top of page
विशेष लेख
माणूस केलंत तुम्ही मला...
इतकं दिलंत, इतकं दिलंत तुम्ही माणूस केलंत तुम्ही मला... असं म्हणणारा एक आनंदयात्री जिप्सी आपल्या सगळ्यांच्या आयुष्यातल्या जगण्याच्या छटा कवितेतल्या नादमधुर शब्दांमधून आणि आशयपूर्ण भावार्थामधून बदलून गेला. त्यांच्याशी केलेला संवाद म्हणजे क्षणोक्षणीच्या आठवणींचा मोठा ठेवाच. त्यांच्याकडून मिळालेली अक्षरांची शिदोरी म्हणजे तुमच्या असण्यापर्यंतच्या प्रवासाला मिळालेली तारूण्याची पालवीच जणू. त्यांच्या काव्यमैफलीत उपस्थित राहून त्यांनीच वाचलेल्या त्यांच्या कवितेचं आपण केलेलं रसग्रहण
Jun 18, 20177 min read
भूता परस्परे पडो मैत्र जिवांचे
सुमारे एक लाख वर्षांपूर्वी आपल्या पूर्वजांनी शिकारीसाठी दगडाचा हत्यार म्हणून वापर केला. तिथपासून ते आज इंटरनेट क्रांतीपर्यंतचा हा प्रवास विलक्षण थक्क करणारा आहे. उत्क्रांतीच्या अनेक टप्प्यांचा हा प्रवास अजूनही चालूच आहे. आपले राष्ट्र आणि आपण सारेजण या प्रवासाचे एक भाग आहोत. आज भारताकडे उड्डाणवाहक, मिसाईल्स, विमाने आणि अतीउच्च तंत्रज्ञानाची सगळीच साधने उपलब्ध आहेत. एक सशक्त राष्ट्र म्हणून जगाच्या नकाशावर सन्मान मिळवत असतानाच एक सशक्त निरोगी समाजाची उभारणी करण्याचं आव्हान आजच्य
Jun 18, 20172 min read
ऊर्जादायी भक्तीसोहळा
विठोबा, ज्ञानोबा, तुकोबा, शिवबा आणि सह्याद्री हे महाराष्ट्राचे पंचप्राण! मराठी माणसाचे अध्यात्मिक वैभव ठरणारी, सामान्य माणसांत श्रद्धा जागवणारी, त्यांच्यात विश्वास निर्माण करणारी आणि भक्तीमार्गातून जगण्याचा आधार ठरणारी पंढरीची वारी वर्षानुवर्षे सुरूच आहे. कोणीही निमंत्रण न देता, ठरलेल्या वेळी, ठरलेल्या मार्गाने, ठराविक ठिकाणी पोहोचणारे वारकरी हे जागतिक व्यवस्थापन तज्ज्ञांसाठी मोठे आश्चर्य आहे. ‘ज्ञानोबा माऊली तुकाराम’चा जयघोष करत आपापल्या दिंड्या घेऊन या आनंदसोहळ्यात, भक्ती
Jun 18, 20173 min read


चित्रपट सृष्टीतील महानायक
1969 साली राजेश खन्ना यांचा ’आराधना’ चित्रपट आला. 1973 साली ’नमकहराम’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. त्यात राजेश खन्ना आणि अमिताभ बच्चन होते. त्याच वर्षी म्हणजे 1973 साली ’जंजीर’ चित्रपट आला, ज्याचे हिरो अमिताभ बच्चन होते. 1991 साली ’हम’ चित्रपट आला, ज्याचे हिरोही अमिताभ बच्चन हेच होते. हे लिहिण्याचे कारण म्हणजे 1969 साली ’आराधना’ हा चित्रपट आल्यानंतर राजेश खन्ना यांनी ’सुपरस्टारडम’ची सुरुवात केली. मोतीलाल यांच्यापासून ते दिलीपकुमार, देवआनंद यांच्यापर्यंत कुणालाही अप्राप्त असे लो
Jun 16, 20176 min read


पू. साने गुरुजींच्या साहित्यातून दिसणारा स्त्री विषयक दृष्टिकोन
पांडुरंग सदाशिव साने अर्थात पू. साने गुरुजी यांची विपुल साहित्य संपदा आहे. अभ्यासू आणि ज्ञानपिपासू गुरुजींना अध्यापन, पत्रकारिता, समाजकारण आणि राजकारणाचा मोठा व्यासंग. अनुभवांच्या कसोटीवर खरे उतरलेले आणि हृदयाच्या आतून आलेले असल्याने त्यांच्या साहित्याला वैचारिक अनुष्ठान होते. सततच्या सूक्ष्म अशा चिंतनातून आल्यामुळे त्याला वेगळी जीवनदृष्टी आहे. त्यांच्या लेखनाला मराठी वाङ्मयात स्वतंत्र स्थान आहे. त्यांनी 19 कादंबर्या, 15 कथासंग्रह, 16 कथा वाङ्मय, 2 कवितासंग्रह, 12 निबंध, 20
Jun 16, 20178 min read
bottom of page
.jpg)




