top of page
विशेष लेख
अन मी पोरका झालो
२२ मार्च २०२०, रात्रीचे दहा वाजले होते, नुकतीच आमची जेवणे उरकली होती. मी आणि बायको वंदना दूरदर्शनवरील बातम्या बघत बसलो होतो. कोरोना विषाणूचा जगभर जोमाने पसरत चाललेला प्रादुर्भाव व त्या संदर्भातील बातम्या ऐकून थोडेसे धास्तावल्या सारखे झाले होते. कालच जनता कर्फ्यू होऊन गेलेला होता. त्यामुळे सगळीकडे जरासे चिंतेचेच वातावरण पसरलेले होते. नाही नाही ते विचार मनात येत होते. मध्येच एक ब्रेकिंग न्यूज आली आणि त्या बातमीने तर अंगावर काटाच उभा राहिला. ती बातमी होती चीन मधील वूहान ह्या श
Aug 20, 202016 min read
सर्जकांच्या मुक्तीसाठी हाक
सर्जकांच्या मुक्तीसाठी हाक तुझ्या जाती, धर्मातला शेतकरी कंगाल, माझ्याही जाती, धर्मातला शेतकरीच कंगाल. माझ्या जाती, धर्मातली नारी गुलाम, तुझ्याही जाती, धर्मातली नारीच गुलाम. हा योगायोग आहे का? की आहे कट कारस्थान? शेतकरी आणि स्त्री यात सर्जकतेचे साम्य आहे. ते समजून घे. शेतकरी करतोय आत्महत्या स्त्रीची होते भ्रूणहत्या शेतकरी राबतो रानात स्त्री कष्टतेय घरात आणि रानातही! शेतकरर्याला सरकारी कायदे करतात गुलाम स्त्री धार्मिक जातीय परंपरांनी खचलेली! मित्रा, जाती-धर्माच्या संघर्षाचे
Aug 20, 20201 min read
दखलनीय 'दखलपात्र'!
श्री घनश्याम पाटील या तरुण, तडफदार संपादकाच्या लेखणीतून उतरलेल्या निवडक अग्रलेखांचा संग्रह 'दखलपात्र' वाचण्यात आला. मुखपृष्ठ ते मलपृष्ठ हा सारा प्रवास खरोखरच वाचनीय नि दखलनीय असाच आहे. पुस्तकाचे मुखपृष्ठ पाहूनच वाचक या पुस्तकाच्या प्रेमात पडतो. त्याचबरोबर प्रथमदर्शनी असाही प्रश्न पडतो की, संपादक म्हणजे लेखनीस सर्वस्व मानणारा प्राणी असे असताना मुखपृष्ठावर लेखनीला जोडून तलवार का बरे असावी? मात्र पुस्तकाचे अंतरंग उलगडत असताना या प्रश्नाचे उत्तर आपोआप सापडते. प्रत्येक अग्रलेख व
Aug 20, 20207 min read
निवडणुकीतली बाई
डॉ. वृषाली किन्हाळकर, नांदेड भारतातली बाई तशी नशीबवान आहे एका बाबतीत! मतदानाच्या हक्कासाठी तिला संघर्ष करावा लागला नाही! पण खरंच या गोष्टीचं काहीतरी मूल्य तिच्या मनात आहे का? मतदानाचा हक्क तिला आपसुकपणेच लाभलेला आहे पण मतदानाचा अर्थ प्रत्येक भारतीय बाईला कळलाय का? नवर्याच्या राजकारणामुळे माझा निवडणुकांशी प्रत्यक्ष संबंध आलेला आहे. गेल्या 25 वर्षांत सुमारे सहा सलग विधानसभा निवडणुका लढण्याच्या माझ्या नवर्याच्या अनुभवामुळे मला जे काही चित्र दिसलं, ते एक भारतीय माणूस म्हणून म
Aug 19, 20205 min read
ज्ञानाचा दिवा, घरोघरी लावा
"दान दिल्याने ज्ञान वाढते, त्या ज्ञानाचे मंदिर हे सत्य शिवाहून सुंदर हे... इथे मोल ना दामाचे, मोती होतील घामाचे सरस्वतीच्या प्रेमाचे, प्रतीक रम्य शुभंकर हे... चिरा चिरा हा घडवावा, कळस कीर्तीचा चढवावा अज्ञानी तो पढवावा, थेंब आम्ही तर सागर हे... त्यागाला या नाव नसे, पुण्यवान हा देश असे कल्पतरू हा उभा दिसे, त्या छायेतील मंदिर हे" असं शाळेचं वर्णन गीतकार जगदीश खेबुडकर यांनी 'जोतिबाचा नवस' या चित्रपटातील गाण्यात केले आहे. देशाचा उत्तम नागरिक घडविण्यासाठी शिक्षणाची गरज आहे. शिक्षण
Aug 19, 20204 min read
तुम्हाला नकार देणे जमते का?
"माझं थोडं ऐकता का श्यामराव? मला थोडे पैसे पाहिजे होते. आपल्या कंपनीच्या फंडातून मिळाले की लगेच परत करणार तुम्हाला! बघा नाही म्हणू नका, एक महत्त्वाचं काम निघालं वेळेवर म्हणून गरज भासली पैशांची!" "तुमचं सगळं बरोबर आहे विलासराव पण काय आहे, आता या एक तारखेलाच मुलीच्या शिकवणीचे पैसे भरले मी. नाहीतर नक्की दिले असते. प्लीज समजून घ्या हं!" अशाप्रकारचे संवाद दैनंदिन जीवनात आपल्या कानावर नेहमी पडत असतात. वेळप्रसंगी पैशाची गरज प्रत्येकालाच भासत असते हे वास्तव आहे! तरीही काही लोकाना म
Aug 18, 20204 min read
विचारांचा दरवळ
- संजीवनी घळसासी पत्रकार, लेखक, प्रकाशक, संपादक अशा अनेक जबाबदार्या एका विशिष्ठ ध्येयाने, निष्ठेने, पूर्ण क्षमतेने, उत्साहाने व आनंदाने पार पाडणारे ‘चपराक प्रकाशन’चे प्रकाशक घनश्याम पाटील यांचे नुकतेच प्रकाशित झालेले ‘दरवळ’ हे पुस्तक वाचले. हे पुस्तक त्यांच्या अनेक पूर्वप्रकाशित लेखांचा संग्रह आहे. हे पुस्तक अनेक विषयांना स्पर्श करते व त्यातुन लेखकाचा आदर्शवाद अधोरेखित करते. प्रसिद्ध साहित्यिक प्रा. द. ता. भोसलेसरांची उत्तम प्रस्तावना म्हणजे या पुस्तकरुपी राऊळाचे तोरणच म्हण
Aug 18, 20202 min read
ग्राहक राजा कधी होणार?
- विनोद श्रा. पंचभाई 9923797725 ‘ग्राहक राजा जागा हो’ किंवा ‘जागो ग्राहक जागो’ अशा प्रकारच्या जाहिराती आपण दूरदर्शनवर सतत बघत असतो. ग्राहकाला इंग्रजीत ‘कस्टमर’ असे म्हणतात. म्हणजेच जो कष्ट करत करत मरतो तो कस्टमर असे गमतीने म्हटले जाते. खरं तर आपल्या भारतात ग्राहकाची यापेक्षा वेगळी स्थिती नाही! स्वातंत्र्यपूर्व काळात आपल्या देशात ‘उत्तम शेती, मध्यम व्यापार व कनिष्ठ नोकरी’ अशी म्हण प्रचलीत होती. आपला देश कृषीप्रधान असल्याने बरेच उद्योग शेतीवर अवलंबून होते. तेव्हा रोख पैशांचा
Aug 14, 20203 min read
मुक्ताई
माधव गिर, पुणे चपराक मासिक, ऑक्टोबर 2011 मुक्ता! माझं बाळ ते! असे अस्पष्टसे उच्चार मुखातून बाहेर पडले खरे, पण त्याच वेळी विट्ठलपंत हळूच उद्गारले. ‘रूक्मिणी, चल आता. सावर स्वत:ला ‘हो, चलावं! रूक्मिणीनी होकार भरला पण तिचा पायमात्र तेथून हलत नव्हता. ‘रूक्मिणी, अगं, आपण हे सर्व आपल्या मुलांसाठीच तर करतो आहोत ना.’ विट्ठलपंत समजूतीच्या सुरात बोलले. ‘चल, आता रूक्मिणी, आपल्या बोलण्याने मुले जागी होण्याच्या आधीच आपल्याला निघायला हवं. ‘हो, आता निघायलाच हवं!’ तिला हुंदका दाटून आला.
Aug 14, 202014 min read
सोलापूरचा वस्त्रोद्योग काल आज उद्या
‘चपराक मासिक - व्यापार आणि उद्योग विशेषांक 2011’ - अरुण रामतीर्थकर कोल्हापूरची चप्पल जशी प्रसिद्ध आहे त्यापेक्षा किती तरी पट अधिक सोलापूरी चादर प्रसिद्ध आहे. घर म्हटले की, त्यात चार-पाच चादरी असतातच. त्या सोलापुरी असाव्यात असा गृहिणींचा आग्रह असतो. सोलापूरची माहेरवाशीण असो वा सासरवाशीण जाता येता ‘आमच्यासाठी दोन चादरी आण हं’ असे दोन-तीन निरोप तिच्याजवळ असतातच. चादरीच्या जोडीला आता टॉवेल, नॅपकीन आणि वॉलहँगिंग यांचीही निर्मिती होत असून काही वर्षांपूर्वी या व्यवसायाची सोलापुरातील
Aug 13, 20205 min read
परीक्षा गुरूंची!
काही शतकांपूर्वी कुणाचे शिष्यत्व पत्करणे, कुणाकडून अनुग्रह घेणे हे आज जेवढे सोपे आहे तेवढे सोपे नव्हते. त्याकाळी गुरु ज्यांना गुरुमंत्र द्यायचा आहे अशा शिष्याची कठीण परीक्षा घेत असत. गुरुंच्या सत्व परीक्षेतून जी व्यक्ती यशस्वीपणे बाहेर पडत असे त्यावर श्री गुरुंची कृपादृष्टी होत असे त्याला गुरुमंत्र मिळत असे . प. पू. श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांनाही अगदी लहानपणीच गुरुला भेटण्याची आस लागली होती. गणपती हे महाराजांचे पाळण्यातले नाव. गुरुंची भेट घ्यावी. विद्यार्जन कराव
Aug 13, 20208 min read
मृत्युघंटा
दीपक राइरकर, चंद्रपूर चपराक दिवाळी विशेषांक 2013 भाषा आणि संस्कृती या नाण्याच्या दोन बाजू आहेत. भाषा मेली तर संस्कृतीचा विनाश अटळ आहे. तसेच जर एखादी संस्कृती लुप्त होत असेल तर भाषा ही लोप पावणारच. जगातील अनेक भाषा आणि त्याच अनुषंगाने त्याच्याशी निगडीत संस्कृती (किंवा त्याउलट) नामशेष होण्याची अनेक उदाहरणे आहेत. त्यांच्या तपशीलात जाण्याचे कारण नाही. परंतु इथे मुद्दा आहे मराठी भाषा आणि संस्कृती या दोहोंच्या संरक्षणाचा. (संवर्धनाचा मुद्दा खूप नंतरचा) या ठिकाणी भाषेमुळे संस्कृतीचे
Aug 12, 20206 min read
21 व्या शतकातील दोन द्रष्टे
- अनिल किणीकर (चपराक दिवाळी विशेषांक 2013) एक स्टीव जॉब्झ हे कौटुंबीक असूनही कलंदर असं एक व्यक्तिमत्त्व होतं. स्टीव चर्चला नाकारत होता पण आयुष्याच्या एका टप्प्यावर त्याने झेन बुद्धिझमचा सखोल अभ्यास केला होता. एकेकाळी तो हिप्पी पंथाचा शिष्य होता आणि त्यावेळी तो हरिद्वारमध्ये मनसोक्त भटकत होता. 1970 च्या सुमारास विद्रोही संस्कृतितील स्टीव हा एक संतप्त तरूण (अँग्री यंग मॅन) होता. शुद्ध शाकाहार प्रेमी स्टीव कित्येक दिवस ऍपल आणि कॅरट (सफरचंद आणि गाजरं) खाऊन राहणारा स्टीव दरिद्री
Aug 12, 202015 min read
आमचे वैचारिक पालक वृत्तपत्रे
- प्रवीण दवणे ‘चपराक दिवाळी विशेषांक 2013’ एका हाताच्या अंतरावर असणारी प्रसारमाध्यमे अगदी मघाचच्या सेकंदाला घडलेली बातमी देत असोत; अजूनही कोट्यवधी घरं सकाळच्या एका बेलची किंवा हळूच वाजणार्या कडीची वाट पाहत असतात. एक उबदार घडी, कडीत वाट पाहत असते आपली; अन् आपण त्या ‘घडी’ची! वृत्तपत्रात बातमी वाचल्यावाचून तिचं ‘बातमीतपण’ मुळी जाणवत नाही. मथळ्यांमधून उतरत जाणारी न् वेगळी असेल तर चहाच्या एक घोट घेऊन घरातल्या कुणालातरी वाचून दाखवल्यावाचून ‘बातमी’ पूर्ण होत नाही; हे निर्विवाद सत्य
Aug 11, 20204 min read
मराठीतील पहिलं वाक्य
जैसी दीपामाजी दिवटी का तीथीमाजी पूर्णिमा गोमटी तैसी भाषामध्ये मर्हाटी सर्वोत्तम! संत ज्ञानेश्वरांनी वर्णिलेल्या या मराठीतील पहिलं वाक्य श्रवण बेळगोळ येथील शिल्पावर ‘श्री चामुंडराय करविले’ हे 1039 साली कोरलेले आढळते. त्यापूर्वीचही एक वाक्य संशोधनात आढळलय. सोलापूर ते विजापूर या रस्त्यावर कुडल संगमावरील मंदिरात सन 1018 मध्ये कोरलेले वाक्य ‘वांछीतो विजयी होइबा’ हे आहे. जो वाचेल तो आयुष्यात यशस्वी होईल, असा त्याचा अर्थ आहे. मुकुंदराज यांनी सन 1196 मध्ये ‘विवेकसिंधू’ हा काव्यरूप
Aug 10, 20204 min read
आयपांढरीतल्या माणसांचा कानोसा
‘चपराक प्रकाशन’च्या या आणि इतरही पुस्तकासाठी आमच्या www.chaprak.com या संकेतस्थळाला जरूर भेट द्या. पुस्तकासाठी संपर्क - 87679 41850 श्री. सुधाकर कवडे यांच्या ‘आयपांढरीतील माणसं’ चैतन्यदायी, प्रेरणादायी आहेत. मराठी साहित्याच्या विश्वात दमदार पाऊल टाकणारा, नवा उमेदीचा व अस्सल मराठमोळ्या मातीतल्या नात्यांची वीण घट्ट करणारा, शब्दांवर प्रेम करणारा, माणसांतलं वेगळंपण जपणारा आणि आपल्या शब्द सामर्थ्यानं सामान्य माणसाच्या जगण्याला असामान्य उंचीवर बसवण्याची किमया, विद्यादेवतेचा वरदह
Jul 29, 20205 min read
आई - एक महान दैवत
द. गो. शिर्के गुरूजींनी लिहिलेल्या आणि ‘चपराक’ने प्रकाशित केलेल्या ‘आई’ या वाचकप्रिय पुस्तकातील हे एक प्रकरण. मातृभक्तीचा यथोचित गौरव करणारं हे पुस्तक प्रत्येकानं वाचायलाच हवं. हे पुस्तक घरपोहच मागविण्यासाठी ‘चपराक’च्या संकेतस्थळाला जरूर भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क - 87679 41850 हृदयाच्या मखमली पेटीत ठेवण्यासारखी दोनच अक्षरे आहेत; ती म्हणजे आई! लहान-लहान, बोबड्या बाळांच्या ओठातून व अं:तकरणातून दिसून येणारा थोर परमेश्वर म्हणजेच ‘आई’. आईचे प्रेम जिथे असेल ती झोपडी राजराज
Jul 27, 20209 min read
लॉकडाऊनच्या नावानं ‘चांगभलं’
करोनाच्या पार्श्वभूमिवर वैद्यकीय व्यवसाविषयी उलटसुलट चर्चा सुरू आहे. प्रसारमाध्यमे ‘ब्रेकिंग न्युज’च्या नावावर अनेक बातम्या चालवतात. प्रत्यक्ष फिल्डवरच्या डॉक्टरांशी, कर्मचार्यांशी मात्र कोणी बोलताना दिसत नाही. लॉकडाऊनच्या नावानं ज्यांचं ‘चांगभलं’ सुरू आहे त्यांच्याविषयी काही आक्षेप घेतलेत डॉ. प्रकाश जोगळेकर यांनी. हा लेख आवर्जून वाचा. आपल्या प्रतिक्रिया नोंदवा. टीम चपराक - सध्याची करोनाची साथ ही इतर कोणत्याही आपत्तीपेक्षा वेगळी आहे. यावर औषधही नाही व लसही नाही. आपत्ती आली
Jul 25, 20204 min read
दरवळ वाचकांना सुगंधित करणारा
‘चपराक’चे प्रकाशक आणि संपादक घनश्याम पाटील यांच्या ‘ दरवळ ’ या नव्या पुस्तकाला सुप्रसिद्ध साहित्यिक प्रा. डॉ. द. ता. भोसले यांनी प्रस्तावना लिहिलीय. ही मर्मग्रही प्रस्तावना खास ‘चपराक’च्या वाचकांसाठी. संवाद म्हणजे माणसाच्या रंगहीन व्यक्तिमत्त्वाला सुगंध देणारी सामाजिक देणगी आहे किंवा दुसर्या शब्दात बोलायचे झाले तर साद नसलेल्या माणसाच्या जीवनाला मिळालेला तो दागिना आहे, नव्हे ती देणगी आहे. ही देणगीही पुन्हा सप्तसुरांची असते. तृप्त करणारी असते. माणसाचं अस्तित्व, माणसाचं व्यक्त
May 19, 202010 min read
आधुनिक ऋषी म. म. यज्ञेश्वरशास्त्री कस्तुरे
स्तुतिर्नैव यस्मै कदा रोचते च । धनं चा पि तस्मै विषं वै सदा च ॥ सदाचार वृत्तं हि यस्यामृतं च । नमामो वयं तं हि यज्ञेश्वरं च ॥ आजच्या काळात कोणाला ऋषी कसे होते याचे प्रत्यक्ष दर्शन करावयाचे असल्यास त्यांनी श्रीचतुर्वेदेश्वरधाम सावरगांव येथे परमादरणीय प्रातःस्मरणीय महामहोपाध्याय यज्ञेश्वरशास्त्री कस्तुरे गुरूजी यांचे दर्शन घ्यावे. अत्यंत तेजःपुज गौरवर्णांकित शरीर, गंभीर मुद्रा, ज्ञान आणि त्याग याचा एकत्रित झालेला समन्वय, नेत्रातील एक वेगळीच चमक, शांत, प्रसन्न, मुखमंडल पाहिल
May 19, 20203 min read
bottom of page
.jpg)




