top of page
विशेष लेख
गडहिंग्लजचा सन्मान पुरस्कारापेक्षा मोठा
घनश्याम पाटील यांची कृतज्ञतेची भावना गडहिंग्लज (प्रतिनिधी) : मला आजअखेर अनेक पुरस्कार मिळाले, गौरव झाला; मात्र गडहिंग्लजकरांनी आपुलकीने केलेले कौतुक आणि झालेला सन्मान कोणत्याही पुरस्कारापेक्षा मोठा आहे असे मी समजतो, असे गौरवोद्गार साप्ताहिक ‘चपराक’चे संस्थापक संपादक घनश्याम पाटील यांनी येथील कार्यक्रमात काढले. साधना प्रशालेचे माजी मुख्याध्यापक फ्रान्सिस रॉड्रिग्ज यांनी लिहिलेल्या ‘साधना’ या आत्मचरित्राचे प्रकाशन उत्साहात झाले. या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून श्री. पाटील
Jul 8, 20193 min read
मोदी युग 2 परफॉर्मन्स व पॉप्युलॅरिटी
दादूमियॉं राजकीय अभ्यासक, बडोदा चलभाष : 9106621872 मला शनिवारी रात्री दहा वाजता कोल्हटकरांचा फोन आला. मी दवाखान्यातून नुकताच घरी आलो होतो व जेवण घ्यायच्या तयारीत होतो. फोनवर मला कोल्हटकर म्हणाले, ‘‘डॉक्टर, तुमच्या मोदींना मानले. ते पुन्हा पंतप्रधान म्हणून निवडून येणार यात शंका नाही.’’ ‘‘कोल्हटकर, तुम्हाला एकदम काय झाले? संध्याकाळी तर तुम्ही राहुलच्या बाजूने बोलत होतात?’ ’ ‘‘ती चूक होती. म्हणून तर तुम्हाला आता फोन केला.’’ ‘‘पण असे काय झाले आणि तुम्ही तुमचे मत बदलले? मी आत्त
Jun 17, 201917 min read
मराठवाड्यातील साहित्यप्रेमींसाठी सुवार्ता
‘चपराक’ने मराठवाड्यातील वाचकांना, लेखकांना नेहमीच प्राधान्य दिले आहे.‘उपेक्षित ते अपेक्षित’ या न्यायाने सर्वच गुणवंतांना, प्रतिभावंतांना सामावून घेण्याचा आमचा प्रयत्न आहे. याचाच एक भाग म्हणून सुप्रसिद्ध कवी, पत्रकार आणि शिक्षक असलेल्या श्री. दिनकर जोशी यांची ‘चपराक’च्या मराठवाडा विभागाच्या संपादकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या या प्रयोगाबाबतच्या नेमक्या संकल्पना काय आहेत हे जाणून घेण्यासाठी त्यांचे हे मनोगत देत आहोत. या परिसरातील लेखक, कवी, वाचकांनी श्री. जोशी यांच्या
May 25, 20193 min read
Update On Chaprak Bookstore (चपराक पुस्तकालयाबद्दल )
नमस्कार! ‘चपराक’च्या माध्यमातून आपण आजवर अनेक प्रयोग केले आहेत. एक दर्जेदार वृत्तसाप्ताहिक, प्रभावी मासिक आणि उत्तमोत्तम पुस्तके प्रकाशित करणारी ग्रंथ प्रकाशन संस्था अशा तीन आघाड्यांवर आपले काम सर्वदूर पोहोचले आहे. नवनवीन पुस्तकांची वाढती मागणी आणि ‘चपराक’ साप्ताहिक, मासिकाचे वाढतच जाणारे सभासद यामुळे अनेक वाचक जोडले जातात. त्यांना ‘चपराक’सह अन्य प्रकाशकांच्या लेखकांची पुस्तकेही हवी असतात. त्यांच्याकडून सातत्याने तशी मागणी येत असते. आपली स्वतंत्र वितरण व्यवस्था असल्याने इ
May 24, 20191 min read
दारिद्र्य आणि त्याचे निर्मूलन : एक कूटप्रश्न!
दारिद्य्र म्हणजे काय? दारिद्य्राची सर्वंकष व्याख्या कोणती? दारिद्य्र नैसर्गिक आहे की कृत्रिम? दारिद्य्राची निर्मिती कशी होते, दारिद्य्राचा निर्माता कोण? दारिद्य्र स्वनिर्मित असते की पर-निर्मित? असे काही प्रश्न विचारणारा व्यक्ती मानवतेचा दुश्मन या दूषणाने दूषित/संबोधित होऊन त्याला तथाकथित मानवतावादी व मानवाधिकारवादी फाडून टाकायलाही कमी करणार नाहीत. तरी मी मात्र असे प्रश्न विचारण्याचे धाडस करीत आहे व करणार आहे . पुष्कळदा दारिद्य्राची संकल्पना स्पष्ट करताना नशीब, किस्मत, नियत
Apr 27, 20194 min read
नगर-एक पर्यटन स्थळ
आम्हाला नगर शहरच नाही तर सबंध जिल्ह्याचा अभिमान आहे. अहमदनगर जिल्हा संतांची पावनभूमी म्हणून ओळखला जातो. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांनी ई.स. 1272 मध्ये ज्ञानेश्वरी कथन करताना ज्या खांबाला ते टेकून बसत तो नेवासे येथील ‘पैस’ खांब भाविकांचे श्रद्धास्थान बनला आहे. या पवित्र स्तंभावर चंद्र, सूर्य आणि शिलालेख कोरलेला आहे. नेवासे नगरहून केवळ 56 किलोमीटरवर आहे. देव आहे पण देऊळ नाही, घरे आहेत पण दारे नाहीत असं शनी देवाचं जागृत देवस्थान शनी-शिंगणापूर नगरपासून 38 किलोमीटरवर आहे. आंतरर
Apr 27, 20196 min read
माझिया शिवारा घडो परिक्रमा
आपल्या जवळ काय काय आहे याचा माणसाला पुष्कळदा विसर पडतो. कधी कधी अतिपरिचयात अवज्ञा झाल्यासारखेही होते. गावातील एक-दोन मित्र ‘वर्ष-सहा महिन्यातून आपण मित्र मिळून कोठेतरी फिरायला जाऊ’ असे अनेकदा म्हणत असतात. त्यांच्या त्या विचारांमुळे साहजिकच अंगात उत्साह संचारतो. ‘मग आपण फिरायला कोठे जाणार?’ असे विचारताच त्याचे उत्तर तयार असणार ‘गोवा’. त्याला गोवा म्हणजे त्यातील फक्त पणजी, तेथील सागर किनारा बघायला खूप आवडतं. तिथला समुद्र किनारा, निसर्ग मनाला भावतो, भूरळ घालतो. बाकीबाब बोरकरांच्
Apr 20, 20198 min read
या पुरातन जलविज्ञानाचे किती वाटोळे करणार?
आज महाराष्ट्रावर दुष्काळाचे भीषण सावट आले आहे. गावोगावी शेतीला सोडा, प्यायला पाणी नाही. धरणांतील जलसाठा सरासरी 45 टक्क्यांवर आला आहे. मृत जलसाठे वापरायची वेळ लवकरच येणार आहे. हे निसर्गनिर्मित संकट नसून मानवनिर्मित संकट आहे हे आपल्याला लक्षात घ्यावे लागणार आहे. ऊस, नारंगी-संत्र्यांसारखी चुकीच्या जलखाऊ पीकपद्धतींनी पाण्याची अक्षम्य उधळपट्टी होत आहे. त्यात आम्ही आमच्याच पूर्वजांनी शोधलेल्या शाश्वत जलपुरवठा पद्धतींचा विनाश करत आणला आहे. बारव हा त्यातीलच एक जलव्यवस्थापनाचा लोकोपयो
Apr 19, 201911 min read
आत्महत्येचा बॉंडपेपर
प्राध्यापकी पेशाच्या मरणकळा जून 2018 मधील प्रसंग आहे. पुण्यातल्या ‘ब्रँडेड’ म्हणवून घेणार्या एका ख्यातनाम अभियांत्रिकी महाविद्यालयातील सहाय्यक प्राध्यापक पदासाठी मुलाखती सुरू होत्या. संस्थेमध्ये 20-22 वर्षे काम केलेल्या अत्यंत सिनियर व डॉक्टरेट प्राध्यापकांचे पॅनेल मुलाखत घेत होते. ती काहीशी खालीलप्रमाणे- पॅनेल : आमच्या संस्थेमध्ये पगार करण्याची पद्धत तुम्हाला माहीत असेलच. किमान पुढील सहा महिने पगार होणार नाही, चालेल का? मुलाखतदार : चालेल सर... हरकत नाही. पॅनेल : समजा
Mar 31, 20194 min read
भूकंपग्रस्तांच्या व्यथा-वेदना कधी समजून घेणार?
30 सप्टेंबर 1993 च्या काळरात्री किल्लारी आणि परिसरात महाप्रलयकारी भूकंप झाला. तेव्हाचे मुख्यमंत्री शरद पवार यांनी भूकंपग्रस्तांसाठी खूप काही केल्याचे सातत्याने सांगितले जाते. मात्र आजही भूकंपग्रस्तांच्या मागण्या कोणी गंभीरपणे घेत नाही. निसर्गाने झोडपले आणि सरकारने दुर्लक्षित ठेवले तर न्याय तरी कुणाला मागणार? या सर्व मागण्यांविषयी किल्लारी येथील युवा उद्योजक आणि सामाजिक कार्यकर्ते गोपाळ भोसले यांनी लातूरच्या जिल्हाधिकार्यांना एक निवेदन दिले आहे. ‘चपराक’च्या माध्यमांतून भूकंपग
Mar 28, 201911 min read
दबंग सखी
माझ्या शेजारी बसलेल्या थोरात वहिनी म्हणाल्या, ‘‘अगं! त्या पुढच्या सीटवर बसलेला तो पुरुष आहे का स्त्री आहे?’’ मग माझेही कुतूहल चाळवले पण तसं विचारणं असभ्यपणाचं ठरलं असतं म्हणून मी देखील अनभिज्ञता दाखवित गप्प बसले. दुपारी जेवणासाठी आमच्या गाड्या एका हॉटेलवर थांबल्या आणि सर्वजण वॉशरुमकडे धावले. ‘तो’ किंवा ‘ती’ देखील महिलांच्या रांगेत येऊन उभी राहिली. आता मात्र थोरात वहिनींना राहवले गेले नाही. त्या म्हणाल्या, ‘‘अगं! तो बघ, चक्क महिलांच्या रांगेत उभा राहिलाय. त्याला सांग पुरुषांची
Mar 27, 20196 min read
बांधवकरांचे भक्कम बांध!
संस्कृत काव्यक्षेत्रातील सर्वश्रेष्ठ विद्वानांपैकी एक मानल्या जाणार्या आचार्य मम्मटांनी सांगितलं होतं की, लेखन हे स्वान्तसुखाय असावं. असं आनंदासाठी लिहिणारे लेखक कमी होत चाललेत. काही प्राध्यापक मंडळी पदोन्नतीसाठी लिहितात, अनेकजण प्रतिष्ठेसाठी लिहितात, काहीजण हौस म्हणूनही लिहितात. कुणी का लिहावं हा ज्याचा त्याचा वैयक्तिक विषय असतो. मात्र तरीही या सर्वांत वाचकांच्या मनाचा, त्यांच्या मतांचा विचार करणारे, त्यांना वेगळी दृष्टी देणारे मोजकेच असतात. मम्मटांच्या स्वान्तसुखाय परंपरेच
Mar 25, 20194 min read
'चपराक'चे सभासद होण्यासाठी...
नमस्कार! ‘चपराक’चे सभासद होण्याविषयी अनेकजण विचारणा करत असतात. त्यांच्यासाठी खास योजना. साप्ताहिक ‘चपराक’ची वार्षिक वर्गणी केवळ तीनशे रूपये आहे आणि ‘साहित्य चपराक’ मासिकाची वार्षिक वर्गणी पाचशे रूपये. या दोन्हींची आठशे रूपये वर्गणी एकत्र भरली तर त्यांना श्री. द. गो. शिर्के गुरूजींचे ‘आई’ हे शंभर रूपयांचे पुस्तक भेट देत आहोत. मासिकाची त्रैवार्षिक वर्गणी पंधराशे रूपये भरले तर त्या सभासदांना एक हजार रूपयांची पुस्तके भेट देण्यात येतात. साप्ताहिक आणि मासिक या दोन्हींची एकत्रित
Mar 19, 20191 min read
यशवंतरावांचे साहित्यिक योगदान प्रेरणादायी
‘चपराक’ दिवाळी अंकाला प्रथम पुरस्कार गेल्या दशकात ‘चपराक’ दिवाळी महाविशेषांक हा मराठी माणसांच्या घराघरात पोहोचला आहे. जवळपास आठ राज्यातील लेखक या अंकात लेखन सहभाग देतात. साप्ताहिक, मासिक आणि ग्रंथ प्रकाशन संस्था अशा तीन आघाड्यांवर ‘चपराक’चे काम चालते. प्रस्थापित लेखकांबरोबरच नव्या लेखकांनाही संधी दिल्याने खास ‘चपराक’साठी लिहिणार्यांची एक स्वतंत्र फळी साहित्यक्षेत्रात निर्माण झाली आहे. येत्या आर्थिक वर्षात आम्ही 365 दर्जेदार पुस्तके प्रकाशित करण्याचा संकल्प केला आहे. महाराष्ट
Mar 19, 20192 min read
दुरिताचे तिमिर जाओ...!
जागतिक स्तरावर एक अस्वस्थता आहे. ट्रम्प प्रशासनातील मंत्री एकामागून एक राजीनामे देत सुटले आहेत. अमेरिकनांच्या दृष्टीने महत्त्वाच्या अशा नाताळ या सणाच्या दिवशी व्हाईट हाऊस सुने-सुने आहे कारण तिथे आर्थिक टाळेबंदी काही दिवस लागू आहे. कर्मचारी वर्गाला सक्तीच्या रजेवर पाठविले गेले. जगाचे शक्तिस्थान असलेली अमेरिका ट्रम्प तात्यांच्या नेतृत्वात विस्कळीत होऊ पाहते आहे तर इराक आणि सिरीआमध्ये 2014 नंतर अचानक जगाच्या नकाशावर आपल्या क्रौर्यासाठी ओळखली जाणारी आयसीस पूर्णपणे संपली असे म्हण
Mar 16, 20196 min read
55 वर्षांपासून 125 गायी सांभाळणार्या अवलियाला पद्मश्री
बीडपासून पाथर्डी मार्गे अहमदनगरला जाणार्या रस्त्यावर अवघ्या 40 किलोमीटर अंतरावर शिरूर कासार हे तालुक्याचे गाव असून येथून 500 मीटर दूर असलेल्या दहिवंडी गावातील जवळपास शे-सव्वाशे गायींना सांभाळणार्या सय्यद शब्बीर सय्यद बुढ्ढन उर्फ छबू मामू यांना भारत सरकारच्या वतीने दिला जाणारा प्रतिष्ठेचा पद्मश्री पुरस्कार नुकताच जाहीर झाला आहे. खरंतर बीड जिल्ह्यातील दोन विभूतींना पद्मश्री पुरस्कार प्रथमच मिळत असल्याने जिल्हावासियांना या गोष्टीचा विशेष आनंद होतोय. दरडवाडी, ता. धारूर येथील ना
Mar 15, 20193 min read
‘चपराक’तर्फे येणारी पुस्तके
नमस्कार मित्रांनो! ‘चपराक’चा अखंड ज्ञानसाधनेचा यज्ञ सुरू आहे. या वर्षभरात कोणकोणती पुस्तके वाचकांच्या भेटीला येणार याबाबत अनेकांना उत्सुकता आहे. वाचक, लेखक, प्रसारमाध्यम प्रतिनिधी, ग्रंथालये, महाविद्यालये या व अशा सर्वांकडून या पुस्तकांविषयी सातत्याने विचारणा होत आहे. त्यातल्या अनेकांनी तर ‘चपराक’तर्फे या वर्षभरात येणार्या सर्वच्या सर्व पुस्तकांची पूर्वनोंदणी केली आहे. ‘त्या त्या महिन्यात छापून होणारी पुस्तके आणि त्याचे बिल सोबत पाठवा’ असा प्रेमळ आदेश देणारे मित्र आमचे बळ वा
Mar 13, 20192 min read
राजकारण 1971 च्या दिशेने...
सत्य समोर असते पण ते बघायची व समजून घेण्याची हिंमत आपल्यामध्ये असावी लागते. इतिहासापासून आपण काही फारसे शिकत नाही, म्हणून इतिहासाची पुनरावृत्ती होत असते. गंमतीची गोष्ट म्हणजे इतिहासाचा अभ्यास करणारे वा तो इतिहास शिकवणारेही त्यापासून स्वत: काही शिकत नाहीत, ही वस्तुस्थिती असते. तसे नसते तर शरद पवार यांच्यासारख्या अनुभवी नेत्याने राहुल गांधी यांच्या आरोपबाजीच्या मागे फरफटत जाण्याची अगतिकता दाखवली नसती. पंचवीस वर्षापूर्वी खुद्द शरद पवारच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते आणि मुंबईतल
Mar 13, 20196 min read
पुरोगामी बहुजन विचारवंतांची अवनती!
फुले-आंबेडकरांच्या काळी ब्राह्मण-ब्राह्मणेतर वादाला काहीतरी एक अर्थ होता. हे दोन्ही महामानव अत्यंत कुशाग्र आणि तर्कनिष्ठ व अभ्यासपूर्ण बुद्धीनिष्ठेच्या बळावर ब्राह्मणी सत्तेला यशस्वी आव्हान देऊ शकले. त्यांच्या कार्याची बहुमोल फळे चाखणारे, चळवळीचे नेते ते पाईक समजणारे हे शतमूर्ख ज्ञानाच्या क्षेत्रात मात्र शिक्षणाच्या सर्व सोयी मिळूनही विद्वत-अडाणी राहिले ते राहिलेच. ब्राह्मणांना शिव्या दिल्या म्हणजे आपण चळवळीचे पाईक झालो या भ्रमातून हे लोक बाहेर कधी येतील ते येओत. वाद या शब्द
Mar 13, 20194 min read
राजकारणातील ज्योतिषी की विदुषक ?
खूप मोठ्या अपेक्षा असणार्या व्यक्ती किंवा संघटनेकडून केवळ पोकळ घोषणाच होत राहिल्या की मग कालांतराने त्यांचे हसू होऊ लागते. त्याचेच आजच्या काळातले जितेजागते उदाहरण म्हणजे राज ठाकरे आणि त्यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेना! कारण नुकताच 9 मार्च रोजी त्यांच्या पक्षाने तेरावा वर्धापनदिन साजरा केला. या तेरा वर्षाच्या कार्यकाळात त्यांनी काय कमावले? काय गमावले? पक्ष संघटना म्हणून आपण किती सक्षम वा कमकुवत झालोय याचे सिंहावलोकन करणे गरजेचे असताना केवळ मोदी, भाजप, शाह, डोवाल आदींवर तोंडसु
Mar 11, 20193 min read
bottom of page
.jpg)




