील कार्यक्रमात जी पिस्तुले वापरण्यात आली होती, ती पिस्तुले सावरकरांनी पाठवली होती असा आरोप वि. दा. सावरकर यांच्यावर करण्यात आला. तेव्हा सावरकर वेल्स येथील एका दवाखान्यात औषधोपचार घेत होते. त्यांनी लंडनला परतण्याचा निर्णय घेतला; परंतु त्यांना अटक होईल आणि तसे झाले तर सुरू असलेले आंदोलन चिरडले जाईल यासाठी सहकाऱ्यांनी सावरकरांनी लंडनला जाऊ नये असे सुचवले; परंतु "माझ्या सोबतच्या लोकांना, मित्रांना अटक होत असताना मी इथे थांबणे शक्य नाही," असे ठामपणे सांगत ते लंडनला परतले. लंडनमध्ये उतरताच त्यांची वाट पाहणाऱ्या पोलिसांनी त्यांना अटक केली. तो दिवस होता १३ मार्च १९१०! सावरकरांना ताब्यात घेऊन नंतर त्यांच्यावर राजद्रोहाचा खटला भरला. काही महिने ब्रिक्स्टनच्या तुरुंगात ठेवण्यात आले. नंतर १ जुलै १९१० रोजी त्यांना भारतात बोटीतून आणण्यात येत होते. समोर अथांग समुद्र पसरलेला होता. सावरकरांच्या मनात उसळत असलेल्या विचारांच्या असंख्य लाटांचा थांगपत्ता कुणालाही लागत नव्हता. तशातच ७ जुलै १९१० रोजी सावरकरांना नेत असलेल्या मोरिया बोटीत बिघाड झाला.

सागरातील उडी आणि अंदमानची शिक्षा

त्या रात्री सावरकर प्रचंड अस्वस्थ होते. मनात चालत असलेले विचार थांबत नव्हते. ठाम निर्णय घेणे अवघड जात होते. काय करावे नि काय नको अशी द्विधा मनःस्थिती झाली होती. त्यांना वाटत होते, 'या बोटीतून भारतात पोहोचलो तर खटला चालणार आहे. शिक्षा तर ठरलेलीच आहे. कदाचित जन्मठेप होईल, ती शिक्षा भोगण्यासाठी अंदमानच्या तुरुंगातही जावे लागेल. मग ह्या स्वातंत्र्य आंदोलनाचे काय होईल? सरकार बळाच्या आणि बंदुकीच्या जोरावर आंदोलन चिरडून टाकेल. बोट बंद पडली आहे. ही वेळ आहे या बोटीचा निरोप घेऊन फ्रान्स देशात जावे का? कारण मी इंग्रजांचा कैदी आहे. आंतरराष्ट्रीय नियमानुसार मी फ्रान्स देशात पोहोचलो म्हणजे लंडनच्या पोलिसांचे काही चालणार नाही. सहकारी काय म्हणतील? त्यांना माझा निर्णय पटेल का? पटेलंच. कारण त्यांचा माझ्यावर विश्वास आहे. त्यांना धोका देण्याचा विचार असता तर मी त्यावेळी लंडनमध्ये परतलोच नसतो. तिथे अटक होणार म्हणून किंवा ते माहिती असूनही मी लंडनला परतलो. परंतु आता जर या बोटीतून भारतात पोहोचलो तर पुन्हा खटला चालवला जाणार आणि कदाचित जन्मठेपही होईल, मग स्वातंत्र्य आंदोलनाचे काय होईल. जर भारतात न पोहोचताच फ्रान्स देशात गेलो तर नक्कीच आंदोलन पुढे जोरात चालवता येईल. तुरुंगात खितपत पडून आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्याचा हेतू साध्य होणार नाही. वेळ पडल्यास राष्ट्रहितासाठी शत्रूच्या कैदेतून सुटका करून घेतल्यास तो राष्ट्रद्रोह अथवा धोका ठरत नाही...' अशा विचारात असलेल्या सावरकरांनी एक ठाम निर्णय घेतला. ८ जुलै १९१० रोजी त्यांनी सागरात उडी मारली. काही क्षणातच तो प्रकार बोटीवर असलेल्या पोलिसांच्या लक्षात आला आणि सावरकरांवर गोळ्यांचा जणू वर्षाव सुरू झाला. समोर अथांग सागर, समोरचा किनारा किती दूरवर हेही माहिती नव्हते. केवळ मातृभूमीवरील प्रेम, प्रचंड आत्मविश्वास आणि कोणत्याही संकटाला सामोरे जाण्याचा दृढनिश्चय यामुळे सावरकरांनी पोहत पोहत किनारा गाठला. तो किनारा फ्रान्सच्या हद्दीत होता. किनाऱ्यावर असलेल्या फ्रान्सच्या सैनिकांशी भाषेच्या माध्यमातून उचित संवाद न साधता आल्यामुळे सैनिकांनी त्यांना अटक केली. पाठोपाठ आलेल्या इंग्रज सैनिकांनी त्यांना पकडले. भारतात आणून त्यांच्यावर खटला चालवण्यात आला. २४ डिसेंबर १९१० या दिवशी त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. त्यांना अंदमान येथील तुरुंगात पाठवण्यात आले. या तुरुंगवासाला काळ्या पाण्याची शिक्षा असेही संबोधण्यात येते. अंदमान येथील तुरुंगात पोहोचताच त्यांना कवितेच्या ओळी सुचल्या...

मुहिब्बाने वतन होंगे हजारो बेवतन पहले,

फलेगा हिंद पिछे और भरेगा अंदमान पहले।

या ओळींचा अर्थ असा की, 'या देशावर प्रेम करणारे खूप होतील पण आधी हजारोंना निर्वासित व्हावे लागेल. आपल्या भारताच्या भरभराटीची स्वप्न पूर्ण होईल पण त्यासाठी प्रथम अंदमान भरेल.'

अंदमानच्या या तुरुंगात सावरकरांचा भयंकर छळ करण्यात आला. शिक्षेचे प्रकार ऐकले की, अंगावर काटा येतो. त्यांना खड्या बेडीत टांगले. तेलाच्या घाण्याला बैलाप्रमाणे जुंपून तेल काढायला लावले. नारळाच्या काथ्या कुटण्याचे, आणि नारळाचे तेल काढण्याचे अत्यंत कष्टाचे काम दिले. त्यांना अंधाऱ्या खोलीत ठेवण्यात आले. किडे पडलेले अन्न खायला दिले गेले. सोबत तुरुंगाच्या परिसरात आणि बाहेर पसरलेली जंगले साफ करण्याची महाकष्टमय शिक्षा मिळत असे. या कामांमध्ये चालढकल करणाऱ्यांना बेताची छडी आणि कोड्याने मारहाण होत असे. अत्यंत घाणेरडा नियम म्हणजे कैद्यांना दिवसातून फक्त दोन वेळा शौचाला जाण्याची परवानगी होती. दिवसभर शौचास जाता येत नव्हते. रात्री तसा प्रसंग आलाच तर स्वतःच्या कोठडीत नैसर्गिक विधी करावा लागे आणि मग रात्रभर तशा घाण वासात राहावे लागे. आंघोळ करतानाही शिपाई म्हणेल तेवढेच आणि सांगेल तेव्हाच अंगावर पाणी घ्यावे लागे.

काव्यरचना आणि समाजकार्य

अशी कठिणातली कठीण शिक्षा भोगत असताना सावरकरांना अनेकानेक काव्य स्फुरत होते; परंतु त्यांच्याजवळ ना लेखणी होती ना कागद होता, ना समुद्राची शाई होती ना आकाशाचा कागद करण्याची परवानगी होती. अशा परिस्थितीत विनायक सावरकरांना काव्यस्फूर्ती शांत बसू देत नव्हती. त्यांनी मग तुरुंगाच्या भिंतीचा कागद केला आणि बाभळीच्या झाडाच्या काट्यांची लेखणी केली. सुचलेले काव्य ते कोळशाने भिंतीवर लिहायचे. नंतर मुखोद्गत करायचे. अशाप्रकारे लिहून पाठ केलेल्या दहा हजारांपेक्षा जास्त ओळी त्यांनी तुरुंगातून सुटका झाल्यावर पुन्हा लिहून काढल्या. 'सागरा प्राण तळमळला...' हे गीत या अंदमानचीच भेट. हे गीत ऐकताना अंगावर काटा आणि डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहात नाही. त्याचबरोबर सावरकरांनी काळ्या पाण्याची शिक्षा भोगत असताना अनेक गझला लिहिल्या होत्या; परंतु दुर्दैवाने त्या हरवल्या. 'जयोस्तुते' हे स्वातंत्र्य देवीचे स्तोत्र सावरकरांंनीच लिहिले आहे.

एकदा शिवजयंतीच्या निमित्ताने एका कार्यक्रमात व्याख्यान देताना सावरकर म्हणाले, "आजपर्यंत आम्ही शिवजयंती हा महोत्सव ऐतिहासिक आहे, यामागे कोणताही राजकीय हेतू नाही असे मानत आलो आहोत; परंतु आज आम्ही जी शिवजयंती साजरी करत आहोत, ती पूर्णपणे राजकीय आहे कारण शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव करण्याचा अधिकार त्यांनाच आहे, जे महाराजांप्रमाणे आपल्या मातृभूमीला परकियांच्या तावडीतून सोडवण्यासाठी झुंजत आहेत. हा महोत्सव साजरा करण्यामागे मुख्य उद्देश हाच आहे की, आम्हाला पारतंत्र्याच्या बेड्या फेकून स्वतंत्र व्हायचे आहे. तशी स्फूर्ती आम्हाला मिळावी." याच व्याख्यानात सावरकरांनी अनेकांना शब्दास्त्राने झोडपून काढले. सावरकरांनी व्याख्यान चालू असताना 'स्वातंत्र्यलक्ष्मी की जय...' असा जयजयकार केला. यासोबतच सावरकरांनी जनतेमध्ये स्वातंत्र्याबद्दल ओढ निर्माण व्हावी, पारतंत्र्याची चीड निर्माण व्हावी म्हणून देशभक्तीपर कविता, देशाला स्वातंत्र्य मिळावे म्हणून बलिदान देणाऱ्या तानाजी मालुसरे, बाजीप्रभू देशपांडे, मुरारबाजी अशा वीरांवर पोवाडे लिहून ते गायला सुरुवात केली.

कौटुंबिक आयुष्य आणि अखेर

देशासाठी सर्वस्व वाहणाऱ्या स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जीवनात अनेक कौटुंबिक चढउतार आले. त्याची धावती नोंद घेणे क्रमप्राप्त आहे. बाबाराव सावरकर यांच्या पत्नी आणि विनायक यांच्या वहिनी सौ. येसूबाई यांचे एप्रिल १९१९ यावर्षी निधन झाले. कुटुंबाचा एक फार मोठा आधार गेला. आईच्या पश्चात जिने आधार दिला ती माऊली सोडून गेल्याचे दुःख सावरकरांना झाले. ७ जानेवारी १९२५ सावरकरांना कन्यारत्नाचा लाभ झाला. तिचे नाव ठेवले प्रभात! कदाचित प्रभातच्या आगमनाने या देशात स्वातंत्र्याची प्रभात पाहायला मिळेल या विचाराने! विनायक दामोदर सावरकर यांच्या मुलाचे नाव विश्वास! त्यांचा जन्म १७ मार्च १९२७ रोजी झाला. १६ मार्च १९४५ रोजी विनायकांचे मोठे बंधू बाबाराव सावरकर यांचा मृत्यू झाला. ८ मे १९४५ या दिवशी प्रभात हिचा विवाह झाला. वि. दा. सावरकरांचे धाकटे भाऊ डॉ. नारायणराव हे १९ ऑक्टोबर १९४९ रोजी हे जग सोडून गेले. वि. दा. सावरकर यांना दोन वेळा जन्मठेपेची शिक्षा झाली. अशी शिक्षा भोगणारे सावरकर हे एकमेव स्वातंत्र्यवीर!

सावरकर हे जगातील पहिले असे लेखक की, ज्यांनी लिहिलेल्या '१८५७ चे स्वातंत्र्य समर' या ग्रंथाला भारतातच नव्हे, तर परदेशातही बंदी होती. स्वातंत्र्य चळवळीत भाग घेतल्यामुळे इंग्रज सरकारने त्यांची पदवी वापस घेतली. भारतीय राष्ट्रध्वजाच्या मध्यभागी अशोक चक्र आहे ते लावण्याची विनंती वि. दा. सावरकरांनी राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांना केली होती. ती मान्य करण्यात आली. 'राजकारणाचे हिंदूकरण आणि हिंदूंचे लष्करीकरण' अशा एक क्रांतिकारी मंत्राचे जनक स्वातंत्र्यवीर सावरकर होते. साहित्यिकांना त्यांनी 'लेखण्या मोडा, बंदुका घ्या' असे घणाघाती आवाहन केले होते. सावरकरांचे एकूण स्वातंत्र्य चळवळीतील योगदान, कार्य लक्षात घेऊन 'स्वातंत्र्यवीर' ही पदवी त्यांना प्र. के. अत्रे यांनी बहाल केली. सावरकर यांना जहाल क्रांतिकारक, महाकवी, क्रियाशील समाजसुधारक, हिंदूसंघटक, हिंदुत्ववादी, राजकारणी, तत्त्वज्ञ, भाषाशुद्धी व लिपीशुद्धी अभियानाचे प्रणेते, क्रांतिकारकांचे प्रेरणास्थान, विज्ञाननिष्ठ सावरकर, इतिहासकार इत्यादी रुपात ओळखले जाते. २ मे १९०८ या दिवशी लंडनमध्ये सावरकरांच्या पुढाकारातून पहिल्यांदा शिवजयंती साजरी करण्यात आली. २४ ऑक्टोबर १९०९ या दिवशी लंडनमध्ये दसऱ्याचा उत्सव साजरा करण्यात आला. १९०९ यावर्षी ते बॅरिस्टरची परीक्षा उत्तीर्ण झाले; परंतु त्यांनी पदवी स्वीकारली नाही.

असे हे थोर समाजसेवक, क्रांतिकारक विनायक दामोदर सावरकर यांनी त्र्याऐंशी वर्षांचे वय असताना स्वतःची इहलोकीची यात्रा संपविण्याचा निर्णय घेतला. त्यांनी अन्नत्याग केला. बावीसव्या दिवशी, म्हणजे २६ फेब्रुवारी १९६६ ला त्यांनी प्राणार्पण केले आणि या जगताचा निरोप घेतला. जणू बावीस दिवस ते ईश्वराची प्रार्थना करीत होते,

ने मजसी ने ईश्वरा जीव तळमळला, ने मजसी परत वैकुंठाला..... प्राण कासावीस झाला......

वंदे मातरम्!

नागेश सू. शेवाळकर(९४२३१३९०७१)

संदर्भ:

१) स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर : लेखिका - मंजिरी मराठे.

२) स्वातंत्र्यवीर सावरकरांची जाज्वल्य पत्रकारिता : लेखक देवेंद्र भुजबळ.

३) इंटरनेटवरील लेख.

The Legendary Leap of Swatantryaveer Savarkar

"Do you recognize me? Only my clothes have changed; I am still the same. If it is God's will, we shall meet again. Until then, should you ever feel the urge for a mundane life, consider this: if raising children and building nests from a few twigs is all that constitutes a family, then crows and sparrows do the same. But if we are to embrace a grander meaning of life, then we, as humans, have achieved something truly significant. We may have shattered our own small hearths, but in doing so, we have paved the way for thousands of homes to perhaps someday burn with golden light." These were the profound words of Vinayak Damodar Savarkar, the great freedom fighter embarking on fifty years of imprisonment in the Andaman Islands. It's almost impossible to imagine the state of mind of Savarkar and his wife as he bid her farewell with such poignant words.

Childhood and Early Education

Bhagur, a village in Nashik district, was home to Damodarpant Savarkar and his wife, Radhabai. Their family was known for its integrity, self-respect, and honesty. They had three sons—Babarao, Vinayak, and Narayan—and one daughter, Maina.

Vinayak, their second son, was born in Bhagur on May 28, 1883. After completing his primary education (up to the fourth standard) in Bhagur, he enrolled in Shivaji Vidyalaya, Nashik, for his secondary schooling. In 1892, a deeply sorrowful event marked young Vinayak's life: his mother, Radhabai, passed away when he was just nine.

From a young age, Vinayak was recognized for his sharp intellect and brilliance. He possessed a remarkable command over both speech and writing. During his school days, he composed exceptional poetry. At the tender age of thirteen, his poems 'Swadeshi cha Fatka' (The Whip of Swadeshi) and 'Swatantryache Stotra' (Hymn to Freedom) gained considerable acclaim. Around the same time, at ten years old, Vinayak began an in-depth study of history and religious scriptures. The news of the Chaphekar brothers' hanging ignited widespread anger and resentment. Young Vinayak was deeply disturbed, unable to sleep for nights. In one such restless moment, he made a resolute decision. Standing before his family deity, Goddess Bhagawati, he swore: "For the freedom of the nation, I will build a bridge of armed revolution and fight until I perish, striking blow after blow!"

Vinayak inherited his father's love for reading, contemplation, and writing. One night, Damodarpant awoke to find young Vinayak writing in the late hours. Approaching his son, he asked, "What are you writing so late at night?" Without a word, Vinayak handed his father the paper. As Damodarpant read the lines, his eyes welled up even as he felt immense pride. What was it that moved him so deeply? Vinayak had composed a ballad about the Chaphekar brothers, filled with revolutionary thoughts. Reading them, Damodarpant said, "Son, you are too young for such thoughts..." But his heart knew that this child was a glowing ember, destined to erupt into a volcano of ideas.

Oratory and Conviction

Vinayak was a keen participant in various school competitions, with oratory being his favorite art form. He would join any public speaking contest in the area. Once, at a competition in Dahivali near Karjat, Vinayak's speech won first prize. However, the presiding judge found it hard to believe that Vinayak had written the speech himself, suggesting it must have been penned by someone else. Despite this doubt, impressed by his delivery, the judge intended to award him the first prize. Hearing this, Vinayak immediately stood up and, with unwavering confidence, declared, "I wrote this speech myself. There are many witnesses to it. It's unfair to say this essay isn't mine just because I am young. By that logic, one would have to say Dnyaneshwar did not write the Dnyaneshwari." Vinayak's sharp retort angered the judge, but others intervened to calm him. From his childhood, small incidents like these revealed Savarkar's innate steadfastness, forthrightness, studiousness, patriotism, and revolutionary spirit.

Personal Loss and Higher Education

In 1899, the plague claimed the life of Vinayak's father, Damodar Savarkar. The responsibility of nurturing and educating Vinayak and Narayan fell upon Babarao, Damodarrao's eldest son. Babarao and his wife, Yesubai, raised their younger brothers with utmost care.

Meanwhile, a pivotal event in 1901 transformed Vinayak's life when he was barely eighteen. He married Yamunabai, daughter of Ramchandra Tryambak Chiplunkar. That same year, Vinayak passed his matriculation examination. Even during his secondary schooling, Vinayak was an avid reader across diverse subjects. The articles and ideas in the newspaper 'Kal' fueled his patriotism. Recognizing Vinayak's desire for further education and his keen intellect, Babarao secured his admission to Fergusson College. Vinayak's father-in-law, Chiplunkar, also assisted in his education. While at Fergusson College, he articulated powerful ideas on patriotism, servitude, and love for the nation. In 1905, Vinayak Damodar Savarkar earned his B.A. degree from Mumbai University. This achievement marked another significant turn in his life. At that time, gifted students received the 'Shivaji Scholarship' to pursue higher education abroad, a scheme initiated by Shyamji Krishna Varma. Lokmanya Tilak recommended Vinayak for this scholarship, filling him with immense joy. He proceeded to London to study law. After successfully completing his studies there, he also obtained an LL.B. degree from Wilson College of Law in Mumbai. Also in 1905, a unique incident occurred: following the Partition of Bengal, Savarkar ignited a bonfire of foreign clothes near Fergusson College in Pune on the day of Dussehra.

The Abhinav Bharat Society

Amidst these endeavors, driven by patriotism, national devotion, and service to the nation, Savarkar established a secret organization named 'Abhinav Bharat' directly in London. The history of its founding is quite extraordinary. As mentioned, Savarkar embarked on his journey to London on June 9, 1906, aboard the 'Persia' to study law. The ship carried many young Indians, and Savarkar quickly befriended them. Throughout the voyage, he consistently discussed how to achieve India's independence. He forged a special friendship with two young men, Keshavanand and Shishtachari. When the topic of establishing a secret organization arose, Shishtachari remarked, "There's no point in a handful of us establishing such an organization. How many people even know us? If a prominent figure like Tilak, Lala Lajpat Rai, or Gaekwad of Baroda were to establish such an organization, we would gladly join and contribute." Savarkar responded by citing numerous examples of individuals from India and abroad, asking, "Didn't the Chaphekar brothers, driven by their own inspiration, strike down the tyrannical Englishman? We must do something ourselves, without waiting to see who will join us. Just as fire fuels fire, so too do acts of valor, bravery, and and movements." Both men found Savarkar's ideas compelling but hesitated to commit. That very night, Shishtachari engaged in further discussions with Savarkar, resolving many of his doubts. He was then ready to establish an organization and launch a struggle. The name of the organization—'Abhinav Bharat!'—was decided right on the ship. Immediately after, Savarkar and the two others took an oath to dedicate everything to the cause of freedom. As this organization's efforts to ignite a major movement for national service became evident, the British government declared it a revolutionary organization. Through Abhinav Bharat, Savarkar began to instill ideas of nationalism and freedom among the Indian populace and youth. Simultaneously, the organization initiated actions to resist and fight against the British government. Its primary objective was to liberate the people of India from British subjugation. Savarkar never compromised on national interest, self-respect, national identity, or national pride. The sting of subjugation, the pain of being enslaved, constantly tormented him. Abhinav Bharat was, in essence, a national educational institution.

"Though the English power may be strong and armed, it can easily be overthrown. In a revolutionary armed struggle, everyone must do their duty and send at least one enemy to their demise. Whether our endeavors succeed or not, it doesn't matter. If you fight alone to free Mother India and teach the enemy a lesson, and even if you fall while trying to break the shackles of slavery, it's alright, because you will have fulfilled your duty." Such was the teaching imparted within the Abhinav Bharat organization. Over time, Abhinav Bharat expanded beyond India, establishing branches in various foreign locations. The British government grew alarmed by the increasing reach and activities of the Abhinav Bharat organization. To crush this movement, in 1909, the government subjected Savarkar's elder brother, Babarao, to horrific torment. Babarao was arrested, shackled hand and foot, and given a bundle of clothes and some utensils to carry. He was paraded through Nashik city in this state, the intention being to instill fear in others and deter any further rebellion against the government. Yet, even in such a condition, Babarao walked with immense dignity and resolute steps. Babarao was prosecuted, sentenced to life imprisonment, and sent to the Andaman Cellular Jail.

This incident enraged the Abhinav Bharat activists. The result was that during an event in London, revolutionary Madanlal Dhingra shot and killed official Curzon Wyllie. That day was July 1, 1909! A few months later, on December 21, 1909, a thrilling incident occurred in Nashik. District Collector Jackson was killed in a daring action by revolutionaries at Nashik's Vijayanand Cinema. Revolutionaries Anant Kanhere, Vinayak Deshpande, and Krishnaji Karve fired the shots. The British government was furious after these two incidents. They arrested many Abhinav Bharat activists. Kanhere, Deshpande, and Karve were sentenced to death by hanging, and Vaman Deshpande was sent to the Andaman Islands for life imprisonment. Vinayak Damodar Savarkar was accused of supplying the pistols used in the Nashik incident. At the time, Savarkar was undergoing medical treatment in a hospital in Wales. He decided to return to London; however, his comrades advised him against returning, fearing his arrest would crush the ongoing movement. But he firmly stated, "While my people and friends are being arrested, I cannot stay here." With that, he returned to London. Upon disembarking in London, waiting police arrested him. That day was March 13, 1910! Savarkar was taken into custody and subsequently tried for sedition. He was held in Brixton Prison for several months. Then, on July 1, 1910, he was being transported to India by ship. The vast ocean stretched before him, and the countless waves of thought swirling in Savarkar's mind were unfathomable to anyone. Then, on July 7, 1910, the 'Morea' ship carrying Savarkar broke down.

The Leap into the Sea and Andaman Imprisonment

That night, Savarkar was extremely restless. The thoughts in his mind wouldn't stop. Making a firm decision was difficult, leaving him in a state of dilemma. He felt, "If I reach India on this ship, I will face trial. The sentence is already decided. Perhaps I'll get life imprisonment and have to go to the Andaman jail to serve it. What will happen to this freedom movement then? The government will crush the movement with force and guns. The ship is broken down. Is this the time to leave this ship and go to France? Because I am an English prisoner. According to international law, if I reach France, the London police will have no jurisdiction. What will my comrades say? Will they agree with my decision? They will, because they trust me. If I had intended to betray them, I wouldn't have returned to London then. I returned to London even knowing I would be arrested. But if I reach India on this ship now, I will be tried again, and perhaps get life imprisonment, then what will happen to the freedom movement? If I go to France without reaching India, the movement can definitely be carried forward with vigor. Languishing in prison will not achieve the goal of gaining freedom for our country. If necessary, escaping from enemy custody for the sake of the nation's welfare is not considered treason or betrayal..." With such thoughts, Savarkar made a firm decision. On July 8, 1910, he jumped into the sea. Within moments, the police on the ship realized what had happened, and a barrage of bullets rained down on Savarkar. Ahead lay the vast ocean, the shore's distance unknown. Driven by an intense love for his homeland, immense self-confidence, and a firm resolve to face any adversity, Savarkar swam and reached the shore. It was within French territory. Due to a language barrier, the French soldiers on the shore couldn't properly communicate with him and arrested him. The pursuing English soldiers then seized him. He was brought to India and put on trial. On December 24, 1910, he was sentenced to life imprisonment and sent to the Andaman Cellular Jail. This imprisonment is also known as 'Kala Pani' (Black Water) punishment. Upon reaching the Andaman prison, lines of poetry came to him:

Muhibbane watan honge hazaaron bewatan pahle, Phalega Hind pichhe aur bharega Andaman pahle.

The meaning of these lines is: 'Many will love this country, but first thousands will have to be rendered stateless. The dream of India's prosperity will be fulfilled, but for that, Andaman must first be filled.'

Savarkar endured terrible torture in the Andaman prison. The types of punishments inflicted send shivers down one's spine. He was hung in shackles. He was yoked to an oil press like a bull and made to extract oil. He was assigned extremely arduous tasks like pounding coconut fibers and extracting coconut oil. He was kept in dark cells. He was given insect-ridden food to eat. Additionally, he received the extremely laborious punishment of clearing the prison grounds and the surrounding jungles. Those who procrastinated in these tasks were beaten with whips and canes. A particularly vile rule was that prisoners were allowed to defecate only twice a day. They could not relieve themselves during the day. If the need arose at night, they had to do so in their own cells and then spend the entire night in that foul stench. Even when bathing, they could only use as much water as the guard allowed and only when instructed.

Poetic Creations and Social Work

Enduring such severe punishment, Savarkar was inspired to compose countless poems; however, he had no pen or paper, no ink from the sea, nor permission to use the sky as paper. In such circumstances, Vinayak Savarkar's poetic inspiration refused to be silenced. He then made the prison walls his paper and acacia thorns his pen. He would write his inspired poetry on the walls with charcoal, then memorize it. In this way, after his release from prison, he re-wrote over ten thousand lines that he had committed to memory. The song 'Sagara Pran Talamalala...' (O Sea, My Soul Yearns...) is a gift from this Andaman period. Hearing this song never fails to send shivers down one's spine and bring tears to one's eyes. Additionally, Savarkar wrote many ghazals while serving his Kala Pani sentence, but unfortunately, they were lost. 'Jayostute' (Hymn to Victory), the hymn to the Goddess of Freedom, was also penned by Savarkar.

Once, while delivering a lecture at a Shiv Jayanti celebration, Savarkar declared, "Until now, we have considered the Shiv Jayanti festival historical, believing it held no political intent. However, the Shiv Jayanti we celebrate today is entirely political, because only those who, like Maharaj, fight to liberate their homeland from foreign clutches have the right to celebrate Chhatrapati Shivaji Maharaj's birth anniversary. The main purpose behind celebrating this festival is to inspire us to break the chains of slavery and become independent." In this very lecture, Savarkar lambasted many with his words. During his speech, Savarkar raised the slogan, "Swatantryalakshmi ki Jai!" (Victory to the Goddess of Freedom!) Additionally, to instill a craving for freedom and ignite resentment against subjugation among the masses, Savarkar wrote patriotic poems and ballads about heroes who sacrificed for the nation's freedom, such as Tanaji Malusare, Bajiprabhu Deshpande, and Murarbaji, and began to sing them.

Family Life and Final Years

The life of Swatantryaveer Savarkar, who dedicated everything to the nation, was marked by many family upheavals. It is essential to briefly note them. Babarao Savarkar's wife and Vinayak's sister-in-law, Mrs. Yesubai, passed away in April 1919. This was a huge loss for the family. Savarkar grieved deeply the loss of the mother figure who had supported him after his own mother's demise. On January 7, 1925, Savarkar was blessed with a daughter, whom he named Prabhat (Dawn)! Perhaps with the thought that Prabhat's arrival would usher in the dawn of India's independence! Vinayak Damodar Savarkar's son, Vishwas (Trust), was born on March 17, 1927. On March 16, 1945, Vinayak's elder brother, Babarao Savarkar, passed away. On May 8, 1945, Prabhat was married. Vinayak Damodar Savarkar's younger brother, Dr. Narayanrao, left this world on October 19, 1949. Vinayak Damodar Savarkar was sentenced to life imprisonment twice, making him the only freedom fighter to have endured such a punishment.

Savarkar is the first author in the world whose book, 'The Indian War of Independence of 1857,' was banned in India and abroad. The British government revoked his degree for his participation in the freedom movement. It was V.D. Savarkar who requested President Dr. Rajendra Prasad to place the Ashoka Chakra in the center of the Indian national flag, a request that was granted. 'Hinduization of Politics and Militarisation of Hindus' was a revolutionary mantra coined by Swatantryaveer Savarkar. He made a powerful call to literary figures: "Break your pens, pick up guns!" Recognising Savarkar's overall contribution and work in the freedom movement, P.K. Atre gave him the title 'Swatantryaveer' (Brave Freedom Fighter). Savarkar is recognized as a radical revolutionary, a great poet, an active social reformer, a Hindu organiser, a proponent of Hindutva, a politician, a philosopher, a pioneer of language and script purification movements, an inspiration to revolutionaries, a scientific-minded individual, and a historian. The first Shiv Jayanti celebration in London was organized under Savarkar's leadership on May 2, 1908. The Dussehra festival was celebrated in London on October 24, 1909. In 1909, he passed his barrister's examination but refused to accept the degree.

This great social reformer and revolutionary, Vinayak Damodar Savarkar, decided to end his earthly journey at the age of eighty-three. He stopped eating. On the twenty-second day, February 26, 1966, he breathed his last and bid farewell to this world. It was as if for twenty-two days he was praying to God:

Ne majasi ne Ishwara jeev talamalala, Ne majasi parat vaikunthala..... Pran kasavis jhala......

(O God, take me, my soul yearns; take me back to Vaikuntha... My life is in distress...)

Vande Mataram.

Nagash S. Shewalkar(9423139071)

References:

  1. Swatantryaveer Vinayak Damodar Savarkar... Author: Manjiri Marathe.

  2. Swatantryaveer Savarkaranchi Jajwalya Patrakarita... Author: Devendra Bhujbal.

  3. Articles on the Internet

Recent Posts

See All
महाराष्ट्र कन्या 'अहिल्याबाई'

देवी सती अहिल्या भारतभूला ललामभूत जी। राजकारणी चतुरा असुनी जिने ठेविला हरी राजी ।। — संतकवी श्री दासगणु महाराज संत श्री दासगणू महाराज यांनी गौरविलेल्या, आणि ज्या मनगटात बळ, बुद्धी व चातुर्य आहे, असा ज

 
 
 

Comments


Chaprak Prakashan | Ladoba Prakashan

Publication House

Socials

Be the First to Know

402, Wellspring, Bavdhan Market Yard, Pune 411021

7057292092

© Copyright

Sign up for our newsletter

© 2026 by Chaprak Prakashan, Ladoba Prakashan

bottom of page