top of page
विशेष लेख
वारकरी संप्रदायाचे तत्त्वज्ञान
मासिक साहित्य चपराक, दिवाळी 2019 भारतीय भक्ती संप्रदायांमध्ये वारकरी संप्रदायाचे योगदान महत्त्वाचे आहे. पंढरपूरच्या श्रीविठ्ठलाला दैवत मानणार्या वारकरी संप्रदायास संत ज्ञानोबा माऊली व संत नामदेवरायांनी लोकप्रियता मिळवून दिली. संत ज्ञानेश्वरांपूर्वी वारकरी संप्रदाय अस्तित्वात असला तरी त्यांनी आपल्या ग्रंथातून व कार्यातून वारकरी संप्रदायास मूर्त रूप दिले आहे. ‘हे विश्वचि माझे घर’ अशी विश्वात्मक शिकवण ज्ञानेश्वर माऊलींनी दिली आहे. सामाजिक समतेचा व वारकरी संप्रदायाच्या भक्तिमंद
Dec 26, 20199 min read
जाज्ज्वल्य देशभक्तीचे पाईक मोहन रानडे
चपराक दिवाळी अंक 2019 आपल्या देशात स्वातंत्र्यप्राप्तीसाठी अनेक रणसंग्राम झाले. निरनिराळ्या प्रकारच्या चळवळी झाल्या. सत्याग्रह झाले. अनेक लढवय्ये क्रांतिकारक हसत-हसत फासावर गेले; तसेच अनेक ज्ञात-अज्ञात क्रांतिवीर, स्वातंत्र्यसैनिवकांनी देशासाठी आपल्या प्राणाची आहुती दिली. स्वातंत्र्य मिळविण्यासाठी अनेक महापुरूषांनी कठोर कारावास भोगला. हालअपेष्टा सहन केल्या. इंग्रजांची जुलूमी सत्ता उलथवून टाकण्यासाठी सर्वसामान्य लोकानीही लाखांच्या संख्येने स्वातंत्र्यचळवळीत हिरीरीने भाग घेतला
Dec 20, 201921 min read
संतसाहित्य आणि युवाविश्व
मासिक ‘साहित्य चपराक’ डिसेंबर 2019 संतसाहित्य म्हणजे अध्यात्म, परमार्थ आणि निवृत्ती असेच चित्र तरुण पिढीच्या मनात आहे. प्रगत तंत्रज्ञानाच्या आजच्या युगातल्या सर्व नव्या संकल्पना संतसाहित्यात सापडतात. इमोशनल इंटलिजन्सपासून ते इकोफ्रेंडली घरापर्यंत, सकारात्मक दृष्टिकोनापासून ते करिअर निवडीपर्यंत, जलसंधारणापासून ते व्यवस्थापनापर्यंत मानवी जीवनाला उपयुक्त ठरणार्या सर्व गोष्टी संतसाहित्यात आहेत. गरज आहे ती संतसाहित्य तरुण वयातच वाचण्याची. अनेकांच्या बोलण्याचा रोख असा असतो की, सं
Dec 20, 20198 min read
मराठीच्या पहिल्या लेखकाची गोष्ट
चपराक दिवाळी विशेषांक 2019 ‘‘मराठीतील पहिला ग्रंथ कोणता?’’ काही वेळेस या प्रश्नाचे उत्तर ‘ज्योतिष रत्नमाला’, ‘विवेकसिंधु’, ‘ज्ञानेश्वरी’, ‘लीळाचरित्र’, ‘धवळे’ असे मिळते. ‘‘मराठीतील पहिला ग्रंथ ‘लीळाचरित्र’चे लेखक कोण होते?’’ या प्रश्नाचे उत्तर ‘म्हाइंभट’ असे चटकन मिळते. ‘‘त्यांचे गाव कुठले?’’ या प्रश्नाचेही उत्तर ‘सराळे’ असे लगेच मिळते! पण ‘‘हे गाव कुठे आहे?’’ या प्रश्नाचे उत्तर बर्याचवेळा मिळत नाही. अगदी आंतरजालवर शोधले तरी या प्रश्नाचे उत्तर मिळत नाही. अशावेळी दुसरा
Dec 19, 20197 min read
सावरकर समजून घ्या...!
साहित्य चपराक दिवाळी विशेषांक 2019 16 जून 2019 रोजी स्वा. सावरकर साहित्य अभ्यास मंडळाच्या वतीने आयोजित केल्या गेलेल्या 31 व्या अखिल भारतीय स्वा. सावरकर साहित्य संमेलनात राष्ट्रीय निरूपणकार आणि वक्ते डॉ. सच्चिदानंद शेवडे यांनी केलेल्या भाषणाचा हा सारांश खास ‘चपराक’च्या वाचकांसाठी . आलेल्या सर्व सावरकर प्रेमींचे मी मनापासून स्वागत करतो. काल एक परिचित भेटले. ‘‘सावरकर संमेलन हे गांधी सभागृहात असणे हे वेगळेपण आहे ना?’’ असे सहज म्हणाले. त्यांना म्हटले, ‘‘अहो, पण ते के. सी. गांध
Dec 16, 201910 min read
कातळावरील अक्षरलेणी
'चपराक' दिवाळी अंकातील प्रिया धारूरकर यांचा लेख. दगडा-खडकांच्या झिजण्यातून बनलेली माती असंख्य खंडप्राय भूभाग तयार करत गेली. स्वतः जगली, जगवत राहिली. समाज, संस्कृती म्हणून घडली. रक्तात उतरली, उसळली, लढली. इतिहास घडवत राहिली. परंपरा सांभाळत राहिली. वर्तमानला प्रवाही ठेवती झाली. काळानुसार बदलत्या सामाजिक पर्यावरणाला सामोरे जात मानवीय बदल स्वीकारती झाली. जगभर त्या-त्या प्रदेशात फळत फुलत राहिली. तिचा त्या-त्या मातीत लहेजा उतरवत राहिली. ओंकाराच्या हुंकारातून बोली उमटत गेली तसे शब
Nov 9, 201915 min read
‘अ’सरदार पटेल...!
घटनेतील कलम 370 आणि 35 अ रद्द करण्याचा निर्णय संसदेच्या दोन्ही सभागृहात घेतला गेलाय. त्याआधी देशात सत्तांतर झाल्यानंतर सरदार वल्लभभाई पटेल यांच्या कार्यकर्तृत्वाची उजळणी सुरू झालीय. त्यासाठी जवाहरलाल नेहरूंची साक्ष काढली जाते! काश्मीरचा प्रश्न जेव्हा जेव्हा निघतो तेव्हा तेव्हा पटेलांचं स्मरण केलं जातं. नेहरू आणि पटेल यांच्याशी असलेले परस्सर संबंध, महात्मा गांधी-नेहरु-पटेल यांच्यातील नातं, शिवाय कधीकाळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदी लादणार्या पटेल यांच्याबद्दल संघ आणि भाजप
Oct 31, 201923 min read
शिक्षकदिनानिमित्त निवडक अल्पाक्षरी
कृपेश महाजन हे आजच्या पिढीचे ताकतीचे कवी आणि प्रयोगशील शिक्षक आहेत. त्यांचा ‘अनिमा-अनिमस’ हा वेगळ्या धाटणीचा कवितासंग्रह याच महिन्यात ‘चपराक’कडून प्रकाशित होतोय. शिक्षकदिनानिमित्त त्यांच्या या अस्वस्थ करणार्या अल्पाक्षरी खास ‘साहित्य चपराक’च्या वाचकांसाठी. एक सर, अळीने पोखरल्यावर मक्याच्या कणसाला दुखत असेल का? म्हटलो- होय नक्कीच! झाडंही सजीव असतात आणि सजीव म्हटलं की वेदना आलीच! सर, वेदना म्हणजे काय असतं नेमकं? बेटा, वेदना म्हणजे दुखणं! सर, काल नानाने लई मारलं आईला... आई रडली
Sep 5, 20192 min read
तलाकविषयी बोलू काही...
विविधतेत एकता हे आपल्या राष्ट्राचे मुख्य तत्त्व असलेले दिसून येते. भारतामध्ये अनेक जाती-धर्माचे लोक राहतात. त्यांच्या संस्कृती विविध स्वरूपाच्या आहेत. आचार, विचार, प्रथा, परंपरा, सण-उत्सव, पोशाख इत्यादी बाबतीमध्ये आपणाला विविधता आढळून येते. मात्र तरीही न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुता इत्यादी मूल्यांनी आपणाला परस्सरांशी घट्ट बांधून ठेवलेले दिसून येते. स्वातंत्र्यापूर्वी व स्वातंत्र्यानंतरही या देशांमध्ये विविध धर्माच्या लोकानी परस्सरांमधील सलोखा कायम ठेवलेला दिसून येतो. स्वतं
Aug 27, 20197 min read
‘सुवर्णपर्व’
‘चपराक’ परिवाराचे सदस्य, सुप्रसिद्ध इतिहास संशोधक संजय सोनवणी यांचा ‘काश्मीरचा सम्राट ललितादित्य’ हा अभ्यासपूर्ण ग्रंथ ‘चिनार पब्लिशर्स’ने प्रकाशित केलाय. या ग्रंथाला महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांची प्रस्तावना लाभलीय. ती खास ‘चपराक’च्या वाचकांसाठी... भारतीय राज्यघटनेच्या विशिष्ट तरतुदीमुळे काश्मीर हा प्रांत भारताचा एक भाग असूनही इतर प्रांतांपेक्षा वेगळा वाटतो. हा झाला राज्यशास्त्रीय किंवा राज्यघटनाशास्त्रीय मुद्दा. त्याची इतिहासशास
Aug 14, 20198 min read
खोलवरच्या आवाजाला शब्द द्या!
मराठवाड्यातील साहित्यिकांसाठी ‘चपराक’ मासिकानं वेगळा निर्णय घेतला. त्याची सुरूवात झाली मराठवाड्यातूनच!! नव्हे; महाराष्ट्रातून त्याबद्दल चांगल्या प्रतिक्रिया आल्या. लिहिणार्या हातांना हे पाठबळ हवंच आहे. आपल्या अभिव्यक्तीला व्यासपीठ ही कल्पनाच चांगली आहे पण मी मागच्या अंकात जी भूमिका मांडली ती अजून विस्तारानं यायला हवीय असं वाटल्यानं पुन्हा एकदा हा संवाद साधतो आहे. लेखनाच्या संदर्भात मराठवाड्यात वेगवेगळे प्रयोग होत आहेत. ते प्रामुख्यानं कथा आणि कविता या दोन साहित्यप्रकारात आह
Aug 12, 20194 min read
‘काळीजकाटा’ कादंबरीला दोन राज्यस्तरीय पुरस्कार
पुणे, (प्रतिनिधी) : ‘चपराक‘ने प्रकाशित केलेल्या सुनील जवंजाळ लिखित ‘काळीजकाटा’ या कादंबरीला ऑगस्टमध्ये दोन राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानीत करण्यात येत आहे. 20 ऑगस्ट रोजी महाराष्ट्र कामगार साहित्य परिषद, महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा भोसरी, गदिमा प्रतिष्ठान व नारायण सुर्वे कला अकादमीच्या वतीने मृत्युंजय साहित्य पुरस्कार दिला जातो. यंदाचा पुरस्कार सांगोला तालुक्यातील चोपडीचे सुनील जवंजाळ यांच्या ‘काळीजकाटा’ या कादंबरीला जाहीर झाला आहे. रोख रक्कम, सन्मानपत्र, सन्मानचिन्ह,
Aug 5, 20191 min read
अब्रूदाराची आत्महत्या
गाडीने वा अन्य कुठल्या मार्गाने तुम्ही पर्यटनाला गेलात तर देशाच्या कुठल्याही लहान-मोठ्या शहरात वा हायवेवर तुम्हाला एक आलिशान हॉट्रेल नक्कीच बघायला मिळालेले असणार. ‘कॅफे कॉफी डे’ असे त्याचे नाव आहे. देशात अशा अठराशे हॉटेलची साखळी आहे आणि तिथे एकाच पद्धतीची सजावट दिसेल व एकाच दर्जाचे खाद्यपेय पदार्थही मिळतात. सुखवस्तु घरातील तरूण मुले किवा लहानमोठे व्यावसायिक यांच्यासाठी निवांतपणे भेटण्याची, गप्पा मारण्याची सुविधा असेच त्याचे एकूण स्वरूप आहे. अल्पावधीत म्हणजे काही मोजक्या वर्ष
Aug 5, 20196 min read
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना खुले पत्र
30 जुलै 2019 मा. निर्मला सीतारामनजी अर्थमंत्री भारत सरकार नवी दिल्ली महोदया, सर्वप्रथम आपले मनःपूर्वक अभिनंदन! मोदी सरकारच्या पहिल्या कालखंडात देशाचे संरक्षणमंत्री म्हणून उत्तम कामगिरी केल्यानंतर मोदी सरकारच्या या कालखंडात स्वतंत्र भारताच्या आर्थिक इतिहासातल्या पहिल्या पूर्णवेळ अर्थमंत्री म्हणून आपण केंद्रीय अर्थखात्याचा कार्यभार स्वीकारलात. ती भूमिका निभावताना आपण आपला पहिला-वहिला केंद्रीय अर्थसंकल्प आपल्या देशाच्या संसदेला 5 जुलै 2019 रोजी सादर केलात. याचा एक भारतीय नागरि
Aug 5, 20196 min read
आरोग्यम् धनसंपदा...
‘‘धर्मार्थकाममोक्षानाम् मुलमुक्तम् कलेवरम्। तच्च सर्वार्थसंदिद्धयै भवैद्यदि निरामयम्॥ अर्थात धर्म, अर्थ, काम व मोक्ष हे चार पुरूषार्थ साधण्याला मुख्य साधन मानवाचे शरीर आहे. ते निरोगी असेल तर वरील चारही पुरूषार्थ साध्य होतील, हे त्रिकालाबाधित तत्त्व अनेक साचार, अनुभवी, निरपेक्ष ऋषिंच्या आणि संतांच्या वचनांनी सिद्ध झाले आहे. वरील श्लोकाचा अर्थ लक्षात घेतल्यास आपले शरीर आरोग्यसंपन्न असणं किती आवश्यक आहे याची खात्री पटते. शरीर निरोगी असेल तरच आपले मन प्रसन्न व निर्मळ राहणार यात
Jul 27, 20193 min read
आधुनिक तंत्रज्ञान संस्कृत भाषेला पोषक!
डॉ. चन्द्रहासशास्त्री सोनपेठकर यांची विशेष मुलाखत केवळ भारतीयच नव्हे तर मॅक्समुलर, गटे, शोपेनहावर प्रभृती पाश्चात्य विचारवंतांना देखील संस्कृत साहित्याने प्रभावित केले होते. भारतातीलच नव्हे तर जगातील एक प्राचीन भाषा म्हणून संस्कृत भाषेची ओळख आहे. श्रावण पौर्णिमेला सर्वत्र ‘संस्कृतदिन’ साजरा केला जातो. त्यानिमित्त संस्कृत भाषेचे अभ्यासक, कवी आणि संस्कृत भाषेच्या प्रचारासाठी आधुनिक तंत्रज्ञानाच्या भूमिकेचे पुरस्कर्ते प्रा. डॉ. चंद्रहास सोनपेठकर यांची ही विशेष मुलाखत. नमस्कार सर
Jul 27, 20193 min read
गोपाळगडाला आजही टाळे!
खाजगी मालकीत अडकल्याचे उजेडात आल्यानंतर गेली 15/17 वर्षे सतत चर्चेत असलेला अंजनवेलचा गोपाळगड किल्ला राज्य संरक्षित स्मारक झाल्याचे घोषित झाले. या पार्श्वभूमीवर नुकतीच किल्ल्याला भेट दिली असता किल्ल्याच्या आधुनिक लोखंडी ग्रीलच्या दरवाजावर दोन ठिकाणी कुलूप लावले असल्याचे निदर्शनास आल्याने घोर निराशा झाली. पश्चिमेकडील आणखी एक दरवाजाही ग्रील आणि काट्या-कुट्या टाकून बंद केलेला आढळला. यामुळे शासनाने हा किल्ला राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित करताना नेमके कोणते ‘तांत्रिक’ निकष ला
Jul 27, 20193 min read
पाकिस्तानचे राहुल गांधी
मध्यंतरी दोन अडीच वर्षे निघून गेली हे सत्य आहे. दरम्यान कुलभूषण जाधव या भारतमातेच्या सुपुत्राला शारीरिक यातनाही सहन कराव्या लागल्या यात शंका नाही; पण अखेरीस आंतरराष्ट्रीय कोर्टात पाकिस्तानचे थोबाड ़फुटायचे राहिले नाही. आता त्याचा निकाल आल्यावर आपली गेलेली अब्रू झाकण्यासाठी पाकचे पंतप्रधान इमरान खान यांनी त्यातही आपलाच कसा विजय झाला आहे, ते सांगायला खुळा युक्तीवाद केलेला आहे. ‘कुलभूषणला भारताच्या हवाली करण्याचा निर्णय कोर्टाने दिला नाही, म्हणूनच तो भारताचा पराभव असल्याचे’ त्या
Jul 21, 20196 min read
बौद्ध साहित्य परिषद - भूमिका
महाराष्ट्रात व महाराष्ट्राबाहेर विविध साहित्य संस्था कार्यरत असून विविध साहित्य संमेलने होत आहेत. महाराष्ट्र साहित्य परिषद, मराठवाडा साहित्य परिषद, विदर्भ साहित्य संघ, मुंबई मराठी साहित्य संघ, कोकण मराठी साहित्य परिषद इ. संस्था महाराष्ट्रात तर इंदूर, उज्जैन, बडोदा, अहमदाबाद, हैद्राबाद, गुलबर्गा, धारवाड, बंगळुरू, उत्तराखंड, गोवा, दिल्ली आदी शहरांतून, बृहन्महाराष्ट्रातून साहित्य संस्था कार्यरत आहेत. याशिवाय शासकीय पातळीवर म.रा.सा.संस्कृती मंडळ, भाषा समिती, प्रकाशन समिती कार्यरत
Jul 17, 20197 min read
नवधर्म स्वीकृतीचा हा मार्ग कितपत योग्य?
डॉ. आंबेडकर यांनी दि. 14 ऑक्टोबर 1956 रोजी दीक्षाभूमी, नागपूर येथे धम्मदीक्षेप्रसंगी दिलेल्या 22 प्रतिज्ञा. 1) मी ब्रह्मा, विष्णु, महेश यांना देव मानणार नाही किंवा त्यांची उपासना करणार नाही. 2) राम व कृष्ण यांना देव मानणार नाही किंवा त्यांची उपासना करणार नाही. 3) गौरी-गणपती इत्यादी हिंदू धर्मातील कोणत्याही देवदेवतेस मानणार नाही किंवा त्यांची उपासना करणार नाही. 4) देवाने अवतार घेतले यावर माझा विश्वास नाही. 5) बुद्ध हा विष्णुचा अवतार, हा खोटा आणि खोडसाळ प्रचार होय असे मी मान
Jul 9, 20195 min read
bottom of page
.jpg)




