top of page
विशेष लेख
वाचाळवीर हरी नरके
‘हा कसला महात्मा? ही तर फुले नावाची दुर्गंधी’ अशा आशयाची अत्यंत संतापजनक आणि चुकीची मांडणी बाळ गांगलसारख्या कोणी केल्यावर किंवा ‘हले डुले महात्मा फुले’ अशी म्हण कुणी अग्रलेखातून मांडल्यावर त्याचा तीव्र विरोध व्हायलाच हवा. महात्मा फुले हे कोणत्याही एका जातीधर्माचे नाहीत तर ते सर्वांचेच आहेत. महात्मा फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाईंनी जे योगदान दिलंय ते शब्दातीत आहे. त्यामुळे त्यांच्याविषयी, त्यांच्या तत्त्वज्ञानाविषयी अशी चुकीची मांडणी कोणी कोणत्याही काळात केली तरी ती निषे
Jul 12, 20215 min read
आर्ट ऑफ ‘पॉलिट्रिक्स!’
‘‘अणीबाणी लोकांसाठी त्रासदायक असली तरी माझ्यासाठी ती चांगली होती. कारण ना. ग. गोरे, एस. एम. जोशी, मोहन धारिया त्याकाळी आमच्या बडोद्याच्या घरात रहायला होते. मी पक्का संघवादी. अणीबाणीच्या काळात आमच्या घरातील या समाजवाद्यांचं वास्तव्य तिथं काम करणारा पोर्या बघत होता. तो या सगळ्यांना चहा देत होता, त्यांची सेवा करत होता. हे सगळे माझे स्नेही म्हणून ते त्याला त्याचं कर्तव्य वाटत होतं. ती मंडळीही त्याला शाबासकी द्यायची. मला ते आवडायचं नाही. मी त्याला रागावून विचारलं, ‘‘अरे तू स्वयं
Jun 29, 20214 min read
प्लेग, रँड, चापेकरबंधू आणि टिळक-बदनामीचे नवे षडयंत्र!
गेली काही… खरेतर अनेक वर्षे २२ जून १८९७ ही तारीख तशी लोकांच्या विस्मरणात गेलेली होती. क्वचित कधीतरी दूरदर्शन वर लागणाऱ्या ‘२२ जून १८९७” ह्या नावाच्या आणि (त्या घटनेवरच्या/विषयावरच्या) एकमेव मराठी चित्रपटाखेरीज फार काही कुठे दाखवले जात नसे. {ह्या चित्रपटाबाबत दुर्गा भागवत ह्यांची एक आठवण आहे, त्यानी ह्या चित्रपटातील स्त्रियांनी नऊवारी साडीचा पदर नीट न घेतलेला दाखवल्याबद्दल आणि त्यांच्या केशभूषा(खोपे) चुकीच्या म्हणजे पेशवाईच्या काळातील दाखवल्याबद्दल दिग्दर्शक नचिकेत आणि जयू पट
Jun 26, 202112 min read
भाजप नेत्यांच्या भेटीआडून शरद पवार आणि उद्धव ठाकरेंचे शह-काटशह सुरू
सध्या महाराष्ट्रातील राजकारण चांगलेच तापल्याचे पाहायला मिळत आहे. त्याचे कारण म्हणजे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची बंद खोलीतील भेट तर तिकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उद्धव ठाकरे यांची बंद खोलीतील अर्धातासाची चर्चा या परस्पर विरोधी घटना नक्की कशाचे द्योतक आहेत हे अनेकांना न समजणारे आहे. त्यामुळेच महाराष्ट्राचे राजकारण नक्की कोणत्या वळणावर आहे याबाबत अनेक तर्कवितर्क लढविले जात आहेत. एकीकडे राजकारणात धुरंधर असलेल्या दोन दिग्गज नेत
Jun 14, 20213 min read
माझ्या यशामागील स्त्री प्रेरणा
हा लेख ‘चपराक’च्या संपादकांनी माझ्याकडून लिहून घेतला आहे त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो. या विषयावर लेख लिहिणे अवघड आहे. कवीला आयुष्यातल्या सगळ्याच गोष्टी उघड करता येत नाहीत. काही कळ्यांची, फुलांची काळजी घ्यावीच लागते. विषय आहे, ‘माझ्या यशामागील स्त्री प्रेरणा’! माझ्यासमोर सवाल खडा आहे, मी यशस्वी आहे काय? ज्या कवितेच्या क्षेत्रात मी आजतागायत उमेदीने लिहित आहे त्यात मी यशस्वी आहे का? या लेखासाठी तुम्ही आणि मी असं गृहित धरू की, मी बर्यापैकी कविता लिहून बर्यापैकी यशस्
Jun 8, 20213 min read
जागा हो!
एकदा कोरोनाशी बोलून, तो एवढा क्रूर का वागतोय हे मला त्याला विचारायचं होतं! पण तो तर नजरेला न दिसणारा अदृश्य जीव! कसं काय बोलणार त्याच्याशी? असा विचार करत असताना, मनात विचार आला, अरे परमेश्वरही अदृश्यच आहे तरी आपण त्याच्याशी बोलतो मग कोरोनाशी बोलणं का शक्य नाही? कोरोना मला दिसत नसला तरी देखील मी त्याच्याशी संपर्क साधण्यात यशस्वी झालो. तो तशा शांत होता. म्हणून मीच त्याला पहिला प्रश्न केला, ‘‘का रे! तू आमच्याशी एवढा क्रूर पणे का वागतोस?’’ त्यावर तो म्हणाला, ‘‘अरे मी एवढा क्रूर
Jun 7, 20212 min read
आधुनिक पिढी
21 व्या शतकात जन्माला आलेली ही पिढी फारच चौकस आहे. कोणत्याही गोष्टीबद्दलची सखोल माहिती मिळाल्याशिवाय शांत बसत नाही. नोकरी अथवा व्यवसाय करण्यासाठी संगणकाच्या मदतीने ते पूर्ण माहिती आत्मसात करून घेतात. ती माहिती पटली तरच ते त्यावर कृती करतात. या पिढीने काळाची पावले लवकर ओळखली आहेत. पुस्तकी ज्ञानाबरोबरच ते संगणकीय ज्ञानालाही तेवढेच महत्त्व देतात. संगणकीय ज्ञानामुळे त्याच्या विचारशक्तीलाही एक प्रकारचा वेग मिळाला आहे. ते कोणत्याही गोष्टीचा सखोल अभ्यास करून ती गोष्ट जास्तीत जास्त
Jun 7, 20215 min read
पुरंदरचा तह
रायरेश्वराच्या मंदिरात वयाच्या पंधराव्या वर्षी आपले बालमित्र आणि मावळ्यांसोबत शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्मितीची शपथ घेतली आणि आदिलशाही व मोगलशाही विरुद्ध उघड संघर्षाला सुरुवात झाली. शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्मितीची शपथ घेईपर्यंत आलमगीर औरंगजेबाचा सर्वात मोठा शत्रु म्हणजे आदिलशाहीच होती पण १६५९ साली शिवाजी महाराजांनी स्वतः प्रतापगडाच्या पायथ्याशी अफजलखानाचा कोथळा बाहेर काढून वध केला आणि या घटनेने औरंगजेबाच्या मनातही जबर भीती निर्माण केली. ही भीती निर्माण होण्याचे का
Jun 6, 20214 min read
शिवप्रताप
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आणि अफजलखान यांच्या संघर्षावर आधारित असलेल्या ‘शिवप्रताप’ या उमेश सणसलिखित कादंबरीचे हे एक प्रकरण. ‘चपराक प्रकाशन’ची सर्वोत्कृष्ट निर्मिती असलेल्या या शिवदिग्वीजयाच्या रोमांचकारी आणि अत्यंत प्रेरणादायी कादंबरीची नवी आवृत्ती लवकरच प्रकाशित होत आहे. शिवराज्याभिषेकदिनानिमित्त हे प्रकरण जरूर वाचा. आपल्या अभिप्रायाचे स्वागत. महालात जाऊन राजांनी कपडे बदलले. काही वेळ विश्रांती घेतली. झालेल्या सर्व घटनांचा प्रचंड असा शारीरिक व मानसिक
Jun 6, 202118 min read
१८ जून शेतकरी पारतंत्र्य दिवस का ?
भारतीय राज्यघटनेतील पहिली घटनादुरुस्ती घटना अंमलात आल्याच्या दुसऱ्याच वर्षी १८ जून १९५१ मध्ये करण्यात आली. घटनादुरुस्तीचा विषय संविधानाच्या अंमलबजावणीनंतर दुसऱ्याच वर्षी समोर आला.पहिली घटना दुरुस्ती (भारतीय राज्यघटना) पहिल्या घटनादुरुस्तीचा मसुदा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी तयार केला. देशातील जमीनदारी नष्ट करण्यासाठी नेहरूंनी जे पाऊल उचलले होते त्याला डॉक्टर आंबेडकरांनी खंबीर साथ दिली आणि सामाजिक न्याय प्रस्थापित करण्याच्या दृष्टीने ही घटना दुरुस्ती महत्त्वाची होती. परंतु जी स
Jun 4, 20215 min read
आभास
शिरपूर, जि. धुळे येथील लेखिका सौ. शिल्पा प्रसन्न जैन यांचा ‘आभास’ हा कथासंग्रह ‘चपराक प्रकाशन’ने प्रकाशित केला. या पुस्तकाला ज्येष्ठ पत्रकार सुभाषदादा कुलकर्णी यांनी लिहिलेली ही प्रस्तावना. हा कथासंग्रह घरपोच मागविण्यासाठी ‘चपराक’च्या वेबसाईटला जरूर भेट द्या. सौ. शिल्पा जैन यांचा प्रकाशित होणारा हा पहिला कथासंग्रह. समाजातील स्त्री मनाशी, त्यांच्या भावविश्वाशी जवळिक साधणारा हा कथासंग्रह आहे. समाजात रोज जे घडते, स्त्रियांना ज्या समस्यांना रोज सामोरे जावे लागते त्यांचे बारकाईने
Jun 1, 20213 min read
आयपांढरीतली माणसं : दखलनीय व्यक्तिचित्रण!
नुकताच सुधाकर कवडे लिखित ‘आयपांढरीतली माणसं’ हा व्यक्तिचित्रणसंग्रह वाचण्यात आला. ‘चपराक प्रकाशन’ने प्रकाशित केलेल्या या संग्रहाचे मुखपृष्ठ संतोष घोंगडे यांनी अत्यंत लक्षवेधक असे चितारले आहे. प्राचार्य शिवाजीराव बागल यांनी ‘आयपांढरीतल्या माणसांचा’ कानोसा घेताना, ग्रंथाची पाठराखण करताना ओळख करुन दिली आहे. मलपृष्ठावर ख्यातकीर्त साहित्यिक प्रा. डॉ. द. ता. भोसले यांनी शुभेच्छारुपी निवेदन केलेले आहे. तसं पाहिलं तर व्यक्तिचित्रण हा साहित्य प्रकार तसा अवघडच कारण लिहिण्याच्या ओघात,
May 28, 20213 min read
चारित्र्याचा महान आदर्श
आपल्या वर्तमानाला आकार देऊन भविष्याची ऊर्जस्वल स्वप्ने सजवण्यासाठी इतिहासाच्या पानात डोकावून त्यातून योग्य तो बोध घेणे गरजेचे आहे. ज्यांना इतिहास माहीत नसतो त्यांचा वर्तमान आणि भविष्य अंधकारमय होतं हा इतिहास आहे. इतिहासात झालेल्या चुकांमधून बोध घेणे, त्या चुका पुन्हा होऊ नये यासाठी प्रत्येक इतिहास घडवू पाहणार्याला इतिहासाचं ज्ञान असणं आवश्यक आहे. ‘मेवाडनरेश महाराणा प्रताप’ हे पुस्तक ही गरज अत्यंत अचूकपणे पूर्ण करते. जगाच्या पाठीवरील सर्वात शक्तिशाली साम्राज्याशी, सर्वात क्
May 28, 20213 min read
रिलेशनशिप
हातात डोकं गच्च धरून, जोर जोरात आदिती ओरडत होती. ‘‘जा इथून सगळे जण... कोणी नकोय मला... मला एकटं राहू द्या.... मला थोडी तरी शांतता हवीय... जाऽऽऽ... प्लिज... जाऽऽ... हात जोडते... पाया पडते...’’ पण तिचा आक्रोश कोणी ऐकायलाही तयार नव्हतं. आई, बाबा, ताई, मैत्रिणी सगळेजण तिच्या भोवती गोळा होऊन तिला विचारत होते, ‘‘काय केलंस तू हे? डॉक्टर ना तू? का? कशासाठी?’’ आणि आदितीकडे कोणत्याच प्रश्नांची उत्तरं नव्हती. खरंतर उत्तरं देता येऊ नयेत कोणाला असे प्रश्न तरी आयुष्यात का निर्माण व्हावेत?
May 28, 20214 min read
राज्यकर्ते बदलले, परिणाम का बदलला नाही?
लोकशाहीमध्ये लोकांचा राजकीय तसेच प्रशासकीय प्रक्रियेतील सहभाग लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी अत्यंत महत्त्वाचा असतो. जनसहभागाचा अर्थ आणि स्वरूप जनतेचा प्रशासकीय सहभाग म्हणजे प्रशासकीय प्रक्रियांवर लोकांचे नियंत्रण होय. हा सहभाग दोन प्रकारे अभ्यासता येऊ शकतो. एक म्हणजे जनतेचा सामान्य प्रशासनातील सहभाग आणि दुसरा म्हणजे जनतेचा विकास प्रशासनातील सहभाग. सामान्य प्रशासनातील जनतेचा सहभाग पुढीलप्रमाणे असल्याचे आढळून येते. जनतेच्या सहभागाचे प्रमुख साधन म्हणून निवडणूक महत्त्वाची असते. निवडण
May 28, 20214 min read
बौद्धिक मागासपणाचे काय करणार?
मानवी जीवन हे विलक्षण आहे. आपापल्या सापेक्ष जीवनचौकटीत तो आपले आयुष्य जगत असतो, धारणा बनवत असतो. आपले व्यक्तिमत्व आपापल्या कुवतीप्रमाणे समृद्ध वा अवरुद्ध करण्याचा प्रयत्न करत असतो. या समृद्धीच्या वा अवरुद्धीची उंची-खोली मोजत बसण्याचे खरे तर कारण नाही. प्रत्येकाचे जीवन हा एक स्वतंत्र अनुभव असतो. कोणताही बाह्य विचार मनुष्य पूर्णपणे स्वीकारत नाही. मग तो धर्मविचार असो की राजकीय विचार. अर्थविचार असो की सामाजिक विचार. अनेकदा प्रत्येकजण विविध विचारांच्या सापेक्ष उपस्थितीत आपल्या स्
May 28, 20214 min read
मलमपट्टी नको; माणूस उभा करा!
कोरोनासारख्या जागतिक महामारीमुळं भयप्रद परिस्थिती निर्माण झालेली असतानाच विविध प्रांतात निसर्गाचं तांडवही अनुभवायला येत आहे. मागच्या वर्षी कोकण भागात निसर्ग चक्रीवादळानं हाहाकार उडवला. यंदाही तौैक्ते वादळानं होत्याचं नव्हतं झालं आहे. गेल्या वर्षी निसर्गाच्या तडाख्यानं कोकणवासीयांचं अतोनात नुकसान झालं. नारळ, पोफळी, फणस, कोकम, जायफळाच्या बागा क्षणार्धात उद्ध्वस्त झाल्या. शेकडो वर्षांची झाडं उन्मळून पडली. डोळ्यादेखत सगळं भुईसपाट होऊनही कोकणी माणसानं धीर सोडला नाही. न खचता, न डगम
May 28, 20214 min read
वात, वारा आणि हवा
वरवर पहाता या तिन्ही शब्दांचा अर्थ सारखाच आहे. हवा वाहू लागली की त्याला वारा म्हणतात हे आपण शाळेतच शिकलो आहोत. हे तिन्ही शब्द जरी समानार्थी असले तरी प्रत्येक शब्द विशिष्ठ ठिकाणीच शोभून दिसतो/चपखल बसतो. अमुक एक जागा हवेशीर आहे असे म्हणताना हवा या शब्दाच्या जागी वारा शब्द चपखल बसत नाही. हवेतील प्राणवायू हा सजीवांना जीवित ठेवणारा मोठा घटक आहे. आपण शाळेत असेही शिकलो आहे की वनस्पती हवेतील कार्बन डॉय ऑस्काईड हा घटक शोषून घेतात व त्यामुळे सजीवांना शुद्ध प्राणवायूचा पुरवठा निसर्गा
May 24, 20215 min read
समाज अध:पतनाला जातोय...
अडीच हजार वर्षापूर्वी गौतम बुद्धांनी जातक कथा लिहिल्या कारण समाज अध:पतनाला जात होता. सातशे वर्षांपूर्वी ज्ञानेश्वरांनी माणसाच्या खलप्रवृत्तीचं वाकडेपण नष्ट करण्यासाठी विश्वनियंत्याकडे पसायदान मागितलं कारण समाज अध:पतनाला जात होता. तीनशे वर्षापूर्वी समर्थ रामदासांनी दासबोध लिहिला त्यात मुर्खांची लक्षणं सांगितली. तेव्हाही समाज अध:पतनाला जात होता. दीडशे वर्षांपूर्वी लोकहितवादींनी लोकपत्र लिहिली, निबंध लिहिली गेली तेव्हाही समाज अध:पतनाला जात होता आणि आज एकविसाव्या शतकात समाजातील प
May 23, 20213 min read
विष्णुशास्त्री चिपळूणकर
विष्णुशास्त्री कृष्णशास्त्री चिपळूणकर यांची आज १७१वी जयंती! २० मे १८५० रोजी त्यांचा जन्म झाला. निबंधकार, लेखक, पत्रकार आणि देशभक्त अशी त्यांची ओळख! १८७४ साली त्यांनी 'निबंधमाला' हे मासिक प्रकाशन सुरु केले. कृष्णशास्त्री चिपळूणकर यांचा जन्म पुणे येथे झाला. महान मराठी ग्रंथकार आणि रसिक विद्वान आणि समाजसुधारक अशी त्यांची ओळख. निबंधमालाकार विष्णुशास्त्र्यांचे ते वडील. पुण्याच्या पाठशाळेत कृष्णशास्त्र्यांनी संस्कृताचे अध्ययन केले. त्यांच्या कुशाग्र बुद्धिमत्तेमुळे, त्यांच्या गुर
May 20, 20212 min read
bottom of page
.jpg)




