top of page
विशेष लेख
जे सानुकूळ श्रीगुरु
एका मित्राच्या लग्नाला गेलो होतो. सोबत पत्नी होती. वर्हाड आलेलं होतं. त्या वर्हाडामध्ये त्या मित्राचे आणि आमचे दोघांचेही शिक्षक लग्नासाठी आले होते. मी त्यांच्या पायावर वाकून नमस्कार केला. तितक्यात मला एका मित्राने हाक मारल्यामुळे मी त्याच्याकडे गेलो नि माझी पत्नी आणि सर गप्पा मारत बसले. सायंकाळी घरी परत आल्यानंतर पत्नीला विचारलं, "काय म्हणाले सर?" त्यावेळेस ती म्हणाली, "तुमचे सर खूप भावूक आहेत. ते म्हणाले, की तुम्ही त्यांच्या आयुष्यातले सगळ्यात उत्तम विद्यार्थी होतात. तुमची
Sep 5, 20205 min read
बळी तो...
आता जमाना बदलला आहे. सगळ्या व्याख्याच बदलायला लागल्या आहेत, म्हणी उलट्या पालट्या व्हायला लागल्या आहेत. त्यांचे अर्थच बदलायला लागले आहेत. सगळ्या क्षेत्रात आनंदी आनंद आहे. कुठल्याही व्यवस्थापनात जा एका चकरेत काम होणारच नाही आणि एका चकरेत झालेच तर आपणच चक्कर येऊन पडू, असं कसं झालं म्हणून. एखादा माणूस गोड बोलला तरी भीती वाटते, हा का बुवा गोड बोलला? काय असेल याच्या मनात? एखाद्याने आपले काम ताबडतोब केलं तरी मनात शंका निर्माण होते, 'ह्याचा काय फायदा असेल बरं आपल्याकडून, म्हणून एवढ्य
Sep 4, 20204 min read
‘मिशन एम्प्लॉयबल’चा आधार गेला
अन्न, वस्त्र, निवारा अशा कोणत्याही मूलभूत गरजा पूर्ण करायच्या असतील तर हाताला काम असणं गरजेचं असतं. गेल्या दशकातील बदलते ट्रेंड पाहता आय. टी. क्षेत्र झपाट्यानं वाढलं. जगभर रोजगाराच्या असंख्य संधी उपलब्ध झाल्या. ‘आयटीत जा आणि ऐटीत जगा’ असं पालकांकडून सांगण्यात येऊ लागलं. आयटीतल्या मुलांचा लग्नाच्या बाजारातला भावही वाढला. संगणक क्रांती झाल्यावर आयटीमुळं अनेकांचं जगणं सुधारलं. अनेकांच्या आयुष्यात स्थैर्य आलं. या क्षेत्रातलं शिक्षण पूर्ण झाल्यावर नोकरीची शोधाशोध सुरू होते आणि मग
Sep 3, 20202 min read
ब्रह्मचर्यावर बोलू काही!
'एक वेळ हिमालयासारखा महापर्वत स्थानभ्रष्ट होईल, आकाश कोसळेल, अग्नी शीतल होईल, पाण्यासारखे पदार्थ स्वतःचे गुणधर्म, स्वतःची ओळख सोडतील पण हा भीष्म केलेल्या ब्रह्मचर्य या प्रतिज्ञेचा कधीही भंग होऊ देणार नाही...' असे ठाम उद्गार आहेत पितामह भीष्माचार्य यांचे. ज्यांनी आजन्म ब्रह्मचारी राहण्याचा संकल्प केला आणि एखादी उपासना करावी त्याप्रमाणे ते स्वतःच्या प्रतिज्ञेशी प्रामाणिक राहिले म्हणूनच आज एखाद्याने कोणताही प्रण केला, प्रतिज्ञा केली की आपण त्यास भीष्मप्रतिज्ञा म्हणतो. पितामह भ
Sep 3, 202013 min read
लातूरचा ऍग्रोसेल
32 वर्षांपूर्वी मार्केट कमिटी कायद्याविरुद्ध केलेला रचनात्मक कायदेभंग साधारण 1998 मध्ये, वर्ष नेमके आठवत नाही. त्या वर्षी आम्ही लातूरला 'ऍग्रोसेल' भरवला होता. लातूरच्या मार्केट कमिटीत शेतीमालाची आवक फार मोठ्या प्रमाणात होत असे. कोट्यवधी रुपयांची उलाढाल व्हायची. खरेदीदार मात्र 60-70च होते. कोट्यवधी रुपयांचा व्यापार मूठभर व्यापाऱ्याच्या मुठीत होता. हे खरेदीदार लायसन्सधारक होते. मार्केट कमिटीने त्यांना परवाना दिलेला असायचा. मार्केट कमिटी आपल्या बगलबच्यांना परवाना देणार. ही सं
Sep 2, 20203 min read
देणाऱ्याने देत जावे
अनंत काणेकरांचा 'दोन मेणबत्त्या' नावाचा लघुनिबंध आम्हाला शाळेत असताना अभ्यासक्रमात होता. या लघुनिबंधातील पुढील वाक्य आयुष्यभर लक्षात राहिलं, 'दुसऱ्यासाठी जगलास तर जगलास स्वतःसाठी जगलास तर मेलास' हे पटवून देण्यासाठी त्यांनी दोन मेणबत्त्यांचे उदाहरण दिले आहे. एक मेणबत्ती स्वतःला जाळून रात्रभर लोकाना प्रकाश देते तर दुसरी मेणबत्ती, जिचा काहीच उपयोग झाला नाही म्हणून सडून, कुरतडून वाया जाते. असेच काही लोक आपण समाजात पाहतो जे स्वतःची परिस्थिती असो की नसो सतत दुसऱ्याला मदत करत अस
Sep 2, 20204 min read
अजातशत्रू व्यक्तिमत्त्व - प्रणव मुखर्जी
स्वतंत्र भारताच्या इतिहासात आजपर्यंत उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, ओरिसा, पंजाब, आसाम आणि महाराष्ट्र या राज्यांमधील दिग्गज नेत्यांना राष्ट्रपती पदावर विराजमान होण्याची संधी मिळाली होती. त्यानंतर मात्र पहिल्यांदाच हा मान काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केन्द्रीय अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांच्या रूपानं पश्चिम बंगाल या राज्याला मिळाला. त्यांनी २५ जुलै २०१२ रोजी राष्ट्रपतीपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर १४ जुलै २०१७ पर्यंत पाच वर्षे देशाचं हे सर्वोच्च असलेलं पद भूषविलं!
Sep 1, 20204 min read
शिंदेसर गेले आणि भीमाशंकर राहिलं!
‘भीमाशंकरला माझ्याकडे फार मोठी टीम नाही परंतु सर्वांच्या सहकार्याने तिथे पर्यावरण संमेलन शक्य आहे. तुम्ही सगळे सहपरिवार भीमाशंकरला या. तुमचे स्वागत आहे.’ या शब्दांना आता आम्ही पर्यावरण मंडळाचे सारे सदस्य कायमचे पोरके झालोय. भीमाशंकरजवळ, पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यात वास्तव्याला असलेले, ‘निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळ’ संस्थेचे कार्याध्यक्ष गोरखनाथ दगडू शिंदे (सर) यांचे १७ ऑगस्टला ‘कोरोना’ने निधन झाले. पुणे जिल्ह्याच्या इतिहासात, शासकीय आदिवासी आश्रमशाळेत
Aug 31, 20204 min read
जयाचे आत्मतोषी मन राहे
"सर उद्या सुट्टी आहे का?" पिंकी म्हणाली. "हो, उद्या जन्माष्टमीची सुट्टी आहे. शाळा भरणार नाही." शाळेचा दरवाजा बंद करत मी म्हणालो. "नको ना सर उद्या सुट्टी. या ना तुम्ही. आपण दहीहंडी करू." धीरज म्हणाला. "अरे, आपल्याकडे साहित्य नाही. तुमच्यासाठी खास ड्रेस नाहीत. कसली दहीहंडी? त्याच्यापेक्षा सुट्टी घेऊया." असं बोलून मी गाडीकडे निघालो. तेवढ्यात किरण म्हणाला," तुम्ही फक्त या. आपण करू बरोबर." आता सगळ्यांचे चेहरे माझ्या उत्तराकडे लागलेले. मी क्षणभर विचार केला आणि म्हणालो, "ठीक आ
Aug 29, 20203 min read
खरं तर हीच वेळ!
काळ मोठा कठीण आलेला आहे. सत्वपरीक्षा घेणारा आहे. स्वयंशिस्त लावून घेण्याचा आणि कायमच असं राहण्याचा. खरं तर हीच छान संधी आहे कुटुंबाबरोबर राहण्याची, मी आहे तुमच्यासोबत घाबरू नका हे सांगण्याची. त्यासाठी आपण स्वत: सामाजिक शिस्तीचे पालन करायला हवं. काहीतरी वाचून वा पाहून घाबरून न जाता परिस्थितीला तोंड द्यायला शिकायला हवे. केवळ आलेले मेसेजेस फोरवर्ड करून हे भागणार नाही. मी माझ्या कुटुंबाचा हे महत्त्वाचे. थोडक्यात ही संधी आहे तुम्हाला, कुटुंबांबरोबर राहण्याची आणि मुलावर संस्कार क
Aug 28, 20203 min read
याज्ञसेनीच्या सुडाचा प्रवास मांडणारी कादंबरी : ‘पाच आऱ्याचं चाक’
महाभारतावर आजपर्यंत अतिशय परिष्कृत विपुल असं लेखन झालेलं आहे. महाभारतासारख्या ग्रंथाचं समाजमनाशी भावनिक नातं असते. ते नातं जपत त्यातील श्रद्धा, धारणा केलेल्या चमत्कृतीचे विवेचन व विस्तार हा लेखकासाठी कसरतीचा भाग असतो. कधीकधी सत्य, वास्तव मांडत असताना समाजावर भावनिक आघात होत असतात. ते आघात व त्यातूनच वास्तवाचे पृथक्करण हाच ऐतिहासिक कादंबरी लेखनाचे मोठे तत्त्व असते. त्याच कादंबऱ्या वाचकास विचार प्रवृत्त करतात. त्याच पठडीतील पूर्व ज्ञानाशी वैचारिक मतमतांतरे करावयास लावणारी कादंब
Aug 27, 202013 min read
सक्षम भारतीय महिला
एक आदर्श सोसायटी म्हणून नावाजलेल्या आमच्या सोसायटीमध्ये काही चांगल्या प्रथा आम्ही सुरुवातीपासूनच अमलात आणल्या आहेत. त्यामध्ये श्री दत्त जयंती, श्री गणेशोत्सव, दहीहंडी, कोजागिरी पौर्णिमा, होळी पौर्णिमा वगैरे सण उत्सव आम्ही सार्वजनिकरित्या साजरे करतो. ज्यायोगे आपली संस्कृती, परंपरा जपण्याचा आम्ही प्रयत्न करतो आणि या परंपरांचा सार्थ अभिमान बाळगतो! त्यातही दहावी बारावी मधील मुलांना प्रोत्साहन देण्यासाठी गणेशोत्सवामध्ये, सोसायटीत ज्या मुलाला किंवा मुलीला सगळ्यात जास्त मार्क मिळाल
Aug 26, 20205 min read
धीर धरा रे...
तुम्ही बसने ऑफिसला निघाला आहात, रस्त्याने नेहमीप्रमाणे गर्दीचा महापूर ओसंडून वाहत आहे. नेमका चौकातला सिग्नल बंद पडला आहे. बसच्या दोन्ही बाजूने सायकल्स, बाईक्स, टेम्पो, रिक्षा पुढे पुढे घुसत होत्या. त्यातच एक ट्रक विरुध्द दिशेने घुसला आणि सर्व बाजुनी वाहतुकीची कोंडी झाली. कुणालाही थांबायला वेळ नाहीये. प्रत्येकाला पुढे जायची घाई आहे. या प्रकारामुळे वाहतुक पूर्ण थांबली आहे. बसमधील प्रवासी अगतिकपणे आजूबाजूला चाललेला गोंगाट व हॉर्नचे कर्कश आवाज सहन करत आहेत. कुणीही आपले वाहन मागे
Aug 25, 20203 min read
सच्चाई आणि अच्छाई जपणारे मित्र
पुढती पुढती पुढती... सदैव होईजे प्रगती! ही गोष्ट आहे ऑक्टोबर 2016 ची. ‘चपराक’ दिवाळी अंकाचं काम संपवून पुढच्या साहित्य महोत्सवाच्या तयारीत व्यग्र होतो. ‘चपराक’चं कार्यालय तेव्हा शुक्रवार पेठेतील छत्रपती शाहू चौकात होतं. महोत्सवात ज्यांची पुस्तकं प्रकाशित करणार असं जाहीर केलं होतं त्या लेखकांची तिथं दिवसरात्र गजबज असायची. आमच्या कार्यालयात विविध क्षेत्रातील मान्यवरांची इतकी ये-जा असते की जणू हे महाराष्ट्रातलं एक प्रमुख साहित्यिक, सांस्कृतिक केंद्रच असावं. एक पुस्तक छपाईला द्या
Aug 25, 20205 min read
समर्पण...
एकदा संत कबीर महाराजांकडे एक युवक आला. त्यानं कबीरांना विचारलं, "महाराज विवाह करणं योग्य आहे की अयोग्य?" ते ऐकून न ऐकल्यासारखं करत कबीरांनी प्रथम त्या युवकाकडे दुर्लक्षच केलं! काही वेळाने युवकाने अधीर होऊन परत तोच प्रश्न विचारला. मात्र त्यावेळीही कबीरांनी काही उत्तर न देता आपल्या पत्नीला हाक मारली व म्हणाले, "अगं आतून जरा कंदील घेऊन ये." तेव्हा युवकाला मोठं आश्चर्य वाटलं. न राहवून तो म्हणाला, "महाराज आता दिवसाढवळ्या कंदिलाची काय गरज आहे? एवढ्या उजेडात तर सगळं काही स्वच्छ दिस
Aug 25, 20203 min read
राज्यघटनेचे स्वयंघोषित ‘बॉडीगार्ड!’
प्रवीण विठ्ठल तरडे हे एक चित्रपट निर्माते आणि अभिनेते आहेत. त्यांनी त्यांच्या घरातील गणपतीची सजावट करताना विद्येची देवता असलेल्या गणनायकाला वंदन म्हणून पुस्तकांची आरास करायचे ठरवले. तशी आरास केली आणि ती करताना इतर पुस्तकांबरोबर गणपतीच्या खाली भारतीय संविधानाची प्रत ठेवली. समाजमाध्यमावर त्यांनी या देखाव्याचा फाटो टाकताच अनेकांकडून त्यांना कडवा विरोध सुरू झाला. ते पाहता त्यांनी त्यांची पोस्ट काढून टाकली आणि जाहीर माफी मागितली. विशेषतः ही माफी मागताना ‘आरपीआय, भीम आर्मी, पँथर अश
Aug 23, 20206 min read
रामफळ
बदली झाली तसे पुन्हा जुन्या शाळेत म्हणजे शाळेच्या गावाला जायला जमलेच नाही. जाण्याचे कारणही नव्हते. दोन्ही गावे तालुक्याच्या दोन विरूध्द टोकाला. अचानक एका दशक्रिया विधीच्या निमित्ताने जाण्याचा प्रसंग आला. मूलं मला पाहून लपून बसायची. हळूच डोकावून पाहायची. नजरानजर झाली की खुदकन हसायची. दोष त्यांचा नव्हताच. हे होणारच होतं.जवळपास वर्षाने मी गावात जात होतो. खरं सांगायचं तर मीच थोडासा बुजलो होतो. वास्तविक कितीही जवळच्या नात्यामध्ये संपर्काचा खंड पडला की असं होतंच असतं-. पंधरा वीस
Aug 22, 20205 min read
विद्येच्या देवतेचा वाचनसंदेश
आज गणेश चतुर्थी. ह्या दिवशी आपण घरोघरी पार्थिव गणपतीचे पूजन करतो. त्याच्यापुढे छान आरास करतो. आपल्यातील कलागुणांना वाव देतो! परंतु ह्यावर्षी मार्च महिन्यापासून कोरोना ह्या विषाणूमुळे जगभर अगदी हाहा:कार माजवला आहे. लॉकडाऊनमुळे सगळे जग कसे ठप्प झाले आहे. महाराष्ट्रात तर ह्या विषाणूने कहरच केला आहे. गेले पाच-सहा महिने झाले सगळे व्यवहार बंद होते. सगळ्यांच्या अंगात आणि मनात नकारात्मकता भरली आहे. ह्या सगळ्या नकारात्मकतेत गणपती बाप्पाच्या आगमनाने मनाला आता कुठे थोडीशी उभारी आली आहे.
Aug 22, 20203 min read
बेरोजगारी कमी होण्यासाठी शेतीक्षेत्र खुले करा!
देशात व राज्यात कोरोना महामारीमुळे मोठे संकट आले आहे. एकूणच अर्थव्यवस्था कोलमडली आहे. प्रत्येकाचे आर्थिक गणित बिघडले आहे. सरकार म्हणून जे काही उपाय योजना करायला पाहिजे त्या सुरु आहेत. काही बाबीकडे आपल्याला लक्ष देणे गरजेचे वाटते. शहरी आणि ग्रामीण असे दोन घटक आहेत. औद्योगिक करणामुळे जनतेचा ओढ शहराकडे सुरु झाला आणि ग्रामीण भागात शेतीकडे दुर्लक्ष झाले, त्याचप्रमाणे सुधारणाही शहर केंद्रित झाल्या. भारत कृषीप्रधान देश आहे असे आपण म्हणतो. जमीनीची सुपीकता व विविधता सोबत त्यासाठी ला
Aug 21, 20205 min read
उगवतीला सलाम!
निवडणुकीचे दिवस होते. एक उमेदवार पंधरा वीस पाठीराख्यांचं मोहोळ घेऊन वॉर्डात प्रचाराला आले. अत्यंत नम्रपणे कमरेत (त्यांच्याच) वाकून प्रत्येकाला बत्तीशी दाखवत नमस्कार करीत होते. तरुणांना मिठी मारत होते. मलाच मत द्या म्हणून लाचार आवाहनही करीत होते. माझ्या ते चांगल्या परिचयाचे होते. मी स्वागताला तयार होतो. शेजारच्या लहान मुलाला कडेवर घेऊन आपुलकी दाखवत होते पण अचानक मला न भेटताच तो लवाजमा पुढे निघून गेला. मला आश्चर्य वाटलं. मी मागे असणाऱ्या एकाला विचारले, "साहेब असे एकदम का गेल
Aug 21, 20204 min read
bottom of page
.jpg)




